Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी वोटिंग वगैरे करत नाही पण
मी वोटिंग वगैरे करत नाही पण करायची वेळ आली तर पुष्करला करायला आवडेल.
मी वोटिंग वगैरे करत नाही पण
मी वोटिंग वगैरे करत नाही पण करायची वेळ आली तर पुष्करला करायला आवडेल.>>+१
सई मेघा उषाला बोलतोय की नाही?
सई मेघा उषाला बोलतोय की नाही?



, स्मिता टास्क छान करते पण कम्युनिकेशमधे सॉलिड बोंब आहे, काहीच धड बोलता येत नाही म.मां पुढे !
नवीन Submitted by अमितव on 5 May, 2018 - 10:44
मांजरेकर उना ला बोलत च नाहीय.... खरं तर सई मेघा पण बऱ्याचदा चुकतात पण त्यांना का धारेवर धरलं जात नाहीय कळत नाही... खूप च पार्शियल आहे म मां
<<
उ.नांना खरच ग्रिल करायला हवं होतं, नुसत्याच बिचिंग करतात, काहीच कामाच्या नाहीत, सारखं सारखं ते वय माझं ७२ चा पाढा !
पण सई मेघा ला का आणि कशासाठी बोलेल म.मां
त्या दोघी आरडाओरडा करतील , राडा करतील पण रडी खेळत नाहीत आणि जिंकायला किलिंग इन्टींक्ट आहे, दॅट्स टोली फेअर, हळदीकुंकु समारंभ नाही हा
सगळ्या हट्ट्याकट्ट्या बैलांना भारी पडतात, स्ट्राँग आवाज आहे, क्लिअर आणि लाउड बोलायची हिंमत आहे म्हणून ओरडायला हवं का ?
जिद्दीने आणि फेअर खेळतात , त्यामुळे सगळ्यात जास्तं फॅन फॉलॉइंग त्यांनाच आहे, गेले काही दिवस ट्विटर आणि फेसबुक वर म.मांना ट्र्ग करून इतक्या लोकांनी लिहिल होतं कि यावेळी त्यांना अॅप्रिशेट केलं नाही तर आम्ही बिग बॉस बघणे बन्द करु, आज मला खरच वाटलं म.मां नी सोशल मिडीया प्रेशरनीच त्यांचं कौतुक तर नाही केलं
असो, सध्याच्या म.मां ची आवडणारी गोष्ट ही कि ते जुईला भरपूर झापतात, ती अतिशय रडी खेळते आणि कांगावा करते तिची पर्सनॅलिटीच अतिशय टिपिकल आहे , बघताच क्षणी एखादीला २ थपडा माराव्याश्या वाटतात कॅटॅगरी, परवा सईने तिला घातलेल्या लाथा आणि खुर्च्या पाहून मी आधी होतेच त्यानंतर सईची अजुन +++++ फॅन झाले, जियो सई
सो कॉल्ड सिनियर गृपची ओवह्रऑलच व्यवस्थित बोलायला पॉइंट्स मांडायला बोंब आहे, मठ्ठोबे सगळेच, राजेश तर मठ्ठांचा राजा
सई आवडण्याच अजुन एक कारण, काय बोलते सटासट , त्या रेशम गृपची नुसती जळजळ होते ती आसपास असली तरी, काय ऑरा आहे
पुष्करही छान बोलला आज, म.मां नी त्याचं टिमशी लॉयल राहिलाबद्दल कौतुक केलं आणि त्याचं उदाहरण देत अस्तादला पुन्हा झापला म्हणून परत एकदा, म.मां साठी टाळ्या !
ऋतुजा माझी आवडती कॉण्टेस्टंट मुळीच नाही , चित्र विचित्रं मेकप, ड्रेसिंग हेही असतच पण आज ऋतुजाने एकदमच सिक्सरच हाणली, पर्सनली मला रेशमची ती चोरी काहीच गैर वाटली नाही आणि मी ऋतुजाच्या रडण्याची भरपूर टिंगलही केली पण बॉस आज तिनी स्वतःचा पॉईंट जसा अॅग्रेशनने मांडला, व्हेरी स्मार्ट, वेल प्लेड , योग्य वेळी योग्य माणसापुढे बोलली , स्मॉल टाउन व्होटींग बॅंक खिशात घालणार पोरगी !
आस्ताद अगदीच फुसका बार निघाला
आस्ताद अगदीच फुसका बार निघाला. पहिल्यांदी त्याच्याविषयी जे काही 'भारी माणुस आहे' असे फीलींग होते ते पुर्ण लयाला गेले. लवकर बाहेर गेला तर बरे होईल. राजेश सुरवाती पासूनच फालतू वाटत होता आणि अता तर त्याचे थोबाड बघवतच नाही. रेशम , जुई या दोघींना सहन करणे अवघड झालेय. जुई किन्वा रेशम या वीक मधे बाहेर जायला पाहिजे.
पुष्कर जोग फारच मस्त!! आधी साधा वाटला होता , फार पुढे जाईल असे वाटले नव्हते. मेघा अतिशय भारी!! आणि सईचा तर कायापालट झाल्यासारखे वाटतेय. रडूबाई जाऊन न. १ लढूबाई झालीये.
पुष्कर ,मेघा किन्वा सई यापैकी कोणीतरी एक बिग बॉस झालेले बघायला आवडेल.
कालचा भाग मस्त झाला,
कालचा भाग मस्त झाला, मांज्याने रेराच्या टीमला चांगलाच धुतला, मांज्यापण या धाग्याच्या कमेंट्स वाचत असावा असं वाटतंय, आज जुईवर चांगलाच पिसळताना दाखवलाय मांज्या, जुई, स्मिता आणि रेशम म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला या मनस्थितीत होत्या, रेशम मारकी म्हैस तर आहेच पण स्मिता आणि जुईचा पण राग येत होता काल, कॅप्टन बनल्यापासून जुई जरा जास्तच करायला लागले, त्यात भर म्हणून काय झालं की या दोघी लगेच रेरा कडे विचारायला जातात काय करू ते, पुष्कर झोपला होता तेव्हा जुई राजेश आस्ताद ला जाऊन विचारते काय करू, नाममात्र कॅप्टन आहे घरची, तेच स्मिताच्या बाबतीत सईने लेस कापली तर राजेशला जाऊन विचारते काय करू, मेघा बरोबर बोलली स्मिताला येताना फक्त कपडे घेऊन आले अक्कल नाही आणली, बाकी ती मारकी म्हैस आणि माळरानावर सोडलेला रेडा एकाच चादरीत झोपले होते, बायको आतापर्यंत माहेरी पोहचली पण असेल, ऋतुजा ने धमाल उडवली, म्हणजे कोणाच्या ध्यानी मनी नसताना असा काय काउंटर अटॅक केला रेरा वर सावरायला वेळच नाय दिला, कानाखाली मारल्यासारखे गप्प होते दोघे, दिल खुश हो गया,
पुष्कर ,मेघा किन्वा सई यापैकी
पुष्कर ,मेघा किन्वा सई यापैकी कोणीतरी एक बिग बॉस झालेले बघायला आवडेल.
<
+++++१
जूई कँप्टन झाली वाटत आता बसा
जूई कँप्टन झाली वाटत आता बसा बोंबलत एकेकाला कामाला लावेल ती रेशम आणी मेघाच भांडण बघायला मला खुप आवडत स्मिता हसतखेळत बदला घेते काल आऊ काय भडकल्या तिच्यावर मला वाटल जाउन मुस्काटात ठेवते की काय स्मिताच्या बाकी सध्या बघायला मजा येतिये काय राडा चालू आहे पोरिंचा आउंचा आवाजच निघत त्याच्यासमजूई कँप्टन झाली वाटत आता बसा बोंबलत एकेकाला कामाला लावेल ती रेशम आणी मेघाच भांडण बघायला मला खुप आवडत स्मिता हसतखेळत बदला घेते काल आऊ काय भडकल्या तिच्यावर मला वाटल जाउन मुस्काटात ठेवते की काय स्मिताच्या बाकी सध्या बघायला मजा येतिये काय राडा चालू आहे पोरिंचा आउंचा आवाजच निघत त्याच्यासमोर
मागच्या भागापेक्षा यावेळी
मागच्या भागापेक्षा यावेळी मांजरेकरांचा परफॉर्मन्स इंप्रूव्ह झाल्यासारखा वाटतोय.... पण अजुन पण त्यांच्यासमोर अरेरावी करणाऱ्या लोकांवर जरब बसत नाहीये.... ती रेशम तर काल who cares मोडमध्ये होती!
जुई ही सॉफ्ट टारगेट होती.... राजेश रेशमला कधी ग्रील करणार हे!
सई दिवसेंदिवस अजुनच आवडायला लागली आहे.... त्या लेस कटींग प्रकरणात तिची चुक असताना सुद्धा ती चुकीची वाटली नाही!
Thats a skil!
राजेश रेशमला कधी ग्रील करणार
राजेश रेशमला कधी ग्रील करणार हे!>>> मला वाटत त्या प्रकरणाला हवाच द्यायची नाही अस काही असाव किवा अजुन जरा वाढल की धारेवर धरणार, रेशम नेहमीच इग्नोरन्स मोड मधे असते , ममाचा परफॉर्मन्स सुधारला पण तरी कितीतरी फुल टॉस ते सोडुन देतात, सलमान एकही पॉइन्ट सोडायचा नाही पार सोलुनच काढायचा, त्याचे मुद्दे पार व्हिडिओनेच पुव्ह करायचा "हा सुर्य आणी हा..." बोलतिच बन्द!
जुई काय पाण्याची धार सुटते तशी नॉन्स्तॉप बोलते मधे श्वास पण घेत नाही.
आज जेव्हा जुई म्ह्टली सईची लाथ खावुन बघितल्यावर कळेल मला वाटल ममा पिसच काढतिल पण ते काय मुद्दा धरतच नाही, सई परेफेक्ट बोलते अगदी... आज तर रुतुजा ने जे काय चौकार षटकार मारलेत काय विचारु नका, गटबदलू म्हटल्यावर आस्ताद बुळ्यासारखा हो म्हटला " अरे काय गड्या तु! धत तुझी तर ! "
राजेश आणी रेशम फुल तु स्टोरी रन्गवतायत ज्याने फोकस त्याच्यावर येइल पण काय हवा होत नाही त्याची... लोकाना पण माहितीये कॅमेरासाठिचे खेळ आहेत.
उना ना पण ममा काहिच बोलत नाहीत त्याने त्याच फावत जरा, त्याच्यामूले टिमला फायदा होतच नाही.
गटबदलू म्हटल्यावर आस्ताद
गटबदलू म्हटल्यावर आस्ताद बुळ्यासारखा हो म्हटला . +१
मागच्या भागापेक्षा यावेळी मांजरेकरांचा परफॉर्मन्स इंप्रूव्ह झाल्यासारखा वाटतोय.... पण अजुन पण त्यांच्यासमोर अरेरावी करणाऱ्या लोकांवर जरब बसत नाहीये.... ती रेशम तर काल who cares मोडमध्ये होती! +१
कालचे सईचे कानातले छान होते.
आत्ता पाहिला..
आत्ता पाहिला..
कसली खतरनाक पेटली ऋतुजा बापरे..
आणि किती #$@&% आहे रेशम.. तिचा पवित्रा काय होता सुशांतने सांगितल्यावर..
ममांना प्रुफ म्हणुन दाखवणे जमत नाही का? आणि ती जूई नाही मी हे केलच नाही म्हणते तेव्हाही..
यांना कधी अक्कल येईल.. ममांना रेटतापन येत नाही म्हणनं कि कॅमेरावर इतक दिसतय ते काय भूतानं येऊन केलय का? काय फालतूपणा आहे..
हीना खान असलेल्या बिग बॉस्ची
हीना खान असलेल्या बिग बॉस्ची एक झलक आत्ता पाहिली. टॉर्चर टास्कची.खुर्चीवरुन उठवाय्चं. बापरे, कंपॅरिटेवली मराठीत कमी राडा झाला म्हणायचा. काय काय फेकलय लोकांनी अंगावर तिच्या आणि विकास गुप्ताच्या.
https://www.youtube.com/watch?v=u2U9SkDftpY
रेशमविषयी मत आधीही काही खास
रेशमविषयी मत आधीही काही खास नव्हतं, आणि ऋजुता जे म्हणत होती त्याबद्दल तिची अरेरावी आणि 'सॉरी बट नॉट सॉरी' अॅटिट्यूड पाहून ते अधिकच खराब झालं. सई आणि ऋजुता आणि मेघा आणि पुष्कर ग्रुप चांगला सणसणीत आहे. संख्या कमी आणि तिकडे ते फुगलेले पुरूष असूनही चांगली टक्कर देतात.
"दुश्मनी जम कर करो लेकिन ये
"दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुँजाइश रहे
जब कभी दोस्त बन जायें तो शर्मिन्दा न हों"
शेर एकदम apt मारलाय महागुरुंनी..... त्याबाबतीत मानल या माणसाला!
प्रॉब्लेम हा आहे की ते तिथेच थांबत नाहीत
I am curious to see his interactions with the house members
डीजे ब्रेक मध्ये task करणे
डीजे ब्रेक मध्ये task करणे आणि वर खोटं बोलणे आणि पकडलं गेल्यावर, सर्वांनी चूक दाखवल्यावर मग कबूल करून सॉरी म्हणणे तोपर्यंत भांडत रहाणे हा रडीचा डाव खेळली की मेघा. तिथे सई फेअर होती.
टास्क संपल्यावर स्मिताच्या बुटाची लेस कापणे हाही रडीचा डाव होता की सई चा. थोड्या प्रमाणात का होईना त्या दोघी पण खोटं बोलतात, रडीचा डाव खेळतात.
ऋतुजा मस्त ती म्हणाली मी
ऋतुजा मस्त ती म्हणाली मी कुठल्याच ग्रुपची नाही. मेघा आणि सईची दादागिरी सहन करायला आणि ऐकायला मी काय नोकर आहे का त्यांची, वाह फार मस्त.
हाच stand स्मिताने घेतला तर आवडेल मला कारण तिच्यात sporting स्पिरीट खूप आहे पण ती मूर्ख रे रा चं ऐकत बसते.
रेशम जायला हवी, अति भांडखोर.
रेशम जायला हवी, अति भांडखोर. अति खोटं बोलणारी, अतिशाहणी आहे.
जुई डोक्यात जाते, पुष्कर कॅप्टन व्हायला हवा होता. बिग बॉस ने दोन grp करायला हवे होते कॅप्टनशिप खेळासाठी.
रद्दी जुई किंवा भूषण जाईल.
रद्दी जुई किंवा भूषण जाईल.
सई बद्दल डीजेला +१११ फडाफड
सई बद्दल डीजेला +१११ फडाफड बोलून सो कॉल्ड सिनियर्स ची तोंडं बंद करते त्यामुळे मी फॅन झाले आहे. काल तिने 'हे लोक करतात तेव्हा फेअर आणि आम्ही केले की हेच लोक बोंबा मारतात' हा पॉइन्ट बिनतोड मांडला. रेरा कँप गप्पच झाला!
सोपे नाहीये ते त्या ग्रुप मधले एक से एक बुलीज पाहता.
आस्ताद तुम्हाला फेवर करतो की नाही यावर एका श्ब्दात सांगायवे तर तर हो असे म्हणाला 
स्मिता नाही आवडली अजून तरी. तिचे ते कुठेही वादात भांडणात हसणे अन आय लव यू हे वेडगळ वाटते.
काल ममां रेशम सोडून बाकीच्यांचे कौतुक असं म्हटला तेव्हा वाटले अजून तिला पॉइन्ट आउट करतील पण काहीच नाही म्हणाले स्पेसिफिक असे. त्या जुईचे रडगाणे फार पुन्हा पुन्हा झाले. आस्ताद लूजर वाटला पुन्हा. त्याला तर राजेश ने पण बॅक स्टॅब केले
ऋतुजाचा इश्यू शी मला रिलेट करता आले नाही पण तिने काल अटॅक भारीच केला हे खरे.
( प्लीज तिला कुणीतरी बेसिक मेकप शिकवा !!)
ममां उना आणि थत्तें बद्दल
ममां उना आणि थत्तें बद्दल मनात विचार करत असतील की घरी जाऊन तरी काय करणार? रहा इथेच काही दिवस.
काल भूषण ने थत्ते सरांची
काल भूषण ने थत्ते सरांची acting छान केली. ते लक्ष वेधून घेण्यासाठी नाटकं करतात. आऊ खरंच पडल्या.
स्मिता नाही आवडली अजून तरी.
स्मिता नाही आवडली अजून तरी. तिचे ते कुठेही वादात भांडणात हसणे अन आय लव यू हे वेडगळ वाटते.>>>>+111111111111
निदान पडल्याचं तरी थत्ते नि
निदान पडल्याचं तरी थत्ते नि नाटक केलं नव्हतं . ते खरंच पडले . भूषण ने त्यांची ऍक्टिंग केली आणि सांगितलं कि त्यांनी नाटक केलं पण ते खर नव्हतं ते खरेच पडले होते
रेशम ती आणि राजेश सोडून
रेशम ती आणि राजेश सोडून इतरान्ना जन्गली माणस म्हणाली.
सई सुद्दा म्हणत होती की हे बुट माझ्यासाठी स्पेशल होते कारण ते माझ्या वडिलान्नी गिफ्ट दिले होते मला. हिनेच स्मिताचे वडिल काढले होते खुर्चीसम्राट टास्कवेळी.
ऋतुजा बेस्ट. सुशान्तने तिला सपोर्ट केल, चान्गल केल.
काल अनिल थत्ते काय घालून होते कोम्बडीच्या पिसासारख. कपड्यान्च्या बाबतीत ते रणवीर सिन्गचे काका वाटतात.
सचिन, स्वपनील आज बोर करायला येणारेत.
रद्दी जुई किंवा भूषण जाईल. >>
रद्दी जुई किंवा भूषण जाईल. >>> जुई जाणार नाही. Captain झालीये ना ती.
आज जेव्हा जुई म्ह्टली सईची लाथ खावुन बघितल्यावर कळेल मला वाटल ममा पिसच काढतिल>>> आज ओरडणार आहेत तिला ममा.
त्याचे मुद्दे पार व्हिडिओनेच पुव्ह करायचा "हा सुर्य आणी हा..." बोलतिच बन्द! >>> +१ ममाने आणि big boss ने व्हिडिओज दाखवायला हवे होते एकेकाचे.
स्मिता नाही आवडली अजून तरी. तिचे ते कुठेही वादात भांडणात हसणे अन आय लव यू हे वेडगळ वाटते.>>> अगदी अगदी
डीजे ब्रेक >>> असा सुद्दा ब्रेक असतो? पहिल्यान्दाच ऐकतेय.
जुई जाऊ शकते. कॅप्टन
जुई जाऊ शकते. कॅप्टन झाल्यामुळे ती सेफ नाहीये झालेली. ती गेली तर नव्याने कॅप्टन शोधला जाईल.
कुणीही गेलं तरी रेरा कॅम्पच कमी होणार आहे. थत्तेंना रेरा त्यांच्या ग्रुपमध्ये गिनू शकत नाहीत, अगदीच बेभरवशाचा आहे तो म्हातारा. त्यामुळे रेराच्या ग्रुपमध्ये ६च लोक राहतील, सै-मेच्या ग्रुपमध्ये ५. त्यामुळे बऱ्यापैकी फेअर डिव्हिजन होईल.
स्मितामध्ये पेशन्स खुप आहेत
स्मितामध्ये पेशन्स खुप आहेत खरोखर, वर म्हटलं तसं ती रेराच्या ओंजळीने पाणी पिते, त्यामुळे शेवटी गंडेल.
मला स्मिता आवडली. कमीत कमी
मला स्मिता आवडली. कमीत कमी वाईट बोलून दुसऱ्या टीमला सॉलिड वात आणला. तिने मी आऊना उकसवायला हे केलं हे मान्य का नाही केलं? उकसावण काही चूक नाही, ती पण गोंधळासारखीच स्ट्रॅटेजिच आहे. सई स्मिता पुष्कर आणि थत्ते ही माझी टीम. एकत्र यावेत. मेधा हल्ली डोक्यात जाते.
पहिल्यांदाच ती लक्षात राहिली.
ऋतुजानी भारी ड्रामा केला
जुईला हाकला. किरकीर्या आवाजात तेचतेच बोलत राहते. पुष्करनी बरोबर सांगितली तिची रडगाणी. आणि औना पण. खोटं बोलतात, आरडा ओरडा फार आणि 72 वर्षाच रडगाणं. हे होत ते होत तर जा घरी आणि गप पडा. आल्या कशाला ?
>>कॅप्टन झाल्यामुळे ती सेफ
>>कॅप्टन झाल्यामुळे ती सेफ नाहीये झालेली.<<
बरोबर. कॅप्टंसीची इम्युनिटी तिला पुढच्या आठवड्यात मिळेल, जर टिकली तर...
ऋतुजाची तक्रार्/चीड वॅलिड होती. राजेश, रेशम यांना पश्चाताप झाल्यासारखा वाटला पण उघडपणे दाखवायची लाज वाटत असावी. उनांना उस्कवयाच्या मुद्द्यावरुन स्वतःला डिफेंड करताना स्मिताचा परत एकदा पोपट झाला. आस्ताद कच्चालिंबू सारखा खेळायला लागला आहे; नेहेमी आपल्या दादा लोकांबरोबर घुटमळणारा...
मांजरेकरांनी पुढच्या वेळेपासुन फुटेज ताबडतोब दाखवुन खोटं बोलणार्यांच्या आर्ग्युमेंट मधली हवाच काढुन घ्यावी...
राजेश, रेशम यांना पश्चाताप
राजेश, रेशम यांना पश्चाताप झाल्यासारखा वाटला पण उघडपणे दाखवायची लाज वाटत असावी.>> निर्ल्लज आहेत दोघ, तस काहीच नाही, बिचारी रुतुजा पोटतिडकिने बोलतेय तर रेशम तोन्ड वेडीवाकडि करत होती. राजेश बधिर आहे का? कशाबद्दल? अरे झोन आउट आहेस का तु .काय चाललाय इथे बोलण, ममा ना फार पोइन्ट सोडतात.
Pages