माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी.. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या कमळाने गजरा काय दिला आणि राधिकाने पकवायची संधी सोडली नाही. शनाया यायच्या अगोदरची एकही आठवण नाही. राधिकाने गुरूला हिप्नोटाईझ करून लग्न केेलं होतं का. संजनाला राधिकानेच सोडलीये की काय गुरूच्या अंगावर.

संजनाला राधिकानेच सोडलीये की काय गुरूच्या अंगावर.>> राधिका किंवा राधिकाच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी. कपूरनी पण असू शकतं.

नवीन पात्रं आलय का मालिकेत? काल एका प्रोमोमधे शनाया साडीमधे आणि `तुमची बायको होउन राहिले' वगैरे काहीतरी बरळली. राधिका आणि शनायाचा आत्मा exchange झाला कि काय

Biggrin
शन्या ला स्वप्न पडलं असेल....किंवा गुरवाला.....गुरवालाच पडावं....म्हणजे समजेल की आगीतून निघून फुफाट्यात पडल्यावर कसं वाटतं ते!

संजनाला राधिकानेच सोडलीये की काय गुरूच्या अंगावर.>> राधिका किंवा राधिकाच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी. कपूरनी पण असू शकतं.>> हो कदाचित Lol

राधिका चा नवीन लूक आवडला कोणाला ? केस मोकळे सोडले असते तर उलट चांगली दिसली असती ,...का मसाले पापड वाली म्हणून अशी दाखविली आहे .. Uhoh

नक्किच संजना ला कोणीतरी पेरलं आहे, मला वाटतं प्रतिमा कुलकर्णी ने. >>> असेल कारण बाकी कोणाला अस काही सुचण शक्य नाही.

रच्याकाने, कालपासुन मालिका बघणे बंद केले Happy

मला वाटतं कपूर सरांनी. प्रतिमा कुलकर्णी उर्फ साठे मॅडम ( सिरीयल मधल्या ) यांना गुरुनाथ विषयी इतके माहीत नाहीये जितके कपूर सरांना आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनीच हे महान कार्य केले असावे.

मला संशेव तं गुरुच्या आई बापावर पण येऊ र्‍हायला. गुरुच्या बाबांना माहीत हाये ना के त्यांचे पोट्टं किती बिलंदर होऊ शकतं.Coffee machine

अंजू थॅन्क्स स्माईलींबद्दल.Bow Down Thank You

आपण एक दोघांना नाही दोष देऊ शकत, सर्व टीम channel सह दोषी असते फालतूपणाला कारण शेवटी channel च्या मंजुरीशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. चांगलं काही केलं तरी सर्वांचं कौतुक आणि दोष असेल तरी तो सर्वांचा.

अभिनय मात्र कलाकाराचा स्वतःचा असतो आणि डायरेक्टर कसं करून घेतात त्याचं पण श्रेय त्यांना पण मुळात कलाकार चांगले अभिनय करणारे असतील तर डायरेक्टरमुळे अजून बहारदारपणा येतो.

पण संजना ची डायलॉग डिलिव्हरी अगदीच बेकार आहे.
आणि हा आनंद व्हिपी आहे ना? Uhoh तो जेनी शी गुरूच्या पर्सनल लाईफ बद्दल गप्पा मारून समिधा मार्फत शनायाला इन्सिक्युर करायचा प्रयत्न करतोय. बाकी काही कामं नाहित का आयुष्यात? Uhoh
आणि जिथे जाईल तिथे, ज्याला त्याला या राधिकाची कथा माहिती असलीच पाहिजे का? शाळा झाली आता पोतदार सुद्धा.

काल वरचे w a मेसेज फिरत होते पण समहाऊ जोक म्हणून घ्यायचं म्हटलं तरी गुरूच्या अनैतिक आणि खालच्या दर्ज्याच्या वागण्याचं त्यातून समर्थन होतं असं माझं पर्सनल मत. मी आमच्या एका grp वर तसं लिहिलं.

अन्जु अगदी अगदी! मलाहि काल असच वाटल , या फोटोत अनिता दाते छान दिसतेय, मला तर तिचा साडितला लुकही आवडतो पण साड्या-ब्लाउज अगदिच काहितरी असतात तिचे , लाब केस अग्दी चप्प वेणित बसवले पाहिजे अस काही नाही, त्यालाही छान स्टाइल करता येतात.

येस्स...समिधा खूप गोड आहे. रेवती पण. हीच काकू बाई दिसते. आणि नानीजी व महाजनी काकूं ना पँट म्हणजे लई च झालं हं!

मी काय म्हणते हा राव आता एम डी झाला ना मग ह्याला साउथ बाँबेत फ्लॅट काउन नाई मिळून राइला? ! तिथे शनाया सकट बस्तान हलवले असते मीतर प्रमोशन मिळाल्या मिळाल्या. कंपनी हाउसिंग हा एक पर्क असतो. व एक स्वैपाकी एक डायवर हे तरी कमीत कमी. काय ही कंपनी चिल्लर माल विकते का?

कंपनीत आनंद व्हीपी आहे, श्रेयस सीनियर मॅनेजर आहे आणि पानवलकर असंच काहीतरी. काही लोकांची कमाई दहा हजार असते पण ते सीईओ, एमडी, व्हीपी आणि कायकाय स्वत:ला म्हणवून घेतात कारण कंपनी त्यांचीच असते, त्यातली गत आहे ही. श्रेयसला स्वत:ची केबीन नाही, आनंद दिवसभर चकाट्या पिटत असतो, कपूरने शनायाला आधी काढून टाकलं होतं कारण तिला उकडीचे मोदक करता येत नाहीत. संजनाला बघून सगळे लाळ गाळतात, तिथे राधिकाला गुरूची बाॅस बनायला पूरेपुर वाव आहे कारण ती स्वयंपाक चांगला करते Happy

श्रेयसला स्वत:ची केबीन नाही, आनंद दिवसभर चकाट्या पिटत असतो, कपूरने शनायाला आधी काढून टाकलं होतं कारण तिला उकडीचे मोदक करता येत नाहीत. संजनाला बघून सगळे लाळ गाळतात, तिथे राधिकाला गुरूची बाॅस बनायला पूरेपुर वाव आहे कारण ती स्वयंपाक चांगला करते>> Lol

Pages