Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कधी हा बोरिन्ग टास्क
हा बोरिन्ग टास्क कधी सम्पणार आहे?
कालच शेवटच अन्ड पुष्करच होत वाटत.
सुशान्त टास्कमध्ये भाग न घेता शान्तपणे बेन्चवर पहुडलेला. मग अचानक पुष्करच्या अन्गावर हा धावून का आला?
हा रडक्या असा अचानक ओरडायला लागतो ना कधीकधी. 
नो body shaming प्लिज! >> +++
नो body shaming प्लिज! >> ++++ १११११
कुणीतरी स्मिता सुशांतच्या
कुणीतरी स्मिता सुशांतच्या वादाची क्लिप दावा ना...
कुठला एपिसोड आणि केव्हा घडलं नेमक ते.. वुट वर आहे का?
मी मागचा पूर्ण हफ्ता बिबॉ बघितलं नाही त्यामूळे मागे पडलीए जरा..
http://expertblogz.com
घ्या....
http://expertblogz.com/sz6b1605-8566-4611-b085-0fea430a6525/3fde413b1d5f...
expertblogz वर बीबॉ चा २४ मे चा भाग पार्ट ६
नाही दिसतय
नाही दिसतय
स्मिता महामुर्ख किन्वा
स्मिता महामुर्ख किन्वा महानालायक एक काहीतरी नक्कीच आहे. त्य सुशांत बरोबर इतके भंडण केले तेव्हा त्या ग्रूप च्या एकानेही , मुलीनेसुद्धा तिला सपोर्ट केले नाही. आणि अता ती महानालायक बाई परत त्या सुशांतच्याच गळ्यात गळे घालतेय. पुढच्या वेळी असे झाले तर कोण त्या स्मिताला जवळ करणार आहे ?
पुढच्या वेळी असे झाले तर कोण
पुढच्या वेळी असे झाले तर कोण त्या स्मिताला जवळ करणार आहे ?>>रे आणि सु
आस्ताद बाळ कॅमेरा समोर येऊन
आस्ताद बाळ कॅमेरा समोर येऊन म्हणतं सई ची गंम्मतच आहे म्हणे...डान्स करताना पाठ दुखत नाही आणि टास्क मध्ये दुखते...अरे वळू बाळा,मग तुमच्या गॅंगची जुई तर महा मोठ्ठी गंम्मत आहे रे.... आणि पुष्की आणि सई बद्दल बोलला रड्या पाशी... अरे तुझ्या गॅंगचा 'दादा' रा आणि तुमची रे 'ताई' या बद्दल काय मत आहे मग त्याचं...
जुई आणि सुशांत अतिशय फालतू
जुई आणि सुशांत अतिशय फालतू आहेत.
स्मिता महामुर्ख किन्वा
स्मिता महामुर्ख किन्वा महानालायक एक काहीतरी नक्कीच आहे. त्य सुशांत बरोबर इतके भंडण केले तेव्हा त्या ग्रूप च्या एकानेही , मुलीनेसुद्धा तिला सपोर्ट केले नाही. आणि अता ती महानालायक बाई परत त्या सुशांतच्याच गळ्यात गळे घालतेय. पुढच्या वेळी असे झाले तर कोण त्या स्मिताला जवळ करणार आहे ?
नवीन Submitted by डेलिया >>>>>>
हे बरोबर आहे. .पण इथे थोडी चुक नायक ग्रुप ची पण आहे...
जेव्हा स्मिता नायक ग्रुप मध्ये यायचा प्रयत्न करत होती तेव्हा मेघा व सई तिला निट प्रतिसाद देत नव्हते..
स्मिताला मग परत खलनायक ग्रुप मध्ये येण्या शिवाय पर्याय नाही..
पण तिथे तरी तिला कोण विचारतं?
पण तिथे तरी तिला कोण विचारतं?
>>हा पुर्वी टास्क करायची
>>हा पुर्वी टास्क करायची चांगले पण ते कंबर दुखी नंतर तर तेही धड नाही<<
सई जाइल बहुतेक, एलिमिनेट होउन रिटायर्ड हर्ट होउन नाहि...
बिग बॉस नंतर कलर्स साठी एक
बिग बॉस नंतर कलर्स मराठीसाठी एक आयडीया !
नवीन सिरियल ’बिग फॅमिली’ !
एक भलीमोठी महाजॉईंट फॅमिली !
पात्रपरिचय :
थत्ते आणि उना हे त्या फॅमिलीचे कंट्रोलिंग आई वडिल .
त्यांची नालायक निकम्मी मुलं : राजेश आणि सुशान्त , एकच गुडबॉय , लग्नाळु लाडका पुष्कर.
या खेरीज एक नालायक मुलगी जुई आणि तिचा नवरा इस्टेटिला हपापलेला घरजावई (घरचा भेदी) अस्ताद.
घरात २ पाताळयंत्री सूना, एकमेकींवर दररोज कुरघोडी करु पहाणार्या , रेशम आणि मेघा (अनुक्रमे राजेश व सुशानतच्या बायको)
राजेश बाहेरख्याली रंगेल, घरी बायकोला घाबरणार पण घराबाहेर एका बॉलिवुड आयटेम गर्लशी घरोबा, ती स्मिता !
रेशम दुष्ट असून नवर्याच्या प्रेमात बुडलेली आणि त्यामुळे मेघासमोर कायम हरणारी , ती मेघा समोर जिंकण्यासाठी घरजावई अस्ताद आणि नणंद जुईची मदत घेत रहाते पण घरजावई केसाने गळा कापणारा, रेशमसाठी चोरी करताना निम्म्याहून अधिक माल स्वतः गिळंकृत करणारा !
सुशान्त गुड फॉर नथिंग , ड्रग अॅडीक्ट , रागावर आणि भावनांवर ताबा नसणारा, मेघा मात्रं कोल्ड ब्लडेड, हुषार , कपटी आणि नवर्याच्या चूका कव्हरप करणारी आणि घरच्या बिझनेसमधे सर्वस्त पॉवरफुल, तसेच सासूच्या मर्जीत राहिल्याने कायम वरचढ.
अशा परिस्थतीत एक दिवस अचानक घरातला लहान मुलगा पुष्की लव्ह मॅरेज करून एक हिम्मतवाली सगळ्यांना पुरून उरणारी बायको आणणर सई !
इथे सगळ्यांच्या नकळत सासरा थत्तेचाही एक घराबाहेर घरोबा, हर्षदा खानविलकरशी , त्यांची नाजायज मुलगी ऋतुजा.
सईच्या येण्याने पेटलेल्या घरात अजून आग लावायला एक दिवस ऋतुजा येणार आपला हक्क सांगायला, ती आणि सई टिम अप करून अख्या घराला सळो कि पळो करून सोडणार.
याखेरीज घरात काही वफादार पण कनिंग नोकर !
रेशमचा नोकर भुषण , जो इकडच्या गोष्टी तिकडे करायला रेशम वहिनीला मदत करणार , रेशमची स्ट्रेंथ राजेशपेक्षा हा नोकरच !
उ.ना ची नौकरानी आरती सोलंकी जी अख्ख्या घराची महावस्ताद खबरी असेल.
सुशान्तचा वफादार नोकर विनित ज्याला सुशान्त साहेब आवडतात पण साहेबांची बायको मेघाबद्दल राग आहे !
.
.
.
एस टी वाय धागा काढावासा वाटतोय यावर
कोण विचारत नसल तरी तिला
कोण विचारत नसल तरी तिला कोणत्या तरी टीम सोबत रहावतर लागनारच ना..
स्मिता च्या बाबतीत मेघा व सई ने एक छान संधी मिस केली...
मेघाच्या टीम मधले बहुतेक सगळे
मेघाच्या टीम मधले बहुतेक सगळे हर्ट होऊनच जाणार. बिग बॉसची 'No violence' policy काही कामाची नाहीये. बिग बॉस ला हे आतलं सेलिब्रिटी पब्लिक झेपतच नाहीये.
डीजे !! _/\_ _/\_
डीजे !! _/\_ _/\_

थत्तेचाही एक घराबाहेर घरोबा, हर्षदा खानविलकरशी >>
घरजावई केसाने गळा कापणारा, रेशमसाठी चोरी करताना निम्म्याहून अधिक माल स्वतः गिळंकृत करणारा !>>> >अरे काये हे
दिपान्जली
दिपान्जली
दीपांजली ताई
दीपांजली ताई

आज उरलेल्या दोन सदस्यांची
आज उरलेल्या दोन सदस्यांची म्हणजे पुष्की आणि त्याखाची अंडी(पिलि
) बाहेर आली. व्हिलन गँगचे नसल्याने ती रितसर नष्टही झाली. त्या दरम्यान सुशांत आणि अस्तादमध्ये थोडी बाचाबाची सुरू होती. पुष्कीनं मला वाटतं काहीतरी वेगळं बोलायला नेमकं त्याचवेळी सुरूवात केली आणि मग पुष्की आणि सुशांतचं मोठ्ठं भांडण झालं. सुशांतनं नेहमी प्रमाणे जोरदार आरडाओरडा केला. तो पुष्कीला म्हणाला की ' तू नेतागिरी करू नकोस.' घ्या! चोराच्या उलट्या बोंबा. आणि पुष्कीची तरी हिंमत बघा, महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याशी असा पंगा घेतात होय? आता महाराष्ट्रानं वोटच नाय केलं पुष्कीला तर गेला की नाही बाराच्या भावात? जरा समोरचा माणूस बघून तरी पंगा घ्यायचा. ते थोर, नवमहाष्ट्राची आशा, जुन्या महाराष्ट्राची शान, बलसागर, वीरशिरोमणी शेलार कुठे, आपण कुठे. काय कळतंच नाय या जोगांच्या पोराला.
असो. तर दोघांना बाजूला घेऊन समजावण्यात आलं. जुईनं सुशांतला समजवण्याच्या निमित्तानं आगीत अजून थोडं तेल ओतण्याचं काम इमाने इतबारे केलं.
नंतर कितीतरी वेळ विविध ठिकाणी बसून सुशांत तो का रागावला याचं स्पष्टीकरण देत होता. मध्येच महाराष्ट्रात काय इमेज दिसेल? असाही प्रश्न पडला त्याला. तो टरकला असावा. शिवाय शनिवारी ममा शाळा घेतील की काय याचीही काळजी असेल.
पुष्की स्मितावरही भडकला होता. ती त्याखाचं अंडं प्रोटेक्ट करायच्या नावाखाली गपचूप अॅटॅकर जुईला मदत करत होती म्हणून.
आज अस्तादनं त्याच्यामते खूप भारी पॉइंट काढला. सॉरी. अस्तादनं पॉइंट काढला इतकं लिहिलं असतं तरी चाललं असतं. त्यानं काढला म्हणजे तो आपसूक भारी पॉइंट ठरणारच, नाही का? तर काय म्हणे की सई पाठ दुखते म्हणते आणि पार्टीत नाचते कशी. मग यावर ' अरेच्चा! काय असेल बरं?' असं एक स्वगत तो कॅमेरापुढे बोलला. मग हा पॉइंट त्यानं आपल्या सज्जन मित्रमैत्रीणींबरोबर शेअर केला. त्यांनाही तो पटला यात नवल काय?
आहा! म्हणजे हे त्यांनी ठरवल्याप्रमाणे आता कॅमेरासमोर मेघा आणि टीमबद्दल बोलत राहणार तर! बाळांनो, पब्लिक येडं नाहीये तुमच्यासारखं. उलट जे काही ४-८ वोटस मिळाले असते ते पण जातील हातून.
स्मिताला किचन मध्ये एक दुधाचं रिकामं भांडं न धुता ठेवलेलं दिसलं. त्यावरून तिनं कॅप्टन मेघाकडे तक्रार केली की हे सईनं कॉफी केली तेव्हा रिकामं झालं पण सईनं न धुता तसंच ठेवलंय. नंतर हा प्रकार स्मितानं सुशांतच्या कानावर घातला आणि वर म्हणाली की हा पॉइंट ती शनिवारी मांडणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचा वसा घेतलेले आपले लाडके नेते सुशांत यांच्या चेहर्यावर स्मिताच्या हुशारी प्रती अतीव आदर दाटून आलेला स्पष्ट दिसला आणि बाष्पगदगदीत होऊन त्यांनी तिची पाठ थोपटली. आता बघा, आज गुरूवार. म्हणजे शनिवार यायला अजून एक दिवस मध्ये आहे. आता या वेळामध्ये त्या पॉइंटची स्मिताच्या डोक्यात किती आणि काय जिलबी होऊन बसतेय देव जाणे. शनिवारी स्मिता पॉइंट मांडणार की नेहमीप्रमाणे गंडणार? महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छितो.
सई बाई पुन्हा त्याच लो मूड मध्ये होत्या. सगळे तिला समजावून थकले पण ही बया ढिम्म कोणाला काही सांगेना की कोणाशी काही बोलेना. अगदी रेशम ही तिला समजावून सांगत होती. शेवटी मेघानं कॅमेरासमोर बिग बॉसला सांगितलं की तिला बोलवून घ्या आणि तिच्याशी बोला. मग नंतर काही काळानं सई कन्फेशन रूममध्ये जाऊन मनातलं बोलून आली. फार काही कारण नव्हतं पण जनरली लोकांच्या दुटप्पी वागण्याचा तिला त्रास झाला होता. बिग बॉसशी बोलल्यावर आणि त्यांनी समजूत घातल्यावर सईबाईंची गाडी ताळ्यावर आली आणि तिनं बाहेर येऊन आपल्या मित्रमंडळींना हग दिला.
यावर व्हिलन मंडळी तर्क करत होती की नक्की काय झालंय. तर ते त्यांच्यामुळे झालं नसून सईच्या घरचा काहीतरी इश्शू असावा आणि त्याबाबत तिला काही मेसेज आला असावा असा त्यांनी निष्कर्ष काढला. आईशप्पथ! नेमके चुकीचे निष्कर्ष काढण्याबद्दल व्हिलन मंडळींना पिएचडीच प्रदान करायला हवी.
आज एक एव्हरयुथ फेसवॉश असा लेडिज बायकांचा टास्क झाला. त्यात दोन दोन बायकांच्या जोड्या केल्या होत्या. त्यातल्या एकीनं चार खोक्यात लपवलेल्या चाव्या शोधायच्या होत्या. प्रत्येक खोक्यात वेगवेगळे पदार्थ होते. माती, चिखल, पालापाचोळा आणि शेवटच्या खोक्यात एव्हरयुथ फेसवॉश. तर जी कोणी चावी शोधत असेल ती तो टास्क करत असताना एका पुरुष सद्स्यानं तिच्या तोंडाला तो पदार्थ फासत रहायचा. एका एका खोक्यातल्या चाव्या मिळत गेल्या की चौथ्या खोक्यातला फेसवॉश मिळणार आणि मग त्या फेसवॉशनं दुसरी टीम सदस्य टास्क करणारीचं तोंड धुऊन स्वच्छ करणार. जी जोडी कमी वेळात हे करेल ती जिंकली. संचालक - भूषण.
सई - शरा, रेशम - जुई आणि स्मिता - मेघा अशा जोड्या होत्या तर अनुक्रमे सुशांत, पुष्की आणि अस्ताद हे तोंडं रंगवणारे होते. सुशांत ज्या पद्धतीनं सईच्या तोंडावर माती, चिखल लावत होता ते बघून चीड आली. तिच्या डोळ्यांवरच तो लावत होता. नंतर पुष्की द जंटलमननं रेशमला अगदी हळूवार, डोळे सोडून आणि अधून मधूनच माती-चिखल लावले. स्मितानं रेकॉर्ड टाईममध्ये टास्क पूर्ण करून तिला आणि मेघाला जिंकवलं. स्मिता इज अ मास्टर ऑफ ऑल टाईप्स ऑफ टास्कस. ती जर का मेघा टीमला मिळाली तर मी पारूला पप्पी द्यायला तयार आहे.
पुष्कीनं बॉईज रूमचा त्याग केला असून तो मुलींच्या रुममधे झोपायला आला आहे. रात्री दिवे घालवले गेल्यावर शरा म्हणाली की दोन खोल्यांमधे दोन टीम्स अशी विभागणी झाली आहे. मेघा म्हणे बाहेर बसतानाही बसण्याच्या वेगवेगळ्या जागा आहेत. बिग बॉसच्या इस्टेटीची वाटणी झाली आहे.
नंतर मेघानं सईला जे पेप टॉक दिलं त्या करता मेघाचं प्रचंड कौतुक. ती सईला म्हणाली की त्यांना तुझा वीकनेस कळलाय. सोमवार आणि मंगळवारी टास्क असतो त्यामुळे त्याआधी शनिवारी किंवा रविवारी ते तुला हर्ट होईल असं बोलतील किंवा कृती करतील. पण तेव्हाच तुला खंबीर राहण्याची गरज आहे. तु आणि मी त्या थर्माकोलच्या अंड्यासारखे आहोत. हे लोकं येऊन बोचकारून आपल्याला फाडायला बघणार. हिंमत हारू नकोस आणि आपले वीक पॉइंटस कळू देऊ नकोस. सईनं मान्य तर केलंय. बघू कितपत मनावर घेतेय. पण मेघा इज सिंपली अमेझिंग!
रच्याकने, कोणी आज रेशमची लिपस्टिक बघितली का? मला दोन वेगवेगळे रंग दिसत होते. अस्ताद सईबद्दलची थिअरी सांगताना रेशमची लिपस्टिक कधी लाल तर कधी हॉट पिंक दिसत होती. तसंच ती स्मिताशी रूममध्ये बोलत असतानाही दोन वेगवेगळ्या शॉटसमध्ये लिपस्टिकचे रंग मला वेगवेगळे दिसत होते. माझ्यात स्मिताचा संचार तर नाही ना झालाय?
डीजे .... अफाट आहे ही थीम.
डीजे .... अफाट आहे ही थीम.
मामी अपडेट भारी. मि रिपिट
मामी अपडेट भारी. मि रिपिट पाहतेय. सुशांत नालायकच आहे. अजुन टास्क सुरू नाही झाला पण प्रोमोत पाहिलं मी सुशांतने चिखल सई च्या डोळ्यांनाच जास्त लावला.
मामी... आजचं जास्तच भारी
मामी... आजचं जास्तच भारी जमलंय डिटेलिंग. 1 नंबर.
मामी तुमच्या reviewes चे मी
मामी तुमच्या reviews चे मी फॅन आहे. त्या मांजरेकरांच्या/कलर्स मराठीच्या इन्स्टा / ट्विटर वर द्या ना. किती गडबडतात ते . हे reviews वाचून जरा क्लिअर तरी होतील काय ,कुठे , किती आणि बोलायचं ते
आली एकदाची सईची गाडी रुळावर!.
आली एकदाची सईची गाडी रुळावर!..... Thank you big boss!
त्या सईने ते एव्हरयुथवाले टास्क पूर्ण केले तेंव्हा सगळे तिला मस्तच चिअर अप करत होते...... फक्त जुई सोडून..... जुईचे expressions बघाच त्या शॉटमध्ये
स्मिता लैच डोक्यात जायला लागलीय.... तिने त्या भांड्याची आधी मेघाकडे तक्रार केली, मग मेघा डिफेंड करते म्हणून किरकिरली, मग परत त्याबद्दल सई कडे विचारणा केली, सईने अपेक्षित reaction न दिल्यामुळे परत मेघाला सईला खडसाववायला भाग पाडल आणि एव्हढ करुनही समाधान नाही झाल म्हणून त्याची स्टोरी त्या सुशांतला ऐकवत बसली!
आणि आता परत वीकेंड का वार मध्ये पण बोलणार म्हणे याच्याबद्दल!..... धन्यवाद आहे ती!
बाकी रेशम कशीही असली तरी तीपण आपण होउन येउन बोलली सईशी.... तिला समजावयाचा चांगला प्रयत्न केला!
शरा पण मेघा आणि सईच्या बरोबरीने आवडायला लागलीय!
डीजे.... बिग फॅमिलीचा प्लॉट
डीजे.... बिग फॅमिलीचा प्लॉट भारी आहे..... द्या पाठवून चॅनेलकडे!
मामी..... नेहमीप्रमाणेच भारी!
ते नेमके चुकीचे निष्कर्ष काढण्याबद्दल व्हिलन मंडळींना पिएचडीच प्रदान करायला हवी.... हे अगदी पटलच!
प्रचंड आत्मविश्वासाने चुकीचे अंदाज लावतात..... आणि मग सगळा ग्रूप माना डोलावतो!
भारीच लिहिलेय मामी
भारीच लिहिलेय मामी
नंतर मेघानं सईला जे पेप टॉक
नंतर मेघानं सईला जे पेप टॉक दिलं त्या करता मेघाचं प्रचंड कौतुक. ती सईला म्हणाली की त्यांना तुझा वीकनेस कळलाय. सोमवार आणि मंगळवारी टास्क असतो त्यामुळे त्याआधी शनिवारी किंवा रविवारी ते तुला हर्ट होईल असं बोलतील किंवा कृती करतील. पण तेव्हाच तुला खंबीर राहण्याची गरज आहे. तु आणि मी त्या थर्माकोलच्या अंड्यासारखे आहोत. हे लोकं येऊन बोचकारून आपल्याला फाडायला बघणार. हिंमत हारू नकोस आणि आपले वीक पॉइंटस कळू देऊ नकोस. सईनं मान्य तर केलंय. बघू कितपत मनावर घेतेय. पण मेघा इज सिंपली अमेझिंग!
<‘<
दॅट्स मेघा !
आठवा, इजाजत मधे नासिस्रुद्दिन शाह म्हणतो रेखाला “दॅट्स माया“, अगदी तेच फिलिंग आलं मला हे मेघाबद्दल वाचून !
(रेखा मायाच उरलेल सामान पठवून देते आणि त्यावर मायाच काव्यात्मक पत्र “मेरा कुछ सामान’ येतं त्यावेळी नासिरुद्दिन शाह प्राउड्ली/प्रेमाने म्हणतो “दॅट्स माया ! , ही तुलना फार फनी आहे पण कान्ट हेल्प माय फिल्मी बॉलिवुड माइंड ..)
ही कोण ऐकूनही माहित नवह्ती पण मेघा सुरवातीपसूनच प्रचंड फोकस्ड, हुषार , भरपूर पेशन्स, ग्रेट ह्युमन बिइंग, लॉयल फ्रेंड आणि अर्थातच एंटरटेनर !
सई मधे यातले बरेच गुण आहेत , फिजिकली ती मेघापेक्षा खूप स्ट्राँग आहे, टास्क्स्स मधे वाघ आहे, रोखठोक मुद्देसुदफस्र मस्तं बोलते, दुध्मन गँगला जाम इरिटेट करते पण पेशन्स मधे कमी पडतेय, इमोशनल रोलर कोस्टरवर सवार होतेय , आय रिअली होप ती लवकर ट्रॅकवर येइल आणि खरच् मेघा बोलली तसे या दोघी टॉप २ मधे उभ्या राहतील !
मग कोणीही जिंकु देत, मला दोघींपैकी कोणीही विनर झाले तरी आवडेल !
पुष्की कधी कधी खूप आवडतो पण बरेचदा दलबदलु/डिसलॉयल वाटतो.
श.रा. देखील आवडतेय पण अजुन तरी नवीन आहे.
सईला डि व्हिटॅमिन द्यायला
सईला डि व्हिटॅमिन द्यायला सांगायला हवं बिग बॉसला.
सईला डि व्हिटॅमिन द्यायला
सईला डि व्हिटॅमिन द्यायला सांगायला हवं बिग बॉसला.>>>मामी मलाही अगदी हेच वाटले.
मामी भारी अपडेट्स दिलेत. पण दोन वेळा काय बदल केला ते नाही कळले. परत वाचायचा आळस
टायपोज होते.
टायपोज होते.
Pages