बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई कसली सॉल्लिड आहे, टास्क करण्यात एकदम स्ट्रॉंग !
पुष्करही भारी !
त्या स्मिताला फोडा आता, उगीच राजेशला हेड मसाज देत बसली होती.
नावडत्या गृपचे ऑलमोस्ट सगळे मेंबर झालेत नॉमिनेट , बरं झालं !
तरीही प्रामाणिकपणे फेअर विचार केला तर खरं तर उषा नाडकर्णी जायला हव्यात, व्हॅलिड मेडिकल रिझन आहेच पण टास्क केलं नाही अजिबात.

नाना ? छ्या.

कोणी मालवणी पात्र हवे होते अधुनमधून डाइलॉग मारायला. ( कोल्हापुरी, जळगांवी ,नागपुरी नको.)मालवणी हुयोच.

नाना नाही येनार कारण ते देखिल उना सारखेच आहेत फटकळ बहुदा उनापेक्षा जास्त आणि पहिला मूद़दा ते असल्या शो मध़ये शा.या

नॉमिनेटेड पैकी मग जुई किंवा सुशान्त जायला हवेत, वीकेन्डला मांजरेकरांची बोलणी खाल्ल्यावर “दिल भर गया “ टाइप निरोपाची भाषा सुरु केली आहे त्यांनी विनित सारखी.
रेशम स्वतःला नॉमिनेट करून घेतल्यामुळे सिंपथी घेणार !
Btw , सई आणि मेघाचे गॉसिपिंग अबाउट राजेश रेशम ‘कंट्रोल’ Rofl

>>उना आता फार डोक्यात जातात. काल थत्ते विषयी हा माणूस हगायला गेला वगैरे असे काहीतरी बोलत होत्या. एकदम घ्रुणास्पद वाटले.
This was expected.. she clearly thinks highly of herself and feels she is invincible. दुराभिमान, दुराग्रह, आणि आपण स्वतः एकटेच खूप कष्ट काढून मोठे झाल्याची भावना.. त्यात मांजा शी जुने संबंध असल्याने मला कुणी बोलू शकत नाही या थाटात वावरतात. खरे तर त्या कुठल्याच टास्क करण्यात फारशा शारिरीक सक्षम नाहीत... (जेवण खावण सोडून). असो. बिबॉ आऊ ची खरडपट्टी काढण्याचे डेअरींग दाखवतील का ते पाहुयात..

थत्ते पुन्हा एकदा ऊंची गेम खेळत आहेत... जोडीला वाक् चातुर्य असल्याने प्रक्षकांची सहानुभूती व घरातील काही सदस्यांचा पाठींबा देखिल मिळवत आहेत... जो माणूस पहिल्या दिवसापासून 'बाहेरचा' व 'नकोसा' होता तोच आता घरात मस्त बस्तान बसवू लागला आहे. ग्रेट!

मेघा, स्मिता, सई चांगल्याच नेटाने किल्ला लढवत आहेत.. बहुतेक टॉप तीन पर्यंत जातील.. मेघा has good leadership and people manipulation skills... स्मिता is like Dhoni of big boos... she is really very kool... shrewed as well.. आणि सई knows how to get sympathy and use her personality to influence others..(she plays double game!)

सई सारखी स्मिता ला डम्ब का म्हणते? ती ( स्मिता ) तर उलट चांगली गेम खेळत होती .तिच्या टीममधल्या सगळ्यांना सांगत होती कि आम्ही तो कचरा सहन करतोय ना तुम्ही जरा चिल . तिच्या परीने चांगली गेम खेळतेय परत स्मिता प्रोफेशल स्टंट बाईकर पण आहे आणि एमटीव्ही स्टंट मॅनिया कार्यक्रमात सेमी फायनलिस्ट म्हणून पण निवडून आलेय तरी सई सारखी स्मिताला डम्ब का म्हणते त्याउलट सईला तर तिच्या आईने निर्मिती करून सिनेमात घेतलंय . यात तीच स्वतःच असं काय कर्तृत्व ? लाडावलेली आहे. मी तर म्हणेन सई च डम्ब आहे स्वतः उद्योग नाही नाही धंदा नाही सारखी रडत असते ती . अजिबात स्पोर्टींग स्पिरिट नाही Angry

सई मला वाटत स्मितावर जळते म्हणून सारखी अशी तिला बोलते . आधीच्या गेम मध्ये पण स्मिताचा बापच बाहेर काढला "तुझ्या बापाकडून वसूल करेन म्हणे. अरे गेम आहे हा जरुरी काय बापाला मध्ये घेण्याची ? दुसऱ्याच्या आई - बापाच्या नावाने शंख करून भडास काढते तू . त्यावरूनच तुझी लायकी समजते . अजिबात खिलाडू वृत्ती नाहीये Angry

काल राजेश त्या पुष्कर ला विचारत होता, तुझं लव झालं का म्हणे सईबरोबर. वर म्हणे माझं झालं रेशमबरोबर. लागतंच ना असं कुणीतरी. चीप माणूस आहे. लव झालं काय. अर्थात तेही ठरवून असू शकतं. पण रेशम पण त्याला व्यवस्थित एन्करेज करते त्यामुळे बिलिव्हेबल तरी वाटतं. त्या सईचं फ्लर्टिंग फारच ओढून ताणून वाटतं कारण पुष्कर फारच डीसेन्ट वागतो, अजिबात तिला लिफ्ट देत नाही. किंवा नाटक करू शकत नाही.
उना चा आता काहीच प्रभाव दिसत नाही. रेशम ने नॉमिनेशन मधे पण फूटेज घेतले. तिथे उना ला चान्स होता अर्ग्यू करण्याचा पण तिने काहीच आवाज केला नाही, रेशम ने डॉमिनेट केले. एकंदर त्यांच्या ग्रुप ने सगळ्यांनीच एकजात नॉमिनेशन्स स्वतः ओढवून घेतली. आता कुणीही एलिमिनेट झाले की ते सगळे ओवरली इमोशनल ड्रामा करणार. जुई तसेही काहीही करत नसल्याने ती जावी असे वाटते. सुशांत पण युसलेस आहे , त्याचे असे काहीच वेगळेपण नाही दिसले अजून.

>>चीप माणूस आहे. लव झालं काय.
पण रेशमला ही 'चालतय की'.. Happy
ऊगाच राजा बाबूंना का दोष?

असो.. या स्पर्धकांचे एका वाक्यात वा शब्दात वर्णन करायचे असल्यास काय असेल?
माझ्या मते:
१. आऊ: मि आणि माझे
२. थत्ते: बिलंदर
३. राजेशः राजा बाबू
४. रेशमः स्वमग्न (self obsessed)
५. मेघा: बॉस
६. स्मिता: कूल खिलाडी
७. सई: बडे घर की बिगडी हुई
८. जुई: मांजर
९. ऋतूजा: ATKT स्टुडंट
१०. पुष्करः पहिल्या बाकावरील विद्यार्थी
११. भूषणः साईड रिदम
१२. आस्तादः वस्ताद
१३. सुशांतः भिरभिरलेला (काऊ)

तुनळी वर एक व्हिडिओ आहे त्यानुसार सगळ्यात जास्त कमाई आऊंची आहे १लाख पर डे, त्या खालोखाल राजेश अन रेशम.
पण गम्मत म्हणजे त्यानुसार जे सगळ्यात कमी पेड आहेत तेच जास्त करमणूक करतायेत मेघा, सई अन थत्ते सुद्धा.

यावेळी रेशम स्वतः नॉमीनेट झाली खरी पण मला वाटते की कदाचित ती जाऊ शकते कारण एकतर स्वतःला नॉमीनेट करताना ती ओव्हर कॉन्फिडेंट वाटली अन यावेळी ती bottom 2 मध्ये होती , तसेही ती खूप जास्त गर्विष्ठ वाटते.
राजेश , रेशम किंवा सुशांत यातील कोणीतरी जायला हवे आता खूप बोअर करतायेत.
एकवेळ हे जरी मान्य केले की रे रा प्रेमाचे नाटक करतायेत तरी ते खुप चिप वाटतेय अन मुख्य म्हणजे त्यांचे खरे पार्टनर गेला बाजार स्वतःच्या मुलांचा तरी विचार करावा, त्यांना कसे वाटत असेल की घरी सांगूनच आलेत की इकडे टीपी करणारेत

माझ्या मते कालच्या नॉमिनेशन प्रक्रियेत क्न्फेशन रुममध्ये अभ्यास करुन जर कोणि गेला असेल तर तो सुशांत. बहुतेक सगळे स्वतःला डायरेक्टली/इन्डायरेक्टली सेफ करायला धडपडत असताना (राजेश, रेशम अपवाद) सुशांतला कल्पना असावी कि पॉसिबल जोड्यांपैकि भूषण-थत्ते आणि ऋतुजा-जुई पैकि एकाचं एलिमिनेशन होणार आहे. हा विचार करुन, (डॅमॅज कंट्रोलच्या उद्देशाने) गेल्या आठवड्यात झलेल्या प्रकाराचा आपल्याला पश्च्याताप झालेला असल्याने मी जनतेच्या रोषाला सामोरं जायला तयात आहे, त्याच बरोबर आस्तादला त्याचं बिघडलेलं पर्सेप्शन बदलायला वेळ दिला जावा म्हणुन तो सेफ व्हावा - हा पवित्रा घेउन त्याने सगळ्या सदस्यांपेक्षा प्रभावी स्पष्टिकरण देऊन आस्तादला अगदि छोटा केलं. आस्तादने हि त्यावर विशेष काउंटर-आर्ग्यु न करता छोट्या पपीसारखी शेपटी हलवली... Happy

आस्ताद-सुशांत जोडि कालचा टास्क हिरीरीने करत होते. फुगा हवेत ठेवण्याच्या सोप्प्या खेळात आस्तादने का हाय खाल्ली हे कळलं नाहि...

भूषण किंवा जुई यापैकि एक बाहेर जाइल...

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!! जय महाराष्ट्र!!!

आज एलिमिनेटेड लोक पण महाराष्ट्र दिन पार्टी मधे येणार आहेत म्हणे! आत्ताच तर गेलेत लगेच परत कशाला?!
सगळ्या मुलींनी छान पैठण्या , नऊ वारी वगैरे नेसलेल्या दिसतायत फोटोत. अपवाद ती ऋतुजा - काहीतरीच गावठी चनिया चोली टाइप घातलेय. अजिबात ड्रेसिंग सेन्स नाही तिला. मेकप पण विचित्र. शाळेचे गॅदरिंग टाइप. कुठल्याही कपड्यांवर कोणत्याही शेड ची लिपस्टिक फासलेली असते.

सई काय सुंदर दिसते... आपल्याला तर खुप आवडते ती.>>> अगदी..सगळ्या घरात तीच एक बघणेबल आहे. बाकी पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता मेघा व सै एक्दम सही आणि रेराआसु ही चां चौ पोकळ बांबूचे फटके मारण्यालायक वाटतायेत सध्य तरी.. Wink
थत्ते काकांनीही हळूहळू त्यांची जागा बनवायला सुरुवात केलीय. आऊ अपेक्षेप्रमाणे फटकळ तोंडाने मुक्त बॅटींग व काड्या लावायचे काम कळत नकळत करतच आहेत. स्मिता व पुष्कर यांना अजून तरी कंपूतून बाहेर पडून स्वतःची भूमीका घ्यावी लागेल, नाहीतर वाया जातील. बाकीचे लोक्स फक्त गर्दीतले चेहरे.

कालचा भाग ऑनलाईन इतका बेकार क्वालिटीचा आहे, टोटल ऑफ सिंक आणि मरत मरत चालतो. ते गेम्स पण बोर झाले. मेधा पण डोक्यात गेली. किती बोलते ती!
आऊ जिव्हाळ्याच्या विषयावर बोलते त्यामुळे जाम हसायला येतं. हगल्यावर साखळी ओढायची पण माहित नाही ला जाम हसलो Biggrin
पण ओव्हरोल आता हे बघून कंटाळा येतोय की काय वाटलं काल.

साडी नेसल्यावर जवळपास सगळ्याच सुंदर दिसत आहेत, पण मला स्मिता अन रेशम जास्त आवडल्या.
ऋतुजा ने सुद्धा साडी नेसायला हवी होती, अगदीच कशीतरी वाटतीये ती

कालचा भाग ऑनलाईन इतका बेकार क्वालिटीचा आहे, टोटल ऑफ सिंक आणि मरत मरत चालतो. >>>> अगदी अगदी...आपली मराठीवरचाच म्हणताय बहुतेक तुम्ही. फारच बेकार...मी तर पहिले २ भागच बघायचा प्रयत्न केला व सहनशक्तीचा अंत झाला.
<<साडी नेसल्यावर जवळपास सगळ्याच सुंदर दिसत आहेत>>> साडीने स्त्रीचे सौंदर्य जास्तच खुलते मात्र... Happy हे.मा.वै. म.

थत्ते सर अतीच करतात, उ ना पण. विनीतला काहीही बोलले त्याने मस्त उत्तर दिलं. आऊ ला काऊ म्हणाले. पुष्करने त्यांचे वर्णन मस्त केलं.

चांगला गातो की तो, शिकलाय शास्त्रीय संगीत बहुतेक.>>> हो. मागच्या आठवड्यात त्याच्या 'हे सुरांनो' ची झलक मिळाली ऐकायला. १४ की १५ वर्षे शास्त्रीय संगीत शिकलाय असं वाचल्याचं आठवतंय कुठेतरी. गातो चांगला पण चैतन्यकांडीने वाट लावायचा प्रयत्न चाल्लाय वाटतं.

पण ओव्हरोल आता हे बघून कंटाळा येतोय की काय वाटलं काल. >>> हो कालचे खेळ बोअर झाले बर्‍यापैकी.
हा कार्यक्रम एकीकडे काहीतरी वाचताना, किंवा काम धामं करताना पाहिलेलं बरं पडतं.

उना अनिलना काहीही बोलतात पण ते अजिबात प्रतिसाद देत नाहीत. आजही त्या थत्तेंना उकसवत होत्या, म्हणे आरती आणि बोंडे त्यांच्यामुळेच बाहेर पडले, आरतीने एखाद्या चांगल्या जोतिषाला हात दाखवायला पाहिजे, थत्तेंसारख्या थातुरमातुर नाही. एवढं ऐकूनही ते काहीच बोलले नाहीत, उना मात्र मस्करीसुद्धा सहन करू शकत नाहीत, लगेच हमरीतुमरीवर येतात. एखादा नळ कसा चालूबंद करायचा हे माहित नसणं हा गुन्हा आहे का आणि आस्तादला जगातल्या सगळ्या नळांची माहीती आहे का, काहीही. आस्ताद गातो मात्र फार सुरेख, ऐकत रहावं. बंडल मालिका करण्यापेक्षा गाण्याचे कार्यक्रम करावे त्याने. चहयेद्यामध्ये त्याचवेळी तीन मालिकातले कलाकार आले होते, बॅकलाॅग भरून काढताहेत वाटते, पण बीबाॅ सोडून चहयेद्या बघणारे लोक कमी असतील.

म्हणे आरती आणि बोंडे त्यांच्यामुळेच बाहेर पडले >> पण इथे कोणाला बाहेर काढणे हा ही गुन्हा थोडीच आहे? रादर तुम्हाला टिकायचं तर तेच केलं पाहिजे ना?
आता #मराठीअ‍ॅक्टरउसुल असा हॅश टॅग काढला पाहिजे.

Pages