बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्सुकता आणि एक- दोन चेहरे ओळखीचे आहेत म्हणून हा काय प्रकार आहे ते पाहिलं पण मला काहीच झेपलं नाहीये. यातून काय आणि कसं मनोरंजन होतंय हे कळत नाहीये. मान्य आहे की नेमके एकमेकांबद्दल बोलत असतात तेव्हाचेच संभाषण edit करून दाखवतात पण दुसरं काहीच कसं बोलत नाहीत हे लोक? उदा. त्यांच्या कामाचे अनुभव, कटकटी, गमती, एकमेकांबरोबर काम केले असल्यास आठवणी, गेलाबाजार राजकारण, चालू घडामोडी , पाककृती, विनोद, पुस्तके , movies ? का त्यावर बंदी आहे का नेमके तेवढे edit करतात ? मायबोलीवरच्या काही ID ना त्यांच्यात सोडून द्यायला पाहिजे.

सुशांत स्वतःला खूप मोठा सेलिब्रिटी समजून राहिलाय. खलबत्ता घाला त्याच्या तोंडावर.. कुजका कुठला.

रच्याकने, प्राची (आस्ताद ची gf) म्हणजे 'अग्निहोत्र' मधली आस्तादची हिरोईन. >> प्राची माटे right ? अग्निहोत्र मध्ये त्याची हिरॉईन होती . तिच्यात निधनाबद्दल तेंव्हा कळले होते sad Sad

उत्सुकता आणि एक- दोन चेहरे ओळखीचे आहेत म्हणून हा काय प्रकार आहे ते पाहिलं पण मला काहीच झेपलं नाहीये. यातून काय आणि कसं मनोरंजन होतंय हे कळत नाहीये. >>>>> आहो पेशन्स ठेवा. असे मध्येच कुठूनतरी थोडावेळ बघून त्यातली गंमत समजणार नाही. दोन तीन आठवडे सलग बघा बघू.

मजा येऊ लागलीय हळूहळू.

आज सईने आस्तादचा मस्त गेम केला. आधी त्याला छानपैकी डबलढोलकी बोलून घेतले. त्याची कारणमीमांसाही करून झाली. त्याने आपल्या टीमशी कशी गद्दारी केली याचेही छान विश्लेषण केले. त्याच्या काड्याही उदाहरणासह सांगितल्या. आणि नंतर मग तोच आमच्यात समेट घडवून आणू शकतो, तोच मला समजू शकतो म्हणत त्याच्या प्रत्युत्तराला छानपैकी बूचही लावला Happy

थत्ते हे डार्क हॉर्स आहेत. ते फार मजल मारतील असे सध्या कोणालाच वाटत नसले तरी या आठवड्याच्या अखेरी पर्यंत त्यांनी प्रेक्षकांना आपली दखल घ्यायला लावली आहे. आणि हळू हळू ते आपल्या पोतडीतून एकेक चीझा बाहेर काढत आहेत. त्यामुळे लोकांचा त्यांच्यामधील ईंटरेस्ट कायम राहणार.
आजही मस्त मुलाखतीचा कार्यक्रम जमवला. अगदी कळीचे प्रश्न विचारले. मास्टरमाईंड कोण या प्रश्नाला सईने त्या बिनकामाच्या श्रुंगारपुरेचे नाव घेत त्याच्याबद्दल ईतरांच्या मनात असूया निर्माण केली असणार. खास करून त्याला त्या ग्रूपचा डॉन ठरवल्याने आस्तादचा चेहरा खर्रकन उतरलेला. ईतरांचीही मनोमन करपली असणारच. पुढे या सई मेघा मिळून बरोबर त्यांची आपसात जुंपवणार. तसेही या दोघींना बाकीचे सारे घाबरले आहेत. त्यामुळे सारखे या दोघी अभ्यास करून आल्या आहेत वगैरे चालू आहे. अरे, मग तुम्हाला कोणी अडवलेले ...

थत्तेंचा पत्रकार जागा झाला, जागा राहिला- सइ_मेधा कॅन्टनसी निकालापर्यंत हे भारी. त्या दोघींनाही उत्साह आला.

आज काय एकदम सिस फायर Proud सगळे तोंडदेखले का होईना गोड बोलु लागले, अस्ताद निवळला, मेघाचीही अस्तादप्रमाणे वरात काढली कॅप्टन्सी रुमपर्यंत.
असो, बहुदा एलिमिनेशन जवळ आलं म्हणून शुक्रवार शांतिचा निवडला असावा, टास्कचे दिवस राड्याचे ठरले असावेत.
सई चांगलं बोलली मुलाखतीत.
आज थत्तेंना फुटेज दिल्यावर आता उगीच वाट्तय त्यांचच एलिमिनेशन होणार कि काय !
खरं तर ते उत्तम सूत्रसंचालक, बर्यापैकी थंड डोकं ठेऊन निर्णय घेणारे, दोन गटात समझौता करायला अतिशय परफेक्ट अत्यंत हुषार व्यक्ती आहेत, उषा नाडकर्णी मात्रं आता फुसका सुतळी बाँब वाटु लागल्यायेत, दोन्ही कडून बोलतात , त्या राजेशचा निरोप घेऊन मेघा-सईकडे जाणे अगदीच अनपेक्षित, एरवी त्याच्याबद्दल किती गॉसिप करतात !
आज थत्त्यांच्या त्या प्रश्नामुळे अस्तादने अठवडाभर दंगा करून क्षणभरात सिंपथी मिळवली.
राजेश रेशम आचरटपणा बाकी वाढतच चाल्लाय !

मी दक्षि च्या पारड्यात..... कसा ही असला तरी अस्ताद म्हणजे माझ्या डोळ्यात बदाम वगैरे....काल प्राची बद्दल बोलल्यावर पण सर्वांसमोर रडायची नाटकं न करता गपचूप बाथरूम मध्ये जाऊन रडून घेतलं आणि नॉर्मल होऊन बाहेर आला.

..कसा ही असला तरी अस्ताद म्हणजे माझ्या डोळ्यात बदाम वगैरे....काल प्राची बद्दल बोलल्यावर पण सर्वांसमोर रडायची नाटकं न करता गपचूप बाथरूम मध्ये जाऊन रडून घेतलं आणि नॉर्मल होऊन बाहेर आला.
<
होना, अस्तादचा फार राग आला होता या आठवड्यात पण आज मुलाखतीत परत चांगला बोलला, सईच्या परखड बोलण्याला तिने केलेल्या मॅचफिक्सिंगच्या आरोपाला समजून घेतलं , अतिशय शान्तपणे गर्लफ्रेंडच्या कॅन्सरविषयी बोलला, सगळ्यांसमोर रडला नाही , मेलोड्रामा टाळला, त्याच्यावर आलेला राग खरच जरा कमी झाला Happy
पुष्करने जाऊन त्याला हग दिली, छान वाटलं, तो एक स्वतःची चांगली इमेज, रिस्पेक्ट मेन्टेन करून आहे, बाकीचे अस्तादचे सो कॉल्ड मित्रं नाही दिसले त्याला आधार देताना.

हो आस्ताद काल एकदम ग्रेसफुल वाटला, उगाच दुख: भांडवल न करणारा. विषय निघाला म्हणून सांगितलं त्याने आणि शांतपणे बाथरूममध्ये जाऊन रडला. अजिबात बाकी सगळ्यांची किंवा प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला नाही त्याने. रिअली hats off यासाठी.

थत्तेगिरी करायला सांगितल्यामुळे मलाही असे वाटले की थत्ते च जाणार की काय यावेळी. थत्ते आता कुठे एस्टॅब्लिश होतायत. अजून राहिले तर मजा करतील. काल त्यांनी प्रश्न मस्त विचारले सगळ्यांना. मला तो भूषण अगदी युसलेस वाटतो, आणि ऋतुजा पण. या दोघांची आधी हकालपट्टी व्हावी असे वाटते. जुईला पण काहीच पर्सनॅलिटी नाही.

तो बावळट भूषण कडू, पाच पैशाची अक्कल नाही बावळटाला, काल त्या राजेशला बोलत होता रेशम तुझीच प्रॉपर्टी आहे उचल नायतर काहीही कर, कुठून आलाय हा मूर्ख मनुष्य, यूपी मधल्या भैय्यांचे विचार पण जास्त चांगले असतात यांच्यापेक्षा, ती रेशमपण एव्हडी बावळट आहे तो राजेश काही बोलला की नुसती दात काढत असते, आणि त्या राजेशलपण थोडीतरी लाज वाटायला पाहिजे हे सगळं करताना, बायकोसमोर कुठल्या तोंडानी जाईल देव जाणे

त्या राजेशलपण थोडीतरी लाज वाटायला पाहिजे हे सगळं करताना, बायकोसमोर कुठल्या तोंडानी जाईल देव जाणे
>>>>>
नावातच श्रुंगार भरलाय हे बायकोला लग्नाआधीपासूनच माहित आहे....

पण गातोय बरा की चक्क... कुठेही बेसूर नाही झालाय.

मिल्या अस्ताद भेटला की जरूर सांग माझी विकेट गेल्ये म्हणून. Wink

पण गातोय बरा की चक्क... कुठेही बेसूर नाही झालाय
>>>>>
शिकलाय तो क्लासिकल... शेवटचा प्रयोग केला त्याने संगीत सौभद्र चा बिग बाँसला जायच्या आधी

सबस्क्राईब वगैरे करून हा कार्यक्रम लाईव्ह बघता येईल का? टीव्ही IPL मुळे बिझी असतो. डिट्टो टीव्हीवर लाइव्ह दिसतं का बिगबॉस? ऑलरेडी voot वर दुसऱ्या दिवशी बघते.

Manjarekar ne mast shala ghetali aaj sagalyanchi ...aajacha bhag awadala....senior walya kampu cha sagalya chuka kadhalya. ..hopefully next week sagale game khelatil. Senior senior karat basanar nahit.

काल त्या राजेशला बोलत होता रेशम तुझीच प्रॉपर्टी आहे उचल नायतर काहीही कर>>>तेव्हा राजेश "तिलाही तेच हवे आहे" असे बोलला. Angry

आस्तादने ते लपवण्यात मला तरी काही गैर नाही वाटले.
आस्ताद किंवा कोणीही तिथे पर्टीक्युलर टास्क जिंकायला नाही तर बिगबॉस जिंकायला आले आहेत. आणि त्या अंतिम लक्ष्याला अनुसरून ते आपली स्ट्रॅटेजी आखू शकतात. एखाद्या दिवशी, एखाद्या टास्कला तुम्ही टीम बनवून काम करत असलात तरी अल्टीमेटली तुम्ही स्वतंत्रपणे बिगबॉसमध्ये स्पर्धेत आहात.
म्हटलं तर टीमशी गद्दारी, म्हटल तर ईन्डिविज्युअलस गेम प्लान. अर्थात हाच मुद्दा वापरून सई मेघा वगैरे आस्तादची इमेज खराब करू शकतातच. हीच तर मजा आहे Happy

बाकी आजचा एपिसोड पाहिला नाही.. कधी नव्हे ते मुंबई जिंकत होती. ते सुद्धा चेन्नईसोबत.

आस्ताद गेम मधे बायस्ड होताच. म मां योग्य बोलले त्याला. आस्ताद शांत बसला. त्याला कळलं की पब्लिकला आवडलं नाहीये.

झोपडपट्टी मेंटालिटीवरुन झाडलं तेही योग्य होतं. रे रा चं बोअर होतंय पब्लिकला, चीप वाटतंय तेही बरेच जण सोशल मिडीयावर लिहीतायेत, हे मांजरेकरांनी सांगायला हवं होतं. फालतू फ्लर्टींग.

भुषणला रेशमला प्रॉपर्टी म्हणण्याबाबत झाडायला हवं, राजेशला पण.

राजेशचा आवाज चांगला आहे.

आऊ जे काही सुहीता थत्तेबद्द्ल बोलल्या ते चुक होतं. सुहीता स्पर्धकही नाहीयेत इथे. अनिल थत्ते ह्यांचे काका यदुनाथ थत्ते ऐकून वाटलं, कुठे ते आणि कुठे हे.

Pages