बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थत्ते पुष्करला सांगत होते तुला जर गेम मध्ये टिकून रहायचा असेल तर मेघा आणि सईची साथ सोड आणि राजेशला जॉईन हो . त्या दोघींमध्ये राहिलास तर तुम्ही लोक कमी आहात तर जास्तीत जास्त नॉमिनेशन तुम्हाला पाच जणांना मिळतील ( पुषकर /सई / मेघा / उना आणि ऋतुजा याना ) आठ विरुद्ध पाच असा सध्या ग्रुप आहे . आठ मधला एक कोणीतरी या रविवारी जाईल तरी सात विरुद्ध पाच उरतील Happy

पुष्क्या ला समर्थक कमी पडल्याने तो हरला हे बहुधा त्याच्या मनाला लागले. >>> पुष्कर हरला? कधी? captain task अजून सम्पला नाही.

सुशान्त टास्कमध्ये सईशी फिजीकल झाला म्हणून पुष्कर भान्डला वाटत त्याच्याशी. नक्की कशासाठी भान्डत होते ते कळल नाही.

राजेश आणि जुई - शेमलेस आहेत खरच >>> च्रप्स, राजेश आणि रेशम अस म्हणायच आहे का तुम्हाला? कारण ते दोघे खरच शेमलेस आहेत. काल गार्डन ऐरियामध्ये चक्क एकत्र झोपले. Sad मला तर असा प्रश्न पडलाय की, राजेशची बायको big boss नियमित बघत असेल तर तिला काय वाटेल? काल रडण्याच नाटक करुन राजेशच्या मिठीत पडली.

उना स्मिताला बोलत होत्या की आपण चान्गल्या घरची माणस आहोत. गुन्ड नाही. हे अस गुन्डासारख चाकू, सुरया घेऊन फिरण योग्य नाही. दुसर्या दिवशी त्यान्नी अनिल थत्तेविषयी जी काही मुक्ताफळे उधळली ती ऐकून गुन्डालाही लाज वाटेल. मुलाला वचन दिलय मी भान्डणार नाही, पण एका पन्जाबी ड्रेसवरुन केवढ बोल्ल्या त्या. Uhoh

एकंदर ज्येना मंबर्स ना कहीतरी करावे लागेल टिकून राहण्यासाठी, कारण टास्क्स असली व्हायलंट होणार असतील तर त्यांना भाग घेणे शक्यच नाहीये. >>>_+१ ज्येना सदस्यान्नी फक्त टास्कच्या strategies आखण्यात मदत करावी. प्रत्यक्ष टास्कस मध्ये भाग घेऊ नये.

जुईला काल कन्ठ फुटला. सईशी भान्डत होती कचाकचा. डोक्याला लागल म्हणून ठोकळे हातात घेऊन कोणालातरी मारायच्या पवित्र्यात होती .:खोखो:

काल सईच flirting पुन्हा सुरु झाल पुष्करशी. मध्ये काही दिवस बन्द होते हे. पुष्कर मात्र सावध राहतो तिच्यापासून, तिला बघत सुद्दा नाही तिच्याशी बोलताना.

ते दोघे जरी नाटक करत असले तरी हातात हात घेणे, पप्प्या घेणे, मिठ्या मारणे हे तर दिसतेच आहे की. खूपच चीप आहे ते.
जोतुमा टास्कच्या वेळी त्यांचे गुलूगुलू बोलणे चालू होते तेव्हा पुष्कर आणि उना गप्प बसून दुसरीकडे बघत होते. मला तर वाटले त्यांनी मुद्दाम त्यांच्याचकडे तोंडकरून त्यांच्याशी बोलत/बघत काय फालतूपणा करतायत असा भाव चेहर्‍यावर आणायला हवा होता. जेणेकरून त्यांनाच अवघडायला झाले असते.

उनाचे पण 'मी कुठे बोलले?' आता सार्खे सार्खे होत आहे. खरेच डबलढोलकी. आवरा आता.
ममां ने काही बोलल्यावर हे लोक मी तसे म्हटलेच नाही असे जेव्हा पवित्रा घेतात तेव्हा ते ममांना खोडून काढता येत नाही. त्यांनी आता पुरावे सादर करायची तयारी ठेवावी. म्हण्जे लगेच क्लिप दाखवून दूध का दूध और पानी का पानी करता येईल.

च्रप्स, राजेश आणि रेशम अस म्हणायच आहे का तुम्हाला?
नाही.. जुईच.. सिपंथी गोळा करते, हजार आजार आहेत म्हणते, आणि काल जोरदार धक्का बुक्क..
चेहऱ्यावरूनच चिडकी वाटते.. किती बोलते मेघा आणि सई ला..
आणि तिला असे वाटते तीच बरोबर आहे ☺️

>>नक्की कोण झाले कॅप्टन?<<

आज दाखवतील. पुष्कर मोस्ट डिझर्विंग आहे. पॉलिटिक्स्मुळे साइडला फेकला जातोय. जुई अन्डिझर्विंग असुनहि कॅप्टंसीच्या शर्यतीत आली, हेच आश्चर्य आहे. त्यात स्पॉडिलिटिसच्या दुखण्याचं निमित्त पुढे करणं म्हणजे "आनंद" आहे. असो.

आता मला सुद्धा स्मिता डंब वाटायला लागलीय. डामिनोजच्या खेळात तिचं पुष्करशी झालेलं आर्ग्युमेंट ब्रेनफार्टचा अस्सल नमुना म्हणुन दाखवलं जाउ शकेल इतकं क्लासिक होतं... Happy

{आता मला सुद्धा स्मिता डंब वाटायला लागलीय. }
आज तर अतीप्रचंड डंब वाटली ती. हो उनाला उचकवण्यासाठी मुद्दाम केलं मी तसं असं बिन्धास्त बोलायला हवे होते तिने.. मुर्खासारखं उनाला फूटेज देतेय येडी..

जुई-राजेश-रेशम-आस्ताद साऱ्यांनाच धुतोय तो..
फेबु- मायबोली- युट्युबवरच्या कमेंट्स वाचून आलेला दिसतो..
रच्याकने, आजसुद्धा एकाच बिछान्यात रा-रे चुळबुळताना आढळले..

ट्विटर च्या कंमेंट्स वाचल्या असतील, त्याला टॅग करून खूप लोकांनी लिहिले आहे।
माबो नसेल वाचत हे टीव्ही वाले, नाहीतर माझ्या नवऱ्याच्या बायकोच्या टीम ने आतापर्यंत जीव दिला असता ☺️

मांजरेकर उना ला बोलत च नाहीय.... खरं तर सई मेघा पण बऱ्याचदा चुकतात पण त्यांना का धारेवर धरलं जात नाहीय कळत नाही... खूप च पार्शियल आहे म मां

हो का... तुम्ही 24 तास रिपीट बघता का?
शेवटी एक तरी सापडलीच रेशम राजेश ची फॅन ☺️
आनंद आहे.
मी रोजच बघतो हो.

मेघा मस्त आहे पण सई स्वतः च डोकं नाही वापरत. मेधा काल च्या एपी मध्ये खोटं बोलली. नंतर सई बोलली ही तिला की तू खोटं बोलली ... मेधा सगळे टास्क मस्त पार पाडते. पण खूप बोलते आणि मध्येच विचित्र वागते... तरी ती बरी आहे... मेधा जिंकेल तर मजा येईल. सॉलिड आहे ती....

उद्याचा भाग त्या म्हागृ आणि त्याचा तो अतिशाना मानसपुत्र श्वप्निल जोशी येणारेत म्हणून बघावासा वाटत नाही..

पुंबा मी अक्षरशः हाच विचार केला मगाशी.... महागरू ची हिंदी शायरी की अजून काही होतं ते ऐकून पुरे आता असं झालं...

ऋतुजा मस्त बोलली. रेशम कधीच चूक काबुल करत नाही, आगाऊ आहे. म मां फार काही तिला बोलत नाही.

ऋतुजा स्वतः विचार करणारी पण आहे मेघा आणि सई ची दादागिरी सहन नाही करत. ती विचारशक्ती tallent असून स्मितात नाही. जुईत पण नाही नेहेमी रे रा चं ऐकतात.

टास्क संपल्यावर सईने स्मिताच्या बुटाची लेस कापणे चूक होतं. स्मिता आऊना अति इरीटेट करत होती ते चूक होतं.

पुष्कर कॅप्टन व्हायला हवा होता, जुई फेअर कॅप्टनशिप नाही निभावणार.

आधीच्या पोस्टस आता वाचणार.

आत्तापर्यंत सर्वात जास्त फेअर आणि डीसेंट पुष्कर वाटतो मला, तो जिंकला तर आवडेल पण ही gang काढेल त्याला बाहेर.

आस्तादला मस्त बोलले म मां, तो कायम बायस्ड असतो. फेअर गेम नाही खेळत.

मेघा काल चुकलीच होती, ब्रेक मध्ये task करत होती आणि मग खोटं बोलत होती. सई कॅप्टन म्हणून फेअर होती आणि चूक दाखवली तिची मग ती sorry म्हणाली.

सईने पण चूकचं केली task संपल्यावर स्मिताच्या बुटाची लेस कापून. म्हणून मला पुष्कर बेस्ट वाटतो त्यांच्यातला.

अश्या खेळात संधि साधने महत्वाचे असते, ऋतुजाने योग्य प्रकारे, योग्य वेळी तोंड उघडलं. तरी रेशमला आणखी झापायला हवे होते.

Pages