नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लालू. मी हेच शोधत होतो.

मला मायबोलीचे नवे स्वरूप आवडले. काही सूचना करायच्याच म्हंटले तरः
१. वाहून न जाणारी पाने उलट्या क्रमाने दाखवली तर बरे होईल
२. वरचे 'नविन लिखाण' तसेच वाहून न जाणार्‍या पानांचा क्रम पानाच्या शेवटीपण दाखवला तर बरे होईल.
३. रंगीत शब्द कधी लिहीता येतील याची आतुरतेने वाट पहात आहे.
धन्यवाद. (sorry, धन्स!)

झक्कीसाहेबांचे म्हणणे बरोबर आहे. पूर्वीच्या मायबोलीत जुन्या झालेल्या २०-२० पोस्ट्स ची मोळी बांधून कॉम्प्रेस्ड लिन्क देत होतो तसे नाही का करता येनार. ? आता पहिल्या पानावरच्या लोकांच्या पोस्ट्स तोंडपाठ व्हायची वेळ आली आहे.

भूतनाथ पाहिला. त्या लहान पोराचे जुहीचे आणि अमिताभचे काम एकदम बेष्ट.
खास करून जुहीने रंगवलेली "आई" बघण्यालायक

आता या ओळी मी किती वेळा वाचल्यात त्याला काही गणती आहे का?
Angry

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

...

IE 8, तसेच firefox वर windows media player चे add-in चालत नाही... त्यामुळे श्राव्य विभागतले कार्यक्रम ऐकता येत नाहीत...
crome मधे टाइपायला खूप त्रास होतो.. म्हणजे काही चूकलं आणि बॅकस्पेस दाबलं की आधीचा सगळा मजकूर एकमेकांत मिसळला जातो.. !
तसचं crome मधे भाषा बदल्यासाठीचा "cntrl + \" हा shortcut चालत नाही..

पराग,
तू सांगितलेल्या तिनही गोष्टी मॅकला पण लागू होतात Sad

श्रवणीय कार्यक्रम आता Firefox आणि इतर न्याहाळकांवर ऐकता येतील याची सोय केली आहे. पूर्वीही ती होती पण त्यासाठी आवश्यक असणारा Windows media player जितक्या मोठ्या प्रमाणात IE वर उपलब्ध होता तितक्या प्रमाणात Firefox वर नव्हता.
आता Flash Plug in वापरून हे साध्य केले आहे. तरिसुध्दा ज्या संगणकांवर/न्याहाळकावर Flash नसेल तिथे ते आधी उतरवून घ्यावे लागेल.

बाकी देवनागरीकरणातल्या Mac वरच्या अडचणींवर काम चालू आहे.

>1 2 next › शेवट »
>हे जे लेखनाच्या अगदी खाली आहे, ते वर सुद्धा करता आले, तर मंजुडी यांचे व माझे हि समाधान होईल.

वाहून न जाणार्‍या लेखनावर, पानांचा क्रम आता प्रतिक्रिया सुरू होण्याच्या अगोदर आणि शेवटी दोन्ही ठिकाणी दिसायला लागला आहे. पूर्वी तो फक्त पानाच्या शेवटी दिसत असे.

जुन्या हितगुजवर नवीन लेखन साठी क्लिक केल्यावर ज्या ज्या बीबी वर काही नवीन लेखन झालं आहे "तेचं" बीबी समोर येत. नवीन माय्बोलिवर्ही तुम्हि "नवीन लेखन" ही लिंक दिली आहे पण त्यावर क्लिक केल्यावर सगळेचं बीबी समोर येतात्.त्यातल्या काहीवर नवीन लेखन असतं पण सगळ्यावर नाही. मग उरलेलं नवीन लेखन वाचण्यासाठी दुसर्या तिसर्या पानावर जावं लागतं. आता बघा, समजा मी एक प्रश्न टाकला.दिवसभरात त्याला कोणी उत्तर दिलं नाही तर "नवीन लेखन" क्लिक केल्यावरही माझी पोस्ट २ ओर ३ नंबरर्च्या पानावर जाते.साहजिकचं कोणाच्या नजरेत येत नाही.मग माझी पोस्ट वर यावी म्हणुन मला काहितरी त्या बीबीवर लिहावे लागते.
हे नक्किचं त्रासाचं आहे. जुन्या हितगुजवरची ही सोय वेगळी आणि सोयीस्कर होती. कृपया बघाल का?

>जुन्या हितगुजवर नवीन लेखन साठी क्लिक केल्यावर ज्या ज्या बीबी वर काही नवीन लेखन झालं आहे "तेचं" बीबी समोर येत. >नवीन माय्बोलिवर्ही तुम्हि "नवीन लेखन" ही लिंक दिली आहे पण त्यावर क्लिक केल्यावर सगळेचं बीबी समोर येतात्.

नवीन मायबोलीवरही "नवीन लेखन" क्लिक केल्यावर फक्त नवीन लेखन झालेलीच पाने कालक्रमाने दिसतात. आता सगळ्याच लेखाना भरपूर प्रतिसाद मिळाल्यामुळे सगळी पाने दिसतात असे वाटते पण ते प्रत्यक्षात नाही.

जुन्या हितगुजवर नवीन प्रतिसाद आल्यापैकी फक्त नवीन २०० च प्रतिसाद आपण दाखवायचो. त्यामुळे एका आवाक्यात आपण सगळे पाहतो आहे असे वाटायचे पण त्यातले कित्येक प्रतिसाद (२०० च्या पुढचे) कधी दिसायचेच नाहीत याची बर्‍याच जणाना कल्पना नाही. आता ती मर्यादा काढून टाकल्यामुळे सगळीच पाने दिसत आहेत असे वाटते.

पण एकूणातच प्रतिसाद शोधणे हे अजून त्रासाचे आहे याची कल्पना आहे. त्यामुळे ते सोपे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एकूणातच एका दिवसात येणारे प्रतिसाद हे वाढतच जाणार आहेत (सध्या कधी कधी एका तासात नवीन पानावर प्रतिसाद जायला लागतात) त्यामुळे उपाय करताना पुढच्या वाढीचा विचार करून करावा लागतो आहे.

अस्सं! चालू द्या चालू द्या एडमिन...

तुम्ही जे काही कराल ते चांगलेच कराल असा विश्वास आहे Happy

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

मायबोलीवर मी फक्त वाचण्याच्याच मोड मध्ये असतो. पण हे नविन स्वरूप आल्यापासून फार गोंधळ होतो, माझे इथे येणे जवळ जवळ नाहीसेच झाले आहे.

प्रतिसाद मध्ये नविन आलेल्या पोस्ट बघण्यासाठी कायम २,३ पान पुढे जावे लागते.

खुप दिवसांनी ईथे लिहीतोय.

१. नविन मायबोली मधे एक/दोन दिवसापुर्वी चे लेखण शोधताना माझा अजुनही गोंधळ होतोय. दोन दिवसांपुर्वीचे शोधणे तर आता मी सोडुन दिलेय.
२. Site still looks like amateur job, lack of professional layout. wastage of screen real estate
३. Other marathi websites, based on same underlying software are much faster than maayboli.com
४. whats up with page 2 on non-archiving forums. e.g. any city forum

please do something to overcome these issues

5. I know you answered this before, still once again. drupal itself uses forums for its user community. then why not us.

पाऊलखुणांची लिंक डाव्या बाजूच्या मेन्यूत देता येईल का?
मी एखाद्या बीबी वर एखादा प्रतिसाद किंवा प्रश्ण टाकला आणि मला दुसर्‍या दिवशी त्यावर उत्तर आलं का ते बघायचं असेल तर तो बीबी शोधून काढावा लागतो प्रत्येक वेळी किंव मग माझे सदस्यत्त्व मधे जाऊन त्यातून ग्रुप किंवा पाऊलखुणांवर जाता येतं..
त्या ऐवजी पाऊलखूणा जर डाव्या मेन्यूमधे सापडल्या तर बरं पडेल..

@Maanus, @apurv, @tonaga
धन्यवाद.
१. तुम्ही डाव्या बाजुला "अजून वाचायचंय" वापरलंय का? तुम्ही अजून जे वाचलं नाही तितकंच फक्त तिथे दिसतं
२. मान्य. काम चालू आहे.
३. शक्य आहे. याबद्दल कायम प्रयत्न चालू असतात. एका वेळी साईटवर येणारे वाचक याचाही परिणाम असू शकतो.
४. सुधारले आहे. गेले काही आठवडे चाचण्या करत होतो.
५. Forums are not scalable ( can not provide autonomous sections. Each subforum needs to have same structure as rest). In fact all new growth of drupal is not happening on drupal forums but on groups.drupal.org. You can try yourself posting a message on drupal forum and also on appropriate group @ groups.drupal.org and see where you get a faster response.
Currently atelast you can subscribe to a group on maayboli and track what is happening on those group. If there were forums there is no way you could have kept track of what is happening where.

@adm
तुम्ही डाव्या बाजुला "अजून वाचायचंय" वापरलंय का? तुमच्या गृपमधलं अजून तुम्ही जे वाचलं नाही तितकंच फक्त तिथे दिसतं. जिथे नवीन प्रतिक्रिया नसेल ते दिसत नाही.

We are aware this is information overload and trying to work out a solution.

Waste of screen's real estate या बद्दल मी २७ ऑगस्ट रो़जी लिहिलेल्या पोस्टमधे मुद्दा क्र. ३ मधे एक उपाय सुचवला आहे. तो कसा वाटतो? Happy

तुम्ही डाव्या बाजुला "अजून वाचायचंय" वापरलंय का? तुमच्या गृपमधलं अजून तुम्ही जे वाचलं नाही तितकंच फक्त तिथे दिसतं. जिथे नवीन प्रतिक्रिया नसेल ते दिसत नाही. >>>>> हो.. ते मी वापरतो... पण सग्ळेच ग्रूप जॉईन केलेले नसतात.. कारण मला एखाद्या ग्रूप मधल्या एखाद्याच धाग्या मधे ineterest असतो.. आणि मग तो पूर्ण ग्रूप जॉइन केला तर अजून वाचायचय मधे भारमभार पोस्ट दिसत राहातात.. म्हणून ते पाऊलखुणांमधून शोधणं सोपं पडतं..

admin,

'नवीन लेखन' या लिंक वर गेल्यावर तिथे नवीन पोस्टस् तारीख वेळेसकट दिसतात... त्याचबरोबर तो बीबी / लेख कोणत्या तारखेला सुरू झाला / लिहिला आहे ते दाखवता येईल का?

म्हणजे एखादा बीबी हा समजा ३ जून ला सुरू झालेला आहे, आणि शेवटची पोस्ट ७ ऑक्टोबर ची आहे... तर या दोन्ही तारखा तिथे दिसु शकतील का? कारण होतं कसं की, मायबोलीला नवीन join होणारे नवीन लोक पुष्कळ जुने झालेले लेख वाचतात आणि त्यावर प्रतिक्रिया देतात आणि मग "नवीन लेखन" याखालील entries खूप वाढतात. त्यामुळे नवीन बीबी आणि लेख खूप मागे लिस्ट होतात. कधीकधी तर जुने already वाचलेले लेख नवीन वाटतात कारण ते प्रतिक्रियांमुळे खूप सुरूवातीला लिस्ट होतात. लेख पोस्ट केल्याची तारीख आणि शेवटच्या प्रतिक्रियेची तारीख असं दोन्ही दिसलं तर कमीत कमी अंदाज येईल कि लि़खाण केव्हाचं आहे....

जेव्हा 'नवीन लेखन' यात सगळ्या साहित्याची यादी दाखवली जाते तेव्हा अगदी डाव्या बाजुला पहिल्या कॉलम मध्ये लेखनाचा टाइप म्हणुन जो टॅग दाखवला जातो त्यावरुन काही बोध होत नाही. गुलमोहोरातले कुठलेही लेखन हे साहित्य लेखन याच नावाखाली येते त्यामुळे तिथे लेखावर क्लिक केल्याशिवाय ते काय आहे हे कळत नाही. तिथे साहित्य लेखन ऐवजी त्या साहित्याचा गुलमोहोरावरील प्रकार जसे कविता, कथा, प्रकाशचित्र, ललित इ. लिहीलेले दाखवता येईल का?

रुनिला मोदक. तसेच filter देता येइलका ह्या पानावर ? एकाच प्रकारच्या साहित्यप्रकारानी सगळी पाने भरभरुन वाहताएत. त्यात जे वाचायचे ते पण वाहुन जाते Sad

जुन्या मायबोलीवर जसे एखाद्या शब्दावर काट मारता यायची तशी इथे येते का?

आणि गुलमोहरावरचा मॉडरेटर्स चॉइस हा प्रकार बंद केलाय का?

हितगुज च्या जुन्या दिवाळी अंकांकडे नेणार्‍या लिंक्सची यादी कुठेही एकत्रितरित्या उपलब्ध नाहीये. तो खजिना अशाने हरवून जाईल ही भिती वाटते!
अशी सूची हि.दि.अं. शी संबंधित प्रत्येक पानाशेजारी उपलब्ध करावी. त्या पानांवर त्या त्या जुन्या दिवाळी अंकांची पीडीएफ ही उपलब्ध करावी.

धन्यवाद!

RSS feed ची सोय आता मायबोलीवर आहे का? माणसाने काही दिवसापुर्वी या बद्दल काहीतरी लिहिल्याचे स्मरते. पण आता सापडत नाहीये.

Recent Posts या पानावर गुलमोहरातील सगळे लेख साहित्य लेखन या प्रकाराखाली दिसतात. त्याचे लेखनप्रकाराप्रमाणे वर्गीकरण करणे शक्य आहे का?

हल्ली चांगले लेख/रंगलेल्या चर्चांना पहिल्या पानावर स्थान मिळालेले दिसते पण त्यात सगळेच लेख येतात असे नाही. गेल्या आठवड्यात किंवा गेल्या महिन्यात सर्वात जास्त प्रतिक्रीया मिळालेले लेख/चर्चा दाखवणारा एखादा विभाग सुरु करता येइल का?

>>गेल्या आठवड्यात किंवा गेल्या महिन्यात सर्वात जास्त प्रतिक्रीया मिळालेले लेख/चर्चा दाखवणारा एखादा विभाग सुरु करता येइल का?
आयडीया चांगली आहे. पण प्रॉब्लेम एकच! आजकालच्या लिखाणाकडे बघता दु:र्दैवाने 'जास्त प्रतिक्रीया म्हणजे जास्त दर्जेदार साहीत्य' असा होत नाही. Happy टुकार साहीत्यावर अचरट प्रतिक्रियांची चढाओढ लागते! Happy

खरंय... पण सध्या मायबोलीवर दोन दिवस आले नाही तर जास्त वर्दळ असलेली पोस्टस बघण्यासाठी Recent Posts मधे ८-१० पाने चाळावी लागतात.

साहित्य प्रकार दाखवणारा column, recent posts च्या पानावर टाकल्याबद्दल खूप धन्यवाद.. Happy

अडमला अनुमोदन्.मीही अगदी हेचं लिहायला आले होते Happy
धन्यवाद.

ओह, मी पण हेच लिहायला आले होते. मोठेच काम झाले ह्या नव्या कॉलमने Happy धन्यवाद ऍडमिन टीम !!!

Pages