Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Welcome Thatte
Welcome Thatte
, first bigboss influenced ID on maayboli.
आँ? अहो मायबोलीवर तरी असे नका
आँ? अहो मायबोलीवर तरी असे नका म्हणू. मध्यमवर्गीय काका काकू हा तर इथला यूएसपी आहे.>>> थत्तेकाका इथेपण?
So we all know, why Mr
So we all know, why Mr.Thatte deserves to be the Big boss
थत्तेकाका इथेपण? Wink >> :
थत्तेकाका इथेपण? Wink >> :
वेलकम थत्ते
रा-रे नी घरात झोपायचं फक्त नाही बाकी क्रिया कर्म करायला घरात जायला काही हरकत नाहीये ना?
स्मिता उत्तम गेम खेळली पण
स्मिता उत्तम गेम खेळली पण जुईला पुढे केलं चोरी जास्त केली म्हणून. नाही पटले.
कॅप्टनशिप task मध्ये बिग बॉस खूप अनफेअर होते. त्यांनी दोन टीम निवडायला हव्या होत्या. जुईसाठी इतके जण आणि पुष्कर साठी इतके कमी. ती मठ्ठ जुई कॅप्टन होणार, श्या. पुष्कर व्हायला हवाय मला.
अंजु +1
अंजु +1
पण ती नॉमिनेटेड आहे ना मग
पण ती नॉमिनेटेड आहे ना मग कॅप्टन कशी होईल?
सेफ करणार तिला. बावळटपणा.
सेफ करणार तिला. बावळटपणा.
कॅप्टनचं काम काय असतं नक्की?
कॅप्टनचं काम काय असतं नक्की?
पण ती नॉमिनेटेड आहे ना मग
पण ती नॉमिनेटेड आहे ना मग कॅप्टन कशी होईल?>>> होवू शकते. फक्त एलिमिनेट झाली तर पोटनिवडणूक होउन दुसरा/री कप्तान होईल.
<<स्मिता उत्तम गेम खेळली पण जुईला पुढे केलं चोरी जास्त केली म्हणून. नाही पटले.>> अशाच प्रकारे वेळोवेळी या बाईंनी स्वत:ला ठेवलेले ड्म्ब नाव सार्थ ठरवलंय. नुसतं त्या राणी व राजाचा हुकुम शिरसावंद्य मानून चाकू-सुरे घेवून १००% टास्कमध्ये लढायचं. ते म्हणले, उठा, आपल्याला नाही खेळायचंय असं, की निघून जायचं, आणि स्वतःच्या कामासाठी मोबदल्याची वेळ आली की मागे हटायचं. मागच्या वेळी पण ती रेशम घेवून गेली क्रेडीट व यावेळी जुई.
कॅप्टनचं काम काय असतं नक्की?>
कॅप्टनचं काम काय असतं नक्की?>> कामाला काही अर्थ नसतोच म्हणा...काटेरी मुकुटच जर इतरांना पुरुन उरता येत नसेल तर. पण १ आठवडा नॉमिनेशन नाही होत. हाच काय तो फायदा.
खरं आहे अजब, का स्मिता अशी
खरं आहे अजब, का स्मिता अशी वागते. स्वतःचं डोकं का चालवत नाही.
बिग बॉस चे सगळेच टास्क रिपिट
बिग बॉस चे सगळेच टास्क रिपिट आहेत त्यामुळे हिन्दीची कपेअर केलेच जात, हिन्दी प्रॉपर तिजोर्या खोटे दागिने हिरे सगळ दिल होत चोरायला, मजा आली होती ते बघायला.
हिन्दी प्रॉपर तिजोर्या खोटे
हिन्दी प्रॉपर तिजोर्या खोटे दागिने हिरे सगळ दिल होत चोरायला, मजा आली होती ते बघायला.>>ईथे पण द्यायला हवे होते. जीवनावश्यक म्हणून लोकं चड्ड्या-बड्ड्या चोरायला लागले
उद्या मजा आहे. बिगबोस दहा
उद्या मजा आहे. बिगबोस दहा सेकंद राहिले बोलताच त्या दहा सेकंदात धुमश्चक्री उडत पानीपत होणार आहे..
बाकी आज तो पुष्कर ते ब्लॉक्स कसे आधी वेड्या सारखे ठेवत होता. एक पडला की सायकल धडाधड पडाव्यात तसे सर्व लाइनीत पडणार. दोन तीन वेळा तसे पडल्यावर त्याला अक्कल आली. त्यात त्याच्या टीममध्ये बायका च बायका. ढकलाढकलीत बाकी फार मस्त मजा आली. पण दोघे जण पेटले तर बाकीचे मारामारी थांबवायला कशाला जातात. आयपीएलमध्ये जसे सुपर ओवर बघायला तरसतोय तसे एक मस्त जोरदार फाईट बघायला तरसत आहे. त्यात लेडी फाईट झाली तर फुल्ल पैसा वसूल !!
चोरीच्या टास्क मध्ये चोर
चोरीच्या टास्क मध्ये चोर हातात वस्तू घेऊन फिरतात तरिही पोलिसांचे काहीही चालत नाही
मला हा शो झेपतच नाही. हिंदीत
मला हा शो झेपतच नाही. हिंदीत पहायचा प्रयत्न केला. अगदी दोन-तीनच पाहिले इतक्या वर्षात पण ते मारामारी, लावालावी, ओरडणे आवडून घेणे जमत नाहीये.
हे पुर्ण स्क्रिपटेड असते ना, अगदी प्रेमप्रकरणं ते मारामारी ते गॉसिपं ?
जर तसे नसेल तर, अंगाला झोंबाझोंबी करणं , मिठ्या मारणं, शिव्या देणं अंगावर येण्यासारख आहे. मराठी बिग बॉस्स कसं आहे म्हणून गेले पाच एक भाग सलग बघितले कारण मला वाटले मराठी नट नट्या आहेत मग कमी फालतुपणा, झोंबाझोंबी असेल तर एकदमच चाट पडले. तसेही मराठी लोकं दांभिकपणात पुढेच आहेत आणि फुकटचे आम्ही सस्कृती कसे पाळतो दाखवणारे..
पण तरी एक प्रश्ण पडला, हे खरे असते का? रेशम टिपणीस प्रेमप्रकरण, कालची मारामारी वगैरे?
जुई उगाच चिडतेय .. मेघा
जुई उगाच चिडतेय .. मेघा सुशांत ला बोलायला अली तर म्हणे हिला इथून जायला सांग म्हणे. राजेश म्हणे तू जा मेघा तुझा आवाज इररितेटिंग आहे..
स्मिता ने समंजसपणे सांगितले की टीम चर्चा चालू आहे तू नंतर बोल..
राजेश म्हणे सुशांत ला कसलय लोकांशी मैत्री करतो रे तू..
राजेश आणि जुई - शेमलेस आहेत खरच.
ती स्मिता पहावं तेव्हा
ती स्मिता पहावं तेव्हा त्रासलेल्या चेहऱ्याने घरी फिरत असते, जस काय अर्धवट झोपेतून उठवले कोणीतरी हीला, आणि तोंड सताड उघडं करून फिरत असते, स्वतःची अक्कल रेरा कडे गहाण ठेवले, मुळात तिला अक्कलच नाहीये ती सई बरोबर डंब बोलते.
जुई म्हणजे कोल्हे कुई आहे.
जुई म्हणजे कोल्हे कुई आहे. किती ती कुरकुर!
पुष्कर पण लायनी पलीकडच्या टीम मध्ये जाणार थोड्याच दिवसात आणि तो गेला की सई ?
मेधा नुसता भोंगा आहे, लेव्हल हेडेड खेळू नाही शकत ती. पण ती आणि सई विचित्र स्वभाव आणि अहंकाराने एकट्या पडणारेत. स्मिता सगळ्यात बेस्ट खेळली, रेशम पण चांगलं खेळली. रेशम शेवटी मतं मिळवायला सेंटी ही झाली. गुड स्ट्रॅटेजि.
ऋजुता आणि आऊ तिकडे नाही जाणार पण लवकरच बाहेर जातील. आऊ सई ला शेठणी म्हणाली, तशीच वागते ती, आणि ते सगळ्यांना समजतंय.
पण ती आणि सई विचित्र स्वभाव
पण ती आणि सई विचित्र स्वभाव आणि अहंकाराने एकट्या पडणारेत.
>>>>
हेच त्यांच्या पथ्यावर आहे.
जेव्हा एक विरुद्ध सहा अशी लढाई असते तेव्हा ती लढाई आणि त्या चकमकी कायम राहायला त्या एकाला गेममध्ये ठेवणे गरजेचे आहे
सई अन मेधा मस्तच पण दोघी..
सई अन मेधा मस्तच पण दोघी.. जुई जास्तच सिंपथी गोळा करत असते स्वतः किती बोलते अन मेधा जास्त बोलते म्हणे..
काल ॠतुजा मेधाला छान समजावत होती.. पण स्वतः मात्र गेम मध्ये खुप कमी सहभाग देते.
Fight was between Pushkya and
Fight was between Pushkya and Jui , thrn Why Mr . Sushant cry baby was crying again??

He needs to exit with Rutuja soon.
Bhushan is becoming strong suddenly, he has got good sense of humour too !
आता हि अफवा कोणी पसरवली कि
आता ही अफवा कोणी पसरवली कि 'बिग बॉस रेशमला मारकी म्हैस म्हणाले'
म्हैस धष्टपुष्ट असते. हे सुकट
म्हैस धष्टपुष्ट असते. हे सुकट बोंबील आहे .
सई कशाला ऋतुजाला ऑर्डर करते
सई कशाला ऋतुजाला ऑर्डर करते हे घेऊन ये ते घेऊन ये . ती स्वतः का नाही घेऊन येत . त्यातून उना पेटल्या आहेत थत्तें विरुद्ध . त्याला तुडवतेच म्हणतात . आउंना काऊ म्हटलं यात एवढं चिडण्यासारखा काय आहे . उना च डोक्यात जायला लागल्यात
त्यातून उना पेटल्या आहेत
त्यातून उना पेटल्या आहेत थत्तें विरुद्ध . त्याला तुडवतेच म्हणतात .>>>>थत्ते बिग बॉस मधून बाहेर पडले की बिलिडिंगच्या खाली पोरं पाठवून तुडवणारं आहे त्याना. पोरांनी तुडव तुडव तुडवला की पोरं बाजूला होतील आणि करण अर्जुन चित्रपटात कशी त्यांची आई हार घेऊन उभी असते तशी उषा नाडकर्णी गोंड्यांच्या फुलाचा हार घेऊन लांबवर उभी असेल. मग थत्ते रेंगत रेंगत तिझ्याजवळ जातील आणि पायावर डोकं ठेऊन माफी मागतील. मग उनाच्या आत्म्याला शांती मिळेल आणि थत्तेंना माफ करतील.
पोरांनी तुडव तुडव तुडवला की
पोरांनी तुडव तुडव तुडवला की पोरं बाजूला होतील आणि करण अर्जुन चित्रपटात कशी त्यांची आई हार घेऊन उभी असते तशी उषा नाडकर्णी >>>
डोळ्यासमोरच आलं एकदम माझ्या!!
थत्ते काल बरोबर कळ लावत होते. एक दोघांना बाजूला घेऊन काड्या घालत होते.
जुईचा रडका सूर ऐकायला नको वाटतो. पुष्क्या ला समर्थक कमी पडल्याने तो हरला हे बहुधा त्याच्या मनाला लागले. त्याच वेळी थत्ते काड्या घालत होते. पुष्क्याची चलबिचल झाली आहे.
रेशम कसली सुकी बोंबिल, चांगली भक्कम आहे की. काल मेघासमोर दादागिरी करत होती तेव्हा धिप्पाड दिसत होती नुस्ती.
आस्ताद पुन्हा एकदा टीमसोबत खेळला नाही. मनाने तिकडचाच राहिला. आधी सुशांत आणि मग रेशम का रडले कळलेच नाही. फुल दादागिरी तर करत होते.
एकंदर ज्येना मंबर्स ना कहीतरी करावे लागेल टिकून राहण्यासाठी, कारण टास्क्स असली व्हायलंट होणार असतील तर त्यांना भाग घेणे शक्यच नाहीये.
रेशम एवढी दादागिरी करून मग
रेशम एवढी दादागिरी करून मग रडण्याची नाटकं कशाला करते. राजेश काल मेधाला एवढं तोडून का बोलला की तुझा आवाज ईरिटेटींग आहे, मेधा पहिल्यांदाच बिचारी वाटली तेव्हा. जुई नाही का ईरिटेटीेग वाटत कोणाला, सारखी अखंड बडबड करत असते, मध्ये श्वास न घेता. ऊना काही बोलल्या की फिस्सकन हसायलाच येतं, मुलं पाठवीन म्हणे मारायला, हे करायला मुलगा परवानगी देतो वाटतं त्यांचा. ऊनापेक्षा आरती असती तर निदान जोरदार फाईट तरी केली असती तिने. एकदोघांना नक्कीच लोळवलं असतं तिने. सुशांत का रडत होता येडपट, त्याचं सुटलेलं पोट आणि ती सई त्याचा टीशर्ट वर करत होती, यक. काल रेशम मेघाला खुर्चीसकट हलवत होती पुभामध्ये ते दाखवलंच नाही.
स्मिता उत्तम गेम खेळली पण
स्मिता उत्तम गेम खेळली पण जुईला पुढे केलं चोरी जास्त केली म्हणून. नाही पटले.> स्मिता मुद्दामून शांत राहिली एकतर जुईला कॅप्टन साठी नॉमिनेट केलं राजेश ने आणि स्मिता मुद्दामून गप्प आहे कारण या आठवड्यात ती नॉमिनेशन मध्ये नाहीये . जुई आहे . उद्या जुई रविवारी बाहेर पडली तर तिला शेवटचा कॅप्टन होण्यासाठी चान्स मिळूदे असा स्मिताने विचार केला . स्मिता हुशार पद्धतीने खेळतोय . फक्त ती मेघा सारखी बोलून दाखवत नाही म्हणून ते प्रेक्षकांना कळत नाहीये . ती डम्ब तर अजिबात नाहीये . डम्ब स्वतः सई आहे कारण ती मेघाच्या डोक्याने खेळतोय . स्वतःच डोकं वापरत नाहीये . परत जिकडे तिकडे रडून सिम्पथी गोळा करतेय . आता थोडा रडकेपणा कमी झालेला आहे
Pages