बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थत्तेंना थोबडवीन म्हटली तेव्हा दोन मिनिट थत्तेंबद्दलच वाईट वाटलं. >> माझ्या मनात विचार आला की उ ना ने ही धमकी रे, रा, सु किंवा आ ला द्यायला पहिजे होती. मग खरी नळावरची भांडणं दिसली असती. थत्ते मात्र बरं बाई, मी नंतर भरेन पाणी या मोडमधे गेले. Happy

ती विहीर सुरू करायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना एक एक कळशी नायतर हंडा देऊन सकाळी पाणी भरायला पाठवायचं, म्हणजे माहेरच्या साडीतली उषा नाडकर्णी जागी जागी झालीच समजा, रेशमला पोहता येत असेल तर ठीक नायतर…..... Lol

उ.ना. काय मेघाच्या कपड्यांबद्दल म्हणत होत्या पण, खेळासाठी लेगिंग्ज घालून आली होती मेघा त्या ड्रेसवर , मे बी ते एडिट केलं असेल.
थोडक्यात ती सेलिब्रिटी असली तरी विषय तिचे तोकडे कपडे, अ‍ॅग्रेशन, जास्तं बोलणे (स्ट्राँग व्हॉइस) यामुळे कसा बिचारा तिचा श्रीमंत नवरा चालु बायकोला सहन करतोय हे विषय काही संपत नाहीत बाई कोणीही असली तरी Happy

Btw ते मेघाच्या कपड्यांवर आधी रेशम बोलली होती सईला, सोमवारी झलक मधे तो व्हिडीओ दाखवला पण अ‍ॅक्चुअल एपिसोड मधे नाही.
रेशम सांगत होती सईला कि झोपताना तरी मेघाला जरा लेगिंग्ज घालायला सांग, झोपेत लक्षं नसतं , कॅमेरा कुठेही फिरतो, चांगल वाटत नाही, दिवसा घालु देत तिला हवं ते आणि वर म्हणे तरी आपल्या मराठी बिग बॉस मधली सगळी मुलं खूप सभ्य आहेत Proud
सईला चक्क पटलं ते !

रेशम चे बोलणे नाही पाहिले पण काल सई तेच मेघाला सांगताना दाखवलं. की शक्यतो लेगिम्ग्ज घाल शॉर्ट कपड्यांवर. मेघाने ने नीट ऐकून पण घेतलं. त्यानंतरच ती गेम्स साठी लेगिंग्ज घालून आलेली दिसली.

आताच कालचा भाग पहिला. थत्ते जे काही पुष्करला बोलले ते पूर्णपणे चुकीचंच आहे तसेही ते उना सारखेच स्पष्टवक्ते आहेत पण त्यांच्या आवाजाचा टोन माजोर्डा नसतो. बिग बॉस ने थत्ते याना घरातल्या लोकांबद्दलची मत विचारली आणि इतरांना पण त्यांच्या बद्दलची मत व्यक्त करण्याची संधी दिली त्यामुळे पुष्करला पण उघड उघड तिखट शब्दात त्याच मत व्यक्त करता आलं आणि विनीत ला पण . विनीत तर सुरवातीपासून त्यांचा पाणउतारा करतोय . अपमानास्पद बोलतोय . .हिडीस फिडीस करतोय . शेवटी गेम आहे हा दोन ठेऊन द्यायच्या आणि दोन घ्यायच्या . झाली फिट्टमफाट.

तसेही घरातले सगळे लोक त्यांना पहिल्यापासून "वाटेल तस" टाकून बोलत आहेतच . मेधा नाही का त्यांच्या वर चिडून बोलली तुम्ही तुमची पुस्तक लिहा आणि स्वतःच वाचत बसा . उना तर सतत येता जाता त्यांचा अपमान करत असतात. वाटेल त्या शब्दात त्यांना बोलतात . थोबडावून काढेन वगैरे . हे शोभत का ऊना यांना? . ते काऊ म्हणाले त्यात वाईट काय आहे अगदी थोबडावून काढेन वगैरे . रेशम तर तोंडावर त्यांना मॅड म्हणाली आहे . आस्ताद स्वतः आगाऊ असून त्यांना तेच बोलतोय . तरी ते काही उलटून बोलतात का कोणाला ? किव्वा उना सारखी थोबडावून काढण्याची भाषा पण नाही वापरत आणि आक्रमक सुद्धा होत नाहीत . ते सगळं हसत खेळत खिलाडू वृत्तीने घेत आहेत पण उना ना नुसतं काऊ म्हटलं तरी थोबडवण्याची भाषा वापरताहेत . ते जर काही चुकिचं वागले असं पब्लिक ला वाटलं तर पब्लिकचं त्यांना त्यांची जागा दाखवेल. शेवटी हा एक प्रकारचा लढाई गेम आहे आणि ती म्हण आहेच "एव्हरीथींग इस फेयर इन लव्ह अँड वोर " असं काही मनावर घ्यायचं नसत बोलणं . ते मनावर घेतात का ? गेम आहे यार .

स्मिता ला काय झालं आज. फुल टू अंगात आलंय. एरवी शांत असते ती.

क्युट दिसत होती मात्र. सर्वात क्युट दिसणारी चोर आणि क्युट इन्स्पेक्टर स्मिताचं.

द्क्षीच्या आस्तादने ऋतुजासाठी त्याग केलाय, nominate झालाय स्वत:हून. खरं सर्वांसाठीचं त्याग केलाय, लिविंग रूम मिळावी म्हणून.

मेघा मुर्ख आहे का? किती रेकतेय तार स्वरात.
आणि म्हणतेय की स्मिता हत्यारं घेऊन चोरी करायला आली...
आयला चोर हत्यारं घेऊन येणार नाहीत तर काय चिपळ्या, टाळ आणि मृदंग घेऊन येणार आहेत का चोरी करायला? Rofl

दक्षिणा: चोर लपून छपून चोरी करतात. चाकू, सुऱ्या, हत्यारं दाखवून धाक दाखवून चोरी करतात त्यांना दरोडेखोर म्हणतात. (Correct me if I am wrong)

पण एपिसोड अजून पाहिलेला नाही सो नक्की सिच्युएशन माहीत नाही.

ऋतुजा मुर्ख.. Rofl
मोठ्या मोठ्या मुली इनर्स मुलांच्या हातात देतात म्हणून रडतेय.. Rofl
चोर्‍या करताना चोर

स्मिता कसली भारी खेळतेय.. सगळ्यांना चिडवून स्वतः हसतेय मस्त Rofl

पियु बरोबर आहे तुझं
पण बि बॉ च्या घरात काय इतकं सिरियस घ्यायचं? मला जाम मजा आली आज.
मेघा उना सई कसल्या चिडल्या होत्या..
अपोझिट टिमला या लोकांना फक्त चिडवायचं होतं बहुधा.

स्मिता कसली छद्मि हसत होती. मेघा हजारच्या लडीसारखी आहे, वात पेटवून दिली की बराच वेळ तडतडत राहते, स्मिताने तेच केलं. ऊना फक्त गाॅसिप करायला आल्या आहेत का. सुशांत काय स्वत:ला करण जोहर वगैरे समजतो का, आपली ईंडस्ट्री, रूतुजा जुनियर आहे आपण सिनियर ईत्यादी ईत्यादी. बाकीच्या लोकांकडे काय अशी मोठी कामं आहेत, मुळात सुशांतला ईथे पाहिल्यावर वाटलं की अरे ह्याला कुठेतरी बघितलंय पूर्वी. राजेशला राणादा म्हणायला पाहिजे बाकीच्यांनी ईतका तो मठ्ठ वाटतो. बेचाळीस पोळ्या काय फक्त मुलीच करतात का, मुलांची काहीच जबाबदारी नाही Uhoh

आऊ आणि काऊ यात त्या नाडकर्णीना काय चिडण्यासारखं झालं?>>>>
काऊ म्हटले की त्यांना भिरभिरल्या सारखे होत असेल. ग्रहण पाहिले असेल त्यांनी Proud

हो स्मिता mam गेम मस्तचं खेळल्या, व्यवस्थित इरीटेट केलं त्यांनी मेघा mam आणि सुशांतसरांना.

मी बिग बॉस च्या पेज वर लिहिताना शक्यतो mam sir लिहिते आणि इथे एकेरी. आत्ताच पेज वरून आल्याने इथे आदरार्थी लिहिलं गेलं Lol

हास्यास्पद मालिका करण्याचा हेतू आहे कलर्सचा. जमलाय प्रयत्न.
दोन म्हातांय्रांपैकी प्रथम थत्ते जातील आणि। उना दम लागेपर्यंत नाचेल. नंतर ती जाईल.
शेवटी तरुण समवयस्कांत रंगेल बिबॅा.
पुरुष मंडळी काहीच करत नाहीत डॅशिंग,फक्त लेडिज बायकांच्या कॅामेंट्स ऐकून मान डोलावणे.

रेशम ने उनांना मस्त झाडले. आता हळूहळू सर्वजण उनांच्या विरूद्ध जायला लागलेत. पुढच्यावेळी नॉमिनेशन मध्ये उनांचे नाव पक्के आहे.

स्मिता मस्त खेळत आहे. ती भांडताना पण खूप छान वाटते. असे वाटते की तिने भांडतच रहावे.

काल ती स्मिता काहीतरी लहान पोरासारखेच करत होती. म्हणजे ज्या टास्कमध्ये समोरच्याला त्रास द्यायची खरे तर गरज नव्हती तिथे तो देणे आणि वर छद्मी हसून दाखवणे अनाकलनीय होते. थोड्यावेळाने चीड येऊ लागली तिचे प्रकार पाहून.
तसेच ते एका पोरीचे इन्नरवेअर उगाच नाचवणे हे देखील पातळी सोडून वाटले.
बेसिकली या लोकांच्या डोक्यात आता एकमेकांना त्रास कसा देता येईल हेच बसले आहे. उद्या यांच्यात कॅरम स्पर्धा घेतली तरी कॅरम खेळायचे सोडून एकमेकांच्या डोक्यावर पावडर उधळत बसतील. अशक्य पाणचट भरलेत.
रेशम राजेश काल एक चादर अंगावर ओढून झोपलेले. हिंदी बिगबॉस या पातळीला जायचे की आपले मराठी पाऊल पुढे पडतेय..

>>रेशम राजेश काल एक चादर अंगावर ओढून झोपलेले. हिंदी बिगबॉस या पातळीला जायचे की आपले मराठी पाऊल पुढे पडतेय..

हिंदीच्या पावलावर पाऊल आहे Wink
पण हिंदीमध्ये अफेअर्स बहुतेक अनमॅरीड लोकांच्यात व्हायची.... म्हणूनच म्हंटले की इथे ही मोजून मापून केलेले (म्हण्टले तर आहे म्हण्टले तर नाही टाइप्स) बघण्यापेक्षा इलिजीबल बॅचलर आणा..... फिर आयेगा मजा!

Pages