Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऊना थत्तेंना काय म्हणाली .
ऊना थत्तेंना काय म्हणाली . मी एक दिवस थोबडावून काढीन तुम्हाला ? आणि या पण टीव्ही समोर त्यांचा अपमान करतात आहेच कि . दुसर्यांना काही वाटेल ते बोलतात ते चालत आणि स्वतःला कोणी काही बोललं कि राग येतो ? काय झालाय ?
स्मिता ला मराठी महिने माहिती
स्मिता ला मराठी महिने माहिती नाही, अतीच आहे. मला आवडते पण एवढं माहिती असायला हवं होतं असं वाटतं.
>>>>
मी मराठी मिडीयमचा आहे. पण मराठी महिने मलाही सगळेच माहीत नाहीत. सिक्वेन्स तर नाहीच नाही. आणि असे बरेच लोकं असावेत. जे महिने वापरले जात नाहीत ते कसे लक्षात ठेवायचे? आणि का?
पण बीबाॅ सोडून चहयेद्या
पण बीबाॅ सोडून चहयेद्या बघणारे लोक कमी असतील.
>>>
रिपीट टेलिकास्टची सोय याचसाठी असते. लोकं दोन्ही बघतात
हो ऋ असू शकेल माहिती नसणे पण
हो ऋ असू शकेल माहिती नसणे पण कमीतकमी गुढीपाडवा चैत्रात येतो, चैत्राचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा एवढं माहिती असायला हवं असं वाटलं. आपले सण वार मराठी महिन्यात येतात त्यामुळे वापरले जात नाहीत असं म्हणणे चुकीचं आहे. अजूनतरी आपण आपले सण ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे नाही करत. एक संक्रात ठरलेली असते, बरेचदा १४ किंवा १५ जानेवारीला असते.
वापरतात हल्ली मराठी महिने, तिथी झी मराठी वाले, नवीन सिरीयल कुठल्या मराठी महिन्याच्या दिवशी सुरु होणार ही add असते.
विनित सोडुन सगळ्यान्च अ
विनित सोडुन सगळ्यान्च अॅनेलिसिस बरोबर होत कि थत्तेच ! ते एका एपिसोड मधे आवडत्याचे नावडते होतिल स्पर्धकान्चे, फारच अनप्रेडिक्टेबल आहेत.
आता मात्र बोअर व्हायला लागलं
आता मात्र बोअर व्हायला लागलं हा बिबॉ हळू हळू . एक तर एक दिवस उशिरा बघायला मिळतय हॅथवेच्या कृपेने आणि कंटाळा पण यायला लागला . इथेच येऊन वाचेन म्हणते
मला कधीपासून बोअर होतंय पण
मला कधीपासून बोअर होतंय पण सवयीने tv लावला जातोय, फार नीट बघितलं जात नाही. येता जाता, w a chat करताना, मध्ये मध्ये बघते.
इंग्लिश मिडीयम ची असेल किंवा
इंग्लिश मिडीयम ची असेल किंवा पुण्याबाहेरचे मराठी मध्यम असेल.
असुदे, वाटलं मात्र गुढीपाडवा
पुण्याबाहेरच्या मराठी मिडीयममधेच मी शिकलेय, तिथेही मराठी महिने शिकवतात.
कुणि निट एकल का, रेशमआरति
कुणि निट एकल का, रेशमआरति समोर चक्क म्हणाली राजेशला की आपली अॅक्टीन्ग कमि पडतेय अस , त्यावर राजेश सावरुन घ्यायला म्हणला की जे आहे ते खर आहे.
पब्लिकलाही माहितेय काय खर आणी काय खोट
हे नाही बघितलं मी. हल्ली फार
हे नाही बघितलं मी. हल्ली फार मध्ये मध्ये बघते, विशेष लक्ष न देता.
पण इथे कोणाला बाहेर काढणे हा
पण इथे कोणाला बाहेर काढणे हा ही गुन्हा थोडीच आहे? रादर तुम्हाला टिकायचं तर तेच केलं पाहिजे ना?
आता #मराठीअॅक्टरउसुल असा हॅश टॅग काढला पाहिजे.
<<
एग्झॅक्ट्ली.
वर म्हणतात आम्ही अॅक्टर आहोत अॅक्टर, हिंदी बिग बॉस सारखे जिंकण्यासाठेर्नचीप वर्तन करत नाही, असं म्हणत डोळे वटारून शिव्या दे मुलींवर धाऊन जातात #मीनाहीत्यातला
व्हर्बल डायरिया नक्कल मस्तच.
व्हर्बल डायरिया नक्कल मस्तच. असं प्रत्येकाने काही गंमतीदार करावे. काचेच्या कपाटात मांडून ठेवलेल्या चॉकलेट्ससारखे कडक बसून राहू नका.
थत्ते उगाच सगळ्यांशी पंगा घेत
थत्ते उगाच सगळ्यांशी पंगा घेत आहेत असे वाटते. स्पर्धकांची मते आत्ता कुठेतरी त्यांच्या बाजूने आणि उनाच्या विरूद्ध होत होती तर त्यांनी विनित आणि उनांविषयी काही बाही बोलून परत स्वतःला धुळीत मिळवले. थत्तेंनी विनितला "अकाली जन्माला आलेला विनोद" असे संबोधले तर विनितने त्यांना लगेच चांगलेच प्रत्युतर दिले..."अकाली जन्माला आलेला मुर्ख" म्हणून..!! यावेळी ते नॉमिनेटेड नाहीत म्हणून नाहीतर निश्चितच बाहेर पडले असते.
ते काही असल तरी ऊनाला पण
ते काही असल तरी ऊनाला पण समज दिली पाहिजे थोबडावून काढीन काय ? मी थत्ते यांच्या जागी असते तर तिथल्या तिथे थोबडावून काढून गेम मधून बाहेर पडले असते किव्वा मी पण म्हटलं असत " माझे हात काही केळी खायला गेले नाहीत . गेम गेला उडत " चांगली बोलण्यामध्ये तिला टफ फाईट दिली असती . काही बोलायचं म्हणजे काय
राडा झालाच पाहिजे, राडा
राडा झालाच पाहिजे, राडा भांडणं झाली तरच लोकं बघतील, सगळे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून गोड बोलायला लागले तर शो कोण बघेल. दंगा मस्ती व्हायलाच पाहिजे, थत्ते पहिल्या आठवड्यात वागले तसेच वागायला पाहिजे आणि आऊने त्यांची कॉलर पकडून सटासट मुस्कटात द्याव्या, प्रत्येकाला एक हत्यार जवळ बाळगण्याची मुभा द्यावी म्हणजे शेलारमामाच्या तलवारीचे दर्शन प्रेक्षकांना घडेल, सकाळी आठ वाजता शूर आम्ही सरदार हे गाणं लागावं आणि शेलारमामाच्या अंगात वीरश्री संचारावी, आपली नागवी तलवार गरागरा फिरवत मामा जो दिसेल त्याच्यावर चालून जावेत, घरातली माणसं सैरावर इकडे तिकडे पळत सुटावीत, कोणी बाथरूम, तर कोणी छतावर जाऊन बसावे, वेळ आलीच तर एकदोन तलवारीचे वार घरातल्यांवर करावे, हिंदी बिग बॉस मध्ये जसा आखाडा मस्ती होती तशी इथेही ठेवावी म्हणजे राजेश एकेकाला कसा कापतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळावं, बायकांनी भांडण झाल्यावर नुसतं रागात न पाहता एकमेकींचे केस पकडून मारामारी करावी नाहीच जमलं तर भांडी फेकून दोन चार जणींची टाळकी फोडावीत, म्हणजे trp वर जाईल आणि जास्तीत जास्त लोक्स हा शो पाहतील
कल्पतरू अपाल्या पोस्टवरून
कल्पतरू अपाल्या पोस्टवरून आठवले. तो कोणतातरी एक चित्रपट होता ना.. अमिताभ, संजय दत्त, कुमार गौरव, संजय मांजरेकर, लकी अली वगैरे.. त्यात ते एक गाणे होते.. कॉलर को थोडासा उपर चढाके, सिगरेट के धुवे का छल्ला बना के.. जाने क्या होगा रामा रे, जाने क्या होगा मौला रे..
त्यात कसे शेवटी सारे जण गोलाकार उभे राहून एकमेकांना धाडधाड गोळ्या मारून एकमेकांना संपवून टाकतात. तसे काही झाले तर टीआरपी हिंदी बिगबॉसच्याही थोबाडात मारेल
विविध गुणदर्शन आणि सायकल
विविध गुणदर्शन आणि सायकल प्रमोशनचा पकाउ ओव्हरडोस

अस्ताद छान दिसत होता काळा कुर्ता आणि गंध स्टाइल कुंकु.
पुष्कर खरच चांगला डान्सर आहे, बाकी बराच फॉरवर्ड केला आजचा एपिसोड.
आज मेघाला बघून राहुल महाजनची रिअॅलिटी शो मधे लग्नं केलेली एक्स वाइफ डिंपी गांगुली आठवली
! डिम्पी गान्गुली पण आली होती
! डिम्पी गान्गुली पण आली होती एक सिझनला,ती मेघाच्या वरताण होती बोलायला आणि गेम मधे एक्दम मास्टरमाइन्ड, खुप म्हणजे खुपच बडबड करायची.
मी फक्त राहुलबाबाच्या
मी फक्त राहुलबाबाच्या स्वयंवरचे काही एपिसोड्स पाहिले होते, डिंपी वॉज ड्रामा क्वीन मेड फॉर रिअॅलिटी टेलिव्ह्जन !
तिनी आता दुसरं लग्नं केलं आणि दुबईला असते.
मेघाचं फेसिंग थोडं तिच्या सारखं आहे.
कोणतातरी एक चित्रपट होता ना..
कोणतातरी एक चित्रपट होता ना.. अमिताभ, संजय दत्त, कुमार गौरव, संजय मांजरेकर, लकी अली वगैरे>>>> कांटे चित्रपट होता तो, बोंडे जिंकला असता त्यात
थत्तेंना गेम समजला असे दिसते.
थत्तेंना गेम समजला असे दिसते. उनाने काड्या करायचा प्रयत्न केला पण ते उचकले नाहीत. ऋतुजाचा ड्रेस चांगला नव्हता/तिने साडी घालायला हवी होती हे खरंय. पण ती मस्त दिसत होती.सई, मेघा, रेशम सुद्धा भारी दिसत होत्या.
ऋजुता काय ते महाविचित्र कपडे
ऋजुता काय ते महाविचित्र कपडे आणि कसा डान्स, ती म्हणे बालपणापासूनची ट्रेन्ड डान्सर आहे, अजिबात वाटत नवह्तं

)
आता पुन्हा त्या घरात सायकल दिसली तर तुडवून फेकून द्यायला हवी बिग बॉस हाउस बाहेर एखाद्या गरम डोक्याच्या मेंबरने
(थँक गॉड , मी तिथे नाही
वाऊ आऊंचा राडा सुरु झाला वाटत
वाऊ आऊंचा राडा सुरु झाला वाटत
कालचा भाग अतिशय बोअर झाला.
कालचा भाग अतिशय बोअर झाला. कोण होता तो? दर्शन कि सुदर्शन?

* रेशम स्मिता चा डान्स भारी झाला सर्वात.
* सई आणि पुष्कर पैकी फक्त पुष्कर छान नाचला. सई त्याच्या अंगावर चुकून पडेल आणि तो चेपला जाईल की काय अशी भीती वाटली मला एक क्षणी.
* थत्तेंची विनित वरची कमेंट अतिशय चीप होती.
* सुदर्शन आणि भूषणने ज्या काही नकला करायचा अयशस्वी प्रयत्न केला तो महाबोअर होता. संजय नार्वेकरच्या वेळी तर 'आवराच' असं झालं.
* आऊ मुर्ख म्हणावी की अतीशहाणी, तिच्या तोंडाला लगाम नाही. एका बरोबरिच्या वयाच्या माणसाला आपण थोबडवून काढू वगैरे भाषा वापरतोय याचं काही भान?
*राजेश म्हणजे कामातुरणं भयं न लज्जा मोडमधे गेलाय. आणि रेशम बरोबर रॉकेल ओतते त्यात.
* लास्ट बट नॉट द लिस्ट - अस्ताद - काळा कुर्ता आणि गंध लावलेलं ते, काय उमदा दिसत होता.
प्रियदर्शन जाधव - टाईमपास 2
प्रियदर्शन जाधव - टाईमपास 2 चा हिरो.
मला एक कळत नाही त्या जुई ला
मला एक कळत नाही त्या जुई ला आणि राजेशला कायम काही करायला सांगत नाहीत . जास्त बोलत पण करत नाहीत .घरातल्या इतर लोकांबद्दल त्यांची मत विचारत नाहीत आणि नेमकं थत्ते यानाच संगळ्यांबद्दल मत सांगायला का सांगितलं . म्हणजे ते लोकांबद्दल काहीतरी बोलतील आणि घरातले लोक परत त्यांना नॉमिनेट करतील असा बिग बॉस चा उद्देश दिसतो . पहिल्यापासूनच बिग बॉस ना थत्ते यांना काढायचं आहे . पण ते जात नाहीयेत. जितकी हि घरातली स्वयंघोषित इंडस्ट्रीतले लोक थत्ते यांच्या विरोधात जातील तितका थत्ते यांना लोकांचा पाठिंबा मिळेल . वाचतेय मी सगळीकडेच. जितक्या आऊ थत्ते यांच्या विरोधात बोलत आहेत तितक्या त्या लोकांच्या डोक्यात जात आहेत
जुई एकदम बोअर आहे या सगळ्या
जुई एकदम बोअर आहे या सगळ्या घरात. तो भुषण सुधा कधी कधी थोडफार एन्टरटेन करतो..पण ही महाबोअर बाई आहे. ती आधी जायला हवी.
राजेश आजकाल मला एकदम झी वरच्या राणादा सारखा वाटतो....नुसताच पैलवान..बाकी काहीच नाही...रेशम मुळे त्याला जरा भाव आहे नाहितर तो पण कधीच गेला असता.
सई आणि मेधा सगळ्यात भारी..एंटरटेनिंग पण आहेत आणि लढवय्या आहेत...सई ने जबरदस्त टास्क केलं...
मेधा पण मस्त करत होती पण रेशम ला जमलं नाही ते पाण्यच्या ग्लास मधे बॉल उडवायचा गेम...
थत्ते पण बर्यापैकी मनोरंजक माणुस आहे...उनांचा कंटाळा आला आता....उगीच वयामुळे ना खेळायला जमतय...ना काही राडे करतायत...गेलाबाजार माहेरची साडी मधलं बेरिंग पकडलं तरी लोकांचं मनोरंजन होईल...आज बघु आता थत्ते वर उचकल्यात म्हणे...
सुशांत न आस्ताद नक्की काय स्टँड घ्यायचा हे न कळलेली लोक आहेत..
़रुतुजा पण बोर आहे ..असुन नसुन सेमच...
स्मिता आणि रेशम मस्त नाचल्या काल...रेशम जास्त आवडली...सही दिसत न नाचत होती....
जुई आणि ऋतुजा अतिशय बोरिंग
जुई आणि ऋतुजा अतिशय बोरिंग
मला एक कळत नाही त्या जुई ला आणि राजेशला कायम काही करायला सांगत नाहीत . जास्त बोलत पण करत नाहीत .घरातल्या इतर लोकांबद्दल त्यांची मत विचारत नाहीत आणि नेमकं थत्ते यानाच संगळ्यांबद्दल मत सांगायला का सांगितलं . >> कसलं भारी ऑब्झर्व्हेशन आहे हे, माझ्या लक्षातच आलं नाही. पण नॉर्मली बिग बॉस मध्ये हेच असतं. ग्रुप फोडायचे, तोंडाळ लोकांना बोलायला अधिक अधिक वाव द्यायचा, दोन जवळ असणारे लोक असतील तर त्याना अशा टास्क मध्ये टाकायच जिथे त्याना एकमेकांना हरवावं तर लागेलच पण नॉमिनेटही करावे लागेल. बॉटल नेक, पाचर मारणे...
जुई बद्धल एक ओबसर्व केले का.
जुई बद्धल एक ओबसर्व केले का. एका रेग्युलर स्पीड ने न ब्रेक घेता बोलते. मांजा ला उत्तर देताना दिसले.. अ.. आ... असले pause नाहीत बिलकुल.
Pages