बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिताचं वागणं confused पेक्षा विचित्र वाटतंय कॅमेरा समोर एक बोलते आणि वागते मात्र वेगळेच...उनाबद्दलतर काही बोलायलाच नको

काल रेशमच्या स्वप्नात राजेश आला होता म्हणे. Proud

आऊ ने बिचिन्ग केली काल मेघाची. मेघाने रेशमची तिच्या जेवणावरुन थोडी स्तुती केली म्हणून. Angry

पुन्हा एकदा भयानक टास्क दिला! Sad

स्मिता नक्की कोणाच्या ग्रुप मध्ये आहे? Uhoh I am confused.

आस्ताद कसा काय आणि कधी झाला nominate टास्क मध्ये? >>> सईच्या गाडीत होता आस्ताद. ती हुषारीने आस्ताद स्वतः पुष्कर ला वाचवतो का नाही ती आधी पहात होती आणि मग त्याला वाचवायचे की नाही हे ठरवत होती. असे करत करत फायनली नॉमिनेट केले त्याला. >>>> धन्स मैत्रेयी. Happy

ह्या आठवड्यात जुई नाही तर रड्या दोघांपैकी कुणी तरी गेल्यावर पुढच्या आठवड्यात आऊ जावी. काहीही उपयोग नाहीये तिचा सध्या. आधी करमणूक तरी करायची. आता, बर्‍याचदा नुसती शांत बसा शांत बसा करत बसलेली असते.

आस्ताद ला खरोखर मानसिक प्रॉब्लेम दिसतोय.
https://www.loksatta.com/manoranjan-news/big-boss-marathi-uncut-episodes...
इथे ती बातमी तो किती देशभक्त आहे या टोन मधे छापली आहे पण मला त्याचे वागणे नॉर्मल वाटले नाही. ऑल पॉइन्ट्स टू अँगर इश्यूज.

आस्तादने सईला शब्द देऊन ऐनवेळी सुशांतचं ऐकलं आणि शब्द फिरवला. सई म्हणून रडतेय बहुतेक, आस्ताद wrong.

अंड कुरतडले की बाद हे समजल्याने सोपं झालंय.

स्मिताने विश्वास गमावला.

Big boss must be a fan of agile methodology >>स्वरुप Rofl जाम हसतोय
सोडून दिलं मी गेले ४-५ दिवस बघणं. जमेल तसे इथेले अपडेटच वाचतो आता.

पुन्हा एक मॅड टास्कचा मॅड दिवस.

मेघा टीमनं कितीही स्ट्रॅटेजी करायची म्हटली तरी ते त्या व्हिलन टीमच्या पातळीवर उतरू शकत नाहीयेत. शिवाय त्या टीममधे स्मिता, भूषण आणि जुई हे अति चपळ लोक आहेत. रेशमही मनात आणलं (आणि ते ती कोणाविरुध्द आणते ते आपल्याला माहित आहेच) तर जीव तोडून खेळते.

खरंतर काल जेव्हा सुशांत आणि रेशम कॅप्टन पदासाठी उमेदवार म्हणून ठरले, तेव्हाच स्ट्रॅटेजिक माघार घेत मेघा टीमनं त्या दुसर्‍या टीममधल्या सदस्यांच्यात कॅप्टन्सी साठी मुकाबला होऊ द्यावा असा प्रयत्न करायला हरकत नव्हती. होऊ देत त्यांच्यात आपापसात स्पर्धा आणि पडू देत फटी .... तसंही जरी यांच्यातलं कोणी कॅप्टन्सीसाठी नॉमिनेट झालं तरी जरा त्यात असा शक्तीप्रदर्शनाचा टास्क असेल तर समर्थक कमी पडल्यानं हरणारच असणार.

स्मिता खरोखरच पूर्णपणे गंडलेली आहे. तिला हल्ली तिथे कोणी भावही देत नाही तरीही तशीच त्यांच्या पायाशी पडलेली असते. या मुलीला कधी अक्कल येणार देव जाणे.

खोटारडी रडकरी अति डोक्यात जायला लागलीये. बरं नाही बरं नाही म्हणताना सई, आउ, पुष्की विरुद्ध किती ताकद लावून खेळली. स्मितानं सईचं अंडं स्विमिंगपूलमध्ये टाकल्यावर जुईच्या चेहर्‍यावर आनंदच आनंद दिसत होता. महा जळकट, कळकट आणि हलकट बाई आहे. जुई आणि रेशम हे सईवर जामच खार खाऊन आहेत.

सई बाईंचा आज सकाळपासूनच मूड नव्हता. वर अस्तादनं तिच्या तोंडाला ऐनवेळी पानं पुसली मग बिचारी जामच वैतागली. मेघा सईला फार मस्त समजावत होती. मेघा सईला 'सईड्या' म्हणते ते देखिल भारी गोड वाटतं. मेघाला बाथरूममध्ये शरादेखिल फार मस्त समजावत होती. त्या तिघी फार मस्त एकत्र गप्पा मारत असतात. मला शरा आवडते.

आउ का पुष्की आणि सईच्या मागे लागल्यात? ते दोघं खूप छान मित्र झाले आहेत. या बळंच सतत त्यांना सल्ले देतात की पुष्कीच्या बायकोला काय वाटेल.

खाडिलकर आज शक्तीप्रदर्शनाचा टास्क असल्याने डिमांड मध्ये होते.

उद्या पुन्हा हाच बावळट गेम कंटिन्यु आहेसं वाटतंय.

खूप पूर्वी म्हणजे ब्लॅक अँडव्हाईटच्या काळात दूरदर्शनवर जर्मनीतील कोणत्यातरी शहरात दोन टीम्स दरम्यान होणारे मस्त मजेशीर गेम्स दाखवत. मी नाव विसरले त्या खेळांचं. बिग बॉस, त्यातून तरी आयडिया उचला आणि टास्कस इंटरेस्टिंग करा.

आठवलं नाव - टेलिमॅचेस!

मामी ते जर्मनीतले सॉलिड असायचे, क्रिकेट match च्या वेळी पाऊस वगैरे झाला आणि खेळ थांबला की दाखवायचे, फुल टू धमाल असायची.

मामी चे अपडेट्स जास्त खुसखुशीत आहेत टीप्पण्यांसहीत असल्याने मूळ शो पेक्षा. हेच वाचावेत झालं. शो मध्ये कैच्याकै फाल्तूपणा चाल्लाय.

मामी बरोबर लिहिलंय..
सगळा एपिसोड न बघता फक्त थोडं preview बघून तुमची पोस्ट वाचलं की झालं... मग काय हा फालतू अनफेअर गेम बघ्याची गरजच नाही..
इट सेवज टाइम ,एनेरजि अँड मनी...

सध्याची माझी मते,

फेव लिस्ट - सई(फायटर), मेघा(फेअर गेम प्लेयर),श रा(गुड गोइंग),पुष्की(स्ट्रॉंग एंड स्ट्रेटजीक गेम प्लेयर)

हेट लिस्ट- रेशम(बेडर निर्लज्ज हिंसक दादागिरी ओव्हर कॉन्फिडन्स आणि वर अजून 1 लफडं करायची इच्छा असणारी बाय),जुई (रडी,नाटकी,एकसुरी,कटकटी, जळकी),सुशांत (रड्या का बादशहा आणि रा च्या हिंसक दादागिरी गॅंगच्या गादीचा वारसदार ),भूषण(महा चालू, संधी साधू ,खाली मुंडी पाताळ धुंडी)

डबल ढोलकी-आस्ताद(वळू सारखा ताकदवान),स्मिता (रे ची मांजर) (आमचा तुमच्या वर भरोसा नाय)

निरुपयोगी सदस्य-त्यागराज,आऊ(फारसे काही कामाचे नाहीत,नॉट अ गेम चेंजर जरी कोणाच्या ही बाजूने असले तरी)

मामी चे अपडेट्स जास्त खुसखुशीत आहेत > + ११
उद्या पण हेच कन्टिन्यू? झाले नाहीत का आज सगळ्यांचे नंबर?! यापुढे मग कॅप्टनशिप चा टास्क!
आऊ किंवा जुई पैकी कुणीतरी एलिमिनेट व्हावे यावेळी. आधी जुई जाईल असे वाटत होते. आता कालची तिची बडबड, रडारड दाखवली ती पाहून वाटतेय की तिला ठेवायचे असावे की काय या लोकांना. "तू म्हणत होतीस अनफिट आहेस, पण बघ बरं किती छान खेळलीस. मी म्हणत होतो ना तू छुपी रुस्तम आहेस, तेच बरोब्बर आहे. काय मग आता नै ना जायचं घरी?" असे काहीतरी ऐकायची इच्छा नसली तरी ऐकावे लागू शकते. Uhoh

काल आस्ताद मस्त खेळला. त्याचं अंडं सुरुवातीला नाहि आलं (बिग्बॉसने रुल टाइट करण्याआधी), अदरवाइज तो आरामात कॅप्टंसीसाठी उमेदवार झाला असता.

मला वाटतं कि, सध्यातरी एकच सदस्य डोकं वापरुन खेळतोय. स्वतःचं अंडं आल्यावर केलेली समर्थकांची निवड, विरोधी सदस्यांशी असलेले जुने मतभेद विसरुन त्यांचे समर्थक होण्याची तयारी, टास्कच्या ब्रेकमध्ये सहकार्‍यां बरोबर केलेल्या चर्चेत पुढच्या खेळीची स्ट्रटिजिक प्लॅनिंग वगैरे वगैरे... कोण असेल बरं तो?.. Proud

माझा होरा सांगतो कि पुष्कर आता ऑफिशियली विरोधी पक्षात जाणार; प्रत्येक टास्कमध्ये पडणार्‍या माराला, नॉमिनेशनला कंटाळुन... Happy

आस्तादचं अंड वाचलं ना, कोणीच विरोध केला नाही म्हणून. फक्त मेघा विरोध करुन लढा देत होती.

आ सु रे तिघं आहेत ना आता कॅप्टन्सीसाठी उमेदवार.

बिग बॉसला कोणाला घालवायचं आहे की नाही? थत्ते जाउन युगं लोटली.
डेली सोपची सवय झाली आहे बहुतेक त्यांना. मिळतोय टीआरपी ओता पाणी. शरा आली त्याखा आला. ऋ टेंपरवारी गेली ती परत येईलच.
कायमचं बाहेर काही कोणी जाईना!

माझा होरा सांगतो कि पुष्कर आता ऑफिशियली विरोधी पक्षात जाणार; प्रत्येक टास्कमध्ये पडणार्‍या माराला, नॉमिनेशनला कंटाळुन...>> पण त्याल कळत नाही का कि त्या पक्षातला आस्ताद त्याला मदत केल्याचे नाटक करतो. गोड बोलून त्याच्याकडून समर्थन मिळवतात.
आज सई त्याला बरोबर सांगत होती, नको त्यांना समर्थन देऊन सगळी एनर्जी जाईल आणि माझ्यावेळी पडशील फॅ करुन Lol

मामी चे अपडेट्स जास्त खुसखुशीत आहेत टीप्पण्यांसहीत असल्याने मूळ शो पेक्षा. हेच वाचावेत झालं. शो मध्ये कैच्याकै फाल्तूपणा चाल्लाय>>>>>+101.....दोन दिवसापासून सोडून दिल बघणे पण मामी चे विश्लेषण वाचत राहिन

मलाही असाच वाटतंय रेशम आणि सुशांतला ठेवतील TRP साठी, जुई ला जाऊ देतील या वीक मध्ये .
तिचा TRP साठी उपयोग नाही , स्वतःची अशी काही BB घरात आयडेंटिटी नाही , फक्त ऐकणाऱ्याच्या डोक्यात जाईल अशी सततची किरकिर ssssss

मामी , तुमचे रोजचे अपडेट्स खूपच मस्त आणि खुसखुशीत !!!
वाचल्यावर एपिसोड पाहिल्यानंतर चा राग कमी होतो Happy

मामी , तुमचे रोजचे अपडेट्स खूपच मस्त आणि खुसखुशीत !!! +१
वाचल्यावर एपिसोड पाहिल्यानंतर चा राग कमी होतो >> अगदी ! कालच्या भागात नवीन काहीच नाही. मेघा-सई -शरा हतबल झालेल्या पाहून वाईट वाटत होतं. बाकीचे जिंकतायत म्हणून नव्हे, तर परत तेच आणि तेच ...शक्तिप्रदर्शन आणि बॅकस्टॅबिंग यामुळे !
शरा हळूहळू ऋ ची जागा भरुन काढायचा प्रयत्न करतीये हेच त्यातल्या त्यात बरं ..

रच्याकने, जुई परवा कॅमेर्‍यात घुसून बोलत होती, ते पाहून डिस्कव्हरी , NatGeo वगैरे चॅनल्स वर जंगलातल्या छुप्या कॅमेराकडे प्राणी ज्या कुतुहलाने अगदी जवळ जाऊन, वगैरे पाहतात तसं वाटत होतं Wink

पोस्ट्स आवडत असल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि सेवेसी श्रुत होय ही विज्ञापना.

Pages