बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे खरा गेम कळलेले फक्त ३ जण आहेत.. सई, मेधा, स्मिता... बाकी सगळे नुसते धिंगाणा घालायला आलेत.
स्मि चा गेम बिल्कुल नाहि आवडला काल... उगाच काहिहि करत होती.. ॠतुजा ने न रडता सुनवायच ना? अन कोणतेहि टॅक्टिक्स गेम साठी वापरत नाहि कुणीहि.. तसं खेळलं तर खुप मजा येईल... नुसता आरडाओरडा करुन थोडं गेम खेळले जातात... त्या रेशम ने जावच या विकेंड ला. नुसती फालतु दादागिरी करते..

अर्र,
दिपांजली तू दिलेली लिंक पाहिली..
त्या घरावर स्वामी ओमची छत्रछाया आहे कि काय असं वाटायला लागलय मला..
मला कालचा भाग पटला नाही.. जूईला कशाला दिली कॅप्टनशीप.. तीने गप बाहेर जावं आता..सतत किरकिर करत राहते..काहीही..
उनाला खरच लागलं कि उगा मी बिच्चारी करत आहे?
रेशम बद्दल कणव वाटतच नाही कधी..
उलट थत्ते अन उना पडले तर बेकार वाटल उगा..
आस्तादपन जूईला सपोर्ट करतोय का बरय..
स्मिताने गेम पलटवायला पाहिजे आता.. उगा त्या येड्यांच्या गोतावळ्यात वेळ घालवतेय..

खुर्चीच्या गेम नंतर त्यांचे ग्रुप बनलेत . रेशम च्या ग्रुप मध्ये स्मिता खरी गेम खेळते स्मिता नेहमीच आपल्या कॅप्टनच्या सांगण्यानुसार खेळत असते .आणि फटफट ऍक्शन घेते . स्पेसिफिकली या गेम मध्ये त्यांना दुसऱ्या पार्टी पेक्षा जास्त चोऱ्या करायच्या आहेत .म्हणून तीने सटसट जाऊन कॅप्टन ने सांगितल्या प्रमाणे चाकू आणि कात्रीने समोरच्या पार्टीचे लॉक केलेलं खण फास्ट मोकळे केले . मस्त दंगा केला आवडलं . पण सई मात्र कायम तिला तिला मंद / स्वतःच मत नसलेली समजत असते . गेम मध्ये तुम्ही कॅप्टनच नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? . गेम मध्ये तुम्ही स्वतःची मत चालवायची नसतात. कॅप्टन समोर तुम्ही तुमची मत मांडू शकता /डिस्कस पण करू शकता पण शेवटी कॅप्टन चा शब्द शेवटचा . स्मिताला बरोबर समजलंय ते. आणि सई सारखी मेघाचं ऐकत असते ती . ती सारखी स्मिताला नाव ठेवते . डोकंच फिरत

इथे हळदीकुंकू नाहीये हो. तुझ्या गळा माझ्या गळा केलं तर कोणी बघणार नाही. राडा केला तर रस आहे बघायला. नाहीतर बघायला बरेच पर्याय आहेत.>> +११११
बायद वे वे आजच्या भागात खूप एकमेकांच्या अंगावर पडा पडी आणि मारामारी आहे Happy

लिंक पाहिली, बापरे राडाच राडा, म्हातारा म्हातारी जिवंत घराबाहेर येवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्या छपरी राजेशला पण आडवा करून २-४ पोकळ बांबूचे ठेऊन द्या. म्हणजे दादागिरी कमी होईल.

वर डिजेने दिलेल्या लिंकच्या खालच्या कमेंट्स महान आहेत. लोकांनी तुफान शिवीगाळ केलीये.>>>>रेशामला किती घाणेरड्या कमेंट्स आल्या आहेत, त्याच लायकीची बाई आहे ती.

डीजेने चोर पोलीस गेम बद्दल मस्त लिहिलंय.

बिग बॉसने पण कशाला दाखवायचं कुठले कपडे आहेत ते कॅमेऱ्यातून, मी बघितलं नाही इथलं वाचून लिहितेय. अति करतात. ती रडायला लागली तेव्हा कळेना का रडतेय.

रेशम मेघा तर इतक्या भांडखोर आहेत, वचवच करत असतात. स्मिता मस्तचं. पण डोकं स्वतःचं जरा चालवायला हवं, रे रा सु आ चं भारी ऐकते.

बिग बॉस हिंदी सगळे सिसन बघितले आहेत आणि माझे स्पष्ट मत असे आहे की, बिग बॉस च्या पहिल्या टास्क मध्ये ज्या टीम बनवल्या जातात, तेच दोन ग्रुप अक्खा सिझन भर चालतात. अपवाद अस्ता सारखे थुंकून चाटणारे लोक.

बिग बॉसने पण कशाला दाखवायचं कुठले कपडे आहेत ते कॅमेऱ्यातून, मी बघितलं नाही इथलं वाचून लिहितेय.
>> ती महामुर्ख आहे हो.
बाकीच्यांच्या फॅन्सी इंनर्स आणि हिचे भोके पडलेले इन्नर्स होते बहुतेक. तरीच ढसाढसा रडत होती.☺️

इनर्स कॅमेर्यात दाखवले म्हणून रडली काय, येडपट्ट आहे ऋतुजा. चोर पोलिस गेम मधे एक तर रेशम ने आरडा ओरडा केला म्ह्णुन कॉस्मेटिक्स ना हात नको लावयला अशी सईच्या टीम ने मांडवली का केली हे कळले नाही तसे नंतर स्मिता चोरी सोडून उगीच वस्तू फेकून मेघाला चिडवणे हेच टास्क असल्यासारखे का करत होती तेही कळले नाही, पण तेच तिला करायचे होते आणि ती यशस्वी झाली. एकूण त्या टीम ने मेघा-सई च्या टीम ला मात दिली हे खरे मात्र. आउट ऑफ कन्ट्रोल गोंधळ माजवला त्यांनी, सईच्या टीम ला झेपले नाही आवरंणे.
ऑब्जर्वेशन - हे सो कॉल्ड सिनियर्स हुषारी करत आहेत, खरेच मॅचुअर आहेत की ओव्हर कॉन्फिडन्ट आहेत माहित नाही पण सगळेच स्वतःहून नॉमिनेशन्स घेऊन , बेड, ब्लँकेट, किंवा कसले कसले त्याग करून ब्राउनी पॉइन्ट्स घेतायत. पण असे कुठेही वॉलन्टियर करायची वेळ आली की मेघा आणि सई अजिबात पुढे होताना दिसत नाहीत. (इन्सिक्युरिटीज?)

जुई ला स्पॉंडीलायटीस चा त्रास आहे असे म्हणत होती खुर्ची टास्क ला.. आज अंगात आले होते बहुतेक, की स्टिरॉइड घेतले होते काय माहीत.. दणादण padapadi आणि उड्या मारत होती.

ती स्मीता खरंच काल काय करत होती! तसं पाहिलं तर तिने पद्धतशीर उकसवलं मेघाला पण ते ही त्या रे रा च्या पांचट ग्रुपच्यासाठी. बरं ते करतानाही काय वाट्टेल तो प्रकाय चाल्ला होता तिचा आणि अक्षरशः मानसिक रुग्ण वाटत होती. (काऊ या शब्दरुपाने बिबॉमध्ये रमाबाई आल्यात बहुतेक स्मितामधे Wink )
तो भूषण पण पद्धतशीर काड्या टाकत होता जेव्हा ऋतुजाने नॉमिनेट व्हायला हात उचलला..म्हणे 'बेटा तुम्हारा करियर अभी तो चालू हुआ है'..त्यांची अपेक्षा होती की सै, मेघा पैकी कोणीतरी करेल स्वतःला नॉमिनेट...पण त्या असलं करण्याची लांबलांब शक्यता नसल्याने आस्ताद झाला व महान बनला. Happy

म्हातारा म्हातारी जिवंत घराबाहेर येवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना>> Happy
त्यांना जास्त वेळ ठेऊ नये इथे. नॉमिनेशनच्या वेळेस त्यांनाच पहिले पुढे करायला हवे. घरातली कामे जमत नाहीत, स्पर्धा-काम जमत नाही, आता तर पीठ पण नाही घरात आणि हे भात खात नाहीत. उना डबलढोलकी तर थत्तेंचा फुटबॉल झालाय प्रत्येकाच्या बोलण्या खात आहेत.

ऋतुजाचे रडणे तिची तात्कालिक प्रतिक्रिया होती. कॅमेर्‍यासमोर रडायला किंवा कारण सांगायला ती स्वतः तयारदेखिल नव्हती त्यामुळे ती हे फूटेजसाठी करत नव्हती. रे- रा सारख्या भिकारचोट लोकांच्या पातळीवर उतरून काही करणे तिला जमत नसेल. परंतू, साध्या मध्यमवर्गिय घरातून आलेल्या, २२ वर्षांच्या मुलीला केवळ टास्क आहे म्हणून कुठल्यातरी पुरूषाने कॅमेर्‍यासमोर अंतर्वस्त्रे फडकवणे सहन होईल असे नाही ना? त्याहून मोठा मुद्दा म्हणजे त्या राजेश नावाच्या बिनडोक पोकळ बांबूला आपण काही चुकीचं वाटलं देखिल नाही आणि हा चुकीच्या गोष्टींना शिक्षा देण्याची आणि मुलींच्या रक्षणाची भाषा करतो.
ऋतुजाने स्ट्राँग होऊन या प्रकाराबद्दल मांजाशी बोलावं आणि त्या रेम्याडोक्याला माफी मागायला भाग पाडावं..
पहिल्या पानावरील कमेंट्समध्ये म्हटल्याप्रमाणेर, ऋतुजाला माझा फूल्ल सपोर्ट आहे. ती नवीन आहे, छोट्या शहरातून आली आहे म्हणून दादागिरी करू पाहणार्‍या टिप्पिकल अभिजनवादी कंपूची उतरवण्यासाठी तरी तिने जिगरबाजपणे खेळावे.

इनर्स कॅमेर्यात दाखवले म्हणून रडली काय, येडपट्ट आहे ऋतुजा. >>>>> Sorry, पण मला हि कमेन्ट पटली नाही. ऋतुजाचे रडणे मला पटले. I support her. मूळातच ती या इन्ड्स्ट्रीमध्ये नवीन आहे. हे अस इन्ड्स्ट्रीमधल्या सिनियर लोकान्चे वागणे पाहून तिला धक्का बसणारच ना.

बिग बॉसने तीन आठवड्यात जे काही टास्क दिले तेच मुळी चुकीचेच दिले (अपवाद तुझी माझी जोडीचे खेळ ). खुर्ची सम्राट वेळी नियम घालून दयायला हवे होते कि कुठले वस्तू डोक्यावर टाकायचे, कुठले नाही. हा टास्क क्रिएटिवलीही करता आला असता. सेम अबाउट चोर-पोलिस टास्क. काय काय चोरायच, चोरायच नाही त्याला सुद्दा काही नियम हवेत कि नाही?

डोमिनोज ठेवण्याचा टास्क गार्डन एरियामध्ये व्हायला हवा होता खर तर. हा टास्क कुठल्याही मारामारीविना, फनी करता आला असता.

ऋतुजाचे रडणे तिची तात्कालिक प्रतिक्रिया होती. >>>+१. स्वाभाविक वाटलं अगदी ते आणि त्यामागचं कारण पण की आम्ही घरी आमच्या भावा-वडीलांसमोरही ते येवू देत नाही.
थोडक्यात तिची हे असले प्रकार सहन करायची मानसिक तयारी नाहीये, त्यामुळे पडेल लवकरच बाहेर.

खुर्ची सम्राट वेळी नियम घालून दयायला हवे होते कि कुठले वस्तू डोक्यावर टाकायचे, कुठले नाही. हा टास्क क्रिएटिवलीही करता आला असता. >>> असं कधीच करत नाहीत...कारण त्यातून काहीच कंटेंट मिळत नाही. आपआपल्या समजूतीप्रमाणे सगळ्यांनी वाट्टेल ते करुन झाले की मग बेबनाव, भांडणे, स्पर्धा, इर्ष्या असलं मस्त बाहेर येतं. तोच तर शो चा आत्मा आहे.

चोर पोलिस गेम मधे यांचे कपाट त्यांनी कापून मोकळे केले, ड्रॉवर्स मधले कपडे उचकटवून फेकले आणि तरी त्यांना हात लावायला वा जेल मधे टाकायला मनाई.. का?
एखाद्याच्या प्रॉपर्टिवर त्याच्यासमोर त्याच्या मर्जीविरुद्ध हात टाकणे हा गुन्हा नसतो का?

रच्याकने, त्या रे रा ला 'कोणत्याही परिस्थितीत घरात प्रवेश करता येणार नाही' असा आदेश होता ना बिबॉ चा? ते दोघे भांडायला आत कसे आले होते?

रच्याकने, त्या रे रा ला 'कोणत्याही परिस्थितीत घरात प्रवेश करता येणार नाही' असा आदेश होता ना बिबॉ चा? ते दोघे भांडायला आत कसे आले होते?>> हा प्रश्न मलापन पडला.. वाटल बिग बॉस रागवेल निमय मोडल्याबद्दल पण टिम रा जिंकली असं दिसतय.

>>रे- रा सारख्या भिकारचोट लोकांच्या पातळीवर उतरून काही करणे तिला जमत नसेल.
चिल करा रे.... एव्हडं सिरीयसली घेऊ नका हे.. मुळात एक्दा सर्वांनी बि बॉ वर यायला मान्यता दिली की 'ईथे जे असतं तेच दिसतं' या बि बॉ च्या टॅग लाईन साठी त्यांनी तयार रहाणे अपेक्षित आहे. त्यामूळे इथे कुठलेही आंतरपाट नसणारेत. सगळ्यांना सगळच पटेल असे नाही. अशा वेळी बिलो द बेल्ट किंवा अंडर द स्कीन वागणूक वा प्रक्षेपण होत असेल तर ते योग्य का अयोग्य हा वाद निरर्थक ठरतो. स्पर्धा आहे आणि ती जिंकायची तर काहिही करायची व झेलायची तयारी असलेलेच टिकतील हे नक्कीच. हा कार्यक्रमच असा आहे.
आपण प्रेक्षक म्हणून जमल्यास मजा घेऊ, थोडे गॉसिपिंग करू ;), किंवा आपले मत नोंदवू...
अगदीच नसेल आवडत, पटत तर ईतर बिंडोक मनोरंजन मालिका आहेतच...! Happy

रच्याकने: किती लोक हा कार्यक्रम आपल्या मुलांबरोबर बघतात? किंवा त्यांना बघू देतात? मॉडरेट करून वा न करून? विशेषतः जिथे रेकॉर्डेड बघण्याची सोय आहे, नेट, टीव्ही किंवा अ‍ॅप वर?
(अर्थातच कळत्या वयातील मुलांबद्दल विचारतो आहे. )

कॅप्टनपदासाठी मुळात स्मिताला का पुढे नाही करत ? जुई कशी काय लढतेय ती एलिमिनेशन्साठी नॉमिनेटेड असताना ?
जुई एक भयंकर रडकी बोअर काकुबाई आहे, तिला काढाव आता !

ऑब्जर्वेशन - हे सो कॉल्ड सिनियर्स हुषारी करत आहेत, खरेच मॅचुअर आहेत की ओव्हर कॉन्फिडन्ट आहेत माहित नाही पण सगळेच स्वतःहून नॉमिनेशन्स घेऊन , बेड, ब्लँकेट, किंवा कसले कसले त्याग करून ब्राउनी पॉइन्ट्स घेतायत. पण असे कुठेही वॉलन्टियर करायची वेळ आली की मेघा आणि सई अजिबात पुढे होताना दिसत नाहीत. (इन्सिक्युरिटीज?)
<<
आधी मेघा भूषण ठरत होते, मग अचानक बदलून लव्हबर्ड्स ठरले, टीआरपी साठी ??
आय कॅन ऑलरेडी इमॅजिन “ सरकायलिओ खटीया जाडा लगे“ हॅपनिंग Wink

स्पर्धा आहे आणि ती जिंकायची तर काहिही करायची व झेलायची तयारी असलेलेच टिकतील हे नक्कीच. हा कार्यक्रमच असा आहे.
आपण प्रेक्षक म्हणून जमल्यास मजा घेऊ, थोडे गॉसिपिंग करू ;), किंवा आपले मत नोंदवू...>>> +१११

जुई एक भयंकर रडकी बोअर काकुबाई आहे, तिला काढाव आता ! >>> आँ? अहो मायबोलीवर तरी असे नका म्हणू. मध्यमवर्गीय काका काकू हा तर इथला यूएसपी आहे.

Pages