Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुषण जुई च्या बाबागाडीत होता.
भुषण जुई च्या बाबागाडीत होता... पुष्की बरोबर बोलत होता कि हा अगदि अलगद वाचतोय.. बाकी सगळ्यांच मत होतं सुमडीत कोमडी गेम खेळतोय.
स्मिता ने काल कॅमेर्यासमोर बरोबर सांगितल ति जरी त्या गृप मध्ये असली तरी त्या टिम मध्ये टिम स्पिरीट नाहीय त्यामुळे ती मनापासुन आपले १००% गेम ला देउ शकत नाहिय.
सई ने आस्ताद बाळाला छान गोष्ट सांगितली खुप हसु आले. मज्जा केली तिघींनी.. बाकी आस्ताद खुप छान गातो.. मला तर तो जेव्हा पहिल्या दुसर्या दिवशी तान घेतली होती तेव्हाच आवडला आवाज.. सई म्हणाली होती त्याला माजात वावरतो घरात.. पण त्याच चालणंच तस आहे .. माज असेल थोडाफार.
कालच्या जोड्या अश्या प्रकारे
कालच्या जोड्या अश्या प्रकारे होत्या :
सई - अस्तादबाळ, रेशम - सईबाळ, सुशांत - स्मिताबाळ , उषा - जुईबाळ, जुई - भूषणबाळ, स्मिता - सुशांतबाळ, अस्ताद - पुष्करबाळ, पुष्कर - रेशमबाळ, भूषण - उषाबाळ,
काल FOGG आणि नॅचुरा डाएट शुगर च्या जाहिराती केल्या गेल्या. बागेत फॉगचे परफ्यूम स्प्रे ठेवले होते ते सदस्य अधून मधून मारून घेत होते. आणि हा आठवडा घरातली साखर बिग बॉसनं परत घेतली असून सगळे पदार्थ शुगर फ्री अथवा डाएट शुगर वापरून करायचे आहेत.
बाकी आस्ताद खुप छान गातो..
बाकी आस्ताद खुप छान गातो.. मला तर तो जेव्हा पहिल्या दुसर्या दिवशी तान घेतली होती तेव्हाच आवडला आवाज.. सई म्हणाली होती त्याला माजात वावरतो घरात.. पण त्याच चालणंच तस आहे .. माज असेल थोडाफार.
)
<<<
डे - १ खरच आवडला होता अस्ताद , अॅक्चुअली पहिलं खुर्ची सम्राट टास्क येऊन त्याने खरे रंग दाखवायच्या आधी माझा फेवरेट अस्तादच होता.
छान गातो, सुरेख मराठी उच्चार आणि तो म्हणतोय तसे माज त्याच्या पर्सनॅलिटीत आहे, ( तो आम्ही बरेचसे पुणेरी लोक जन्मतःच घेऊन येतो
नंतर वाट लागली अस्तादची, पूर्णच MCP व्हिलन !
सई -मेघा -पुष्की ट्रायोने जे त्या खुर्ची सम्राटपासून बिग बॉस गाजवलय आणि त्यांच्याच जीवावर बिग बॉस चालु आहे, अजुन तरी ऋतुजा सोडून कोणीच या तिघांइतकं डिझर्विंग दिसलच नाहीये बिग बॉसमधे !
आज बाकी सईने काय सॉल्लिड एंटरटेन केलय, काय गोष्ट सांगितली अस्ताद बाळाला, मधेच डॉ शर्मिष्ठाने व्हॅक्सिनेशन टोचलं, धम्माल
हे सुई टोचणं टॉय टास्कला का नाही सुचल कोणाला ?
बाकी सुशान्त भुषणवर उचकलेला पाहून फार मज्जा आली, त्याने आउंना वाचवले जे प्लॅनमधे नवह्तं पण सुशान्तनेही एक प्रकारे डोकं वापरलय स्मिताला वाचवून !
एक तर स्मिताला वाचवून आणि स्वतःला नॉमिनेट करायला लाऊन त्याने लेटेस्ट काँट्रोव्हर्सी वर पडदा टाकायचा प्रयत्न केला आणि स्मिताला पुन्हा आपल्या गृपमधे आणायचा प्रयत्नही !
यावेळी जुई जाईल बहुदा, आस्ताद - सुशान्तला नाही काढायचे इतक्यात , स्ट्राँग व्हिलन पब्लिक इतक्यात नाही जाणार !
<हे सुई टोचणं टॉय टास्कला का
<हे सुई टोचणं टॉय टास्कला का नाही सुचल कोणाला ?>
शर्मिष्ठाने सर्वच बाळांकडे जायला हवं होतं टोचवायला. त्यानिमित्ताने बराच कंटेंट मिळाला असता बिबॉला.
पन.. पण.. पण..
गेली असेलही. पण बाकीच्यांनी
गेली असेलही. पण बाकीच्यांनी असं काही मजेशीर केलं नसेल.
आस्ताद कसा काय आणि कधी झाला
आस्ताद कसा काय आणि कधी झाला nominate टास्क मध्ये? हे मी बघितल नव्ह्त वाटत. कुणी सान्गाल का , प्लीज?
मामीच्या अपडेट्स भारी आहेत.
मामीच्या अपडेट्स भारी आहेत. लिहीत जा मामी.
असेच वागत राहिली तर पब्लिक तिला का वाचवेल! पुष्की पण बोटचेपे पणा करून तीच चूक करत आहे.
मेघाही हुषारीने खेळतेय पण बर्याचदा फेक वाटते.
काल मजा आली तशी, पण सुशांत सोडून बाकी प्रेडिक्टेबल होते. मला आऊ चा फार राग येत आहे हल्ली. भयानक डबल ढोलकी. कधी सुशांत चा तर कधी जुईचा पुळका! का? घ्यायचा की एक काहीतरी स्टँड. उलट तिच्या टिव्ही इमेज प्रमाणे वागली तर जास्त अटेन्शन मिळेल
कॅप्टनशिप चा तो चौकट वाला टास्क आणि कालचा बाबागाडीवाला टास्क दोन्हीमधे सई सर्वात आवडली. सॉलिड हुषारीने खेळली! मला तिची सिगारेटची आणि लोशन साबण इ. आयडिया , कोणालाही न घाबरणे, आपल्या भूमिकेवर स्ट्राँग राहणे सगळंच सुपर्ब!! सध्या तरी माझी फेवरेट सईच
रेशम, सुशांत आस्ताद हे कधी प्लेन हलकट वाटतात तर कधी जेन्युइनली चांगले . बायपोलर लोक . जुई सगळ्यात बेक्कार. ती तिच्या ग्रुप मधे पण कुणाला आवडत नाही हे जाणवतं. रेशम वगैरे लोक काही प्लॅन करताना तिला खिजगणतीत धरत नाहीत. आता तीच जाईल असे वाटतेय.
शर्मिष्ठा टिव्ही वर इरिटेटिंग रोल्स करत असली तरी इथे सरप्रायजिंगली प्लेजन्ट वाटली अजून पर्यन्त. त्याखा फेक आणि बराचसा अनुल्लेखनीय आहे अजून.
मला आऊ चा फार राग येत आहे
मला आऊ चा फार राग येत आहे हल्ली. भयानक डबल ढोलकी. कधी सुशांत चा तर कधी जुईचा पुळका! का? घ्यायचा की एक काहीतरी स्टँड. उलट तिच्या टिव्ही इमेज प्रमाणे वागली तर जास्त अटेन्शन मिळेल Happy असेच वागत राहिली तर पब्लिक तिला का वाचवेल! >>>>>+१११११११
आस्ताद कसा काय आणि कधी झाला
आस्ताद कसा काय आणि कधी झाला nominate टास्क मध्ये? >>> सईच्या गाडीत होता आस्ताद. ती हुषारीने आस्ताद स्वतः पुष्कर ला वाचवतो का नाही ती आधी पहात होती आणि मग त्याला वाचवायचे की नाही हे ठरवत होती. असे करत करत फायनली नॉमिनेट केले त्याला.
आजकाल बी बॉ चे दैनंदीन भाग
आजकाल बी बॉ चे दैनंदीन भाग बघायला फुरसत नसल्याने विकेंड चे डाव बघूनच एकूणात कल्पना येते.
पण एक गोष्ट नमूद कराविशी वाटते: ईथले बरेचसे मेसेजेस बघता एकूणात काही स्पर्धकांबद्दल ईथे वापरली गेलेली बर्यापैकी खालच्या पातळीची भाषा वा विशेषणे खेरीज स्पर्धकांबद्दलच्या अत्यंत 'जजमेंटल' व वैयक्तीक स्वरूपाच्या पोस्ट्स बघता, बी बॉ पेक्षा बाहेर जास्ती नकारात्मक व सोयीस्कर प्रतिक्रीया दिल्या गेलेल्या पाहून आश्चर्य वाटते.
विशेषतः पुन्हा एकदा स्त्री वि. पुरूष, संस्कृती, डिग्निटी वगैरे असे नेहेमीचे वादग्रस्त मुद्दे ऊपस्थित करून आप्ल्या आवडत्या स्पर्धकाचे ढोल बडवणे व नावडत्यांचे सतत या मुद्द्यांच्या आधारे प्रतिमा खंडण करणे हे ईथे जोरात सुरू आहे असे दिसते. काही पोस्टींनी बर्यापैकी सर्व मर्यादा ओलंडलेल्या दिसतात.
त्यामूळे आता असेही ईथे येऊन पोस्टायची विशेष ईच्छा नाही.
आपल्याला एक प्रेक्षक म्हणून जेव्हडे दिसतेच तेव्हड्याच आधारावर आपण बोलत असतो. आणि खेळाचे ऊत्तर खेळानेच दिलेले बरे एव्हडीच अपेक्षा असावी.
असो.
चालू देत..
>>खेळाचे ऊत्तर खेळानेच दिलेले
>>खेळाचे ऊत्तर खेळानेच दिलेले बरे
खे़ळत नाहीयेत , नुसताच पुरुषी अहंकार दाखवत माज करत आहेत
मेघा मला अगदी परवा परवा
मेघा मला अगदी परवा परवा पर्यंत अज्जिबात आवडत नव्हती. पण रेशमच्या विरूद्ध जेव्हा नॉमिनेट झाली तेव्हाचा तिचा त्रागा अगदी खरा वाटला. परवा घरातून बाहेर पडण्याच्या प्रसंगाला माझे ही डोळे भरून आले होते. एक दोन गोष्टी सोडल्यास मेघा खरंच गुणी आहे. काम करते, मोकळेपणी बोलते, बेधडक आहे, टास्क मध्ये खूप प्रामाणिक खेळते.
) बघु नंतर विचार बदलला तर.
(तरी माझं वोट माझ्या बदामालाच
सध्या घरात मला आवडत नाही अशी फक्त एकच व्यक्ती ती म्हणजे जुई. मला कॉल करायची संधी मिळाली तर मी खरंच मुस्काडफोड झाडेन तिला फोन वर. आणि एक्स्प्लेन करायला चान्स पण देणार नाही, फक्त आणि फक्त तोंड्सुख घेईन
फायनल ला मेघा सई आणि पुष्कर किंवा आस्ताद असावेत. अस्ताद क्रश आहे म्हणून, अन्यथा तो फायनल मध्ये येण्याच्या पात्रतेचा नाहिये. (कारण ती अख्खी टिम पार्शियल खेळते)
योग अरे असं नको करू, लिहित जा
योग अरे असं नको करू, लिहित जा, तुझ्या पोस्ट्स आवडतात मला
मेघाबद्दल दक्षे मम. मेघा
मेघाबद्दल दक्षे मम. मेघा अजिबात न आवडणारी हळूहळू आता आवडायला लागली, रिस्पेक्ट पण निर्माण झाला.
माझं वोट सध्या फक्त पुष्करला.
स्मिता परत त्या जुन्या
स्मिता परत त्या जुन्या ग्रुपला सपोर्ट करणार अशी चिन्हं. लवकर जाणार ही. एवढं सुशांतने वाचवलं म्हणून लगेच तिथे जायची गरज नाही, त्याने तुला नाही स्वतःची इमेज वाचवायचा प्रयत्न केलाय.
पण स्मिता नॉमिनेट च होत
पण स्मिता नॉमिनेट च होत नाहीये समहाऊ. हुषारी असेल नाहीतर योगायोग.
काल तिने कॅमेर्यावर बोलले ते मी वेगळेच इन्टरप्रेट केले. मला वाटले की आधीच्या टीम मधे निगेटिविटी होती म्हणून मेघासोबत खेळताना आवडले असे म्हणाली ती. तसे नव्हते का?
आज पुन्हा धुवाधार कुस्त्या दिसताय्त टास्क मध्ये.
काल तिने कॅमेर्यावर बोलले ते
काल तिने कॅमेर्यावर बोलले ते मी वेगळेच इन्टरप्रेट केले. मला वाटले की आधीच्या टीम मधे निगेटिविटी होती म्हणून मेघासोबत खेळताना आवडले असे म्हणाली ती. तसे नव्हते का? >>> तसंच होतं.
पण परत ती जुन्या टीमच्या प्रभावाखाली येतेय, सुशांतने वाचवलं म्हणून असं करायची गरज नाहीये. मनाला पटेल ते करावं. काय करायचं हीचं, मला आवडते म्हणून वाटतं. बिग बॉसने टीम पाडल्या असतील तर वेगळी गोष्ट, नाहीतर ती चुकतेय.
आउ खरच कोण्याच्याही सख्या
आउ खरच कोण्याच्याही सख्या नाहीत, त्यांची दादागिरी फक्त थत्तेंवर चालायची, इथे या लोकांना नुसतेच अनॉय करते, हवं तेंव्हा काहीच स्टँड नाही , त्यांचं एज सिनियर असणे म्हणून कोणी काही म्हणायचं नाही .

सई बरोब्बर बोलली पुष्करला !
रेशम बाकी महेश मां च्या इतक्या शाळांमधून काही शिकली नाही, राजेश गेला तर आता अस्ताद भुषणला ऑफर देतेय फेक अफेअरची
अस्ताद जेन्युएनली म्हणे , पण आम्ही तुला ताई म्ह्स्णतो
शेवटचं वाक्य
शेवटचं वाक्य
त्यावर अजून त्याला काय काय सांगत राहिली, मग सुशांतशी बोलली.
ती पूर्ण आयडियाच भयंकर लेम
ती पूर्ण आयडियाच भयंकर लेम आहे. मेघा म्हणाली मला तुम्ही खाद्य दिले तर मी बोलणारच. यावर या दीडशाहाण्यांचा प्लान काय तर ते तिला मुद्दाम खाद्य देणार (?) त्याने काय होईल म्हणे?
रेशम ला मेघा जे कन्टेन्ट शो ला देतेय त्याने ती सेफ राहील/ राहतेय इतके कळतेय तर ममां च्या बोलण्यातून आणि २ दा नॉमिनेशन मधे डेंजर झोन मधे जाऊन पण स्वतःच्या स्टेटस बद्दल काहीच क्लू लागत नाहीत? गंमतच आहे.
मलाही तो सगळा सन्वाद झेपलाच
मलाही तो सगळा सन्वाद झेपलाच नाही, मेघाला कटेन्ट दिला तर ती अजुन वाढवुन ठेवेल, अजुन गॉसिप करेल म्हणजे अजुन कॅमेरासमोर असेल्,फोकस मधे यइल, तुमच काय पब्लिक आधिच निगएतिव्ह मधे आहे अजुन जाइल... रेशम नक्कि कुठल्या भ्रमात आहे तेच कळत नाहीये.
सुशान्त सान्गत होता की मी तिला ताइ,मम्मा म्हणतो आणि ती म्हणेल तस खेळणार... अरे!
रेशम इज जस्ट फुल ऑफ हरसेल्फ.
रेशम इज जस्ट फुल ऑफ हरसेल्फ. आपण काही चुकतोय हेच तिला मान्य नाहीये त्यामुळे तिच्यात सुधारणा होणं शक्य दिसत नाहीये.
रेशमला टास्क मधे इंटरेस्टच
रेशमला टास्क मधे इंटरेस्टच नसतो , खुर्ची सम्राट असो , कॅप्टनशिप टास्क असो , टॉय टास्क काय सगळीकडे लग्गेच गिव्हप करते किंवा रडी !
काल तर काय सई मिळाली तिला, मग तर लग्गेच गिव्हप करण्यात पहिला नंबर लावणारच होती , आधी अस्तादच्या पुष्की बाळाशी खेळत होती तेंव्हा वाटलं थोडं तरी एंटरटेन करेल यावेळी पण ते ल्गेचच संपलं !
अजुनही तिला खोटं अफेअर करून त्यावर “मेघाचं” अटेन्शन मिळवणे इतकाच हेतु दिसतोय !
जुई महा इरिटेटींग आहे, सईच्या दंडांवर चर्चा चालु असताना मेघाने सगळ्यांनाच नो बॉडी शेमिंग म्हंटल्यावर ती एकटीच किती उचकली.
भयंकर जळते जुई सईवर!
आउबद्दल वरच्या विधानांना
आउबद्दल वरच्या विधानांना पूर्ण अनुमोदन.
कालच्या पार्किंगच्या टास्कला शेवटच्या वेळी बाळ रडण्याचा गजर झाला तेव्हा सगळे स्ट्रोलरधारी घरात होते आणि बाहेर जायला एकच गर्दी झाली. एरवी कधी कोणत्याही टास्कमध्ये भाग न घेणारी आउ धावत पुढे झाली आणि भूषण पहिल्यांदा बाहेर पडावा म्हणून दार उघडून जुई आणि स्मिताला अडवायचा प्रयत्न करत होती.
इथे ०१.०१.३४ ला बघा.
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/sushant-s-shoc...
आधी अस्तादच्या पुष्की बाळाशी
आधी अस्तादच्या पुष्की बाळाशी खेळत होती तेंव्हा वाटलं थोडं तरी एंटरटेन करेल यावेळी पण ते ल्गेचच संपलं ! >> ते तिला पुष्कीला जरा चुचकारायचं होतं. पुष्कीच्या हाती रेशमबाळाच्या पाळण्याची दोरी होती ना!
ती आधी पुष्कीला म्हणाली ना, की तू काहीही कर हरकत नाही पण स्वतःच्या मनानं कर. दुसर्यांचं ऐकू नको.
आता हे असं तिनं सांगणं पॅरॅडॉक्सिकल नाहीये का? म्हणजे जर रेशम म्हणतेय ते ऐकायचं पुष्कीनं ठरवलं तर त्यानं दुसर्यांचं कोणाचं ऐकायचं नाही म्हणजे रेशमचंही ऐकायचं नाही असं होतं. हे आर्ग्युमेंट पुढे वाढवत नेलं तर इन्फिनिट लूप मध्ये जाईल आणि पुष्की नक्की काय करावं हे न कळून येडा होईल.
आउ एकदम भित्रट आहे आतुन.. रा
आउ एकदम भित्रट आहे आतुन.. रा रे टिम आपल्याकडुन दुखावु नये म्हणुन किती तो शरणागतीपणा..
जुई नोमीनेट झाल्यवर सईला म्हणते "मला आडकवलस ना तु?" आणि त्या जुईला "आई शप्पथ, आई शप्पथ मी नाही केल म्हणत" गयावया काय करते. आ ज्जिबात आवडेनाशी झालीय आउ...
त्या नायक ग्रुप मधुन ती व नंतर पुष्कर बाहेर पडावे..
खलनायक ग्रुप मध्ये जुई हि खुप आगोदर पासुनच जळकट व कुजकट स्वभावाची आहे. ती म्हणजे असे लोक की जे आपल्याला नाही मीळाल तर दुसर्याला का मिळातय म्हणुन चरफडनारे त्या टाइपची. सई वर तर खुपच जळते..
नायक ग्रुप मधील सई तर काय सुंदर दिसत होती काल फ्रॉक मध्ये... ( डोळ्यात बदाम )...
कसली मस्त पर्सनॅलीटी आहे, उंच, गोरी, लांबसडक केस... वेळ पडली तर २ जनांना सहज भिरकावेल...
अशी मुलगी हवी लाईफपार्टनर..
भयंकर जळते जुई सईवर!
भयंकर जळते जुई सईवर!
Submitted by दीपांजली >>>>>>
जळते... अरे भंयकर.. नुसती आग हि आग...
आणि त्यात ती कुजकी... कुजकट लाकड तर पटकन जळतात...
जुई ला सईचा भंयकर कॉम्पेक्स आहे... काल सई मस्त बोलली जुई ला... क्राय बेबी...काय उचकली जुई.
म्हणजे जर रेशम म्हणतेय ते
म्हणजे जर रेशम म्हणतेय ते ऐकायचं पुष्कीनं ठरवलं तर त्यानं दुसर्यांचं कोणाचं ऐकायचं नाही म्हणजे रेशमचंही ऐकायचं नाही असं होतं. हे आर्ग्युमेंट पुढे वाढवत नेलं तर इन्फिनिट लूप मध्ये जाईल आणि पुष्की नक्की काय करावं हे न कळून येडा होईल.>>

पुष्कर थोडा हुशार असता तर म्हटला असता कि हो मी कोणाचेही ऐकणार नाही तुझे पण नाही. जा रेशमबाळाची जू जूची वेळ झाली. आवाज करू नको. टाटा
आस्तादची अंगाई बेस्ट आणि डॉ चा टूच्चूवाला सीन मस्त बाकी कोणाला काही करताच येत नाही.
नायक ग्रुप मधील सई तर काय
नायक ग्रुप मधील सई तर काय सुंदर दिसत होती काल फ्रॉक मध्ये... ( डोळ्यात बदाम )...
कसली मस्त पर्सनॅलीटी आहे, उंच, गोरी, लांबसडक केस... वेळ पडली तर २ जनांना सहज भिरकावेल... Lol
अशी मुलगी हवी लाईफपार्टनर..
>>>> morpankhis, बगतांव हां .......
मामी मस्तच तुमच्या पोस्टी..
मामी मस्तच तुमच्या पोस्टी.. या धाग्यवर तुमच्या पोस्टी वाचवयास यावेसे वाटते..
त.टी.
हा घागा एक टप्पा पार केल्यानंतर, मामी तुम्ही पुढचा धागा उघडा "बिग बॉस - मराठी - २" ...
Pages