माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी.. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता तिसरी देखील आली.. संजना! >>> माझ्या नवर्याची तिसरी बायको. एकता कपूरला सुद्दा मागे टाकेल हि सिरियल. Proud

हो संजना फारच टकाटक आहे. स्नेहसंमेलनाचं शूटिंग गडकरी रंगायतचं होतं. एपीमध्ये नाव दिसलंं वर लिहिलेेलंं. शेवटी एकदाचं गुरूनाथचं नसणं राधिकाने स्वीकारलं.

वोके तरी पण माझ्या प्रश्नाचे उत्तर कुणी दिलेच नाही. ही संजना कोण ? हिचा भैताड गुरुशी काय संबंध? ही त्या एपिसोड मध्ये कोण म्हणून आली होती? मग तिला पाहुन कोणाची काय प्रतीक्रिया होती?

रश्मी....ही संजना गुरुच्या हाफीसात ट्रेनी म्हणून आलीये. सगले तिला पाहून अगदि अवा ss क झालेले. ती सुद्धा प्रत्येकाशी अगदि सहज हस्तांदोलन करताना दाखविलीये. जरा स्मार्ट, शनाया सारखीच अल्प वस्त्रांकिता वगैरे आहे! म्हणजे.........गुरवाचं तर नावच आहे, पण आनंद , मनिष (होसुमीयाघ मधला) इव्हन रघ्या.......... डोळे फाडफाडून तिच्या कडे बघताना दाखविलेत....कसली ही मेंटॅलिटी म्हणावी?

असे आहे होय. थॅन्क्स आंगो.:स्मित:

बहुतेक गुरुबाळ शन्याला सोडुन हिच्या मागे लागेल असे वाटल्याने सगळ्यांनी डोळे फाडले असतील.Office chair

पण हे लोकही अशी पाणचट गिरी करु शकतात?

@ दक्षिणा नवीन trainee join झाली आहे .
आंबट गोड म्हणाली तसं स्मार्ट ,शनाया सारखीच अल्प वस्त्रांकिता वगैरे आहे Wink
आणि ती आल्यावर लोकांचे पुतळे झाले! आनंद , तो दुसरा इव्हन रघु आणि अर्थात गुरवाचा ..डोळे फाडून आणि तोंडाचा आ वासून ..जरा कमी लाळ गळायचीच बाकी ठेवली ... शी!!.. रागाने डोळे फिरवणारी बाहुली

आनंद आणी श्रेयस लग्नाळु आहेत, पण गुरुचे काय? पुढे पुढे म्हणजे सिरीयल वाढल्यावर ( आता ही टकाट्क आली म्हणजे वाढणारच की) गुरुला शन्या मठ्ठ असल्याचा आणी गुड फॉर नथिंग असल्याचा साक्षात्कार होईल. तसेही शन्याबेबीOffice basketball
शॉपिंग करणे, खाणे-पिणे या शिवाय काहीच हितोपयोगी करत नाही हे पण त्याला कळेल.

ह्याच नियमाप्रमाणे त्याला राधाक्काही मठ्ठ असल्याचा आणी गुड फॉर नथिंग असल्याचा साक्षात्कार झाला असेल आणि शन्या आवडली असेल.
मग आता दुसरी टकाटक आल्यावर श्न्या चा नंबर Lol
दळारे दळारे दळारे दळा
हो दळा ओ दळा अहो दळा हो दळा

ती संजना मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आली तेंव्हा कोणालाच माहीत नव्हतं की आपल्या हाफिसात एक कोणीतरी ट्रेनी जॉईन होणार आहे?? जेनीला पण अपेक्षित नसावं? का संजनाने स्वतःच ठरवलं की आज ह्या कंपनीत जाऊ ट्रेनी म्हणून.

या भैताड मालिकेला नेमका प्राईम टाइम मिळालाय दाखवायला . निर्मात्याच नशीब थोर . आठ हि अशी वेळ आहे कि सिनियर लोक्स जेवणाच्या निमित्ताने / काही लोक्स ऑफिस मधून घरी आल्या आल्या जरा टाईम पास म्हणून हि सीरियला बघत असावेत म्हणून टीआरपी जास्त नाहीतर अतिशय इतकया टुकार मालिकेला इतका टीआरपी ? दाखवण्याची वेळ पण इतकी जबरी अलॉट झालेय निर्मात्याला कि त्याची चांदीच चांदी Happy
भारतीच्या लग्नाचं काय मधेच? >> होना . चुकून असणार नक्कीचं Happy

स्नेहसंमेलनात खूपच फालतुगिरी दाखविली. ज्या मुलाच्या घरात गेले १-२ वर्ष वाद-भांडणे चालू आहेत, त्या मुलाला My Family बद्दल बोलायला सांगणे किती दुष्टपणाचे आहे!!
मुळात एका मुलाने आपल्या कुटुंबाची माहिती सांगणे असा कार्यक्रम असतो का?

मला वाटत पलकने चुकून त्या भारतीच्या लग्नाची लिन्क दिली असणार. खरतर तिला खालची लिन्क दयायची असेल.

https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...

आता सवत माझी लाडकी सुरु होणारे सिरियलमध्ये. अस जर होणार असेल तर मग हया संजनाला कशाला आणलय? Uhoh

मुळात एका मुलाने आपल्या कुटुंबाची माहिती सांगणे असा कार्यक्रम असतो का? >>> My Family बद्दल निबन्ध लिहायला सान्गतात, पण आपल्या कुटुंबाची माहिती सांगणे हा कार्यक्रम पहिल्यान्दाच ऐकते बुवा. Proud

उद्याच्या भागात , गुरुची दाढी पुसत होती ती आणि समीधाने बघितलं .
कैच्या कै चालू आहे .
नविन प्रोमोमध्ये शन्या , राधिकासारखी बोलतेयं , फक्त डिझायनर साडी नेसून

दक्षु, ती माधवी निमकर होती, बाजूची हॉटेलवाली. पण तिला हम तो तेरे आशिक है ही प्रसाद ओकची रात्री १० ची सिरीयल मिळाली मेन रोलमध्ये. मग ती कशाला दुय्यम रोल घेईल इथला.

राधिकाच्या मसाला उद्योगातल्या बायका अजुन दिसतात का ह्या सिरियलमध्ये? त्यातल्या एका बाईला दुसर्या वाहिनीवरच्या सिरियलमध्ये पाहिले.
बहुतेक त्यांचा या भैताड सिरियलमधला रोल संपला असावा.

त्यातल्या एका बाईला दुसर्या वाहिनीवरच्या सिरियलमध्ये पाहिले.>>>>. ती बाई जागो मोहन प्यारे मध्ये पाहिली का? मलाही तसेच वाटतयं. वर्‍हाडी भाषेचा ठसका ऐकायचा तो भारत गणेशपूरे कडुनच.

ती बाई जागो मोहन प्यारे मध्ये पाहिली का
>> हा बहुतेक. त्या मोहनच्या फॅक्टरीत पाहिली आहे असे वाटतेय.
बिचारी. कधी राधिकाच्या तर कधी मोहनच्या फॅक्टरीत काम करत असते Biggrin

Pages