बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बॉस ने त्या दिवशीच्या तमाशावरुन राजेश, सुशांत, रेशम आणि आस्ताद यांना झापायला हवं होतं खरं म्हणजे.

थत्ते यांच्याऐवजी फिमेल असती राखणदार तर सईला गेम सोडावा लागला नसता, तिचा नाईलाज झाला नाहीतर तीही मस्त टीकली.

दक्शी आपले आस्तादवरचे बदाम सोडायला तयार नाय... Happy
रच्याकने फेबु वर कुठेतरी लिंक वाचली त्यात थत्ते काकांची कुंडली दिली होती पास्ट लाईफची. त्यात त्यांनी 'बलात्कार कसा करावा?' हे पुस्तक लिहिलंय म्हणे Uhoh

बाकी मेघा आणि सई पक्क्या गेमर आहेत. बिबॉचा फोकस सध्यातरी यांच्यावर आहे, नंतर तो बाकी लोकांवर येईलच तेव्हा सगळ्यांचे पत्ते दिसतील. आऊ, थत्ते सध्यातरी अंपायर मोडात आहेत बहुतेक सगळ्या टास्क्स मध्ये, ते ही खेळात येतील तेव्हा होईल टराटरा-फर्राफर्रा Wink

योग Lol कोणी उत्तर नाही देणार. पण डायरेक्ट लिहीलं तर किमान वाचावं ही अपेक्षा. केवढे मेसेज आहेत तिथे. मीच वाचले नाहीत फार.

एमसीपी म्हणजे?

आस्तादला कॅप्टन व्हायची घाई झालेली. परखड बोलने, बॅलन्स वागणे, आपण कसे योग्य असे काय काय बोलला होता. सगळी हवा गेली त्यातली.

ओके.
कपडे धू म्हटल्यावर ती मूर्खबाई हसली. मागच्या वेळेस तो विनीतला सांगत होता कि तिला मिठी माराविशी वाटली कि मारुन टाकायची अशी.... तेव्हा पण ती हसत होती. विनीतच लाजून गप्प झाला.

कोणी उत्तर नाही देणार. पण डायरेक्ट लिहीलं तर किमान वाचावं ही अपेक्षा. >> कोणतेही उत्तर येणार नाही. कारण ते पेज तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनांनीच तयार केलेले असते. (गरळदारी) (हागणदारी या चालिवर वाचावे)

>>कोणी उत्तर नाही देणार.
आणि बि बॉ च्या घरात असताना मोबाईल, नेट, सगळे बंद..! खरे तर या एका गोष्टीनेच सर्व जण अंतर्मुख व्हायला हवेत.. Happy पण जास्तीच बिथरलेत.
असो. आता मांज्या कुणाची शाळा घेतो का हे बघायला हवे- माझ्या 'बा' च्या टिव्ही वर.

रोज रोज इथल्या ढिगांनी पडणाऱ्या पोस्टी आणि दक्षिणा च्या डोळ्यातले बदाम (दिवा घे Happy ) बघून बघून मी पण bb पहायला सुरुवात केलीये
सध्या तरी आवडतंय , अरे काय चाल्लंय काय ! , किती हा बालिशपणा . वगैरे संमिश्र मतं आहेत .
सध्या माझी फेव्हरेट मेघा ! बघूया कसा कसा बदलत जातोय game ते

>>दक्षिणा च्या डोळ्यातले बदाम
बदामस्ताद. Wink
आधीच पुण्यातला, त्यात काळे, त्यात अस्ताद नाव... आता कोण पंगा घेणार?
दक्षिणा, अस्ताद नावाचा अर्थ काय बरे? ऊस्ताद, वस्ताद याच्या मधलं काहितरी आहे का? दिवे घे.

हो राजेशचे ते "माझेही कपडे धू ना" ऐकून भयंकर चीड आली. ते पण जसे काही तो रेशम ला कहीतरी सन्मान देत आहे अशा थाटात म्हणाला!! म्हणजे ही याची रोमान्स ची कल्पना? टिपिकल एमसीपी कुठला, पालथा घडा क्लब चे सदस्यत्व द्या त्याला. तिला चाललं ते यावरून तिच्या अकलेची कल्पना यावी.

<
अ‍ॅक्चुअली पालथा घडाच फोडावा त्याच्या टाळक्यावर असं वाटतं आणि म्हणून मला स्क्रिप्टेड नाही वाटत शो Proud
टि.व्ही वर पाहून व्हॉयलेंट विचार येतात मनात, तिथे अशी ऑड विअर्ड लोक अ‍ॅक्चुअली समोरासमोर, विदाउट फोन इंटरनेट घड्याळ हाउस अरेस्ट असतना घरात राडा /मारामार्या होणं अगदी सहज शक्यय Wink

आधी जे चांगले वाटत होते ते अनॉयिंग वाटत आहेत आणि आधी ज्यांची चीड यायची ते बरे वाटायला लागलेत
<<
होना, मेघा ,ऋतुजा,सई आणि थत्ते पहिल्या आठवड्यात कसे वाटले होते , आता मात्रं तेच सेन्सिबल वागतायेत .
मेघा तर फुल डॉन आहे, सगळ्या पालथ्या घड्यांना खलबत्त्यात कुटो ही आशा Proud

शो फुल्ली स्क्रिप्टेड नसेल, पण कॉम्न्टेस्टन्ट्स नी , उदा. राजेश, रेशम इ. नी जे चालू केलंय ते ठरवून केले आहे नक्कीच.

सई आज पण रडुबाई. तिने सावरायला हवं स्वतः ला, तिथे थत्ते बरोबर सांगत होते.

ती आत्ता बरोबर बोलतेय.

सई परफेक्ट बोलली आस्तादबद्दल.

US मधे कसा बघायचा हा प्रोग्रॅम? वुट इथे दिसत नाही. आणि कलर्स मराठी वेब साइट वर क्लिप्स आहेत.

काल सई, मेघा आणि थत्ते बेस्ट वाटले. पुष्कर पण ठीक आहे. थत्तेंची मी मूर्ख आहे वाली गाडी, आणि ठाण्याच्या केबलवर काहीबाही बडबड पहिल्याने डोक्यात वेगळीच प्रतिमा झालेली, त्यानंतर काल त्यांचा वावर बघून थत्ते तर चक्क आवडले.
सईला रेस्टरूम मध्ये थत्तेना बाहेरून हात दाखवत आत कार्य उरकता आलं नसतं ना? ती दुसरी पोरगी आत मॉनिटर करायला गेलेली तेव्हा असंच केलेलं की! त्यात आता मेल असला तर काय झालं?

बाकी लोकांनी जन्मात कुठलाही खेळ खेळाच नाही की काय असा प्रश्न पडला. सिनियोरीटी कसली आल्येय डोंबलाची! ती काय सरकारी बढती आहे का?? काल पण आस्ताद, राजेश आणि तो तिसरा (पुष्कर म्हातारा झाल्यावर जसा दिसेल तसा दिसतो तो) डोक्यात गेले.

सुशांत म्हणतोयस का तू अमित? तो पुष्कर सारखा वाटला ?! Happy
बाकी आउला गुंडाळले काल त्या शृंगारपुर्‍याने.
आउ एकदम घरगुती आहे. नाराज असली तरी थत्तेंना कुणाच्यातरी हस्ते चहा पाठवणे , दूध भात वगैरे ऐकून मला गंमत वाटली. त्या पिरपिर करणार्‍या पण घरात कामे करणार्‍या कुंडलकरी हाउसवाइफ्स असतात ना तशी.

हो. सुशांतच असणार.
आऊला गुंडाळले, पण उनाने जसं सांगितलं ते एकदम चांगलं वाटलं...तिने सांगितल्यावर एक सेकंद मला पण पटलं ते Lol तेच राजेश जसं सांगत होतातते ऐकुन राग आलेला Lol
आऊ घरगुती आहे, पण प्रेमळ आहे. कुंडलकारी हाउसवाईफ ... लोल परफेक्ट उपमा.

ते रे रा बोअर करतात, पण भूषण ने राजेशला तिच्याबद्दल तुमचीच प्रॉपर्टी हे शब्द वापरले मिन्स रा जाऊ का, उचलू का काहीतरी विचारत होता तेव्हा, ते शब्द जाम खटकले.

उषा नाडकर्णी काही भरोशाच्या नाहीत तशाही, त्या भंपक लुझर राजेशने मांडवली करून पाठवलं आणि या गेल्या लगेच .
परवाच म्हणत होत्या राजेश बद्दल कि इथे कॅमेरे लावलेत म्हणून बोटात बोटं धरून बसतात कॅमेरे नसते तर आणखीन काय धरून बसले असते काय माहित, याला रेशमची चटक लागलीये, जातो कि नाही इथून बाहेर गेल्यावर बायकोला सोडून हिच्याकडे बघ !
सगळ्या गृप्स्मधे मिक्स होतात गॉसिप करत असल्या तरीही :), अर्थात नॉमिनेशन्स च्या वेळी रेशम गृपलाच करतील होपफुली !
मेघा इज ऑलवेज राइट, ती म्हणत होतीना सईला, तू सोडून कोणाचा भरोसा नाही!
तिने अ‍ॅक्चुअली तिथून स्मिताला फोडल पाहिजे, जुईने स्मिताचा नंबर स्वतःला घेतला आणि चांगली कामगिरी करुनही स्मिता ऐवजी त्या गृपने रेशमची निवड केली ही निगेटीव्हिटी भरवून द्यायला हवी तिच्या मनात.

आस्ताद च्या gf बद्दल ऐकून डोळ्यातून पाणी आलं.>>>
भयंकर प्रेमात होते दोघे.. ती गेल्यानंतर सुद्धा एक दीड वर्षांपूर्वी पर्यंत तिचे आणि त्या दोघांचे एकत्र photos होते आस्तादच्या fb वर.. तिच्या वाढदिवसाला वगैरे पोस्ट्स असायच्या..
रच्याकने, प्राची (आस्ताद ची gf) म्हणजे 'अग्निहोत्र' मधली आस्तादची हिरोईन.

Pages