बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिक्स्ड असावं, सुशांत घराबाहेर जाणार असेल तर घालवणार नाही आणि तोच कॅप्टन होणार.

पण मी काय म्हणते, जर तो शो आवडत नाही तर त्या शोच्या
धाग्यावर जाऊन प्रतिसाद वाचावेतच का?

Submitted by मामी >>>>>
एक नम्बर पकडलत मामी... जियो... Happy

आज बरीच मजामजा होती घरात.

सगळ्यात पहिले म्हणजे सई तलवार उपसून रणांगणात उतरली होती. दे दणादण ती रेशमला उलट उत्तरं देऊन गप करत होती. सई लैच फॉर्मात होती आज.

आज सुरवातीलाच काही निवडक विशेषणे दाखवून ती ज्या व्यकींना सूट होतात असं सदस्यांना वाटतं त्या सदस्यांना १ ते ५ क्रमांकावर उभं करायचं कार्य होतं. त्यात पहिला शब्द होता अति आत्मविश्वास. पहिल्या क्रमांकावर सर्वानुमते मेघा उभी रहायला हवी म्हणून ती उभी राहिली.

मग सई सुरू झाली, की दुसर्‍या क्रमांकावर रेशमनं उभं रहायला हवं. रेशम नेहमी म्हणते की मी फायनल पर्यंत जाणार फलाणा ढिकाणा, आम्हाला ती कॉम्पिटिशन मध्ये धरतच नाही वगैरे हा तिचा ओवर कॉन्फिडन्स आहे. असे सगळे मुद्दे सईनं मांडले. तर रेशम म्हणाली की मला मान्य नाहीये हे आणि मी दुसर्‍या क्रमांकावर उभी रहाणार नाही. मी तुम्हाला माझी कॉम्पिटिशन मानत नाही याचा अर्थ की मी त्या रेसमध्येच नाहीये आणि माझी कॉम्पिटिशन माझ्या स्वतःशी आहे. टॉप ५ मध्ये पाच पाच रेशम एकमेकींशी लठ्ठालठ्ठी करताना ड्वाल्यापुढे आल्या आणि ड्वाले पानावले.

मग सुशांत म्हणाला खरंतर सई दुसर्‍या क्रमांकावर हवी कारण ..... उभे असाल तर बसून घ्या आणि मग सुशांतचं कारण वाचा ...... तर कारण हे की इतके ४८ दिवस झाले पण सईला घरच्यांची आठवण आलेली नाही. ती म्हणते की मी घरच्यांच्याशिवाय राहू शकते वगैरे तर हा तिचा ओवर कॉन्फिडन्स आहे. Biggrin

एनीवे, आपल्या क्रमांकावर उभे राहिल्यावर त्या सदस्यांना आपलं स्पष्टीकरण द्यायचं होतं. तेव्हाही सईनं रेशमशी पंगा घेतला. सई म्हणाली की मी अजिबात ओव्हर कॉन्फिडन्स नाही. उलट रेशम आणि राजेश स्वतःला कॉन्फिडन्ट समजत होते पण आता पाहिलं तर राजेश घराबाहेर आहे की! पोरगी मस्त बोलत होती.

शेवटी भवती न भवती होऊन एकदाचे नंबर आणि मेंबर यांच्या जोड्या जुळल्या. पण बिग बॉसनं इथेच एक मज्जा केली. घरात रहायला येणार्‍या नविन सदस्याला हवे तसे नंबर बदलण्याचा अधिकार दिला होता. नवा सदस्य अजून घरातल्या लोकांना दिसला नव्हता पण त्यानं मेंबरांचे नंबर बदलून त्यांना उभं रहायला सांगितलं. लोकं हैराण झाली की हे कोण? मग त्यांना अंदाज आणि काही वेळातच त्यांनी कोण येतंय हे नावही अचुक ओळखलं - आवाज आणि बोलण्याच्या ढबीवरून. तर त्याप्रमाणे आज नंदकिशोर चौघुले घरात दाखल झाले आहेत.

मधेच मेघा आणि पुष्की-भूषण यांचं मेघानं तिचे कपडे अनेक बेडस्च्या खणांतून आणि कपाटांतून ठेवल्यामुळे आणि ते ती तिथून काढत नसल्यामुळे वाजलं. मेघानं खूपच कपडे आणले आहेत असं सगळेच वेळोवेळी म्हणत असतात. पण तिनं ' मी लोकांच्या इशार्‍यावर नाचणार नाही' असं सांगून त्यांना उडवून लावलं. पुष्की चिडला होता आणि मग नव्या कॅप्टननं हा मुद्दा धसास लावायचा असं त्यांनी ठरवलं,

आज फॉग परफ्यूम वापरून स्विमिंग पूलमध्ये एक खेळ घेतला. तीन-तीनच्या तीन टीम्स करून पाण्यात टाकलेल्या फॉगच्या जास्तीत जास्त बाटल्या गोळा करायच्या होत्या. हायलाईटस होते - फॉगच्या जिंगलवर नाचणं आणि फॉगचे हँपर गिफ्ट म्हणून मिळणं. रेशम अस्ताद जुईची टीम जिंकली. हा टेलिमॅचेस सारखा होता बरं का!

रेशम कॅप्टन्सीच्या कार्यातून गळल्यामुळे उद्या अस्ताद आणि सुशांत पैकी एकाची निवड होईल, या साठी ऐकूण ७ सदस्यांनी त्यासाठी उमेदवारांना एक एक नारळ देऊन आपलं समर्थन जाहिर करायचं आहे.

नन्दकिशोर चौघुले ! कोण आहे हा? आणी ओव्हर कॉन्फिडन्स च्या नॉमिनेशन बदलुन त्याने अगदी का..ही.. ही रॅन्किन्ग दिल, अजुन शरा किवा॑ त्या.खा वर २५ वेळा कॅमेराही आला नसेल की तो १० वाक्य/मत त्याने दिले नसेल त्याला कसल ओव्हर कॉन्फिडन्स मधे टाकतोय
सुशान्त ने सईसाठि दिलेले कारण म्हणजे बादरायण सबन्ध जोडण्याचा कळस होता,

पोरगी मस्त बोलत होती.>>>
हे म्हणजे असा झाला आपला तो बाळ्या अन दुसऱ्याच ते कार्ट.. ती स्वतःचा सोडून रे रा चा काढत बसलेली..अन इतका नाकाला मिरच्या कशाला झोंबयला हव्या होत्या सई ला..

हा टेलिमॅचेस सारखा होता बरं का! >>> हे लय भारी.

सई स्वतःची बाजू उत्तम मांडते, ठाम असते. बरोबर असते बरेचदा तरी हल्ली फार डोक्यात जायला लागली आहे, तोंडपट्टा फार सपासप सुरु असतो.

काही पण असु देत...पण सई साठी आपल्या डोळ्यात बदाम...
घरातील द मोस्ट ब्युटीफुल, डॅशींग आणि बरच काही....
तिचा तोंडाचा पट्टा जरी असला तरी ... फक्त ऐकत बसाव वाटत... Happy

या दोघींना खरच अजुनही रेशम सर्वात मोठी व्हिलन वाटते पण विदाउट राजेश ती इतकी वाइट नाही वागत, सुशान्त सर्वात नालायक, हिंसक. शॉर्ट टेंपर्ड , अतिशय लो मेंटॅलिटी माणुस आहे हे तिला कधी समजणार ? >>>

मेघा व सईला ( विशेषतः मेघाला ) रेशम ही नुसतीच व्हिलन वाटत नसून शेवटपर्यंत टिकणारी कंटेस्टंट पण वाटत असावी. तिथे तुल्यबळ प्रतिस्पर्धी नको म्हणून त्या रेशमची आधीच गच्छंती झाली तर बरी असाही विचार करत असाव्यात. म्हणून सुशांतला वाचवून तिला टार्गेट करत असतील.

मला आस्तादने आज दिलेली सगळी कारणे आवडली, पटली.

चौघुले घरात एंटर करण्यापूर्वी ची रूम हि राजेशच्या अज्ञातवासाची रूम आहे हो ना ?
बेड काढून फक्त खुर्ची आणि कॉफी टेबल हा फरक दिसला .

आता निवड फक्त आस्ताद आणि सुशांत मध्ये करायची असेल तर आस्ताद कॅप्टन झालेला चालेल, सुशांतपेक्षा कितीतरी बरा पण होणार नाही अशी चिन्हं दिसतायेत. चौगुलेने स्वतःच्या मनाने नसतील लावले नं, bb ने सांगितलं असणार, दाट संशय.

Please , Wild card entries Avra... !! ---------

आणि अवरायच्या नसल्या तरी निदान जरा हँडसम दिसणारे तरुण ऍक्टर पाठवा

Mami, mi ata phakta tumschy posts ani weekendcha dav baghatate. Kantala yayla laglay... tumachi khoop chhan lihita.

मामींची आपण इतकी तारीफ केलीय, त्यांना दर एपिसोड नीट बघून अपडेट टाकावा लागतोय. >> हो ना! एकदम जबाबदारी असल्यासारखं वाटायला लागलंय. पण मी कंटाळा आला तर नाही लिहिणार अधून मधून.

काल तर अमाप झोप येत होती पण तसंच लिहिलं कारण काल सई मुळे लिहावसं वाटत होतं. शेवटी अजिबात टाईप करता येईना तेव्हा थांबले. सगळे पॉइंट्स नाही कव्हर करता आले.

एखादा हँडसम तरुण पाठवण्या ऐवजी एक तगडा पैलवान पाठवा , एखाद्या टास्क मध्ये आकांत आणि वस्ताद ला उचलून स्विमिंग पूल मध्ये फेकला की कळेल त्यांना

खन्डोबा (देवदत्त नागे )लाच बोलवावे लागेल मग !
खरय ! जरा फॅमिलिएर फेसेस पाठवा किवा सई ला सुट होइल असा मस्त हॅन्डसम गबरु जवान

अरे काय ती अनॉयिंग छपरी वाइल्ड कार्ड एंट्री , मी त्याला पाहिल्या पाहिल्या म्हंटलं कि हा टिपिकल भुषण सुशान्त कॅटॅगरी छपरी आहे, बरोब्बर भुषणचा मित्रं निघाला Proud
हा तोच ना शिट्टी वाजली गाडी सुटली ?
कित्ती छपरी पब्लिकची गर्दी झाली आहे !
बाकी अजुन एक बोअरिंग एपिसोड , सर्वात राग पुष्करचा आलाय, अस्ताद कडून बॅकस्टॅबिंग टाय्टल काढून घ्ययाचय त्याला, कित्ती मेघाच्या मागे इरिटेट करत होता आणि शेवटी जे सईला भडकवलय (आणि बहुदा सईला पटलय), मेघामुळे निगेटीव्हिटी वाढेल सांगत होता , त्याला माहित नहीये मेघा कित्ती मोटिव्हेट करते सईला, सईचे मुड स्विंग्ज असतात आणि मेघा नेहेमी तिला नीट समजावते.
हा पुष्कर शर्मिष्ठा - सई सगळ्यांना काहीतरी वेगळच सांगत फिरत होता, त्याला अर्थताच कल्पना नाहीये कि पब्लिक सपोर्ट हा फक्त तो सई मेघाचा मित्रं आहे म्हणून आहे , पब्लिक भयंकर शिव्यांची बरसात करतय सडन्ली पुष्कर वर.. लवकरच एलिमिनेट होईल वाटतय जर मेघा सईची मैत्री तोडली तर !
आधीच यांचा गृप वीक आहे , त्यात एकमेकांशी भांडण लावतोय , कठिण आहे यांच्या गृपचे भवितव्यं !
उद्या अ‍ॅक्चुअली पुष्करनेच एलिमिनेट व्हावं, सई मेघाची फ्रेंडशिप तोडून गेम स्पॉइल करण्या आधी !

हो खरंच पुष्कर फक्त दिसायलाच साधा दिसतो त्याच्या मनात काहीतरी वेगळच चालू असतं असं वाटतंय आता.... मूर्ख वाटतोय तो आणि स्मिता पण वेगळंच वागत आहे

ओव्हरॉल ऋतुजा सोडून गेली, सईची पाठ मोडली वगैरे प्रकारानंतर शो ची क्वलिटी आणि एन्टरटेन्म्नेट फॅक्टर फारच घसरत चाललाय !
त्यात त्यागराज, शिट्टी वाजलेला माणुस वगैरे फ्लॉप वियर्डो वाइल्ड कार्ड्स घुसलेत .. यांच्या पेक्षा मग ह.खा बरी होती !

ओव्हरॉल ऋतुजा सोडून गेली, सईची पाठ मोडली वगैरे प्रकारानंतर शो ची क्वलिटी आणि एन्टरटेन्म्नेट फॅक्टर फारच घसरत चाललाय !
त्यात त्यागराज, शिट्टी वाजलेला माणुस वगैरे फ्लॉप वियर्डो वाइल्ड कार्ड्स घुसलेत .. यांच्या पेक्षा मग ह.खा बरी होती ! >>>+ 1

नन्दकिशोर चौघुले ! कोण आहे हा?>>>>> HA TUMCHYASATHI KAAYPAN ASHI COLOURS MARATHI VAR PROGRAMME ASAYCHA TYAT ASTO. Sagala colours marathi cha public ghusavlay

पुष्करचा राग आला खरंच काल.
मेघा अधे मधे जे सईला पेप टॉक देते ते मस्त असतं !
सई ने मूड स्वींग्स सांभाळले नाहीत आणि मेघाने सुशांत ची सतत बाजू घेणे (फक्त जुना मित्र म्हणून) सोडलं नाही, तर पब्लिकची मतं विरोधात जाऊ शकतात !
रच्याकने, त्या ओव्हर कॉन्फिडंस ची क्रमवार फायनल यादी काय आली ? कालच्या भागातला फक्त शेवटचा अर्धा तासच पाहता आला.

लोकहो, एक गोष्ट लक्षात आली का ??
त्या बिग बॉस रहिवासी संघाच्या बोर्डावर अजून ४-५ नावांच्या पाट्या लावण्याइतपत जागा शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही लोक वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकतात असा सोयीस्कर अर्थ लावावा का !!! Uhoh

ऋतुजा येउदे लवकर. सई फार डोक्यात जायला लागलीय माझ्या. ती आली की सईचं महत्व कमी होईल आणि मेघाला जरा सपोर्ट मिळेल, ह्या सईचं काही सांगता येत नाही. ती कोणाच्याही ऐकण्या म्हणण्यात येते.

पुष्कर जरा चुकीचा वागतोय पण मला आवडतो. मला अजिबात पूर्वी न आवडणारे, आवडायला लागलेत त्यात मेघा आणि ऋतुजाचं नाव घ्यायला लागेल. ऋतुजा कोणीही असो मेघा सई त्याचं पटत नसेल तर ऐकत नाही, स्वत:ची विचारबुद्धी वापरते, हे मला जास्त आवडलं.

स्मिता कशीही असली तरी आवडते अजूनही पण मी वोट वगैरे नाही देणार तिला.

Pages