Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूषण जाईल असे वाटते.
भूषण जाईल असे वाटते.
जुई कॅप्टन आहे पण ती तशी अजिबात खंबीर नाही. दरवेळी ती रेराकंपूला विचारणार कि आता काय करायचे? मग एक वेळ अशी येईल कि मेधा किंवा सई तिला जाऊन विचारायचा चान्सच नाही देणार आणि झाड-झाड झाडतील. रेराकंपू मदतीला धाऊन येईल पण त्या बधणार नाही. जुईला मी कॅप्टन का झाले असेच वाटेल. कॅप्टन कमजोर असेल तर बरेच राडे होऊ शकतात त्यामुळे ती असणार असे वाटते.
आता यापुढे कंपू फोडूनच टास्क होतील. ज्यांचे तोंडही बघावेसे वाटत नाही त्याच्या बरोबर काम करावे लागणार.
सई ने मागच्यावेळी आधी बाप
सई ने मागच्यावेळी आधी बाप काढला होता स्मिताचा मग रेशम ने सई ची आई, दोघी खालच्या पातळीवर उतरल्या, म मां दोघीना बोलले होते.
काल भूषण ने थत्ते सरांची
काल भूषण ने थत्ते सरांची acting छान केली. ते लक्ष वेधून घेण्यासाठी नाटकं करतात. आऊ खरंच पडल्या.
>>> नाही हो अंजु... खरच पडले थातते, आणि मला वाटलेलं गेला यांचा हात, एलबो किंवा शोल्डर तरी, नशीब वाचले.
सध्यातरी आय लव पुष्कर.
सध्यातरी आय लव पुष्कर.
स्मिता आवडत असली तरी रे रा चं ऐकते ते अजिबात आवडत नाही.
थत्ते खरंच पडले असतील तर म
थत्ते खरंच पडले असतील तर म मां काहीच कसं बोलले नाहीत भूषण ला. ते खरंच पडले असतील तर माझ्या वाक्याबद्दल सॉरी.
उद्या बिग बॉस ने वेगळे ग्रुप
उद्या बिग बॉस ने वेगळे ग्रुप बनवले आणि ओपोसित ग्रुप मध्ये असेल तर स्मिता भांडल रारे बरोबर 100%.
स्मिता हिंदी बिग बॉस लेव्हल आहे.. लांबी रेस की घोडी.
चरपस +1
चरपस +1
नाही, स्मिता टास्क करेल पण
नाही, स्मिता टास्क करेल पण त्या छपरी गृपशी पंगा नाही घेत, एक टास्क केलं कि सई बरोबर, जो सईमुळे जिंकल्या सुध्दा , पण ती बॅक टु छपरीज


आता मलाही स्मिता डंब वाटायला लागलीये, सई वॉज राइट
Btw, ते महागुरु आणि स्वप्नील २ पकाउ एकत्रं म्हणजे कठिण आहे
ही लिंक पहा, रेशम कटहरेमे
https://www.facebook.com/BBMarathi/videos/1817948284916762/
जुई-रेशमच्या तुलनेत त्या
जुई-रेशमच्या तुलनेत त्या येडबंबू राजेशला कमी झापलं गेलं आहे..
रेशमला आपली बाजू आजिबातच मांडता येत नाहीये..
भलताच ट्विस्ट चक्क जुई सेफ???
भलताच ट्विस्ट चक्क जुई सेफ?????
रे- रा चे चाळे भोवले बहुतेक त्यांना..
दोहोंपैकी कुणीही गेलं तरी मेघा- सई प्रचंड स्ट्राँग होणारेत. माझा अंदाज- राजेश जाईल. आणि ते सुयोग्यच असेल. तो सगळ्यात मोठा हिप्पोक्राईट आहे..
ममा परत एकदा बोअर
ममा परत एकदा बोअर
जिथे गरज नाही तिथे ओरडले जुईला अन जिथे गरज होती तिथे शांत.
बकवास एकदम
बाकी मी वोट केले होते जुईला, ती आवडते म्हणून नाही तर असेच tp
रेशम जाईल वाटते कारण ओल्लीवूड च्या ऍड मध्ये दिसतेय ती
हो, राजेश जायला हवा, पण ती ऍड
हो, राजेश जायला हवा, पण ती ऍड बघून वाटले की ही ऑलरेडी बाहेर गेलीये
की आतमध्ये शूटिंग ऑलॉउड आहे
मांजा मला तरी आवडला.. आज
मांजा मला तरी आवडला.. आज पॉइंटस काढ- काढून बोलला. मी बनवलेला स्वैपाक कुणी खायचा नाही वाला मुद्दा त्याने वेळेवर काढला.
रेशमला भरपूर ग्रिल केलं, जुई, स्मिताचे पितळ उघडं पाडलं..
सुशांतचं रडणं आणि उनाचं केकाटणं डोक्यात जायलंय आता.
दोघेही लवकरात लवकर कटावेत..
ऋतुजा सेफ खेळतेय ती अजून २-३
ऋतुजा सेफ खेळतेय ती अजून २-३ आठवडे तरी टिकेल असे दिसतेय. भूषण- आस्ताद इथून पुढे तरी रे- रा पैकी जो कुणी राहिल त्या/तिच्या ताटाखालचं मांजर बनून राहू नयेत एवढेच वाटते.
So big Boss is going to spare
So big Boss is going to spare both Resham and Rajesh for garden sleepover ?
उद्याचा टीपी वाढावा म्हणून
उद्याचा टीआरपी वाढावा म्हणून मुद्दाम निकाल उद्यावर ढकलला.
I feel they are you goibg to
I think they are you going to get rewarded for open air honeymoon footage
नाही दीपांजली, दोघांपैकी एकजण
नाही दीपांजली, दोघांपैकी एकजण उद्या जाणार.
आधीच्या प्रतिसादाला उत्तर लिहीले अन् ते पोस्ट करेपर्यंत दुसरे रिप्लाय आले.
कदाचित रेशमला बाहेर काढले
कदाचित रेशमला बाहेर काढले सांगून स्पेशल रूममधे शिफ्ट करतील. तिथून आतल्या घडामोडी दाखवून काही दिवसांनी परत आणतील for स्पेशल राडा.
दोघांना स्पेशल रूममध्ये
दोघांना स्पेशल रूममध्ये ठेवतील, अगेन bored.
ती स्मिता का आऊनच्या पाठी लागलीय. बरं झालं म मां बोलले तिला.
रेशम सारखी स्मिताही दिसली
रेशम सारखी स्मिताही दिसली त्या जाहिरातीत.घराच्या.
मला तर उषाताई, रे, रा, विनीत
मला तर उषाताई, रे, रा, विनीत दिसले त्या वॉलिवूडच्या जाहिरातीत.
रेशमला काढून वाईल्ड कार्ड
रेशमला काढून वाईल्ड कार्ड एंट्री देऊन परत आणतील..
राजेश बाहेर गेला वाटतंय, आताच
राजेश बाहेर गेला वाटतंय, आताच लक्ष्मी रोडवर राजेश सारखा एक माणूस जीव मुठीत धरून पळताना दिसला मागे एक बाई लाटणं घेऊन धावत होती.
विनीत म्हणाला बिग बॉस चालू
विनीत म्हणाला बिग बॉस चालू होणार आहे आणि त्यात मी आहे.
म्हणजे जाहिरात अगोदर शूट केली आहे आणि आता TRP मिळाला की दाखवत आहेत
कल्पतरू
कल्पतरू
त्या जाहिरातीत आऊ पण होत्या.
त्या जाहिरातीत आऊ पण होत्या.
सई चं कौतुक, मस्त बोलली ती राजेश बोलल्यावर, तिने बुटाची लेस नव्हती कापली, काढून ठेवली होती याबद्दल पण कौतुक.
सुशांत पेक्षा पुष्कर ला बेस्ट
सुशांत पेक्षा पुष्कर ला बेस्ट प्लेयर म्हणायला हवे होते. ममा नी पार्सिलिटी केली. राजेशला सुद्धा खुपच सौम्य पणे समज दिली. रेशम , राजेश ममा ला कीती उलट बोलत होते, रेशम तर त्याला काही भावच देत नव्हती.
स्मिता कधीच डंब वाटली नाही ती
स्मिता कधीच डंब वाटली नाही ती व्यवस्थित खेळतेय . तिला फक्त तिच वागणं ममा ना पटवून देणं जमत नाहीये . शांत राहून तिने दुसऱ्या ग्रुप ला त्यातल्या त्यात उना ना चांगला वात आणला. फक्त बोलण्यात /स्वतःच मत दुसऱ्याला पटवून देण्यात ती कमी पडतेय . सई पहिल्यापासून लाडावलेली . रडू बाई . रडून सिम्पथी गोळा करणारी म्हणून डोक्यात जाते. स्मिता च्या बुटामधल्या लेस पण तिने टास्क संपल्यावरच गायब केल्या ना . म्हणजे तिने डोक्यात खुन्नसच घेतलाय . मेघाच ऐकून ऐकून वागते. तिला पण स्वतःची मत नाहीयेत लाडावलेली आणि म्हणूनच मंद आहे ती . त्यातून जरा ऋतुजा तिला न बोलणारी वाटते /शांत वाटते म्हणून लगेच तिला कामाला लावलं हे घेऊन ये /ते घेऊन ये . वरती माझं काय ऐकूनच घेत नाहीस वगैरे वगैरे . ऋतुजा शांत राहिली तरी ती सईला चांगली ओळखून आहे तिला कळलंय हि आपल्याला कामाला लावतेय आणि मी काही नोकर नाही तिची आणि करणार नाही या बाबतीत तिची स्वतःची मत क्लियर आहेत . हॅथवे च्या कृपेने कलर्स चॅनल बंद आहे त्यामुळे आजचा भाग उद्या व्हुट वर बघते गेला आठवडा .
लवबर्डसना एक शेवटची जुदाई की
लवबर्डसना एक शेवटची जुदाई की रात दिली...
आता कॅमेरे लाऊन ते रात्रभर काय करतात, किती रडतात, किती गळ्यात गळे घालतात याचे मस्त शूटींग करतील...
आणि ते बिगबॉस अनसेन्सॉरड मध्ये दाखवून टीआरपी वाढवतील
कि आपल्याला उद्या दाखवणार आणि तिथे मात्र लगेच काढणार.. कारण अश्या स्थितीत त्यांना एक रात्र देणे धोकादायक देखील आहे..
Pages