माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेवती छान दिसत होती काल सर्वांत. ग्रेसफुल, इम्प्रेसिव्ह.

आज मी एक शॉट बघितला, ती अथर्वला सांगते बाबा आता कधीच परत येणार नाहीत. ते आवडलं, म्हणजे ती आता त्याला परत मिळवणार म्हणत होती ते नाही. योग्य दिशेने वाटचाल फक्त किती स्लो नेतात काय माहिती. त्याला रस्त्यावर आणून मग डिव्होर्स द्यायचा, एक दोन महिन्यात झालं तर ठीक नाहीतर, 6 महिनेही दळतील. असो पेशन्स नाही बघायचे, जबरदस्त काही turn असेल तर इथे कळेल. मग बघेन एखादा एपिसोड.

त्वरा करा ! त्वरा करा ! त्वरा करा! अनलिमीटेड जागा शिल्लक! आज याची देही याची डोळा एक लेडीज फ्री स्टाईल बघण्याचे भाग्य तमाम रसिक मंडळींना लाभणार आहे. मादक सुंदरी शन्या आणी डोकेबाज सुंदरी संजना या दोन उंदर्‍यांमधील ( मांजरीमधील )Cat Fight कुस्ती, झटापट बघायला आप आपल्या घरी न चुकता हजर रहा.

वेळ : -रात्रौ ८ वाजता

ठिकाण :-तुमचे घर

चॅनेल :-झी मराठी

पळा पळा कोण पुढे पळे तो....

गुरुच , आईबाबांसमोर भांडं फुटल्यापसून काही एपिसोड नियमीत बघितले .
तो भाग चांगला झाला होता . गुरु आणि त्याच्या आई-वडिलांचा अभिनय आवडला. राधिका शेवटी रेवतीच्या गळ्यात पडून रडते ते पण फार सहज वाटलं .
राधिका फार कॉन्फिडेन्ट वाटते आता.
पण परवा बँकेत केवायसी देतात तशी ऑफिसम्ध्ये जाउन प्रपोजल देते .
शिन्दे आणि ती बोलत असताना , मागचा माणूस ढिम्म्म हलत नाही की काय चालालं आहे ते ऐकत नाही.
संजना ला कोणी "प्लान्ट" केलेले नाही . ती ही शन्या सारखी संधीसाधू आहे पण तीच्यापेक्शा फार स्मार्ट आहे.
गुरुने लाच देउन काम करणं आणि नेमकं त्याचवेळी राधिकाने सचोटीने कॉन्ट्रॅक्ट मिळवणं हे फारच फिल्मी झालं .

"बीवी नंबर वन" सिनेमा कोणी बघितला आहे का ? स्टोरी सेम तू सेम बीवी नंबर वन ( सलमान खान , करिष्मा कपूर, सुश्मिता सेन आणि अनिल कपूर सगळ्यात शेवटी सुश्मिता ( शानया ) चा मित्र म्हणून सैफ अली खान ) सारखी. सिनेमातले प्रसंग पण जसे च्या तसे उचलले आहेत. . पण मग पट्कथालेखकाच कस काय क्रेडिट ? सगळे प्रसंग पण सेम तू सेम Happy

आणि कित्ती सोप्पं सगळं? Uhoh झटपट जवळकरांचा नंबर मिळतो राधिकाला, आणि ते एका फोन कॉल मध्ये तिच्यावर विश्वास ठेवतात पण? Uhoh या आधी शिंदेने पास केलेली टेन्डर्स पैसे घेऊनच आत घेतली आहेत याची साधी कुणकुण पण जवळकरांना नसेल तर तितक्या मोठ्या पदावर काम करायची त्या माणसाची पात्रता असू शकते? Uhoh

आणि हा गुरू च्यायला एम डी आहे कंपनीचा की शिपाई? Uhoh राधिकाला मी खूप मोठा होऊन दाखविन हे वाक्य सतत गेल्या दोन तीन एपिसोडात बोलला, अरे तिला तु मोठा माणूस नव्हे एक चांगला/बरा नवरा म्हणून हवा आहेस हे त्याला कळत नाही? Uhoh शिवाय हापिस आहे का चावडी ते पण कळत नाही, एका एम डी च्या लफड्या विषयी सगळे लोक उघड कसं काय बोलतात? Uhoh शिवाय गुरू त्या संजना समोर नांग्या कसा काय टाकतो? आणि एका मॅनेजमेन्ट ट्रेनीला एम डी पर्यंत अ‍ॅक्सेस असतो? Uhoh ऐते न च बाबा.
आमच्या हापिसात तर व्हिपी लोकांना (सिरियल मधल्या आनंद ची पोस्ट) भेटायला सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजर्स च्या वरचे रादर फक्त प्रॅक्टिस हेड्स च येतात. आणि एम डी ने स्वतःच्या पदरचे पैसे घालून ट्रेनीला मोबाईल घेऊन द्यावा? Uhoh हापिस हाय का बाल्वाडी? हॅट्ट! Angry

आणि हा गुरू च्यायला एम डी आहे कंपनीचा की शिपाई? Uhoh राधिकाला मी खूप मोठा होऊन दाखविन हे वाक्य सतत गेल्या दोन तीन एपिसोडात बोलला, अरे तिला तु मोठा माणूस नव्हे एक चांगला/बरा नवरा म्हणून हवा आहेस हे त्याला कळत नाही? Uhoh शिवाय हापिस आहे का चावडी ते पण कळत नाही, एका एम डी च्या लफड्या विषयी सगळे लोक उघड कसं काय बोलतात? Uhoh शिवाय गुरू त्या संजना समोर नांग्या कसा काय टाकतो? आणि एका मॅनेजमेन्ट ट्रेनीला एम डी पर्यंत अ‍ॅक्सेस असतो? Uhoh ऐते न च बाबा. >>>
एवढ्या मोठ्या कंपनीत लोक किती असतात... ?
गुरु , जेनी , आनंद , श्रेयस , संजना , समिधा , पानवल्कर , कदम , तो एक मिशीवाला आनि त्याच्या बरोबरची बाई ( श्न्याचे चमचे) आणि रघू .

आणि सगळे फक्त गुरू आणि शनाया बद्दल बोलत असतात. एम्डी ला किती पावर असते हे या लोकांना माहित नाहि काय? Uhoh परस्पर शनायाला फोन करवत्तात त्या रघु करवी. आणि हे काम करून कोण घेतो? तर आनंद सारखा व्हिपी? Uhoh बाकी सगळी कामं संपली? Uhoh

अरे देवा! अजून चालू आहे का हे? >> चिन्नू देवा. अजून सुरू आहे का हे म्हणजे काय? जोमात अगदी.
सग्ळ्यात जास्त टि आर पी आहे या सिरियल चा Uhoh

:uhoh:

सग्ळ्यात जास्त टि आर पी आहे या सिरियल चा >>>> आमच्याकडे आवर्जुन बघते मम्मी.

मी कधीतरी त्यावेळी जेवत असेन तर दिसते.

कालचा तो शान्या अन संजनाचा मारामारीचा सिन पाहीला, अन डोक्यात तिडीक गेली, अन बघते तर बाकीचे तो सिन ईतका एन्जॉय करत होते की हसुन वाट लागली होती त्यांची.

असो, आवड आपली आपली.

पण मला खरचं खुप राग आला त्या सिनचा, नक्की काय दाखवायचे होते यांन्ना, असे कुठे होते का, अन त्या दोघी ईतक्या भांडेस्तोर सेक्युरीटी होते कुठे अगदी शेवटला आले ते

अन राधीका त्या माणसाला पकडुन देते तो सिन पण हास्यास्पद होता. असे काहिही दाखवण्यापुर्वी हे लेखक - दिग्दर्शक आपले डोके अगदी बाजुला काढुन ठेवतात की प्रेक्षक म्हणजे मुर्खातला मुर्ख प्राणी असे यांना वाटते.
हा सिन टीव्हीवर चालु असताना मी मम्माकडे रागाने पाहिले तर ती बोल्ली, कुठे येवढे सीरीयसली बघते मी, थोडासा विरंगुळा ईथे फक्त बघायचे अन सोडुन द्यायचे, बास.

मग काय बोल्णार यावर

पण खुप चिड येतेयं झी वाल्यांची काहिही म्हणजे अगदी काहिही दाखवतायेत.

बिचर्या कितीतरी बायका कळत न कळत अनुकरण करत असतील देव जाणे.

व्हि बी संपुर्ण पोस्टला अनुमोदन.
मी रोज सकाळी कालचा एपिसोड ओझी वर पाहते. आज चा नेमका पाहू शकले नाहिये.
रात्री बस मध्ये पाहिन Proud

हास्यास्पद तर होताच....अपण मला समहाऊ आवडला तो सिक्वेंस.. म्हणजे....शनाया- संजना ने असं भांडणं..... शनाया अफकोर्स मच सुपिरीअर दिसते त्या संजना पेक्षा... अभिनय ही मस्त करत्येय. गुरु ची पार वाट लागली ते बघून हसायला येत होतं. बाकी ऑफीस मधले डायलॉग्ज निव्वळ टाईमपास. गुरु , जेनी , आनंद , श्रेयस , संजना , समिधा , पानवलकर , कदम , तो एक मिशीवाला आणि रघू....यांना कुणालाच काही काम नसतं ..

संजनाच्या हातातून तो पॅक केलेला मोबाईल शनाया खेचून खाली फेकते तेव्हा पॅक बॉक्स मधून बाहेर काढून पार दगडाने ठेचल्यासारखा दिसत होता तो मोबाईल. यापेक्षा लहान मुलांचे 'छईय्या छईय्या' आणि 'धूम मचाले' वाले गुलाबी फ्लॅप वाले मोबाइल जास्त मजबूत असतात.

पियू.. हो ना...मी सुद्धा असा विचार केला की यांना प्रॉप्स मधे जुने तुटके मोबाईल्स लागत असतील..... तो मोबाईल अगदीच ठेचलेला, काच निखळून पडलेली दिसत होती...... Biggrin
आणि त्यांनी मोबाईल पसंत पण किती पटकन केला...अगदी अर्ध्या मिंटात......! असं कुणी करतं का? त्यावरच चांगले दहा मिंटं खर्च करता आले असते की!

कालच्या भंडणात दोघी गुरूला ठोकतील अस वाटल. पण नाही. शेवटी शनायाने काठी दोनचार वेळा उगारल्यासारख केल तेव्हा बरं वाटल जरा. काल रेवतीच्या घरी बोलताना राधिका उगाच साळसुदाचा आव आणत होती. इतकी सात्विक असेल तर मॉल मधे अगदी एन्जॉय करत होती की . आणि सगळे बरे त्या एकाच मॉल मधे जमले एकाच वेळी.

आज मी दोन एपिसोड पाहिले. मॉल मध्ये जाण्या अगोदरचा एपिसोड प्रचंड बोअर होता.
आधी गुरू आणि संजनाचा संवाद(?) मग हापिसातला जेनी, आनन्द आणि श्रेयस मधला, मग रेवती आणि राधिका.
मॉल मधला तमाशा तर हास्यास्पद होता. तिथे तर राधिका शनायाला चॅलेंज करून संजनाला मार म्हणून सांगत होती.
आणि नंतर संजना गुरू ला म्हणाली की राधिका किती काईंड हार्टेड आहे Lol

हसू का रडू तेच कळेना मला.

राधाक्काने आज संजनाची सहानुभूती मिळवून, गोड गोड बोलून तिला शनायाच्या विरोधात कामाला लावले.
बाकी सगळे करून 'आपल्याला काय करायचे!' असे ती नेहमी म्हणत असते.
हे दोघे नवरा बायको 'मी मोठा होणार', 'मी मोठी होणार' असे सारखे बोलत असतात. Uhoh कधी एकदाचे मोठे होणार असे झाले आहे. Happy

हे दोघे नवरा बायको 'मी मोठा होणार', 'मी मोठी होणार' असे सारखे बोलत असतात. Uhoh कधी एकदाचे मोठे होणार असे झाले आहे. >>>>सही! Biggrin

राधाक्काने आज संजनाची सहानुभूती मिळवून, गोड गोड बोलून तिला शनायाच्या विरोधात कामाला लावले.
बाकी सगळे करून 'आपल्याला काय करायचे!' असे ती नेहमी म्हणत असते. >>> संजनाशी बोलताना म्हणते , माझी कहाणी सगळ्याना सांगायला मला आवडत नाही . . बाई ग , सुरुवातीच्या काळात मसाल्याची काम मिळवतानाम, वस्तीतल्या बायकांची मदत गोळा करताना " माझा नवरा माझ्याकडे रहात नाही , मला ४ लाख रु . द्यायचेत "करून रडलेलीस की तेन्व्हा प्रत्येक ठिकाणी रडगाणं गायचीस की .
संजना म्हणते , गुरु सर खूप चांगले आहेत , तसे अजिबात नाहीत . शनायाच गुरु सरांच्या मागे लागली आहे.

संजना म्हणते , गुरु सर खूप चांगले आहेत , तसे अजिबात नाहीत . शनायाच गुरु सरांच्या मागे लागली आहे. >>> हो हे काल मी बघितलं. टोटली कपाळाला हात लावला, मी का आज बघतेय असं. खरं तर तो पूर्ण सीन आवडला नाही. चालुदे trp मिळतोय ना अशा सर्व कथानकासाठी त्यामुळे ते हवेत आहेत, काहीही दाखवायला मोकळे Sad .

आणि मला एक कळत नाही. राधिका संजनाला भेटून नक्की सिद्ध आणि काय साध्य करू पाहतेय? Uhoh
तिला गुरूशी काही देणं घेणं नाहिये ना? मग संजना बरोबर टाईमपास करत बसायची काय गरज होती? आणि संजना पण हापिसच्या वेळी तिच्यासोबत हॉटेलात गप्पा कश्या काय मारत बसली? वेळ बिळ नसते काय हापिस्ला?

इतरही अनेक गोष्टी अत्यंत अतार्किक आहेत या सिरियल मध्ये.
एम डी असून गुरू कुणालाच कसं काय खडे बोल सुनवत नाही? शनाया जाऊ दे पण कुणालाच. एम डी म्हणलं की कसं एक पर्स्नॅलिटी येते डोळ्यासमोर, हा कंप्लिट बुळचट वाटतो त्या पदासाठी. Sad
आणि मॅनेजमेंट ट्रेनी ला मोबाईल घेऊन द्यावा जरी वाटला कुठल्या एम डी ला, तर गुपचुप पैसे देइल, किंवा खर्च कर आणि कंपनीला लाव असं म्हणेल ना? कुठली स्वारी खुद्द स्वतःच्या गाडीतून वरात काढेल मॉलपर्यंत? Uhoh
काहीही म्हणजे काहिही..

आणि संजना पण हापिसच्या वेळी तिच्यासोबत हॉटेलात गप्पा कश्या काय मारत बसली? वेळ बिळ नसते काय हापिस्ला? >>> ती हापिसच्या बाहेर होती . आनंद आणि मंडळी , हापिसमध्ये वेळ काढतात .
रच्याकने , जेनी रिसेप्शनीस्ट आहे . तिचा डेस्क दरवाज्यापासून ईतका लांब आहे . ऑफिसचा कॅफेटेरिया मुख्य हॉल मध्येच आहे .
यांच्याकडे , स्वाईप कार्ड वगैरे काही पद्धत नाही . अजून मस्टर साईन करतात . अजून कागदी फाईल्स घेउन फिरतात .
महत्वाच्या मीटीन्गसाठी रिसेप्शनीस्ट ला बोलावतात . बरच काही अतर्किक आहे .

आणि गुरू एम डी वगैरे असून त्याचे केबिन एकदम क्लिन आहे.
पर्फॉर्मन्स चार्ट्स, व्हाईट बोर्ड वगैरे काही नाही. नुसता लॅपटॉप बडवत बसतो. ऑल द टाईम. Proud

अरे काय हे, प्रेक्षक म्हणजे अगदीच मूर्ख वाटतात का यांना.

तो गुरु, घराचे हफ्ते चुकवतो ते पण 3 तरीहि यांना नोटीस येत नाही

अन तो md आहे न, मग सिबिल स्कोर नावाचा एक प्रकार असतो हे माहित नाही का यांना??

काहीही म्हणजे अगदी काहीही दाखवताहेत, डोकं बाजूला ठेवून

शनाया का राधिकाच्या घरात राहते आणि भाऊ-वहिनी पण. ती वहिनी सह्याद्रीच्या एका कार्यक्रमात निवेदक म्हणून असते.

Pages