नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते नको आहे, attachment मधला हवा. फक्त अर्धचंद्र हवा; चंद्रावर डाग नको. शरद

अ वर चंद्र देता येत नाही सध्या. ऍ हे त्यातल्या त्यात जवळ जाणारे अक्षर वापरता येईल

कॅ = kE ,
तसे jE = जॅ ;
bE = बॅ ... हे होतेय.
पण
aE = अऍ ???
apple मधला ऍ (!) अर्धचंद्र नाही जमत आहे.

याचे कारण माझ्या माहितीतल्या कुठल्याही युनीकोड फाँटमधे ते अक्षर कसे दाखवायचे याची सुविधा नाही. अ+अर्धचंद्र केल्यावर दिसायला हवे असणारे अक्षर फाँटमधे नाही. अँ हे वेगळे अक्षर फाँटमधे आहे.

ही मायबोलीवरची अडचण नाही. मूळ फाँटची अडचण आहे. (आणि कदाचित युनिकोडची अडचण आहे)
अगदी पहिल्यांदा युनीकोड आले तेंव्हा मराठीतला पोटफोड्या र (र्‍ ) त्यात नव्हता नंतर तो आला. कदाचित तसे असावे.

हो माझी गल्लत झाली. चंद्रिकाविरहीतभालचंद्री 'अ' काढायचाय तुम्हाला. Happy

याचे कारण माझ्या माहितीतल्या कुठल्याही युनीकोड फाँटमधे ते अक्षर कसे दाखवायचे याची सुविधा नाही. अ+अर्धचंद्र केल्यावर दिसायला हवे असणारे अक्षर फाँटमधे नाही.<<<<

ऍडमिन, हे अक्षर युनिकोडमध्ये उपलब्ध करण्याकरता आपण काही करू शकतो का? युनिकोडकरता एखाद्या भाषेचा अक्षरसंच/चिन्हे कोण निश्चित करते?

अ‍ॅडमिन! आलं की नाही मला लिहिता? :p

काल वरचा संदेश लिहिल्यावर मनात विचार आला की, हल्ली बरीचशी वृत्तपत्रं युनिकोडमध्ये प्रसिद्ध होतात. तेव्हा काही वृत्तपत्रातले लेख/बातम्या चाळल्यावर ' अ‍ॅ' हे अक्षर असणारे शब्द सापडले. या संदेशात लिहिलेलं 'अ‍ॅ' हे तिथूनच इथं डकवलं आहे.

वॉव ! मला हे अजिबात माहिती नव्हतं. खूप खूप धन्यवाद. पाहतो कसे दुरुस्त करता येते ते. हे इथे दिसले म्हणजे फाँट आणि युनिकोड दोन्हीमधे ही सुविधा आहे. म्हणजे आपल्याला दाखवता आली पाहिजे.

ऍडमिन. येउ का जरा आत? मलाwww.rajashivaji.com ही साईट availableआहे हे सर्व मायबोलीकरांच्या निदर्शनास आणायचे आहे . असा एखादा सार्वजनिक चव्हाटा आहे का? कारण आताशा बरेच मायबोलीकर सर्व बीबी वर जात नाहीत्.अन त्यात पुन्हा गृपचे सदसत्वाचा लफडा आहेच.

रॉबिन ती साईट ऍव्हेलेबल नाहीये अजुन्.वेर्लणकर २-३ वर्षापासुन साईट 'लवकरच काही महिन्यात सुरु होणार आहे' असे सांगत आहेत.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

@robeenhood ,
वर लिहिल्याप्रमाणे एक तर ती वेबसाईट अजून तयार झाली नाही आणि दुसरे म्हणजे हा उपक्रम सेवाभावी संस्थेचा नाही. त्यानी केलेले पैशाचे आवाहन एका व्यापारी (Commercial या अर्थाने) संस्थेला मदत करा असे आहे. ते त्यानी एखादी रितसर सेवाभावी संस्था सुरु करून , Trust करून त्या नावाने करा असे केले असते तर लोकांनी नक्कीच मदत केली असती.

त्यानी आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे हे चांगलेच आहे. पण त्यात उल्लेख केलेल्या २०,००० पानांपैकी एकही पान अजून वेबसाईटवर का नाही? २५०० रेखाटनांपैकी एकही प्रकाशीत का नाही? १, ७५,००० छायाचित्रांपैकी एकही वेबसाईटवर का नाही? आजकाल तंत्रज्ञान इतके सोपे आहे की फोटो अपलोड करणे कुणालाही जमते. त्यामुळे तांत्रिक अडचण असेल असे वाटत नाही.

शिवाजी महाराज या विषयामुळे आपण सगळेच नक्की भारावून जातो पण थोडं खणून पहा कि खरोखर कुठपर्यंत काम झालं आहे.

यात कुठेही त्यांच्या कामाचा अवमान करण्याचा उद्देश नाही. पण जो पर्यंत ते काम लोकाना दिसत नाही तो पर्यंत एक सामान्य वाचक या न्यायाने हे विचारायचा नक्कीच आपल्याला हक्क आहे.

कानोकानी.कॉम हे मायबोलीचे नवीन संकेतस्थळ कुठल्याही संकेतस्थळाची किंवा त्यातल्या पानाची माहिती व्हावी म्हणून उभारले आहे. तिथे याची ते केंव्हाही नोंद करू शकतात.

ऍडमिन्,त्यांनी पुण्यात किल्ल्यांच्या फोटोंचे प्रदर्शन केले होते.पण ते इतके वर्ष पुढे पुढे का ढकलत आहेत कळत नाही.मी पण वेर्लणकरांना तुमच्याकडे जितकी माहीती आहे तितकी अपलोड करा आणि नंतर उपडेट्स करत रहा असे सुचवले पण त्यांनी काहीतरी घुळमुळीत उत्तर दिले.तोपर्यंत http://maratha.typepad.com/ ही साईट बघु शकता.चांगली माहीती आहे त्यात.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

मलाही त्यात फार माहिती नाही. महाराजांवर सर्वंकष माहिती देनारी साईट अद्याप नाही ही बाब लाजिरवाणी खरीच. त्यामुळे जे कोणी असे काम करीत असतील त्याची माहिती मायबोलीकराना असावी एवढच उद्देश होता. कुठे तरी लिंक दिसली म्हणून विचारले. चला त्या निमित्ताने ही ही माहिती मिळाली.
तरीही काही महत्वाची माहिती सर्व मायबोली कराना सांगायची असेल तर सार्वजनिक नोटीस बोर्ड आहे का? शाळेत अथवा कार्यालयात असतो तसा? Happy

हूडा,
वरच्या ऍडमीनच्या पोस्ट मधल्या शेवटच्या २ ओळी तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. Happy

जेव्हा एखाद्या पानावर खूप मोठा मजकूर असतो तेव्हा ते पान उघडायला वेळ घेते. हे मोठे लेखन भागाभागात टाकले तर त्यावरच्या प्रतिक्रिया एकत्र न राहता विखुरल्या जातात. तेव्हा असे लेखन पान एक, पान दोन अशाप्रकारे करता येईल, पण त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया एकाच ठिकाणी लिहिल्या जातील अशी (म्हणजे मुख्य लेखनाकरता पेजिनेशनची) सोय करता येईल का? Happy

अ‍ॅडमीन , अँट आता लिहिता येत आहे. त्यासाठी E ही कळ वापरू शकता. गजानन देसाई यांचे विशेष आभार.

अ‍ॅ लिहीतांना ऑ सारखे का दिसतेय, काना असल्यासारखी एक उभी रेष दिसतेय मला सफारीत, बाकी ब्राऊझरमध्ये पण असच दिसतय का?

नाही IE आणि FF मधे व्यवस्थित दिसते आहे.

runi
वर लिहिलेला गजानन देसाईंचा प्रतिसाद पहा(gajanandesai | 13 फेब्रुवारी, 2009 - 00:35 ) त्यात तुम्हाला अ‍ॅडमीन शब्द नीट दिसतो आहे का?

अ‍ॅडमिन मला तुम्ही किंवा जीडींनी लिहीलेले सारखच दिसतय त्याचा स्क्रीनशॉट देतेय Picture_1.png

रुनी, अग हो सफारीमधेच तु डकवले आहेस तसे दिसतेय. म्हणजे क्रोममधे पन हाच प्रॉब्लेम असणार ...

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

क्रोममधे Windows वर व्यवस्थित दिसते आहे.

अ‍ॅडमिन या क्षणी उपस्थित असलेले सदस्य कळु शकतात का ? (login केलेले)

अ‍ॅडमिन,
मायबोलीच्या मुख्यपॄष्ठावरील बित्तंबातमीची लिंक काढून टाकली आहे का?
-अनिता

लिंक पुन्हा पहिल्या पानावर दिली आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद

अ‍ॅडमिन,

आपण 'विचारपूस' मधे प्रतिसाद देताना, आधिच्या व्यक्तिने काय लिहिले आहे ते तिथे दिसत नाही...नविन खिडकी open होते...
ते बघण्यासाठी परत स्वताच्या 'विचारपूस' मधे जावे लागते...

अशी काही सोय करता येइल का, कि प्रतिसाद देताना त्याच खिडकी मधे control रहावा, म्हणजे विचारपूशी लिहिताना सोपे जाइल..

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

सध्या 'एखाद्या ग्रूप चे सदस्य व्हा' या प्रकाराने मला थोडी समस्या येते आहे. असे आहे की मला एखाद्या विशिष्ठ ग्रूपचे/धाग्याचे च सदस्यत्व पाहिजे आहे, जसे की बंगळूर चा बीबी, पण त्याकरता मला पूर्ण दक्षिण भारत बीबी चा सद्स्य व्हावे लागते. सहसा हे ठीक असते, पण जेव्हा याचे तोटे दिसायला लागतात, जसे की सारेगमप चा बीबी बघायचा असेल तर मला 'सुगना चा गौना' सारखे बीबी पण पहावे लागतात (कारण ते सर्वात ताज्या पोस्ट मध्ये आघाडीवर असतात), किंवा paarle chaa beebee vaachaayachaa asel tar ek kaTTaa naamak beebee paar karun jaave laagate kaaraN to bharun vaahat asato (maajhyaa veLet) kiMwaa maayaboleevarachyaa devenaagareekaraNaaviShayee vaachaayache asel tar 'maraaThee maaNoos kRutee kaa karat naahee' tatsam beebee samor disataat.

ekhaadyaa groop che sadasyatva ghetaanaa tyaavar adhik granularity add karataa yeNaar naahee kaa ? mhaNaje varachyaa udaaharaNaapramaaNe samajaa malaa paarle beebee chaa sadsya vhaayache aahe aaNi tyaakarataa mee muMbaee beebee chaa sadsya vhaayalaa gelo tar tethe malaa eka check box disel jyaat asaa option asel kee either sagaLyaa beebee (gappaaMche paan) che sadsya vhaa kiMwaa jevaDhyaa paahije tevaDhyaach... ashaane aapalyaalaa paahije asalele beebee / gappaaMche paan paahaNe tar sope hoeelach paN aajakaal malaa naveen fOrmET muLe apaDeTs kaLat naaheet hee takraar paN baRyaach aMshee kamee hoeel.

हेच पोस्ट खाली आहे, पण हे पोस्ट तसेच ठेवले आहे कारण मायबोलीचे स्क्रिप्ट अचानक चालत नाहीये माझ्या फायरफॉक्स मध्ये. मी सुरुवातीला ते स्क्रिप्ट लोड होईपर्यंत नक्की थांबलो होतो (ज्यामुळे मला थोडे देवनागरी लिहिता आले) पण मी मध्येच एक रेफरन्स घेऊन परत आलो (दुसर्‍या विंडो मध्ये) तोपर्यंत हे स्क्रिप्ट आपोआप चालायचे बंद झाले होते Sad
अ‍ॅडमिन, कृपया वेळ मिळेल तेव्हा पाहाल का ?

सध्या 'एखाद्या ग्रूप चे सदस्य व्हा' या प्रकाराने मला थोडी समस्या येते आहे. असे आहे की मला एखाद्या विशिष्ठ ग्रूपचे/धाग्याचे च सदस्यत्व पाहिजे आहे, जसे की बंगळूर चा बीबी, पण त्याकरता मला पूर्ण दक्षिण भारत बीबी चा सद्स्य व्हावे लागते. सहसा हे ठीक असते, पण जेव्हा याचे तोटे दिसायला लागतात, जसे की सारेगमप चा बीबी बघायचा असेल तर मला 'सुगना चा गौना' सारखे बीबी पण पहावे लागतात (कारण ते सर्वात ताज्या पोस्ट मध्ये आघाडीवर असतात), किंवा पार्ले चा बीबी वाचायचा असेल तर एक 'कट्टा' नामक बीबी पार करुन जावे लागते, कारण तो माझ्या वेळेत भरुन वाहत असतो किंवा भारतातल्या निवडणु़कांविषयी वाचायचे असेल तर 'मराठी माणूस कृती का करत नाही' किंवा तत्सम विषयाचा बीबी आधी समोर दिसतो.

हे टाळण्यासाठी ग्रूप च्या सदस्यत्वामध्ये थोडी granularity वाढवता येणार नाही का ? एखाद्या ग्रूप चा सदस्य होताना एकदम 'सामील व्हा' ऐवजी त्या ग्रूप मधल्या पानांची यादी दाखवता येईल (का?) आणि त्यातली जेवढी पाहिजे तेवढीच पाने सिलेक्ट करता येतील असे काहीतरी करता येईल का?

यामुळे दोन गोष्टी होतील, एक तर मला जेवढी वाचायची आहेत तेवढीच पाने दिसतील आणि नवीन रचने मध्ये मला अपडेट्स मिळत नाहीत (कारण खूप जास्त शोधावे लागते) असे वाटणे कमी व्हायला मदत होईल

सध्या एखाद्या लिखाणावर 'कानोकानी' चे लिंक दिसते. तेथे जाऊन आपण या लिखाणाची लिंक तेथे देऊ शकतो.

असे लिखाण एकदा कानोकानी मध्ये सामील झाले की त्या लिखाणावरची ती लिंक काढून टाकता येईल का ? म्हणजे आपोआप कळेल की या लिखाणाचा उल्लेख तेथे झाला आहे.

असे लिखाण एकदा कानोकानी मध्ये सामील झाले की त्या लिखाणावरची ती लिंक काढून टाकता येईल का ? म्हणजे आपोआप कळेल की या लिखाणाचा उल्लेख तेथे झाला आहे. >>>
किंवा ती लिंक काढणे शक्य नसेल तर, तोच लेख परत कोणी कानोकानी मध्ये टाकायला गेले की तिथे तो आधीच टाकलेला आहे असे सांगुन परत कानोकानी वर टाकण्याची परवानगी नाकारणे. (असे आधीच होत असेल तर तसदीबद्दल क्षमस्व.)

Pages