बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेळ पडली तर २ जनांना सहज भिरकावेल... अशी मुलगी हवी लाईफपार्टनर.. >> Uhoh Rofl
मेमोरिअल डे मुळे गेले तीन दिवस काहीही बघितलं नाही. आता धागाच वाचतो.

आजचा एपिसोड बोर झाल कोण काय खेळत होत व का खेळत होत काही लाॅजीक नव्हत आज टास्क मध्ये त्यामुळे
अर्ध्यातुन सोडून दिला

अजून एक मठ्ठ कार्य. असली कार्य का देतात? वर म्हणे हिंसा न करता पार पाडा. देऊच नका ना पैलवानी कार्य.

खरीखुरी बुध्दी, चतुराई वापरून खेळता येतील अशी कार्य द्या. खेळणार्यांनाही आवडतील आणि बघणार्यांनाही.

आऊ आज पुन्हा एकदा डोक्यात गेली. महाचॅप्टर आहे ती.

आऊ हा सर्वात मोठा नगारा आहे जो दोन्ही बाजूनी वाजतो.
आज सई काय सांगत होती कॅमेर्‍यात? Uhoh अती जवळ उभी राहिल्याने चिवित्र दिसत होती.

आज सई काय सांगत होती कॅमेर्यात?अती जवळ उभी राहिल्याने चिवित्र दिसत होती.>>>
सई कधी बोलली??
मी तर एपिसोड सुरु झाला तेव्हा जुईला बघितलं.

स्मिताने फसवले मेघाला... Resham बोलली तसं आस्तादला... अणि मेघा सुशांत साठी किती fare खेळत होती... ती तर आधी म्हणाली होती ना की फक्त support चा दिखावा करणार असं..

स्मिताने फसवले मेघाला... Resham बोलली तसं आस्तादला >>> मला वाटलं नाही तसं. मेघाने सांगितलं तू माझ्या मागे ये, राहा तर ती राहिली आणि रेशमला ढकलत होती, तरी तिने फसवले असेल तर अतिशय चूक. मग आता स्मिता स्वतः च्या कर्माने जाणार.

आज पण बिग बॉस अनफेअर. बिग बॉस सुशांत, रेशम च्या बाजुने. एकतर सुशांतच्या वेळी आस्तादला असं प्रोटेक्शन चालणार नाही म्हणाले नाहीत, सेम strategyने रेशम पण जिंकली मग बिग बॉस जागे झाले पण पहिलं कॅन्सल करायला तयार झाले नाहीत.

अतिशय चुकीचं हे. मेघाने पण objection घेतलं नाही.

मलाही मेघाबद्दल फक्त एक कंप्लेंट आहे, सुशान्तला किती दिवस जुना मित्रं म्हणत रहाणार , त्याला कुठे आहे काही सॉफ्ट कॉर्नर, फरफटवतो, जखमी करतो तिला !
पुष्कर हुषार आहे , तो सुध्दा अतिशय संधीसाधु मित्रं आहे, सई मेघा दोघींचाही मित्रं असल्याचा दावा करतो पण कधी कसा कुठली चाल खेळेल सांगता येत नाही, ऋतुजा जे म्हंटली होती ते खरय ,हि इज अ बिग प्लेयर !
इतर MCP पुरुषांच्या गर्दीत वागायला हा एकटाच gentleman आहे एवढच !
मेघा सई टिमचा प्रॉब्लेम एक महिना होऊन गेला तरी अजुनही तोच आहे , यांच्या टिममधे कितीही गर्दी झाली तरी शक्तिवान रेडे दुसर्या टिममधे असतात , जखमी धारातिर्थी फक्तं यांच्याच टिमचे लोक होणार !
शक्तीच्या बेसिस वर डिसिजन मेकिंग टास्क्स असतील तर सुशान्त अस्ताद फायनल पर्यंत बाजी मारणार, बाकी लोक जखेमी निवृत्त होतच हळुहळु गळत जाणार, पब्लिक व्होटिंग पर्यन्तसुद्धा नाही पोचणार ऋतुजासारखे !

शक्तीच्या बेसिस वर डिसिजन मेकिंग टास्क्स असतील तर सुशान्त अस्ताद फायनल पर्यंत बाजी मारणार, बाकी लोक जखेमी निवृत्त होतच हळुहळु गळत जाणार, पब्लिक व्होटिंग पर्यन्तसुद्धा नाही पोचणार ऋतुजासारखे !>> अगदी ...आणि बिग बॉसला जागही उशिरा येते, जेव्हा कोणीतरी जखमी होतो .
मला तर सुशांतचं अंडं सगळेच वाचवताना दिसले. सुशांत आणि रेशमासाठी परत खेळायला हवं होतं . स्मिता बहुतेक अजून कंफ्युझ आहे कि कोणाला सपोर्ट करावा. मेघाला सपोर्ट करत होती, पण तिने विरोधकांना मदत केली.

>>अजून एक मठ्ठ कार्य. असली कार्य का देतात? <<

हे सगळे गेम्स्/टास्क्स हिंदी बिग्बॉस मधुन उचललेले (रिसायक्ल) आहेत. तोच सेट्/प्रॉप्स वापरुन चॅनल पैसे वाचवत आहे...

अजून एक मठ्ठ कार्य. असली कार्य का देतात? वर म्हणे हिंसा न करता पार पाडा. देऊच नका ना पैलवानी कार्य.

खरीखुरी बुध्दी, चतुराई वापरून खेळता येतील अशी कार्य द्या. खेळणार्यांनाही आवडतील आणि बघणार्यांनाही. >>>+११११

खुपच बोर केलं आज. शेवटी त्यावर उतारा म्हणून Takeshi's Castle पाहिले.

पुष्कर वरचा विश्वास आता कमी-कमी होत चाललाय . तो कधी मेघा-सई चा घात करेल सांगता येत नाही. त्या दोघींची ची काळजी वाटते.
स्मिता या आठवड्यात वाटत होती थोडी सुधारलीये पण नाही.
आऊं बद्दलचा माझ्या मनातला आदर कमी झाला हे निश्चीत !

थोडकयात आता गॅंगवॉरहि संपून Individual गेम सुरु झाला आहे. बरेच जण एकमेकांची दिशाभूल करत आहेत.

आऊ आज पुन्हा एकदा डोक्यात गेली. महाचॅप्टर आहे ती.>> आउना कल्पना आलिये की सध्या त्या बॉट्म २-३ मधे असतिल त्यामुळे त्या नॉमिनेशन पासुन वाचण्यासाठी त्या सगळ्याच्याच गुडबुक मधे राहण्याचा प्रयत्न करत असतिल, तस असेल तर नथिन्ग रॉन्ग शेवटि हा गेम आहे त्याना माहितीये की त्याच्या फिजिकल लिमिटिशेनस मुळे त्या टास्क फार चान्गला खेळु शकत नाही.ममा म्हटले सुधा की आउ टोन डाउन झाल्यात... त्या तेवढ्या डोकेबाज नक्किच आहेत.
बॉटम मधे आहोत ह्याची जाणीव जुईला पण झालीये आज ती आज सैरभैर वाटत होती..

पकपकपकपक पकाक पकले काल मी.

'साधारण पाचफूट कोंबडीच्या पोटाखालच्या तीन फूट जागेत, दीड फुटाचं वाटोळं सोनेरी, थर्माकोलचं अंड केंद्रस्थानी ठेऊन ८-१० लोकांनी केलेली अशक्य यडपट झोंबाझोंबी' याव्यतिरिक्त काही नव्हतं.

सुरवातीला जुईनं कॅमेरासमोर केलेली किरकिर दाखवली. आदल्या दिवशी जेव्हा सई तिला ती व्हाईन करते म्हणाली तेव्हापासून ती हलली बहुतेक. बिग बॉसला म्हणत होती की ' मी मिसफिट आहे, मला घरी जाऊ द्या.'

रेशम बोलत होती की शरा बाहेरून आली आणि म्हणे मेघा विनर दिसतेय बाहेर पण शरा खरं बोलतेय हे कशावरून? रेशम अ‍ॅक्सेप्ट करूच शकत नाहीये की ती असतानाही इतर कोणी आणि ती ही सो कॉल्ड ' ज्युनियर' मेघा जास्त पॉप्युलर आहे. रहा बाई मुर्खांच्या नंदनवनात!

काल पुष्की ऑलमोस्ट बेशुद्ध पडला. मग बिग बॉसनं मेघा, अस्ताद वगैरेंना आत बोलावून पुन्हा एकदा 'हिंसा न करता खेळा' असं सांगितलं. सुशांत आणि रेशमची अंडी वाचल्यानं ते दोघं कॅप्टन पदाचे उमेदवार झाले आहेत. पण यापुढे म्हणे अंड्याभोवती मानवी साखळी करूनच फक्त अंड जपायचं. ते कवटाळून बसणे, त्यावर आवरण घालणे वगैरे चालणार नाही.

यापेक्षा कबड्डीचे सामने तरी आयोजित करा.

हे आर्ग्युमेंट पुढे वाढवत नेलं तर इन्फिनिट लूप मध्ये जाईल आणि पुष्की नक्की काय करावं हे न कळून येडा होईल.>> Biggrin

बिग बॉसला म्हणत होती की ' मी मिसफिट आहे, मला घरी जाऊ द्या.' >>>रडकरी बाईंची अटेन्शन सिकिंग ची चाल होती असं वाटलं. पुढचा नंबर आपला असु शकतो तेव्हा जनतेला वेगळ्या प्रकारे अपील करुया असं काहीतरी ..

सपोर्ट करणार्‍यांनी साखळी करायची म्हणे, विरुद्ध पार्टीतल्या एखाद्याने अंडं पळवायचं, तेव्हा साखळीतल्या लोकांनी पळवणार्‍या कडे काय फक्त डोळे वटारुन पहायचं आणि "एsss बघतोय हां मी, नेऊ नकोस ते, ठेव खाली" म्हणायचं की फक्त अनुल्लेखाने मारायचं Wink कैच्याकै !! मुळात हिंसा होईलच असे टास्क ठेवताच कशाला मग !
बरं ते आस्ताद आणि सुशांत एवढे सांड आहेत, की त्यांना गुदगुल्या पण होत नसाव्या ! मग पळवायचं कसं अंडं Uhoh

खरच काहिहि देत आहेत टास्क.. हिंदी बि-बॉ संपला आहे अन आता हा मराठी आहे तेच ते गेम काय? कि बि बॉ कडे नविन नविन गेम्स सुचवणारी मंडळीच नाहियेत?
मलाहि नाहि आवडलं काल पुष्कीचं बोलणं.. मेघा इतक पोटतिडिकेनं सांगत होती अरे देऊ दे न तिला सुचना कामाबद्दलच्या ..कॅप्टन बनुन जर तिलाच ती कामं करायचीत तर काय अर्थ उरतो कॅप्टनशिपचा..

काय तो अंडी गेम, पुन्हा तेच लोळवणं ,लॉक करणं आणि बेशुध्द होणं !
आज बिग बॉसच पुन्हा एकदा कलप्रिट !
मुद्दाम अशी टास्क्स द्यायची मग चोराच्या उलट्या बोंबा कि तुमच्याकडून हिंसा झाली !
हे असले टास्क्स पाहिले कि शारजाह च्या इंडीया पाकिस्तान मॅचेस आठवतात , इंडीयाचा दारुण पराभव जिथे पाकि टिम मधे अ‍ॅडीशनल प्लेयर असायचे, ते म्हणजे अंपायर्स !
इथे बिग बॉस असेच अ‍ॅडीशनल प्लेयर्सचे हाम करतात, हिंसा प्रमोट करायची आणि हवे तेंव्हा वेगळे नियम करायचे !
पुष्कीचं थोबाड आज बांगडा खाऊन फुड पॉयझनिंग झाल्याने मॅच खेळु न शकणार्या वेंगसरकर सारखं दिसत होतं !
प्रामाणिक मत : ताकदीची टास्क्स आली कि सरेंडरच करावं मेघा सई पुष्की टिमने !
ऋतुजा सारख्या इन्जयुरीज करून घेण्यापेक्षा ट्राय करुच नये, कॅप्टनशिप दान करावी सरळ !
समोरच्या टिम मधल्या वळुंबरोबरच मुलीही ताकदवान आहेत हे सत्य आहे.
स्मिता आहेच ताकदीत सबकी बाप पण स्वतःला अजारी म्हणून घेणारी जुई सुध्दा मेघाला आणि शर्मिष्ठाला आरामात लोळवते.
स्मिताला पुन्हा चुकुनही आपल्या बाजुने वळवायचा प्रयत्न करु नये मेघाने, स्मिता खरच कनफ्युज्ड आहे, अशी अ‍ॅडीशन काय कामाची टिम मधे जी अनशुअर आहे ?
जर स्मिता स्वतः ओके आहे सुशान्तच्या टिममधे तर कोणी काही करु शकत नाही.

आता बोअर होतय.. तसही सगळे एपिसोड नाहिच पाहिले मी..
पण किती ते बोअरिंग टास्क.. शक्ती असणारी टिम कुरघोडी करणारच.. आणि हिंसक वळण लागणारच..
आधी च्या हिंदी बिबॉ मधे बरेच चांगले टास्क पण होते..
आत्ताची परिस्थिती.. म्हणजे फिजिकली कमजोर टिम वि. फिजिकली स्ट्राँग टिम बघता.. टास्क थोडे रिथिंक करुन मजेदार बनवावे ना..
काल पहिल्या अंड्याचा सिन बघुनच पटकन चॅनेल चेंज केलं.. या कार्यात ना डोकं ना शक्ती ना कल्पकता कशालाच वाव नव्हता...

रडके, लूझर्स परत एकदा केवल ताकदीच्या जोरावर जिंकणार..
लूझर सुशांत म्हणे, त्याची काही चूक असती तर मांजाने त्याला लेफ्ट, राईट, सेंटर घेतलं असतं, तसं झालं नाही म्हणज एत्याची काही चूक झाली नाही.
भयानक.
हा असला छपरी माणूस स्वतःला राजकारणी म्हणवून घेतो??

बिग बॉस धड नियम सांगत नाही आधी, नियम कोणाला कळत नाहीत मग दोनजण bb ला हवे असलेले झाले कॅप्टनपदाचे उमेदवार की वरातीमागून घोडं येतं bb चं.

टीशर्ट मध्ये अंड लपवणे योग्य होतं का, मेघानेने पण टोपल्या blanket टाकणे योग्य होतं का मग आस्तादचा अजूनचं वस्ताद पणा पण bb काही बोलले का, नाही. पुष्करला लागल्यावर नियम सांगायला जागे झाले.

Big boss must be a fan of agile methodology Wink
Submitted by स्वरुप on 30 May, 2018 - 14:31 >>>> Lol Biggrin Lol Wink

बेक्कार टास्क कालचा. मेघाची टीम फुल अनफिट, आणि स्ट्रॅटेजीज पण गंडलेल्या होत्या. मेघा स्वतः तर इतकी फुसकी आहे की कोणीही तिला सहज ढकलू शकते. रेशम बरोबर म्हणाली, मेघाला एका हाताने पण मी कन्ट्रोल करू शकते. सई अजिबात भाग घेत नवह्ती कुस्ती मधे , जे तिची मोडकी पाठ पहाता योग्यच होतं. शर्मिष्ठा दिसते तर स्ट्राँग पण अजून लोकांना डायरेक्ट भिडण्याइतकी भीड चेपली नसावी किंवा तेवढी फिट नसावी. आउ ही युसलेस बाई झालेली आहे. चीड येत होती तिची.
राहिले कोण , त्या खा, त्याचाही काहीही उपयोग दिसत नाही. पुष्की एकटा (मार खाण्याचे)काम करतो. अन मेघा ची स्ट्रॅटेजी दुसर्‍या बाजूने खेळून खोटा सपोर्ट करायचा. पण ती म्हणाली तसे तिने केलेच नाही. पुष्की बावळट आहे. आस्तादला मी सपोर्ट करणार आहे म्हणे , शब्द दिलाय. सुशांत पण त्याला घोळात घेत होता. शिवाय सई, मेघा वर उघड सगळ्यांसमोर कमेन्ट्स करणे. पुष्की फार शेकी झाला आहे. स्मिता दोन्ही बाजूने खेळतीय का? ताकदवान आहे ती, आणि रेशम पण पैलवानच आहे. लोळवते सहज इतर मुलींना.
आता आज पण तेच कन्टिन्यू करणार वाटते. कंटाळवाणे होणार.

Pages