नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफाईलवरचा फोटो बदलायचा खुप प्रयत्न केला पण काही जमत नाहिये. जुना फोटो डिलीट होतो.. पण दुसरा फोटो अपलोड करायला जावं तर परत जुनाच फोटो दिसतो.. ही माहीत असलेली त्रुटी आहे का?

काही फलकांवरच्या संदेशांची संख्या वाढुन २ पाने तयार झाली आहेत (उदा. पुस्तक पारायण). यात दुसर्‍या पानावर गेल्यावर नवीन संदेश निर्देशक (नवीन) दिसत नाहीत. याबद्दल काही करता येऊ शकेल का?

मॅकसाठी काहीतरी करा राव! संन्यास घ्यायची वेळ आलीय Sad परवा त्या पाटवड्या लिहिताना इतका वैताग आला की बास. ती जुन्या मायबोलीची देवनागरी खिडकी कुथेतरी ठेवा आमच्यासारख्यांसाठी नाहीतरी एक पोस्ट लिहाअची तर १ तास लागेल कमीतकमी!
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

New Messages च्या page वर "अमुक नवीन" अशी जी link दिसते त्याबरोबर "Last Updated By" असे काहिसे दिसू शकेल का ? म्हणजे जुन्या हितगुजवर जसे Last Day Search चा Node Expand केला User चे नाव नि Post चा थोडासा भाग दिसत असे तसे काहिसे.

म्हणजे एखाद्या link वर बरेच नवे messages दिसत असले तरी जर ते उल्लेखनिय वाटत नसतील तर तिथली click skip करता येईल.

मॅकसाठी काहीतरी करा राव! >>> अनुमोदन. मायबोली बघन्यासाठी आजकाला आयफोनचा वापर होतोय आणि तिकडे विचीत्र टेक्स्ट दिसत.

मॅकवर चाचणी केली आहे. सफारी ३.१.२ (५५२५.२०.१) वर देवनागरी अगदी व्यवस्थीत दिसते आणि लिहिता येते. आताच वेगवेगळ्या मॅक वर चाचणी करून आलो.
आयफोनचा न्याहाळक हा इतर मॅकवरच्या न्याहाळकापेक्षा थोडा वेगळा आहे. त्यात अजून कुठल्याच देवनागरी युनीकोड वेबसाईट दिसत नसाव्यात. तुम्हाला BBC ची हिंदी भाषेतली वेबसाईट दिसते का?

साईट चांगली दिसते पण सर्वच शब्द व्यवस्थीत दिसत नाहीत जस आजच्या हेडलाइन मध्ये मायावती, वामदलों के साथ आए देवेगौड़ा और अजित हे मायावती, वामदलों के साथ आए देवेगौड़ा और अजति असे दिसते. सफ्ताह हे सपताह असे दिसते. मायबोलीही बर्याच अंशी निट दिसते पण व्यवस्थीत दिसत नाही.
पण त्या साठी तुम्ही खुप प्रयत्न केले नाही तरी चालतील कारण आयफोन वरुन बघनारे फार तर दोन चार व्यक्ती असतील. Happy

ऍडमिन,
मला सफारीवर मायबोली आणि बीबीसी छान दिसतेय पण मायबोलीवर टाईप करतांना फार त्रास होतोय. चुकुन जरी डीलीट बटन वापरावे लागले की सगळ्या अक्षरांची सरमिसळ होत जाते आपोआप आणि परत सगळे टाईप करायला घ्यावे लागते पहिले डीलीट करुन. Sad
तसेच ctrl + / button भाषा बदलण्यासाठी चालत नाही दरवेळी मला ते manually बदलावे लागते त्या विंडो वर क्लिक करुन.

ऍडमिन,
या गोष्टी सुधारून मिळतील का?

  1. १. विसर्ग द्यायला आधी H लिहिले की चालायचे. सध्या H टाइप केल्यावर | ('दंड') हे अक्षर उमटते. आधीप्रमाणे करता येईल का?
  2. २. पोस्ट उडवायची काही सोय करता येईल का?
  3. ३. शुद्धलेखनचिकित्सक? Proud

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

deemdu, manjud, naatyaa
वाहून न जाणार्‍या पानावर, दुसर्‍या पानावर जर नवीन प्रति़क्रिया आल्या तर तिथली लिंक पहिल्या पानावरच जात होती. आता ही तृटी दूर केली आहे. आणि ज्या पानावर तुम्ही न पाहिलेली प्रतिक्रिया असेल तिथे आता ती लिंक घेऊन जाईल. हा प्रश्न सोडवायला थोडा अवघड होता. सगळेच मायबोलीकर एकाच वेळेस मायबोलीवर येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मायबोलीकरासाठी ही लिंक (आणि कुठल्या पानावर जायचं ते) वेगळी असू शकेल.

उदा. एखाद्या लेखावर १०४ प्रतिक्रिया आहेत. आणि एका पानावर ५० प्रतिक्रिया मावतात असे समजू.
त्यातल्या deemdu साठी १०२ नवीन आहेत. deemdu यांनी टिचकी मारल्यावर त्यांना पहिलेच पान दिसेल (तिसर्‍या प्रतिक्रियेपासून)
त्यातल्या manjud साठी ४० नवीन आहेत. manjud यांनी टिचकी मारल्यावर त्यांना दुसरे पान दिसेल.( ६५ व्या प्रतिक्रियेपासून)
त्यातल्या naatyaa साठी २ नवीन आहेत. naatyaa यांनी टिचकी मारल्यावर त्यांना तिसरे पान दिसेल. (१०३ व्या प्रतिक्रियेपासून)

आता काही मायबोलीकर असे आहेत की ज्याना इतरांनी काही लिहिलेलं अजिबात न वाचता (किंवा आपण पुनरोक्ती करतो आहोत का नाही याची काळजी न करता) फक्त शेवटी काहीतरी लिहायचं आहे, त्यांच्यासाठी उत्तर नाही. आपलं कुणीतरी वाचावं असं ज्याना वाटतं, त्यानी थोडं इतरांचंही वाचण्याचे कष्ट घ्यायला हरकत नसावी. Happy

dineshvs,
>Admin अनंताक्षरी वर गाणी लिहिताना मधे कडव्यातली मोकळी जागा सोडली तरी शेवटी ती गायब होते. असे का होते ?

हि तृटी पण दूर केली आहे. तुम्हाला अजूनही ती मोकळी जागा दिसत नसेल तर Browser चे पान ताजेतवाने करून पहा.

ऍडमिन, धन्यवाद. एक किचकट प्रश्न सोडवलात आता दुसरा प्रश्न.... Happy

विचारपुशीतले आता नको असलेले जुने संदेश निवडून एकाच वेळी डिलीट करायची सुविधा करता येईल का? एकेक संदेश डिलीट करायचा तर त्यात खुप वेळ जातो.

मी आज आहारशास्त्र आणि पाकक्रुती या ग्रुप ची सभासद झाले. त्यामुळे अचानक बर्याच नवीन नवीन पाकक्रुती दिसल्या. "नवीन धागा हा फक्त ग्रुपच्या सभासदांनाचं दीसावा का सर्वांना दिसावा" या option मुळे असे झालेले असावे. मला हे option चुकीचं वाटत आहे. कारण मी जरी या ग्रुपची सभासद नव्हते तरी मी नेहमी इथे काही नवीन आले आहे का हे बघत असे. पण मला कधीचं काही दिसले नाही. माझ्या मते सर्व पाकक्रुती या सर्व मायबोलिकरांना दिसाव्यात. बघा पटतंय का?

सुप्रिया१९, तुम्ही या पानाच्या (किंवा इतर कुठल्याही पानाच्या) सर्वात वर असलेल्या "नवीन लेखन" या दुव्यावरुन पुढे गेलात, तर तुम्हाला तुम्ही सभासदत्व न घेतलेल्याही गृप्समधील नवीन लेखनाची माहिती दिसेल.

या उलट, तुम्ही "अजून वाचायचंय" हा दुवा वापरलात, तर तुम्हाला केवळ ज्या गृप्सच्या तुम्ही सभासद आहात, त्याच गृप्समधील नवीन लेखनाची माहिती दिसेल.

ऍडमिनसाहेब, किमान आजच्या दिवसाच्या नवीन ताज्या पोस्ट्स एकसमयावच्छेदेकरून एका स्क्रीनवर पहाता येतील का? अहो, नवीन पोस्त्स शोधण्यासाठी दारोदार कटोरा घेऊन प्रत्येक लिंकवर जावे लागतेय Sad

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा,
नविन लेखन म्हणुन जी लिंक आहे वर मध्यभागी तिचा उपयोग नक्कीच होईल तुम्हाला सगळ्या विभागातल्या सगळ्या ताज्या पोस्ट्स बघण्यासाठी.

उदा. एखाद्या लेखावर १०४ प्रतिक्रिया आहेत. आणि एका पानावर ५० प्रतिक्रिया मावतात असे समजू.
त्यातल्या deemdu साठी १०२ नवीन आहेत. deemdu यांनी टिचकी मारल्यावर त्यांना पहिलेच पान दिसेल (तिसर्‍या प्रतिक्रियेपासून)>>>>>>>>>>>>
असं होत नाहीये जरा check करणार का please.
 
 
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

Deemdu, जरा पुन्हा एकदा तपासून बघणार का? ही सोय व्यवस्थित काम करते आहे. तुम्हाला कोणत्या गृपवर हे होत नाही असे जाणवले? तुम्हाला कोणत्या पानावर जाणे अपेक्षित होते आणि तुम्ही कोणत्या पानावर गेलात?

स्वारी स्वारी
माय मिस्टीक
म्या नावावरच क्लिक करत हुतु, नविन च्या आकड्यावर न्हाई.
आपणास दिलेल्या तसदी बद्दल क्षमस्व.
 
 
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

ऍडमिन,
या पानाचे नाव 'मध्य पूर्व आशिया' ठेवणे अयोग्य आहे. या भागाला 'पश्चिम आशिया' म्हणतात. आणि 'मध्य पूर्व आशिया (Middle East Asia)' अशी शब्दयोजना वापरात नसून 'मध्यपूर्व (Middle East)' अशी शब्दयोजना प्रचारात आहे. युरोपीय लोकांनी युरोपाला केंद्र मानून चीन-जपानादी देशांना 'अतिपूर्व (Far East)', पश्चिम आशियातील अरब-इराणी भूभागाला 'मध्यपूर्व (Middle East)' आणि तुर्कस्तान-सायप्रसादी भागाला 'उपपूर्व (Near East)' असे शब्द योजले. तेव्हा 'मध्यपूर्व' हा शब्द युरोपसापेक्ष आहे; आशियासापेक्ष नाही. तेव्हा या पानाचे नाव 'पश्चिम आशिया' किंवा 'मध्यपूर्व' असे ठेवावे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

1 2 next › शेवट »
हे जे लेखनाच्या अगदी खाली आहे, ते वर सुद्धा करता आले, तर मंजुडी यांचे व माझे हि समाधान होईल.

ऍडमीन,
वाहून न जाणार्‍या पानांवरचे नविन प्रतिसाद आता व्यवस्थित उघडत आहेत. एकच अडचण आहे की तिथेच आपण काही नविन प्रतिसाद दिल्यावर ताजे/शेवटचे पान उघडायला हवे तिथे पहिले पान उघडत आहे.
म्हणजे समजा त्या बा.फ. वरचा ६४ संदेश आहेत. माझा ६५ वा प्रतिसाद दिल्यावर तो जातो २ नं. च्या पानावर पण स्क्रिनवर मात्र १ नं. चं पान उघडतं.
उदा. हा बा. फ.

फने वर मांडलेला मुद्दाच पुन्हा.
शुद्धलेखनाचं काही करता येईल का? अगदी मायबोलीच्या पहिल्या पानावरही अशुद्धलेखन पाहून बरं वाटत नाही.
संलग्न मुद्दा देवनागरीचा. ज्योतिष्य, इत्यादी बा फ रोमन संदेशांनी भरून वाहत असतात. तेही चुकीचे वाटते.

मायबोलीवर जे साहित्य टाकले जाते ते प्रिंट करायचे करायचे असेल तर मुद्रणसुलभ बघण्याची सुविधा नाही ( मदतपुस्तिका सोडली तर) ही सुविधा देता येइल का?
तसेच ते प्रत्येक वेळी साहित्य पोस्ट करणार्‍याच्या निर्णयावर अवलंबुन हवे. जसे लिखाण सबमिट करतांना तिथे एक टिकबॉक्स देता येईल की हे साहित्य वाचकांना मुद्रणसुलभ दिसावे की नाही. जर तिथे हो उत्तर असेल तरच ते मुद्रणसुलभ दिसावे.

तुमच्या सगळ्यांच्या सूचनांबद्दल धन्यवाद. सगळ्याच विचाराधीन आहेत. काही अंमलात आणायला सोप्या तर काही अवघड आहेत. जसजसे जमेल, साधने असतील तसे प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतो आहोत.

फक्त शेवटी काहीतरी लिहायचं आहे, त्यांच्यासाठी उत्तर नाही. आपलं कुणीतरी वाचावं असं ज्याना वाटतं, त्यानी थोडं इतरांचंही वाचण्याचे कष्ट घ्यायला हरकत नसावी.

इतरांचे (असह्य) लिखाण वाचायचे कष्ट घेतोच हो आम्ही. Happy
पण आम्ही पोस्ट केल्यानन्तर ते कसे उमटले आहे याची खात्री करण्यासाठी ते पोस्ट पुन्हा पहावे लागते ना.!
त्यासाठी ते पोस्ट पहायला जाताना ती २-३-४ पाने ओलांडूनच जावे लागते ना!! त्या ऐवजी पोस्टिंग केल्याबरोबर लगेच त्या पानावर दिसावे अशी अपेक्षा !!!
ज्योतिष्य, इत्यादी बा फ रोमन संदेशांनी भरून वाहत असतात. तेही चुकीचे वाटते.

माते, आपण आपले डोळे बन्द करून घ्यावेत हे उत्तम. तिकडे अमराठी लोकांच्या बी बी वर जावेच कशाला मी म्हनतो?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

शुद्धलेखनाच्या सूचनेबद्दल श्रद्धास अनुमोदन. मुखपृष्ठावर 'ईतिहास' शब्द बरा दिसत नाही. असो. माझ्या थोड्या आणखी सूचना:

१. गृप्सचे हे जे पान आहे http://www.maayboli.com/og त्याची लिंक डावीकडे देता येईल का? किंवा तशी लिंक इतरत्र आधीच असेल तर सांगाल का?
२. जुन्या हितगुजवर जसे सर्व विषयांचे विभागवार विभाजन केले होते, तसे या गृप्सचे पण करता येईल का? वरील पानावर एखादा गृप शोधायचा झाला तर वेळ लागतो. त्यापेक्षा माझे शहर -> भारत -> महाराष्ट्र वगैरे असे विभाग केले तर traversing सोपे होईल.
३. सध्या पानाच्या उजव्या बाजूला "या नवीन सभासदांचे स्वागत" व गूगलच्या जाहिराती दिसतात. "स्वागत" विभागाचा मला काहीच उपयोग जाणवला नाही. शिवाय या मुळे पानाची उजवीकडची मोकळी जागा व्यापली जाते आणि पान खाली स्क्रोल केले की भरपूर "white space" डावीकडे आणी उजवीकडे राहून vertical scrolling वाढते! तर हा "स्वागत" चा रकाना काढून टाकून, गूगलच्या जाहिराती डावीकडे खाली हलवल्या तर?

चाफा, तू ज्या ग्रुप च्या पानाची लिन्क दिली आहेस त्यासारखीच 'हितगुज' ही लिन्क आहे डावीकडे आहे जी जास्त उपयोगी आहे. तू दिलेल्या लिन्कवर सगळे ग्रुप दिसतायत् पण एका मोठ्या लिस्ट मध्ये काही शोधायला अवघड जाते. त्यापेक्षा ते 'हितगुज' लिन्क वर सोपे आहे. तुझ्या दुसर्‍या मुद्द्याचे उत्तरही काहीसे तिथे मिळेल.

Pages