बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता आणि जुईला सिनियर टीम वापरून घेतात असे वाटतेय. +१
रिंगचा टास्क सe आणि मेधाने मस्त केला.+१११
हो मला पण आवडला खूप ,एकदा वाटलं कि आता यांच्यात पण ईर्षेमुळे फूट पडतेय कि काय ,पण नशीब तसं काही नाही झालं

यदुनाथ थत्ते हे अनिल थत्ते यांचे काका आहे आणि सुहिता थत्ते हि चुलत बहीण हा शोध कोणी लावला ? काही पुरावा ? म्हणजे मला माहित नाही म्हणून विचारतेय . गेल्या आठवड्यात कोणी तरी फेसबुकवर लिहिल होत कि कर्तारसिंग थत्ते म्हणजेच अनिल थत्ते . हसावं कि रडावं तेच कळलं नाही असो आणि त्या हिंदी बिग बॉस चा होस्ट सलमान आणि मराठी बिग बॉस चे मांजरेकर यांची तुलना का होतेय ? सलमानच बोलणं / स्पर्धकांची खरडपट्टी काढणं हे त्याला कोणी तरी लिहून दिलेल होत तेच मांजरेकरांच्याबाबतीत . दोघांनाही भाग बघावे लागत असतीलच . मग तुलना का ? मांजरेकर होतील ना काही सिझन नंतर तयारीचे . पहिल्या सीझनलाच का तुलना ? पटत नाही

Mahesh Manjarekar is no where close to Salaman in hosting the show
>>>>>
मराठीमध्ये हा शो कंडक्ट करायला तो दरारा फक्त मांजा आणि खेडेकर कडेच आहे.... सो ईट्स ए परफेक्ट चाँईस....

यदुनाथ थत्ते हे अनिल थत्ते यांचे काका आहे आणि सुहिता थत्ते हि चुलत बहीण हा शोध कोणी लावला ? >>> शोध कोणीच लावला नाही.. अनिल थत्ते यांनी बिग बॉसच्या कॅमेऱ्यांसमोर स्वतःच्या तोंडाने सांगितलेली माहिती आहे ही.. पुराव्यासाठी voot वर जाऊन मागचे एपिसोड बघा.

मी सलमान चा बिग बॉस पाहिलेला नाही पण मांजरेकर सो फार आवडलेत. अजून दोन्च वीकेन्ड झालेत ना, अजून मजा करतील तेही. विनित ला मस्त धुतले त्यांनी. थत्तें ना भरपूर फूटेज दिले काल. पण आता त्यांनी अजून काहीतरी उपद्रवी करायला पाहिजे नाहीतर उडतील Happy
काल उलट मला वाट्ले की रेशम ने " ते शिव्या, माणुसकी नाही वगैरे मी सईला आणि मेघाला खुर्चीतून उठवायला म्हणत होते" असं म्हटल्याने तिची बाजू बर्‍यापैकी सावरली गेली.
बाकी विनित गेल्यावर आस्ताद, सुशांत इतके रडले काय येड्यासारखे Happy तो होता तेव्हा तर तसे काही प्रेम दिसले नाही.
येत्या आठवड्याची झलक दाखवली तेव्हा जोडीचे टास्क आहे असे दिसले. सगळ्यांना जोड्या जोड्यांनी कंबरेला पट्टे बांधलेले. रेशम आणि आउ ची जोडी आहे. रेशम टॉयलेट मधे गेलीय आणि आउ बाहेर नाकाला रुमाल लावून उभ्या आहेत असे दाखावले Lol कठीण आहे!

>> मग तुलना का ?
तुलना तर होणारच!
जशी स्पर्धकांची होते, जशी सेटची होते तशीच होस्टचीही होणारच!
आपल्याला बाहेरुन जे जाणवत असते आणि होस्टने ज्याचा उल्लेख करावासा वाटत असते ते होस्टने स्वता न म्हणता आतल्याच लोकांकडून वदवून घेण्याचे जे स्कील असते ते सलमानकडे पूरेपूर होते.... मांजरेकर पण सीझन्ड होतील तसे ते ही हे स्कील अवगत करतील पण सध्यातरी त्यांच्या होस्टींगमध्ये कुठेतरी ते हसतहसत समोरच्याची उडवण्याची, आपल्याला हवे तेच स्पर्धकांकडून वदवून घेण्याची आणि कळ लावून मजा बघत बसण्याची जी एक या फॉर्मेटसाठी आवश्यक स्टाईल आहे त्याची कमी जाणवतीय!
वर कुणीतरी म्हंटले तसे "रेशमच कॅप्टन का?" असा प्रश्न जुई आणि स्मिताला विचारुन त्या ग्रूपमध्ये काडी टाकण्याचा चांगला चान्स होता!
एखादी गोष्ट होस्टने सांगणे आणि तीच गोष्ट त्या घटनेत involve असलेल्या लोकांकडून वदवून घेणे यातून आतल्या equations मध्ये फार फरक पडतो!

दरारा नक्कीच आहे पण तो सिलेक्टिव्ह असू नये.... म्हणजे राजेशने उलट उत्तरे दिली किंवा स्वताची बाजू ज्या अरोगंटली मांडायचा प्रयत्न केला तेंव्हा मला तो दरारा दिसला नाही.... दरारा दिसला कुठे तर सईने मध्येच 'मी बोलते' म्हंटल्यावर 'तुम्हीच ठरवा/ बोला.... माझी काय गरज आहे..... इथे मी ठरवणार कुणी बोलायचे ते' वगैरे वगैरे मध्ये दिसला!

असो!..... त्यांच्यासाठीही हा फॉरमॅट आणि हा रोल नवाच आहे म्हणा!
Its too early to judge!

कच्चा लिंबू ओके थँक्स . कितवा एपिसोड साधारण कारण मी तसे सगळेच बघितले आहेत पण कधी त्यांच्या तोंडून ऐकलं नाही
>> मग तुलना का ?
तुलना तर होणारच! >> का ?सलमान ने कितीतरी सिझन होस्ट म्हणून काम केलाय आणि मांजरेकरांच्या पहिलाच आहे . एकदम नवीन माणसाची तुम्ही तयारीच्या माणसाशी तुलना कशी करता ?

कितवा एपिसोड साधारण कारण मी तसे सगळेच बघितले आहेत पण कधी त्यांच्या तोंडून ऐकलं नाही>>अगदी अलीकडचे एपिसोड..गुरू- शुक्रवार पैकी कुठला तरी असावा

आही रेकॉर्डिंग करतो आणि दुसरेदिवशी जाहिराती फारवड करून उरकतो. ( जाहिरातवाल्यांना कळलं तर धडगत नाही.)
सल्लू पन्नाशीचा असला तरी थट्टेगिरीत अजून जोरदार आहे. मांजा,आऊ,थत्तेकाकांचं वय बोलतं. सगळ्यांना ददददा करणाय्रा जुईला तर फादरफिगरला उत्तरे देताना अवघडून जातं.
ती मेधा नक्कीच ट्रेकिंग ग्रुपची लिडर असावी. वाटाणे नसलेला फक्त आलूवाला समोसा कसा गळी उतरवायचा चांगले माहित असावे.
एसेमेस करून मांजरेकरालाच इलिमिनेट केल्यास बरे होईल.

कच्चा लिंबु thank u. काका पुतण्या शोधाच्या उत्तराबद्दल. कारण ते मी लिहिलं होतं, मी उशिरा आले माबोवर आज.

सुजा, शनिवारच्या एपिसोड मध्ये सांगितलं अनिल थत्ते यांनी आऊना.

मलाही मांजरेकर चांगले वाटत आहेत होस्ट म्हणून, अर्थात सलमानला पाहिलं नाही म्हणून पाटी कोरी आहे पण मराठीत मांजरेकर बर्यापैकी पॉवरफुल आहेत आणि थोडी डॉन/गुंड पर्सनॅलिटी कि काय म्हणतात ती आहे !
पुष्करला हळुहळु आवाज फुटतोय आणि टेक्निक्झ्ली करेक्ट योग्य दिशेने चाल्लाय, इमेज बिल्डींग बरोबर चालु आहे.
थोडक्यात सई - पुष्कर, राजेश- रेशम, मेघा हे आपापले स्पॉट्स सोडणार नाहीत, टॉप ५ मधे नक्की असणार !
यातलं कोणी उडलच तर वाइल्ड कार्डने परत येणार !
परवाच विचार करत होते कि यातलं कोणी व्यायाम करताना कसं दिसत नाही, नुसतच वाट्टेल ते खातात, गॉसिपतात ,झुले झुलतात आणि उरलेल्या वेळात टास्क नाहीतर भांडणं !
स्विमिंगसुध्द्दा फार कमी लोक करतात, पोरी तर उतरतच नाहीत पुल मधे !
चिंता वाटु लागली बिग बॉस्स्मधून परत येताना डबल साइझने परत येतात कि काय पण प्रोमो मधे दिसले वजनं उचलताना फायनली Proud
बाकी माझ्यातल्या (लिगली ब्लाँड मोड) ब्युटी डीटेक्टिवला खात्री आहे कि दर आठवड्याला ग्रुमिंग सेशनही होत असणार , पोरी आयब्रोज /नेल्स वगैरे करत असणार आणि मुख्य म्हणजे थत्ते ज्या हेअर कलर शेड्स वापरतात ते प्रत्येक शँपु नंतर फेड होतात, व्यवस्थित मेन्टेन केलेत म्हणजे आठवड्याला टच अप होत असणार नाहीतर केस न धुता बस्स्लेत २ आठवडे , उलट दाढीवरच्या रेड स्ट्रिप्स नव्याने केल्यायेत किंवा जास्तं व्हायब्रंट कलर दिसतोय इतक्यात.
थोडक्यात घरातून बाहेर जाता येत नसल तरी बाहेरून काही लोकांना आत यायला परवानगी आहे कपडे, ब्युटी प्रॉडक्ट्ससाठी.

राजेश पुश अप्स मारताना, अजून स्मिता की कोणीतरी पण व्यायाम करताना दाखवले होते अधे मधे. सो जे एरव्ही नियमित असतील ते इथेही करत असणार , फक्त आपल्याला ते एडिटिंग मधे नसतील दाखवत, बाकी जुई, ऋतुजा भूषण टाइप पब्लिक व्यायाम वगैरे करत असेल असे वाटत नाही.

आत असलेल्या कॅम्स मध्ये रेकॉर्ड सगळं होतंय. त्यातून मग एडीटून रोजचा दीड तासाचा भाग आणि वूट व अनसीन वगैरे चालवतात.
ग्रूमिंग सेशन्स, वर्क-आऊट सेशन्स, लाँड्री सप्लाय हे बाहेरून होत असणारच. दुसरं म्हणजे इतके १५ लोक्स घरात दिवसभर राहाणार वावरणार तरीही संपूर्ण घर स्पॉटलेस क्लीन (काचा ही) + ईतक्या लोकांचं खाणं-पिणं (१०/१५ लोकांचा रोजचा दोन्हीवेळेसचा स्वयंपाक/बाकी खाणं बनवणं इ. नक्कीच हे लोक्स करत नसणार...) याकरता नक्कीच बाहेरून मदत (हाऊसकिपिंग) वगैरे असणारच.

स्वयपाक आणि सफाई करतात ना हे लोक? त्यावरूनच किती वाद होतात नेहमी. मी केलेले पदार्थ देणार नाही, अमक्याने विरजण चु़कून चहात टाकलं , तमकीने तिखटला अंड्याचा हात लावला वगैरे.

स्वयंपाक क्लिनिंग त्यांचं त्यांनाच करावं लागतं, आता बिग बॉस मधे बर्यापैकी पैसे मिळतात, मालामाल होतात सेलिब्रिटीज , मग त्याच्यासाठी घरकाम शिकणे नो बिग डिल , शिकावच लागलं असेल.
त्यांना आहेत्या सामग्रीत किचन चालवणे इज पार्ट ऑफ बिग बॉस हाउस फॉरमॅट.
तसेही ५ हट्टेकट्टे लोक क्लिनिंग टिममधे म्हणजे रहाणारच कि घर स्पॉटलेस.
किचनमधेही ढिगभर मदतनीस , म्हणजे १५ लोकांचा स्वयंपाक खरं तर अजिबातच कठिण नाही.
बाकी मराठी सेलिब्रिटीजचा घरगुतीपणा कुठेतरी डोकावतो, आउ म्हणे पडेल तशी भांडी घासत जा, साठवु नका.
सुशान्त सराईतपणे बाथरुमची फरशी पुसत होता, पोळ्या बर्याच जणी व्यवस्थित सवय असल्यसारख्या गोल लाटताना दिसतात.
रेशमला , उषा नाडकर्णी, सईला आणि मेघाला रेग्युलरली स्वयंपाकाची सवय आहे असं वाट्तं.
राजेशला लसुणही सोलता येत नाही म्हणून त्याला भांडी घासायला दे असं सई सांगत होती मेघाला Biggrin

शेलार मामाला वाटलं जशी आरतीला एकाला सेव्ह करायची पॉवर मिळाली होती तशी विनितलापण मिळेल, मग शेलारमामांनी रडायचं नाटक सुरू केलं, असं दाखवत होते विनितच्या जाण्याचं त्यांना किती दुःख झालंय आणि किती नाही, पोरीला सासरी पाठवताना बाप पण रडत नाही एव्हडं ते रडले, पण शेवटी बरोबर विरुद्ध पॉवर विनितला देऊन बिग बॉसनं शेलारमामाचं कट कारस्थान उधळून लावलं.

कोणीही पुरुष स्वयपाकघरात फारसे काही करताना दिसत नाहीत, येतच नसावे. एखादे टास्क म्हणून किंवा काहीतरी इतर बहाण्याने निदान एक आड एक आठवडा तरी बायांनी स्वयंपाक न करता पुरुषांनी करायचा असं काहीतरी एन्फोर्स करायला हवं या लोकांनी. आयतोबे कुठले.

>>आयतोबे कुठले.

आता ईथेच बिग बॉस चालू होईल असे वाटते... Wink

पेपरात वाचलं, सेट डिझायनर म्हणाले की मराठी लोकं घर नीटनेटके, चांगलं आवरून ठेवतात, हिंदी मध्ये असं नाही होत, सारखं bb ला सांगायला लागतं.

>>शेलारमामांनी रडायचं नाटक सुरू केलं,<<
मलातरी ते नाटक वाटलं नाहि. सुशांत आणि आस्ताद जेन्युनली गहिवरले होते.

पुष्करने शेवटी रिंगणात उडी घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला संकोचणारा आता उघडपणे आस्ताद, राजेश, सुशांत गँगला विरोध दर्शवतो आहे. त्याची हि खेळी "जियो या मरो" ठरु शकेल काय?..

रविवारचा भाग अगदीच बोर झाला. थत्तेना फारच फुटेज दिलं. पण कन्टेन्ड आणि मचुअर्ड आहेत थत्तेकाका.

बिग बॉसला टोटल गुंडाळून ठेवलं रे.रा.सु नी. इतकी सारवासारव केली की विचारू नका! गोल गोल काहीही लॉजिक नसलेली आणि धादांत खोटी पण आपली इमेज गोड गोड राहील अशी विधानं करत होते, आणि मांजरेकर काही हटकत न्हवते.
आस्तादला सगळ्यांनी कॉर्नर केलं ते एक चांगलं झालं. पण तरी शेवटी मेधा आणि सईच्या मध्ये बसलेला आस्ताद एपिसोडच्या शेवटी पलटीमारून त्या साईडला बसायला गेलाच! निर्लज्ज किंवा भयानक इनसिक्युअर आहे तो आस्ताद.
एक एक कमेंट ऐकून उना पण उतरली मनातून. जुई कसली कुरकुरी आहे... किती तो क्रिब मारते!
स्मिता कशी आहे काही समजलं नाही अजून मला.
हो पुष्कर रिंगणात उतरला हे बेस्ट झालं. आता सई, मेधा, पुष्करना लोकं आपल्या कडे खेचावी लागणार आहेत. उना, ऋजुता आहेत. स्मिताला फोडलं पाहिजे.
नॉमिनेट घरातले लोक करतात का "तमाम महाराष्ट्रातील जनता Proud " ?

आयतोबे कुठले.>>>
बाकी कामे करतायत हो, संडास साफ करणे, बाकी क्लिनिंग वगैर. काय जिथं तिथं स्त्री पुरुष वाद घालता. तुमच्या सारखे सेक्सिस्ट लोक पाहिजेत बिग बॉस मध्ये, मसाला मिळेल जरा आणि एंटरटेनमेंट होईल ☺️

त्या सुशांत शेलारने एव्हड्या शिव्या दिल्या पण त्यावरही मां फार काही बोलले नाहीत, शेलारच बोलणं असं की तो परिस्थितीला शिव्या देत होता, समोरच्या माणसाकडे पाहून हातवारे करून शिव्या द्यायच्या आणि बोलायचं परिस्थितीला शिव्या दिल्या हे अजबच पाहायला मिळालं,
>>> कल्पतरू- अगदी माझ्या मनातले बोललात.

आपलीच टिमकी वाजवली असती नानाने. तो पण हाय उसूल टाईप माणूस आहे. गेम समजून त्या फॉर्ममध्ये जज करायला त्याला जमलं असतं असं (इथे बसून) वाटत नाही.
सचिन खेडेकरपण टफ वाटत नाही. आता तरी मांजरेकर चांगले वाटतायत. चिन्मय मांडलेकर चांगला करू शकेल बिग बॉस असं वाटतं.

मला पण नाना आठविले होते. ते असते तर फक्त झापाझापी झाली असती. सगळ्यांची खरडपट्टी!
कौतुक करणे, गोड बोलून समोरच्याकडून चूक वदवून घेणे मग ओरडणे, कंपू मध्ये फूट पाडणे हे सगळे करता यायला हवे.

Pages