बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आस्तादने ते लपवण्यात मला तरी काही गैर नाही वाटले.<<
ऋन्म्या, गेमचा थोडा अभ्यास कर. गेम मध्ये एखाद्याला ठेवायचं कि नाहि ते घरातले सदस्य ठरवत नाहि (नॉमिनेट करत असले तरी), वोट करणारे प्रेक्षक ठरवतात. स्ट्रॅटजी, गेमप्लॅन वगैरे ठिक आहे पण त्यातलं खरं-खोटं प्रेक्षक ओळखतात. गेम मध्ये फाउल प्लेला थारा नाहि...

पण त्यातलं खरं-खोटं प्रेक्षक ओळखतात. गेम मध्ये फाउल प्लेला थारा नाहि...
>>>

तसे आपल्याकडे लोकांनी संतमहात्म्यांना निवडून द्यायची पद्धत नाही.
पण येस्स डबलढोलकी आणि चिडकी माणसं लोकांना आवडत नाही हे मात्र खरेय.
माझे म्हणने आहे की जर तो काही स्ट्रॅटेजीने तसे वागला असेल तर ते एथिकल नाही असा ओरडा करण्यात अर्थ नाही. त्याला त्याच्या गेमप्लानवर सोडा. त्यामुळे त्याची ईमेज खराब झाली आणि हा त्याने आपल्याच पायावर धोण्डा मारला असेल तर ती गोष्ट वेगळी झाली. म्हणून पुढे म्हटलेय ना की या पॉईंटला पकडून राहून त्याच्या विरोधात असणारे सई मेघा वगैरे त्याची ईमेज आणखी खराब करू शकतात. ईथे तो माणूस वाईट असण्यापेक्षा गेम समजण्यात आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी आखण्यात जरा गंडलाय ईतकेच.

चला, मांजरेकरांनी बरोबर ज्यांची चिड आली त्यांची शाळा घेतली, जे आवडले त्यांच्या टिमच्या फॉर बोलले , बरं वाटलं!
मुळात टास्क सोडून जाणे ही ऑप्शन नाही हे क्लिअर केले तेही उत्तम.
मेघा कॅमेर्यासाठी शो ऑफ करते ते पाहून पोटात दुखतं पण थत्त्यांचं नाही हा दुटप्पीपणाही मस्तं दाखवला.
अस्ताद,जुई ,सुशान्त, राजेशचे चेहरे थोबाडीत खाल्य्यासारखे झाले होते , ते बघून मला खरोखर मजा आली , मांजरेकरांनी व्हर्च्युअल थपडाच पाठवल्या जणु , पण अर्थात तो राजेश इतकं करूनही पालथा घडाच !
अस्ताद तर लिटरली शिक्षा झाल्यासारखा मेघा सईच्या मधे बसला होता , त्याला टिमशी गद्दारी केल्याबद्दल , खेकसण्याबद्द्ल झापण्यापसूनच सुरवात झाली , सोशल मिडीयावरच्या निगेटीव्हिटीची कल्पना दिली तेही फार बरं झालं!
त्याचं सुरेख गायन, सुंदर स्पष्ट मराठी उच्चार हे जितकं आवडतं, तितकच त्याचा आरडा ओरडा, चिटींग खटकतं म्हणून त्यानेच बनवलेला त्याचा हॅशटॅग त्याला आठवण करून द्यावासा वाटला मला, #नकानाकरुअसं
आता बघु कोण उडतय उद्या, विनित जाईल असं वाटतय.

या आठवड्यात थत्त्यांवरून नॉमिनेशनचा फोकस इतर लोकांवर गेलाय. खर तर बिग बॉस ने पहिल्या आठवड्यापुरतं घरात ठेवायला त्यांना ऑफर दिली असावी अशी माझी कल्पना . कारण खेळ सुरु झाला रविवारी आणि लगेच सोमवारी चार लोक जी नॉमिनेट झाली (विनीत/ स्मिता / सई आणि थत्ते ) त्यातल्या तीन जणांना बिग बॉस ने स्वतःच्या अखत्यारीत सेफ केलं आणि फक्त थत्त्यांना नॉमिनेट केलं . पहिले दोन आठवडे पाठोपाठ ते नॉमिनेट झाले ते त्यांच्या विचित्र वागण्याने आणि या अभिनयाच्या इंडस्ट्रीत ते नसल्यामुळे . तरी सुद्धा व्यवस्थित मुलाखत हॅण्डल करून / स्वतःच वागणं सुधारून त्यांनी स्वतःला बऱ्यापैकी सेफ केलाय. खरंच हे सोप्प नाहीये . बघूया आता परत तिसर्यांदा ते नॉमिनेट होतात का ?

उषा नाडकर्णीला एक टाका पालथ्या घड्यांच्या लायनीत !
मधेच काय त्या सुहिला थत्तेने लग्ना नंतर नाव बदललं नाही, कुंकु मंगळसुत्रं घालत नाही वर घसरली आणि इथे मेघाच्या गृपमधे बसतात तिथे सुशानत्ला म्हणतात (मेघासारख्या ) चालु बायकांनाच चांगले आणि श्रीमंत नवरे मिळतात वगैरे.
बरं झालं डबल ढोलकी लायनीत त्यांनाही टाकलं गेलं !

वीकएंड का वार बघितला..मांजरेकर सरांनी आस्ताद ला घेतला बरोबर...पण त्या सोबत त्या रेशम ला पण झापयाला पाहिजे होतं..तीच नाव दिलच का कॅप्टन नोमिनाशन साठी... जुई किंवा स्मिता च का नाही दिल..त्यांनी कचराही सहन केला आणि नंतर ओपोसीट टीम ला उठवायला पण बरंच नाटक केलं होतं... आणि रेशम नि आयती आलेली संधी पण वायाच घालवली..तिथे ही राजेश ने परत सिनियर आहे, मान घेवयन गेम गिव अप कर म्हणे.. दिपांजली ने म्हटल्याप्रमाणे मांजरेकर सरांनी लायकी काढूनही हा माणूस गिरे तो भी टांग उपर... आज झापयाला पाहिजे अजून या ' रे रा ' जोडीला..आणि सरांसमोर का नाही हातात हात घालून बसत... आणि विनीत ची पण घेतली शाळा बरोबर.. कॅप्टनशीप च्या टास्क बद्दल आज बोलतील अशी अपेक्षा आहे...

ऊ ना मोठ्या आहेत ना मांजरेकर पेक्षा?तरी त्या महेशजी म्हणतात आणि मांजरेकर नुसतच ऊषा हाक मारतात.ऊषाताई, मावशी काहीतरी म्हणावं.

मांजरेकर रॉक्स.
आस्ताद, सुशांत, राजेश, रेशम, जुई सगळ्यांचं पितळ उघडं पाडलं.
टोटल मनातलं बोलले. त्यांना तरी गेम समजला आहे याची खात्री पटली. विनीत जाईल

बिग बॉस (हिन्दी) हा कार्यक्रम कधीच पाहिला नव्ह्ता त्यामुळे मराठी बिग बॉस बघताना एक दर्शक म्हणून पाटी कोरी आहे.
पहिल्या पासून कालपर्यंतचे भाग बघून झाल्यावर आवडलेल्या,खटकलेल्या या काही गोष्टी:
यातले बहुतांशी स्पर्धक मला महिती नव्हते. पण या बिग बॉसचे पहिले भाग बघितले तसे त्यातले काही सो कॉल्ड सेलेब्रीटी अगदी हवेत असल्यासारखे वाटले. खरतर त्यापैकी कोणी चुकुन आधी बाहेर भेटलं असत तर यांना अजिबात ओळखलं नसतं.
उषा नाडकर्णी पहिल्या आठवड्यात किरकिर्‍या लाऊड वाटल्या. पण त्यांना हा काय गेम आहे हे समजत आहे का नाही अशी शंका वाटतीये.
थत्ते पेहराव,वावरावरुन आधी विचित्र वाटले पण आता ते जरा करमणूक करु शकतील असं वाटतय.
बाकी सो कॉल्ड सिनियर गँग ( राजेश, रेशम, सुशांत ) टोटल फेक , अरेरावी ग्रुपीझम करणारे, अजिबात स्पोर्टिंग वाटले नाहीत. ते लवकर बाहेर पडलेले आवडतील. राजेश रेशमची जी काही नौटंकी चालली आहे ती बघायला फारच बोअर आहे आणि तो कोण भूषण ज्याने या त्याच्याच कंपू मैत्रीणीला कोणाची प्रॉपर्टी म्हटलं ते फार चीप वाटलं.
भूषण, जाई यांना स्वतःची काहीच मतं, पर्सनॅलिटी नाही, काहीच एन्टरटेनिंग पण नाहीत. दोघही एरंडेल प्यायल्यासारखे चेहरे करून वावरत असतात. दादागिरी ग्रुप मधे घुसून बांडगूळ म्हणून तरून जात आहेत. यांना पहिला बाहेरचा रस्ता दाखवलेला आवडेल.
स्मिता, आस्ताद दादागिरी ग्रुप मधे असले, चुकत असले तरी फेक नाही वाटतं, एंटरटेनिंग आहेत. पण चुकीच्या कंपूतून बाहेर पडून त्यांनी स्वतःची अशी छबी दाखवावी. आस्तादचा आवाज, त्याने गुणगुणलेली गाणी, त्याच मराठी छानच. केवळ या करता तरी तो बराच वेळ घरात असावा!
विनीत, हा अजून का आहे? पहिला जायला हवा होता. किती रडारडी करतो आणि अ‍ॅनोईंग आहे.
मेधा, सई पहिल्या आठवड्यात काही आवडल्या नव्हत्या पण या आठवड्यात त्यांच्या स्पोर्टिंग स्पिरिट, राईट अ‍ॅटीट्युड मुळे आवडल्या. रडीचा डाव खेळून तरी हरतोय हे जाणून टिपिकल MCP अ‍ॅटिट्युड दाखवून त्यांच्यावर खेकसून ओरडून, शिव्या घालणार्‍या राजेश, सुशांत, आस्तादला त्या पुरून उरल्या. कॅप्टनशिप करता स्पोर्टिंगली खेळल्या ते पण आवडलं.
पुष्कर त्या घरातला बॅलन्स्ड डिसेंट बॉय वाटतो.
रुजुता आहे काय आणि नाही काय.

बाकी पहिलाच दिलेला यज्ञ या टास्कचं प्रयोजन कळल नाही. उगाच तूपाची नासाडी, वर हवेत प्रदूषण, धूर वाढवणारा आणि काहीच मजेचा नसलेला टास्क. खूर्ची सम्राट आणि थत्तेगिरी आवडली. त्यातून घरातील माणसांचे मुखवटे आणि चेहरे समजून घ्यायला मदत झाली.

~ITG
#ColorsMarathi #BiggBossMarathi

मांजरेकरचं अजुन एक आवडलं, त्या डोक्यात कचरा टाकला , वजन ठेवलं म्हणत रडणार्या रडक्या जुईला म्हणाले, तुला काय हळदीकुंकु मिळणं अपेक्षित होतं का ? डोळे चुरचुरत होते तर खुर्ची सोडून उठायचं आणि जाऊन डोळे धुवायचे होते Proud

रेटिला धारेवर धरायला हवं होतं खरतर..
या लोकांना हे स्वतः फारच शहाणे वाटतात असं दिसतय.. कुणी काहीका म्हणुदे पण आम्ही बरोबर म्हणजे बरोबर..
ते सगळ प्लॅन्ड होत आणि राश्रु आणि सुशेने ठरवुन वाद उकरला हे सारं कॅमेरात रेकॉर्ड झालय हेपन सांगायला पाहिजे होतं ममां..
रेटिचे अजुनही सुधरण्याचे चान्सेस वाटत नाही. जुईला आणखी झापायला पाहिजे होतं.. जुई स्मिताला कि तुम्हाला इतका त्रास झाला तर उठले का नाही? खेळणं कंटिन्यु का केलं..

ते सततच मराठी अ‍ॅक्टर पालुपदवर झापलं ते मस्तच..

सुशेने डबलढोलकी पदवी बहाल केल्यावर आस्तादला आता तरी अक्कल यावी कि आपण कसल्या लोकांसोबत धागे जुळवून आहो..

मांजरेकरचं अजुन एक आवडलं, त्या डोक्यात कचरा टाकला , वजन ठेवलं म्हणत रडणार्या रडक्या जुईला म्हणाले, तुला काय हळदीकुंकु मिळणं अपेक्षित होतं का ? डोळे चुरचुरत होते तर खुर्ची सोडून उठायचं आणि जाऊन डोळे धुवायचे होते Proud>> मी फिस्सक्कन हसली होती..
खरतर जेम एपिसोड होता हा..
या सार्‍या आरेरासुभूजुस्मि कंपूला त्यांच्याबद्दल काय बोलण्यात येत हे सांगायला हवं ममांने..
मला राहून राहून अतितीव्रतेने सल्लूची आठवण येत होती.. तो हवा होता सुत्रसंचालक म्हणुन. काय बेक्कार झाडला असता एकेकाला..वाईट्ट..आले मोठे सारे सिनियॉरिटिच्या नावाने टिमक्या वाजवणारे..

उना बद्दल +१.. पण मलातरी नाही वाटत त्यांना गेम समजला असेल असे.. उनाचे स्मिताबद्दल इतके ग्रह का आहे हे कळेना.. आणि मला त्यांचे विचार नाही आवडत बरेचशे.. मग ते थत्तेबाई नाव नाही बदलवल वगैरे बोलणं असो वा त्यांनी काढलेलं बेकार पोरींना चाम्गले नवरे मिळतात अस मेघाबाबतचं कन्क्लुजन असो..
विनीत एकदम मिसफिट वाटायला लागलाय मला.. तो जाईल वाटतय..किंवा भूषण तरी..

थत्तेने जे त्या भांडणाबद्दल म्हटलं ते गेमवाल्या लोकांनापन झोंबलं वाटत.. स्क्रिप्टेड..
चीड आली राग आला हे मान्य पण त्यावरची प्रतिक्रिया हि फार काहिच्याकाही ओव्हररेटेड..परफेक्ट.. प्रक्षुब्ध होणे मान्य पण इतक्या मोठ्या आणि हाय स्केलने..हाहाहा..

सगळ्यांशी सहमत. मजा आली कालच्या भागात. आस्ताद , जुई ची नाटके एक्सपोज केल्याचा फार आनंद झाला.
आज पण पुन्हा कोर्टात उभे करणे वगैरे ग्रिलिंग आहे!
उना खरोखरच डबल ढोलकी निघाली. सगळ्यांच्यावर गॉसिप्स करते. लोकांची खानदाने, नातेवाईक, जात पात , पैसा काही सोडत नाही काढायचे. मग थत्ते बरे की! ते बॅलन्स्ड अप्रोच ठेवून आहेत.
काल सईचा ड्रेस छान होता. मला आता एक उपप्रश्न पडला आहे. हे लोक, विशेषतः मुली कोणीही ड्रेस रिपीट करताना दिसत नाहीत. येताना तर एकच बॅग घेऊन आले होते तीही फार मोठी नव्हती. कसे मावले त्या एका बॅगेत इतके सगळे? पुन्हा सप्लाय करत असतील का त्यांना?

गेम मध्ये एखाद्याला ठेवायचं कि नाहि ते घरातले सदस्य ठरवत नाहि (नॉमिनेट करत असले तरी), वोट करणारे प्रेक्षक ठरवतात.
>>>>>
जस्ट कुतुहल आहे की ईथे किंवा ईतर ठिकाणी बिग बाँसवर भरभरून लिहिणारे प्रत्यक्ष कोणी वोटिंग करतय का????
ईथे लिहिणार्यांपैकी कोणी केलंय का वोटिंग बाय एनी चान्स???

मी करते भुंगा. Voot वर एका क्लिकवर होतं वोटिंग.
खेरीज नेहमी नेहमी voot वर बिबॉ बघितल्याने ते आता होमपेजवरच मला डायरेक्ट मराठी बिबॉ ची लिंक देते आणि नॉमिनेशन च्या दुसऱ्या दिवशी वोट करायची पण लिंक देते.

एवढं सोपं झाल्यावर मीपण एका क्लीकवर लगेच वोट देऊन टाकते. Happy Voot इज बेस्ट.

मांजरेकरांना १० पैकी ७ मार्क. हिंदी आणि मराठी शोचे प्रोड्युसर्स एकच आहेत; मराठी शो नविन अस्ल्याने फटकारताना हात आखडता घेतला असावा. हळुहळु शो आणि मांजरेकर मुरल्यानंतर मजा येईल. शिवाय "थत्तेगिरी" मध्ये आघाडिच्या खेळाडुंनी आपापली भडास ऑलरेडि काढलेली असल्याने मांजरेकरांना ते प्रश्न/पॉइंट्स रिपीट करता आले नाहि.

भूषणाच्या त्या चीप कामेंटवर मांजरेकरांनी अजुनतरी कारवाइ केलेली नाहि, ती करुन शिव्या, डिरॉगेटोरी कामेंट्स पास करणार्‍यांना समज (खर्चापानी) द्यायला हवी...

मांजरेकर नुसतच ऊषा हाक मारतात.>> नाही ते पण आउच म्हणतात, स्मिता आणि सई अभ्यास करुन आल्या असतिल शोचा तर चान्गलच आहे अ‍ॅटलिस्ट काही लोक सेन्सिबली गेम खेळतिल, बाकिचे नुसतेच हवेचे बुडबुडे,
राजेश च काल गिरे तो भि टन्ग उपर आणि वर रेशमचही सिनॉयरिटीच कौतुक फार झालय आता , तिला ममा नी झाडायला हव होत, आस्तादची शाळा मस्तच घेतली पण तरी सलमान ने अजुन भारी हॅन्डल केल असत.
मी एकच सिझन बघितला होता पण सलमानचा विकेन्डचा वार भारी असायचा त्यात.

हिंदी बिग बॉस कधी पाहिल नाही, पहावसं वाटत नाही, त्यात रिलेट करण्यासारखी कोणी लोक नसतील असं वाटतं पण आता उत्सुकता आहे फक्तं सलमान बद्दल, तो नक्की काय आणि कसं ग्रिल करायचा ? मांजरेकरपेक्षा अ‍ॅग्रेसिव्ह का ?
बाकी सलमान खानने कोणाला बिहेवियर बद्दल कानपिचक्या देणे म्हणजे... लुक हु इज टाकिंग प्रश्नं नक्कीच येत असेल स्पर्धकांच्या मनात Wink
असो, तरीही तो एक उत्तम शो होस्ट आहे यात काहीच शंका नाही, दस का दम होस्टींग अम्मेझि ग करायचा !

तो नक्की काय आणि कसं ग्रिल करायचा ? मांजरेकरपेक्षा अ‍ॅग्रेसिव्ह का ?>> मी सिझन ८ पाहिला फक्त , त्यात करिश्मा टन्ना , पुनित इस्सर (दुर्योधन फेम), प्रनित भट्ट (शकुनी फेम) वैगरे मन्दळी होती, त्यात यापेक्षाही जास्त ग्रुपिझम, राडा गोन्ढळ, आणी टास्क वरुन भाण्डण झालेली, (खुर्ची टास्क, रिन्ग टास्क सेमच होते त्यातही ) सलमान व्यवस्थित वेड्यात काढतो , स्पर्धकाना स्मार्ट नसतिल तर कळायचेच नाही नक्कि आपण वागल ते बरोबर कि चुक., तो खुपदा त्याच्याकडुनच त्यान्ची चुक वदवुन घ्यायचा... आय लाइक हिम अ‍ॅज होस्ट इन दॅट सिझन.
गौतम गुलाटी जिकलेला यात, भारी होता तोही (स्क्रिन फुटेज साठी खोटि खोटी लफडी होतीच )

आजचा एपिसोड ठीक ठीक वाटला.. विनीत गेला...पण बाकी फार काही झालं नाही... रे रा ला कप्तानशीप च्या टास्क गिव अप बद्दल काहीच झापल नाही... सेनेओरिटी वगैरे सोडून गेम खेळा अस काहीच नाही...असो... हिंदी आणि इंग्लिश बिग बॉस पाहिल्या मुळे बहुतेक माझ्या फारच अपेक्षा होतायत मराठी बिग बॉस कडून.. Sad
आणि ताई दादा काय लावलंय.. बरोबर बोलले मांजरेकर सर....नावाने हाक मारून पण रेस्पेक्ट दाखवता येतो.. अपवाद उ ना आणि अनिल थत्ते सोडून... बाकीचे सगळे यंग आहेत मग काय प्रॉब्लेम आहे.. 'राजेश,तुम्ही अस,तुम्ही तसं....'अस म्हणूच शकतात की बाकीचे...त्याला राजेश दादा ,राजेश भाऊ,राजेश सर म्हणायची काय गरज आहे.. हे मा वयक्तिक मत आहे...

रेटि पण स्मोक करते का???
कारण मी मगाशी बघितल की आऊ आणि रेशम उद्या टास्क मध्ये एकत्र होत्या.
आणि रेटि त्या स्मोकिंग रूममध्ये गेली :/

आजचा भाग खूप बोर झाला

सलमानला खूप खूप मिस केले,
मांजरेकर त्याच्या पुढे १०% पण नाही वाटले मला, खरेतर खुपसार्या गोष्टी होत्या ज्या काल अन आज डिस्कस व्हायला हव्या होत्या, ज्या झाल्या नाहीत
आजचा भाग बघितला नसता तरी चालला असता असा झाला Angry

विनीत जाणार अन गेल्यावेळी जे झाले त्याच्या उलट आज होणार हे अपेक्षित होतेच, अन विनीत थत्तेना nominate करणार हे पण

हे लोक, विशेषतः मुली कोणीही ड्रेस रिपीट करताना दिसत नाहीत. येताना तर एकच बॅग घेऊन आले होते तीही फार मोठी नव्हती. कसे मावले त्या एका बॅगेत इतके सगळे? पुन्हा सप्लाय करत असतील का >>>>> हो. त्यांच्या घरुन दर आठवड्याला येतात.

सगळे टास्क हिंदी बिबॉ मधून उचललेत,

मला कालचा भाग ही इतका आवडला नसला तरी ठीक होता,

बाकी, जोवर आस्ताद आहे तोवर बघेन मी, फक्त त्याच्यासाठी ,

कदाचित आता तो थोडा बॅलन्सड वागेल अन त्या माजखोर कंपूतून बाहेर पडेल असे वाटतेय

रे ला एवढं काही बोलले नाहीत म मां. विनीत पेक्षा थत्ते, रेशम गेली असती तर जास्त आवडलं असतं.

सुहिता थत्ते ला उगाच बोलायचं काय कारण होतं आऊनी.

Pages