बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या यांच्यात कॅरम स्पर्धा घेतली तरी कॅरम खेळायचे सोडून एकमेकांच्या डोक्यावर पावडर उधळत बसतील. अशक्य पाणचट भरलेत. >>> Lol काव्यात्म न्याय यालाच म्हणतात ना? ओढून ताणून वळकटी आणणारा हे बोलतोय!

लहानपणी म्हणजे अगदीच दुसरीत असताना ऑफ तासाला आमच्या टिचरनी आम्हा ३-४ मुलींना एका तासपुरतं वर्ग सांभाळायला सेक्रेटरी केलं आणि वर्ग आमच्या हतात देऊन मोकळ्या झाल्या , झालं पॉवर आल्यावर घेतल्या पट्ट्या, डस्टर्स आणि काढलं दणादण बदडून सगळ्या पोरांना ज्यांचा राग येतो , मग बिग बॉस प्रमाणे टिचरची बोलणी खाल्ली नंतर पण त्यावेळी हात मोकळे केल्याचं काय समाधान मिळालं Rofl
आजचा बिग बॉस टास्क बघून तेच आठवलं !
आजचा एपिसोड बघताना मला फार म्हणजे फार हसु येत होतं , एक गरम डोक्याची लेडी पोलिस चोरांना अशी चोरी करायची नाही, नीट करा सांगत होती, दुसरी लेडी पोलिस चोरांनी अंडरगार्मेन्ट्स चोरली म्हणून रडत बाहेर पळाली चोरांना थांबवण्या ऐवजी, तिसरा दाढीवाला गणारा पोलिसही बाहेर धावला रडक्या बाळाला शान्त करायला, मग आत चोरांना विनवण्या करायला गेला “आमची पोलिस रडतेय, असं वागु नका”, अजुन एक वयस्कं पोलिस नुसताच “आता माझा हात उठेल हं “ धमकी देत होता ( हे बहुदा आता माझी सटकलीचं थकलेलं पोकळ व्हर्जन ) , बाहेरची एक कामचुकार म्हातारी पोलिस नुसतीच वटारलेल्या डोळ्यांनी दात ओठ खात “थांब हिला जेलमधेच टाक” कोकलत होती जसं काय खरच जेल आहे Biggrin
स्मिता चोर एकटीच लय राडा - दंगा करत होती ,बाकी चोर आळशी होते , पुष्कर चोर त्यातल्या त्यात अ‍ॅक्टिव्ह होता पण बर्यापैकी भुरटा होता, प्रयत्न करत होता पण त्याची शक्ती पोलिस मैत्रीणीला चोरीचे नियम काय आहेत काय नाही सांगण्यात जात होती, वयस्कं दाढीवाला कॅप्टन चोर नुसताच कपडे सांभाळायला उभा होता, रेशम चोर नुसतीच किंचाळत होती, चोरीत काहीच मुद्देमाल जमवत नव्हती.
बाकी आज स्मिताचं मेघाला चिथवणं बघून लगान मधली ब्रिटीश टिम आठवत होती , त्या अर्जनची बडवाबडवी चालु असते, त्याने विकेट फेकावी म्हणून त्याला चिथवतात,” तुम् साला गुलाम लोग हमारे जूते के नीचे रहेगा” आणि मग गरम रक्ताचा अर्जन चिडून गेम खराब करतो Proud
Btw हिंदी बॉस कधी पाहिलं नाही पण खरच हाथापाई झाली तर सिक्युरिटी टिम असते का मारामार्या थांबवायला ?
आज सई मात्रं कॅप्टन असून शान्त वाटत होती.

<ऋतुजा मुर्ख.. Rofl
मोठ्या मोठ्या मुली इनर्स मुलांच्या हातात देतात म्हणून रडतेय.. Rofl>
दक्षिणा, मला वाटतं आपण या गोष्टीकडे चुकीच्या पद्धतीने पहात आहात.
रेशम, राजेश यांनी जे केलं ते निषेधार्हच आहे. इनरवेअर्स अश्या प्रकारे हातात घेऊन कॅमेर्‍यासमोर नाचवणं हे कोणत्याही दृष्टीने योग्य मानले जाउ नये असे वाटते. मुळात चोरी करण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये अश्याप्रकारे कपडे विस्कटने वगैरे गोष्टींची काय गरज होती. त्याने कुठलाच उद्देश साध्य होणारा नव्हता. स्मिता खरोखरीच डंब असलयसारखे खेळत होती. राजेश त्या दिवशी मोठा संस्कृतीरक्षक आणि मुलींचा आदर ठेवणारा वगैरे दाखवत होता स्वतःला त्याने अश्या प्रकारे विकृत वागणं मांजाने खपवून नाही घ्यायला पाहिजे. ऋतुजानेदेखिल या गोष्टीचा जाब रे-रा दोघांना विचारायला पाहिजे.

राजेश ऋतुजाच्या बापाच्या वयाचा आहे, जरी यंग समजत असला तरी तो थेरडाच आहे तिच्यापुढे. त्याच्याकडून असे प्रकार झालेले कसं सहन होईल तिला?

इनरवेअर्स अश्या प्रकारे हातात घेऊन कॅमेर्‍यासमोर नाचवणं हे कोणत्याही दृष्टीने योग्य मानले जाउ नये असे वाटते.
>>>
+७८६

मुळात हे हेतूपुर्वक केले होते. एक पुरुष म्हणून बघायलाही ते किळसवाणे वाटले. ज्या स्त्रीबाबत घडले तिला रडू फुटू शकतेच. मुळात बहुतांश लोकं तिथे निगरगट्ट तरी आहेत वा लाज विकून आलेले तरी आहेत. त्यामुळे एखादी नॉर्मल व्यक्ती नॉर्मल पद्धतीने यात रिएक्ट होत असेल तर ती बोअर वा बालिश वाटू शकते.

जसा गेम पुढे जाईल तसे लोकांना समजेल की जो जितका बेताल वागेल तो स्पर्धेत राहणार. त्यामुळे हे वाढतच जाणार...

स्मिता, राजेश , रेशम रॉक्स. आजचा एपिसोड जाम आवडला.
मेधा आणि आऊला - ve पोट्रे करायला भाग पाडलं. नियमात ब्रा चोरायचा नाही कुठेही न्हवत. त्या सांस्कृतिक पोलिसांची डोकी टोटल आउट करून टाकली. मेधा तर इतकी तणतणत होती आणि तो शेलारमामा.
केओस इज बेस्ट स्ट्रॅटेजि. स्मिता वर टोटल फिदा. सई आणि मेधा एकदम बच्च्या वाटल्या आज. #खुळचटमराठीलोकउसुल
हे नाही करायचं आणि ते नाही वरून मेधा ला मांजरेकरांनी झाडलं पाहिजे. मेधा डोक्यात जात्येय. रा आणि रे ला सगळे इतके बोलतायय की मला आता त्यांचं गुटरगू आवडायला लागलंय. Lol

इथे हळदीकुंकू नाहीये हो. तुझ्या गळा माझ्या गळा केलं तर कोणी बघणार नाही. राडा केला तर रस आहे बघायला. नाहीतर बघायला बरेच पर्याय आहेत.

यात शेवटच्या राऊंडला किती लोकं ठेवतात? दोन कि तीन? एवढ्या कमी लोकांत काय टास्क टास्क खेळतात? कमी लोकांत बोअर होते की जास्त मजा येते?

इथे हळदीकुंकू नाहीये हो. तुझ्या गळा माझ्या गळा केलं तर कोणी बघणार नाही. राडा केला तर रस आहे बघायला. नाहीतर बघायला बरेच पर्याय आहेत.

+786

हे नाही करायचं आणि ते नाही वरून मेधा ला मांजरेकरांनी झाडलं पाहिजे. मेधा डोक्यात जात्येय.
>>>

तिची स्ट्रॅटेजी आहे ती. तुझ्या गळा माझ्या गळा न करता प्रत्येक गोष्टीत टांग अडकवायची. प्रत्येक टास्क, राडा, हाणामारीमध्ये ती सहभागी असतेच. तिचा हाच गुण तिला शेवटपर्यंत नेणार.

कालच्या भागातले काही भाग अपलोड नव्हते झाले त्यामुळे तुटक तुटक बघता आलं .. नीट लिंक नाही लागली
bb ने सगळ्यांना त्या चौकोनात बसायची शिक्षा का केली ? नीट खेळेल नाही म्हणजे नक्की काय केलं ? कोणी सांगेल का ?

मेघा आणि सै च्या टीम ने २९ गोष्टी चोरल्या ?? बापरे !!
मग स्मिता ते कपडे उचका फासकी काय करत होती ? तिला कळलंय ना कि चोरी करायची आहे समोरच्याला उस्कवायचं नाहीये ?का हि अजून पहिल्या खूचींच्या टास्कवाल्या मोड मधेच आहे अजून ?? आणि तरी राजेश काही बोलला नाही ??
काल मेघा किती कचकच करत होती .. तिला तरी समजायला पाहिजे कि स्मिता हे मुद्दाम करतेय .. तरी हीच तुणतुणं चालूच

एकंदरीत मज्जा येत होती बघायला .. पण मधले भाग नसल्यामुळे जरा विरस होत होता .

पण त्याच बरोबर ती खूपच शॉर्ट टेम्पर आहे. आज स्मिताने शांत आवाज ठेवून जाम उकसवलं तिला. सई आणि मेधा स्वतः कुठेही नॉमीनेट झाल्या नाहीत. आता नंतर जे लोक नॉमीनेट झाले नाहीत त्यांना नॉमीनेट केलं तर जातील एका फटक्यात. टू सेफ खेळणं ही अंगावर येऊ शकतं.

काल पहिल्यांदा आस्ताद आवडला मला जेव्हा तो ऋतुजा ला विचारात होता काय झालं ?का रडतेयस वगैरे .. आणि चक्क स्वतःला नॉमिनेट करून घेतले

पण या वीक मध्ये सगळे रेशम च्या टीम वाले प्लस आता आस्ताद हे लोक नॉमिनेशन मध्ये आहेत ना ? सो नेक्स्ट वीक पर्यंत सई आणि मेघ वगैरे सेफ आहेत .. कसलं डेंजर मराठी लिहितेय मी .. Uhoh

हो. ऋजुताला नको म्हणत सेफ पैकी उषा, सई, मेधा, थत्ते पुष्कर कोणीही पुढे आलं नाही. आस्ताद आला.. स्मार्ट मूव्ह. तो नक्की जात नाही आणि ब्राऊनी पॉईंटही खूप मिळतील. अर्थात अनिश्चित काळ आहे, पण मला पण त्याने केलेलं आवडलं. गद्दारी भुला दी.

इथे बऱ्याच लोकांनी हिंदी बिग बॉस बघितलेले दिसत नाहीये.... हा फॉरमॅटच असा आहे की इथे सगळ्या प्रकारचे लोक लागतात..... सगळ्यांकडून एकसारखी अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये.... आणि म्हणूनच वेचून वेचून वेगवेगळ्या पर्सनॅलिटिज आणलेल्या आहेत इथे!
फ्लेवर्स आहेत म्हणून मजा आहे.... सगळेच आरडाओरडा टाइप्स असते तर (आत्ताच इतकी होतीय तर) किती मंडई झाली असती जरा विचार करा!
मस्त चाललेय सध्यातरी!

बायदवे, मांजरेकरांनी हा धागा वाचला तर त्यांना पिसे काढायला बिग बॉस च्या सपोर्ट टीमची गरजच लागणार नाही Wink

बापरे, new teaser, आता खरच मारामारी, लाथा, तुडवातुडवी आणि पाडापाडी !
हे बसत का रुल्स मधे ? फिजिकली हार्म करायचं नाही अंगाला हात लाऊन हा नियम आहे ना ? Uhoh
https://youtu.be/D_S0FBN0dA4

हे असले पांचट चाळे करतात आणि लोक आवडीने बघतात.
कसला रीअ‍ॅलिटी शो. सगळी नौटंकी आहे.
पैसा घेउन जे काही वाह्यात सांगतील ते करायचं. लोक आहेतच चवीनं बघायला.
क्सकाय लोकांना हे सगळ्म बघायला इंटरेस्ट वाटतो देवजाणे.

बापरे! आता यात काय चूक आणि काय बरोबर? कॅप्टनने नियम करायचे का नाही? केलं ते चुकून का मुद्दामून. सगळंच ग्रे एरिआ. कॅप्टनने दोन्ही टीम मधून एक अशी रेफ्री पोझिशन द्यायला हवी होती का? पण परत म मा मी बीबॉ आहे करून बोंबलले असते.
आऊनी रडून सेंटी मारण्यापेक्षा लांब जाऊन बसावं असं मात्र वाटलं.

मेघाला डोकं शान्त ठेऊन खेळायची गरज आहे .
सई किंवा मेघाशिवाय अजुन तरी कोणीच डिझर्विंग वाटत नाही पण स्मिता जाम टफ फाइट देणार.
पुष्कर बघु काय करतोय !

मे बी डोमिनो फुंकरेनी पाडा असा काही नियम हवा होता. यावर जर बीबॉ नी कोणाला झाडल तर मांजा लाच जाब विचारायला हवा.

वरची मारामारी, कोणीही कोणाच्या अंगचोटीला जाऊन त्याला लोळवणे, म्हातार्यांना काहीतरी फेकून मारणे यामुळे खरेखुरे पोलिस तरी येणार नाहीतर अँब्युलन्स तरी !
(विषयन्तर : याने टीआरपी वाढतो म्हणे.
एक इंग्लिश सिरीज होती अनरिअल नावाची, लाइफटाइम चॅनलवर .
त्यात अशा रिअ‍ॅलिटी शोजची खरी रिअ‍ॅलिटी दाखवायचे, प्रत्येक काँटेस्टन्टच्या मागे एक मॅनेजर नेमलेला असतो, त्याचं काम त्या काँटेस्टन्टला 24X7 ऑब्झर्व करणे, त्याला चिथवणे, गंमत म्हणजे काँटेस्टन्टला माहितही नसतं ती व्यक्ती आपल्यावर देखरेख करायला नेमली आहे, त्यांना वाटतं ही जनरल युनिटची माणसं आहेत ! जो मॅनेजर जितकी रडारड, राडा घडवून आणेल त्याला तितका बोनस मिळतो, अँब्युलन्स- पोलिस वगैरे आले तर एक्स्ट्रॉ पर्क्स, कॅश बोनस !)

आजचा भाग बघून तरी मी सई मेघा सोडून पुष्कर स्मिताच्या टीम मध्ये.
<<<
पुष्कर स्मिताची टिम नाहीच्चे , ती फक्तं टास्क पुरती :),
अ‍ॅक्चुअल हाउस टिम मेघा पुष्कर सई विरुद्ध बाकी सगळे , म्हणायला आउ, ऋतुजा आहेत पण त्या दोघींना काही अर्थ नाही.
स्मिता स्मार्ट आहे पण त्या सो कॉल्ड सिनियर MCP लोकांमधे रमते , योग्य वेळी बाहेर पडेल अशी आशा आहे !

Pages