Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणखी के वाइल्ड कार्ड एंट्री:
आणखी के वाइल्ड कार्ड एंट्री: किशोर चौघुले, कॉमेडी एक्स्प्रेस्मधला..
हे घर कधी रिकामं होईल असं वाटत नाही, ऋतुजा सुद्धा येईलच काही आठवड्यात.
नवीन Submitted by पुंबा on 1 June, 2018 - 17:11
_______________/\_________________
कोणी यायला तयार होत नाही असे दिसतेय
काय कोणाकोणाला आणतायेत,
काय कोणाकोणाला आणतायेत, त्यापेक्षा आणू नका कोणाला. येत नसणार मराठी कलाकार कोणी इथे
एकेक बघून.
काय कोणाकोणाला आणतायेत,
काय कोणाकोणाला आणतायेत, त्यापेक्षा आणू नका कोणाला. येत नसणार मराठी कलाकार कोणी इथे Lol एकेक बघून.
नवीन Submitted by अन्जू on 1 June, 2018 - 17:42 >>>>>>>१००
असेच दिसतेय एकुण

आम्ही नाही येणार जा , आम्हाला भीती वाटतेय
तेव्हा रेशिम तिला काहितरी
तेव्हा रेशिम तिला काहितरी बोलायला गेली तेव्हा सई म्हणाली की मी तुझ्याशी नव्हे बिग बॉस शी बोलतेय. >>> शाब्बास! असंच उत्तर दिलं पाहिजे.
रेशम काल शर्मिष्ठा बद्दल
रेशम काल शर्मिष्ठा बद्दल बोलत होती अस्ताद कडे.
की म्हणे आम्ही पहिल्या दिवसापासून इथे झगडतोय. पुढचं कंसात असेल..
सई अफाट धीराची आहे पन तितकीच
सई अफाट धीराची आहे पन तितकीच उतावीळ, आळशी आणि लाडावलेली. मेघा कमिनी आणी खरोखरच खूप अभ्यास करून आलेली आणी म्हणूनच रे ग्रुपला पुरून उरणारी आहे. आज ती या शोची अक्षरशः जान बनलेली आहे. दोघी एकत्र असतील तर रे ग्रुपचा काहीही निभाव लागणार नाही. आता, शरा तिच्या ग्रुपमध्ये आल्याने ती आणखी स्ट्रॉंग होईल. उद्या जुई गेली तर सुशांत आणखीच पिसाळेल पण ते सई- मेघा ग्रुपला परत फायद्याचे ठरेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुष्करचे कसलेही स्वतंत्र व्यक्तिमत्व या ग्रुपिझममुळे समोर येत नाही. तसेच तिकडे भूषण, स्मिताचे होते, झाकोळले जातात.
शर्मिष्ठा चांगलीच चलाख निघाली
शर्मिष्ठा चांगलीच चलाख निघाली आहे. ऋतुजाची स्ट्रॅटेजी वापरून ती टिकणार बरेच आठवडे असे दिसते. रे कंपूला असेही सई, मेघाला घालवण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
काल रेशम सईला काय झाले बाळा
काल रेशम सईला काय झाले बाळा? तू अशी का रडतेयस कालपासून? असे म्हणाली. अगदी चल काय करून देऊ तुला खायला असे पण म्हणाली! टु बी ऑनेस्ट मला तेव्हा ती जेन्युइन वाटत होती. आणि त्यावर सई रडक्या आवाजात "मसाला टोस्ट" असे म्हणाली तेव्हा मला फार हसायला आलं. दॅट वॉज अ क्यूट मोमेन्ट
(अर्थात प्रोमो मधे गोष्टी पुन्हा नेहमीच्या वळणावर आलेल्या दिसल्या नंतर!)

सई जरा जास्त लाडावलेली आहेच नो डाउट, पण एक लाइकेबिलिटी आहे तिच्यात. मला आवडते ती
सुशांत हिट लिस्ट वर दिसतोय सोशल मेडियावर सगळीकडे. तोच गेला तर बरे होईल. पण मेघा त्याला सपोर्ट करायच्या मागे लागलीय कॅप्टन म्हणून
हो तो सीन छान होता रेशम सईचा.
हो तो सीन छान होता रेशम सईचा. फ्रेंच टोस्ट म्हणाली ना ती.
सई डोक्यात जाते पण माझ्या. रड, लाड, पुष्की हे जरा अति तिचे पण task काही छान केले तिने. सर्वात मस्त टिश्यू पेपरची सिगरेट फुकून सुशांतला चिडवणे हा होता.
मला पण रेशम जेव्हा सईच्या
मला पण रेशम जेव्हा सईच्या डोक्यावर हात थेवुन तिला समजावून सांगत होती तेव्हा जेन्युइन वाटली होती खूप.
रडकरी जाऊ देत घरी. ती डोळे
रडकरी जाऊ देत घरी. ती डोळे बारीक करून आणि चेहरा खोटा रडका करून किरकिर्या आवाजात बोलायला लागली की "बाई, जा पुढच्या दारी जा" असं सांगावसं वाटतं.
फ्रेंच टोस्ट मागितला सईनं.
फ्रेंच टोस्ट मागितला सईनं.
मला पण रेशम जेव्हा सईच्या डोक्यावर हात थेवुन तिला समजावून सांगत होती तेव्हा जेन्युइन वाटली होती खूप. >> हो हो.
व्हूटवरच्या एका क्लिपमध्ये सुशांत आपल्या टीमबरोबर ( रेशम सोडून बाकी सर्व व्हिलन मंडळी आहेत ) पुढची स्ट्रॅटजी ठरवताना म्हणतो की रेशमताईला नीट सांगायला हवं ती लगेच विसरते.
हे घर कधी रिकामं होईल असं
हे घर कधी रिकामं होईल असं वाटत नाही >> पोरखेळ
बिग बॉस पेक्षा आओ जाओ घर तुम्हारा असे नाव ठेवायला पाहिजे.
यांना बिबॉचा डेलिसोप करायचाय का काय? Proud>>>
मेघाने आता माझा मित्र म्हणत सुशांतची चमचेगिरी बंद करावी आणि जी काय मैत्री असेल ती बाहेर दाखवावी. तो माणुस दिवसेंदिवस खालच्या पातळीवर उतरायला लागला आहे.
रात्री या लोकांची चर्चा चालू होती....नेहमी आपणच व्हिलन कसे ठरतो? तर आपली चूक असली तरी समोरच्यावर इतके हॅमर करायचे कि त्यालाच वाटायला पाहिजे कि त्याचे चुकले..इती सुशांत.
मी खोटे बोलणार ही माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा तर ठेवा किंवा नाही ठेवला तरी माझ्या विश्वात काही फरक पडणार नाही... इती आस्ताद.
ऑडियन्सला कळायला पाहिजे कि कोण कसे आहे, ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे....इती स्मिता. आपण कोणाताही मुद्दा हसत-खेळत टोमणा मारुन नाही उडवायचा त्यामुळे त्याच्या सिरियसनेस जातो...इती भुषण.
नंतर त्याच्या उलट रेशमताईंची स्मिताकरवी सुशांतला शिकवणी कि तू चीडू नकोस हसत हसत बोल आणि एकटा बोलू नको १-२ जणांना बरोबर घे म्हणजे एकटाच वाईट होणार नाहीस आणि गम्मत करत होतो म्हणून बाजूला होऊ शकतोस.
याचा परिणाम......
सपुमेश गटात चर्चा....जाम पचरपचर चालू आहे वाटतं.....स्मिता धड इकडची ना तिकडची....प्लॅनिंग प्लॉटिंग गेमिंग सुरु झाले.....ते एकत्र आणि स्ट्राँग आहेत.
सकाळी सकाळी सईने कॉफीचे भांडे धुतले नाही आणि मेघा तिला ओरडली नाही याचा डंका पिटून आता ममांनाही ते सांगणार.
आस्तादने नटूनथटून आपल्यासमोर येऊन सईची पाठदुखी फेक आहे अशी पुडी सोडली. (चालता-बोलता-नाचता-बागडता स्पॉंडिलायटीस त्याला कधीच दिसला नाही या भावात)
रे सु आ ची पु आणि सै बद्दल चर्चा... त्यावेळीही आस्ताद पुष्कर सै च्या हाकेला ज्याप्रकारे धाऊन जातो ते अवघड आहे हे बोलताना विसरला कि त्याची रेशमताई तर राच्या मांडीवर बसायची, मिठी मारायची, पापी घ्यायची. रेशमनेही त्यास दुजोरा दिला पण हे विसरली कि पु फक्त हाकेला धावतो, कामे करतो त्यांच्यासारखे नाही वागत. त्यापेक्षा बोलली असती कि अरे छान मैत्री अशू शकत नाही का? मी अन राजेश पण क्लोज होतो पण लोक असाच वेगळा अर्थ काढतात तर जास्त खरी वाटली असती पण तिच्यात तो खरेपणा नाहीच तर सुचणार कसा.
फेसवॉश्च्या कार्यात पुष्कर आणि सुशांत यांच्यात्ला फरक दिसून आला. मेघाचे सईला समजावणे छान होते.
एक गट दुसर्या गटाला वाईट कसे दाखवायचे हा विचार करतो तर दुसरा गट आपण कसे चांगले खेळायचे हा विचार करतो.
मला पण रेशम जेव्हा सईच्या
मला पण रेशम जेव्हा सईच्या डोक्यावर हात थेवुन तिला समजावून सांगत होती तेव्हा जेन्युइन वाटली होती खूप. >> हो मला पण. ती नंतर भुषणने तिला का विचारायला गेली हे विचारल्यावर म्हणाली कि मला तिला विचारावेसे वाटले म्हणून मी विचारले.
<एक गट दुसर्या गटाला वाईट
<एक गट दुसर्या गटाला वाईट कसे दाखवायचे हा विचार करतो तर दुसरा गट आपण कसे चांगले खेळायचे हा विचार करतो.>
अगदी अगदी..
ऑ सोडली तर सगळे पॅशनेटली खेळतात.
मला पण रेशम जेव्हा सईच्या डोक्यावर हात थेवुन तिला समजावून सांगत होती तेव्हा जेन्युइन वाटली होती खूप. >>
होय.. मेघाच्या वेळेला पण रडलेली ते जेन्युईन वाटलं होतं..
हो त्या स्ट्रॅटेजीज
हो त्या स्ट्रॅटेजीज हास्यास्पद वाटल्या मला. मला खोटा म्हणता ना आता मी खोटेच वागणार (?!) नाही म्हणजे एक्झॅकटली फरक काय पडणार आहे त्याने?!
अणि सई पुष्कीच्या सतत मागे लागते म्हणून आस्ताद त्यांचे बाहेर गेल्यावर कसे होईल, ती त्याच्या घरीच जाऊन टपकेल वगैरे चिंता करत होता ते ऐकून
असे झाले! अरे रेशम आणि राजेश चे जे चालायचे ते यांना दिसतच नव्हते की काय ? सुशांत तर आपल्याच जगात. म्हणे नविन आलेत ना दोघे त्यांना राहू द्या. जुने लोक आहेत ना ( सई मेघा वगैरे) त्यांना आपण बाहेर काढू शाल श्रीफळ देऊ. काय कॉन्फिडन्स आहे!! 
काल सुशांतचं आस्तादवर उखडणं
काल सुशांतचं आस्तादवर उखडणं ठरवुन (डायवर्शन) केल्यासारखं वाटत होतं कारण आस्तादची रिअॅक्शन कूल होती. त्यांनतर सुशांतने समर्थक बेसावध असताना घुसुन अंडं पळवायचा/कुरतडण्याचा प्रयत्नहि केला. पण या गोंधळात पुष्करचा पापड का मोडला, हे कळलं नाहि. कदचित सुशांतवरच्या रागाचा तो टिपिंग पॉइंट असावा. असो, पुश-कि हल्ली किल्ली हरवल्यासारखा दिसतोय...
स्मिता मस्तच खेळली त्या चावी शोधण्याच्या टास्कमधे. आता मांजरेकरांना तिचं कौतुक करणं भाग आहे...
इकडे लिहिणार्या सगळ्यान्ना
इकडे लिहिणार्या सगळ्यान्ना वाकुन नमस्कार.
बापरे!!! येवढ्या बारकाइने बघता तो शो?
नंदकिशोर चौघुले करणार बिग
नंदकिशोर चौघुले करणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री
काय चाल्लयं काय?
काल सुशांतचं आस्तादवर उखडणं
काल सुशांतचं आस्तादवर उखडणं ठरवुन (डायवर्शन) केल्यासारखं वाटत होतं कारण आस्तादची रिअॅक्शन कूल होती.>>हो
आस्ताद आणि स्मिताचे पण भांडण खोटे वाटले.
तू मारल्यासारखे कर मी लागल्या सारखे करतो या टाईप.
बापरे!!! येवढ्या बारकाइने
बापरे!!! येवढ्या बारकाइने बघता तो शो? >> हो.
का हो काय झाले ?
नाही फारच बालीश आहे.
नाही फारच बालीश आहे.
चालु दे.....
आता या सगळ्या मंडळींना बिबॉ
आता या सगळ्या मंडळींना बिबॉ नंतर कधी सिरीअल किंवा पिक्चर मधे वगैरे बघू तेव्हा यांची इथलीच रुपे आठवत राहतील., कोण कसे आहे ते?
नाही फारच बालीश आहे. >>> हो
नाही फारच बालीश आहे. >>>
हो लहान मुलांकरताच आहे तो शो, म्हणूनच आम्ही बघतो.
नाही फारच बालीश आहे. >>>
नाही फारच बालीश आहे. >>> मोकिमी, तुम्ही सुरवातीचे काही शो बघितलेत का? तुम्हाला बालीश कसे वाटले काय की! कारण खरं तर तेव्हा तो अॅडल्ट शो होता. म्हणून प्रेक्षकांनी तक्रार केली, मग एकाला हाकलले बिबॉ नी.

नविन काही नाही. बरेच लोक बिबॉ
नविन काही नाही. बरेच लोक बिबॉ (किंवा तत्सम शो) पहाणार्यांना " कसं बॉ पहाता तुम्ही हे असले " असे (उच्चासनावरून) म्हणतात. त्याने त्यांची स्वतःची उच्च अभिरुची आणि इन्टलेक्ट सिद्ध होत असेल तर होऊ दे बापडी. जाउ द्या झालं
पण मी काय म्हणते, जर तो शो
पण मी काय म्हणते, जर तो शो आवडत नाही तर त्या शोच्या
धाग्यावर जाऊन प्रतिसाद वाचावेतच का?
तर काय! अगदीच बालिश आहे बिग
तर काय! अगदीच बालिश आहे बिग बॉस. मी पण सोडला बघायचा.

हो हो! पण असल्या लोकांना पिडायला मजा येते.
" कसं बॉ पहाता तुम्ही हे असले " >>>
>>>जर तो शो आवडत नाही तर त्या शोच्या धाग्यावर जाऊन प्रतिसाद वाचावेतच का?>>>
अरे!!! धाग्यावर प्रतिसाद वाचायचा आणि नावडीचा कॉजल संबंध!!! अगदीच कायच्या काय झालं की हो हे! कुफेहिपा!!!
:मायबोलीवर जे आयडी डोक्यात जातात त्यांचे धागे सर्व प्रथम वाचणारा माने:
तर काय! अगदीच बालिश आहे बिग
.
काल कॅप्टनशिप टास्क मधे मेघा
काल कॅप्टनशिप टास्क मधे मेघा येडी सुशान्तला सपोर्ट देणार म्हणत होती ऐकून मात्रं फार म्हणजे फार डिप्रेशन आलं ,इतकं सगळं होऊन पुन्हा तेच ??
या दोघींना खरच अजुनही रेशम सर्वात मोठी व्हिलन वाटते पण विदाउट राजेश ती इतकी वाइट नाही वागत, सुशान्त सर्वात नालायक, हिंसक. शॉर्ट टेंपर्ड , अतिशय लो मेंटॅलिटी माणुस आहे हे तिला कधी समजणार ?
रेशम बरेचदा सटकलेली असली/दादागिरी करत असली तरी क्वचित अधुन मधुन तरी माणुसकी दाखवते, सईला किती व्यवस्थित समजावत होती ! अगदी आई मुलीला सांगेल तशी.. नेमक्या शब्दात.. खाण्याबद्दल प्र्शन विचारला कि माझाही लहानपणी रुसवा निघून जायचा, रेशमने अगदी छान एखाद्या आई सारखी ट्रिक वापरली अँड इट वर्क्ड !
सुशान्त -जुई - अस्ताद- भुषण पब्लिक विघ्नसंतोषी कॅटॅगरी आहे, दे मेक फन ऑफ इन्ज्युरीज.. रेशम इज वे बेटर, कशीही असली तरी जखमी सई- पुष्की बद्दल तिने कन्सर्न वेळोवेळी दाखवलाय.
सई मेघा बाकी इतक्या हुषार इथे सुशान्त अस्ताद हे रेशम पेक्षा वाइट आहेत हे कधी समजणार पोरींना ?
कॉलर ऑफ द वीक मधे मला संधी मिळाली तर हा प्रश्न सई मेघा दोघींना विचारायचय मला, पण ही स्पर्धा देशी रेसिडेन्ट्स साठी आहे, कोणि तरी विचारा माझ्या वतीने !
Pages