Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विनोद हा
विनोद हा विभाग फक्त मायबोली सभासंदासाठी दिसतो, कृपया तो सार्वजनीक करता येईल का?
पुर्वी
पुर्वी मॉडरेटर चॉईस नावाचा एक विभाग असायचा, जो दर महिन्याच्या अखेरीस update व्हायचा. तशी सुवीधा परत सुरु करण्यात यावी.
ह्यात गेल्या महीन्याभरातील चांगल्या लेखांचे अवलोकन असावे.
रोज काही गावांच्या विभागात काही अती चांगल्या, उच्च प्रतीच्या कोटी येतात. किंवा Top comments, त्यांचा देखील जमल्यास ईथे समावेश असावा.
>विनोद हा
>विनोद हा विभाग फक्त मायबोली सभासंदासाठी दिसतो, कृपया तो सार्वजनीक करता येईल का?
विरंगुळामधला विनोद विभाग आधीपासूनच सार्वजनिक आहे त्यामुळे सभासद नसलेल्या कुणालाही दिसतो. तुम्हाला दुसरे कुठले पान अपेक्षीत आहे का?
एखाद्या गृपमधल्या पानाला "विनोद" हा टॅग लावला तर मात्र ते पान सार्वजनिक होणार नाही. ते कुठल्या गृपमधे आहे त्यावर ते अवलंबून आहे.
> पुर्वी
> पुर्वी मॉडरेटर चॉईस नावाचा एक विभाग असायचा, जो दर महिन्याच्या अखेरीस update व्हायचा. तशी सुवीधा परत सुरु करण्यात यावी.
"मॉडरेटर चॉईस" ही सुविधा करायचा विचार नाही. कारण आता एका मॉडरेटरलाही एका महिन्यात सगळीकडचे वाचून मग कुठले चांगले कुठले वाईट हे ठरवण्याइतका वेळ देता येणार नाही. It is not a scalable solution.
त्या ऐवजी कानोकानीमधे तुम्हाला आवडलेला कुठलाही लेख पटकन टाकण्याची/मतदान करण्याची सुविधा लवकरच देतो आहोत. जे लेखन जास्त लोकाना आवडेल ते आपोआप पहिल्या पानावर जाईल. कानोकानीवरचे सर्वोत्तम १० लेख्/कविता आपोआप मायबोलीवर दिसतील किंवा RSS Feed अशी सोय करता येईल.
चांगले लेखन आपोआप लवकर दृष्टीस पडावे यासाठीही इतर प्रयत्न चालू आहेत.
ऍडमिन, गुलम
ऍडमिन,
गुलमोहोरावर टाकल्या जाण्यार्या साहित्याला वाचकांकडुन रेटींग देता येण्याची सोय करता येईल का, गणेशोत्सवात फोटो स्पर्धेसाठी जसे दिले होते अगदी तसेच १० तारे देवुन, त्यात एक आयडी एका कलाकृतीला एकदाच रेटींग देवु शकत होता तसेच इथे करता येईल. त्यामुळे आपोआप चांगले रेटींग मिळालेले साहित्य तुम्ही वरच्या पोस्ट मध्ये म्हणताय तसे आपोआप पहिल्या पानावर जाईल आणि रेटींग न मिळालेले साहित्य मागे पडेल.
ऍडमिन,
ऍडमिन, नेमस्तकहो, आंतरराष्ट्रीय घडामोडींसंदर्भात सविस्तर लेख लिहायचा असेल तर तो कुठे लिहावा? 'चालू घडामोडी' विभागात 'आंतरराष्ट्रीय घडामोडी' असं चर्चापान आहे. पण त्यावर एखाद्या विषयाबद्दल सविस्तर लेख लिहिणं आणि त्याअनुषंगानं (विषयाला धरून :फिदी:) चर्चा करणं हे सर्वच विस्कळीत व्हायची शक्यता वाटते. 'चालू घडामोडी' विभागात 'आंतरराष्ट्रीय घडामोडी' नावाचा उपविभाग बनवता येईल का? तसं झाल्यास एखाद्या विषयावरून नवीन चर्चापान त्या विभागात बनवणं सोपं ठरेल.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
sorry my mistake,
sorry my mistake, माझा एक मित्र new4me_all वरुन साईट बघत होता व त्यात त्याला ते पेज दिसत नव्हते. मी देखील लॉगऑउट करुन पाहीले, तेव्हा मला देखील दिसले नाही म्हणून ईथे मेसेज टाकला. anyway, पण new4me_all makes sence only to registered users.
मायबोलीवर
मायबोलीवर कोणत्याही पानावर आल्यावर अगदी ताज्या पोस्ट बघण्याकडे आपला कल असतो.परंतु अगदी ताज्या पोस्ट सर्वात शेवटी दिसतात. त्यामुळे "शेवट' वर जाऊन मग लास्ट पोस्ट बघता येते.
या सगळ्या खटाटोपाऐवजी पूर्वी होते त्याप्रमाणे पानांचा क्रम चढा न ठेवता उत॑रता ठेवला तर लास्ट अपडेतेड पेज समोर दिसेल.
_________________________
-Impossible is often untried.
मॉड
मॉड /ऍडमिन,
मला मायबोलीवरच्या कवितांबद्दल एक प्रश्न आहे.
सध्या असे दिसतेय की बरेच नवकवी इथे कविता लिहितायत. नवीन कवींनी येणे आणि इथे लिहिणे यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. उलट आपण त्यांचे स्वागतच करतो कारण मायबोली सगळ्यांसाठी आहे. पण मला आक्षेप आहे त्या कवितांच्या दर्जाबद्दल. मायबोली हे काही उठसूठ कविता ड्राफ्ट करण्याचे किंवा कविता ट्राय करण्याचे ठिकाण नाही.
त्यामुळे जिथे तिथे अशा कविता दिसतात, त्यात वाचल्याशिवाय चांगली कोणती हे कळत नाही. नवीन माणसाला मायबोलीचा खरा दर्जा अशाने कळणार नाही ही भिती आहे.
या कवितांबद्दल काही करता येइल का?
@giriraj >त्यामु
@giriraj
असं हवे असेल तर शेवटी वर टीचकी मारण्याला पर्याय नाही.
>त्यामुळे "शेवट' वर जाऊन मग लास्ट पोस्ट बघता येते.>
हा प्रश्न वेगळ्या रितीने पूर्वीच सोडवला आहे. तुम्ही नवीन लेखन भागातून तुम्ही आतापर्यंत न वाचलेल्या प्रतिसादावर एकदम उडी मारू शकता. तो प्रतिसाद शेवटच्या पानावर असेल तर लगेच तिथे जाता. हं आता आलेले प्रतिसाद कितिही असो पण ते न वाचता मला शेवटच्या पानावर जायचंय
@bhagya >त्यात
@bhagya
>त्यात वाचल्याशिवाय चांगली कोणती हे कळत नाही.
हाच तर मोठा प्रश्न आहे हो. तुम्हाला काय आवडेल हे दुसर्याना कसे कळणार?
>>>>>>>> तुम्हा
>>>>>>>>
तुम्हाला काय आवडेल हे दुसर्याना कसे कळणार?
>>>>>>>>>
हेही खरेच.
मायबोलीवर
मायबोलीवर लिहीलेल्या लेखांची वा कवितेची किती वाचने झाली ही सुविधा देने फार अवघड नाही. ( ती सुवीधा सध्या कदाचित इतरांना पाहायला मिळत नसेल. म्हणजे हिडन असेल) तर अशी सुविधा करुन द्याल का? म्हणजे लेखकाला किती वाचने होतात हे तर कळेलच पण पुढचे लेख लिहायचे की नाही हे देखील कळेल.
मी जुन्या मायबोलीवर देखील हा प्रश्न विचारला होता, आता ती सोय न द्यायला काही खास कारण आहे का?
>सुविधा
>सुविधा देण फार अवघड नाही.
बरोबर. सुविधा देणे अजिबात अवघड नाही. पण आम्ही काही चाचण्या केल्या होत्या आणि ही सुविधा चालू केल्यावर प्रत्येक पान येणे खूप हळू झाले. ज्या साईटवर फारसा वावर नाही तिथे अशी सोय दिली तरी सर्वरवर फारसा ताण येत नाही. पण जिथे खूप वावर आहे तिथे अशी सोय दिली तर प्रत्येक पान पाहिल्यावर त्याची नोंद ठेवणे मोठे काम होते. त्यामुळे मायबोलीच नाही तर जिथे खूप वावर आहे अशा साईटवर सहसा ही सोय नसते. ही सोय दुसरीकडे/दुसर्या सेवादात्याकडे Offload करणे हा उपाय सहसा वापरला जातो. आम्हीही दुसरीकडून ही आकडेवारी पाहतो. त्यामुळे प्रत्येक मायबोलीकराचा ID / password त्या दुसर्या सेवादात्याला कळवल्याशिवाय ही सोय देता येणार नाही.
या साईटवर इतके लोक येतात आणि तुमचे तुम्हीच पहा किती वाचत आहेत असे दाखवायला मायबोलीलाच काय पण कुठल्याही वेबसाईटला आवडेल. पण त्यामुळे जर प्रत्येक पान हळू होत असेल तर मात्र त्याचा फेरविचार करावा लागेल. म्हणून हे सध्या दिले नाही.
अवांतरः
किती लोक वाचतात त्यावरून वेबसाईटची उपयुक्तता पाहणे हा विचार आता जुना समजला जातो. त्यापेक्षा ROI हा जास्त महत्वाचा समजला जातो. उदा. एका वेबसाईटचा लेख १००० लोकांनी वाचला आणि त्यातल्या १० लोकांनी अपेक्षीत असलेली कृती केली आणि दुसर्या वेबसाईटचा लेख फक्त ५० लोकांनी वाचला आणी त्यातल्या २० लोकांनी अपेक्षित कृती केली तर दुसरी साईट जास्त परिणामकारक समजली जाते. गेल्या काही दशकात टीव्ही आणि वर्तमानपत्रे या माध्यमानी आमचे इतके अमूक तमूक लाख वाचक आहेत याची महती सांगून जाहिरातींच्या जगात वर्चस्व मिळवले. गेल्या काही वर्षात इंटरनेटमुळे जाहिरातदाराना ROI चे महत्व कळून सगळ्यात जास्त ROI देणार्या माध्यमावर/वेबसाईटवर (मग त्यांचे वाचक कमी असले तरी) खर्च करण्याचे प्रमाण वाढले.
>> 'चालू
>> 'चालू घडामोडी' विभागात 'आंतरराष्ट्रीय घडामोडी' नावाचा उपविभाग बनवता येईल का? तसं झाल्यास एखाद्या विषयावरून नवीन चर्चापान त्या विभागात बनवणं सोपं ठरेल.
ऍडमिन, विषय मागे पडला म्हणून पुन्हा विचारतो : असं करता येईल का?
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
सध्या
सध्या कुठेच उपविभाग बनवण्याची सोय नाही पण नवीन लेखनाचा धागा बनवता येतो. तसा आंतरराष्ट्रीय घडामोडी असा धागा आधीच तिथे आहे. त्या सगळ्या धाग्यांना आंतरराष्ट्रीय अशी शब्द्खूण दिली तर त्याचा आपोआप विभाग तयार झाल्यासारखे होते आणि विषयवार यादीतूनही पाहता येते.
असे करता
असे करता येईल का? की....
जर एखाद्या पोस्ट मधे ठराविक प्रमाणात देवनागरी शब्द्/अक्षरे नसतील, किन्वा ती केवळ रोमन लिपित असेल तर ती पोस्ट टाकता न येणे वा टाकल्यास आपोआप डिलिट होणे!
पूर्वी किमान चार शब्दान्ची मर्यादा (रोमन वा देवनागरी) होती, तशीच काही मर्यादा केवळ देवनागरी शब्दान्ची करता येईल का?
(तसे झाल्यास, केवळ रोमन मधील रतीबासारख्या कट एन पेस्ट पोस्ट्स ना आळा बसेल)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मायबोलीचं
मायबोलीचं नवीन रूप मस्त आहे. फक्त एक सुचवायचं होतं. मुख्य पानावर 'चेहर्यात' असं हवं.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
शिवाय 'गृप'
शिवाय 'गृप' असे न लिहिता 'ग्रुपमधील' व 'ग्रूप' असे लिहिता येईल का? किंवा त्यासाठी एखादा मराठी शब्द वापरता येईल का?
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
अगोदर
अगोदर पेक्षा आता जो बद्दल केला आहे तो एकदम व्यवस्थित आहे आगोदर मायबोली मध्ये थोडा फार अडखळल्या सारख व्हायच पण आता समजत पटकन ...
मायबोलीचे
मायबोलीचे नवीन रूप छान आहे, पण मांडणीतील काही गोष्टी नाही आवडल्या.
'माझी विचारपूस', 'माझे सदस्यत्व' हे सगळे पूर्वी डावीकडे होतं तेच छान होतं असं मला वाटतं. लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया हा कॉलम उजवीकडेच छान दिसेल का (आपली वही असते ना, तसं. डावीकडे समास आणि उजवीकडे लिखाण). फॉन्ट सुद्धा मोठा झाला आहे वाटतं. जुन्या मायबोलीवरचा फॉन्ट पर्फेक्ट होता... आता सगळं मोठं दिसतं आणि खूप स्क्रोल करावं लागतं... सूचना योग्य वाटल्यास कृपया बदल करावेत.
नवीन
नवीन स्वरूप छान आहे. मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव बघितले तर त्यांच्या स्टाईल मधे फार फरक दिसत नाही (मला तरी). मायबोली जरा वेगळी दिसायची, आता थोडी त्यांच्या जवळ जाणारी स्टाईल वाटली. याचे कारण कदाचित फॉन्ट, रंगीत अक्षरे वगैरे असेल. पण एकूण नवीन लूक चांगला आहे.
जुन्या हितगुज वर प्रत्येक पोस्ट ला थेट लिंक देता यायची तसे या बदलानंतर आता होउ शकेल का?
नवीन
नवीन मायबोलीवर एक संपूर्ण दिवस वावरल्यावर लक्षात आलेल्या काही गोष्टी -
१. 'अजून वाचायचय', 'विचारपूस' इ. दुवे हे 'चोखंदळ ग्राहक' इ. दुव्यांच्या अलिकडे असले तर सोयीचे होईल.
२. रंगीबेरंगीत लिखाण करताना लक्षात आलं की डाव्या बाजूची अक्षरं कापली जात आहेत. तसंच preview बघताना तारीख इ. गोष्टी distort होतात.
३. अनेक पानांवर 'अजून वाचायचंय' हा दुवा खूप खाली येतो. त्यामुळे एखाद्या पानावरून थेट विचारपूशीत अथवा नवीन लेखनावर जायचे असेल, तर बरंच खाली स्क्रोल करावं लागतं.
४. एखाद्या सदस्याची विचारपूस कशी करायची?
५. santino यांनी लिहिल्याप्रमाणे हा फॉन्ट जरा मोठा वाटतो.
६. डावीकडे लेख व उजवीकडे दुवे हे जरा चमत्कारीक वाटतं. सर्वसाधारणपणे हे नेमकं उलट असतं.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
डाव्या
डाव्या बाजुला समास नाहि..त्या मुळे काहि वेळा डाव्या बाजुचि शब्द निट /पुर्ण दिसत नाहित...उदा.प्रतिसाद हा शब्द...आपल नाव हे अगदि ब्राऊसरला चिकटुन आहे..थोडा समास हवा असे वाटते...
अविनाश.....
मला जुनाच
मला जुनाच लुक चांगला वाटत होतां नवा लुक थोडासा मनोगत या साईटसारखा दिसतोय.बाकी भाषा बदलण्याची सुविधा वरच दिली हे बर केल.तशीच स्मायलीजची सुविधा दिल्यास बरे होइल
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
@chyayla >नविन
@chyayla
>नविन मायबोलीत लिहिलेली पोस्ट ही ब्लॉक मधे घुसमटलेली दिसते, पोस्टचे डिजाईन जुन्या सारखेच नाही ठेवता येणार का?
तथास्तु ! तुमची इच्छा आता पूर्ण झाली आहे का?
@maanus >३. Other marathi
@maanus
>३. Other marathi websites, based on same underlying software are much faster than maayboli.com
तुम्हाला आता काही फरक जाणवतोय का?
इतर कुणाला काही फरक जाणवतोय का?
ज्या
ज्या पानांवर मधल्या मुख्य स्तंभात असलेल्या मजकुराची (Images वगैरे) रुंदी खूप जास्त आहे त्या पानांवर उजव्या बाजूचे स्तंभ खाली ओघळले आहेत. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे.
@avi.appa
>डाव्या बाजुला समास नाहि..
माझ्या माहितीप्रमाणे हि अडचण IE6 screen resolution 800X600 असणार्यानाच फक्त येते आहे. तुमचे Details सांगणार का?
रन्गसन्गत
रन्गसन्गती छान!

फॉण्ट थोडा मोठा दिसत असल्याने आम्हा चष्मेबहाद्दुरान्ची चान्गली सोय झाली हे!
वेगाबाबत अजुन अन्दाज आला नाहीये
फक्त पुर्वीसारखा डावीकडे समास हवा होता! त्याची जाम सवय झाली हे! अर्थात जागेच्या परेपुर वापरासाठी काही बदल आवश्यकच अस्तील तर मजकुराची जागा उजवी कडे ठेवुन वरील उजवी कडील लिन्क्सचा अलमोस्ट वन थर्ड रुन्दीचा मजकुर डाविकडे घेतल्यास बरे होईल.
कदाचित वनथर्ड रुन्दी एकसलग मिळत असल्याने जाहिरातीन्करता व अन्य मजकुरासाठी बरे पडत असावे अन्यथा पुर्वी वनथर्डचे पुन्हा निम्मे निम्मे कॉलम दोन्ही बाजुला असल्याने दोन चिन्चोळ्या लन्गोटीसारख्या उभ्या पट्ट्याच उपलब्ध असल्याने त्यान्चा "फारसा उपयोग" होत नसावा, त्या दृष्टीने सध्याची व्यवस्था चान्गली हे फक्त जागेत डावी उजवीकडे बदल हवा.
मी इतर साईटवर फारसा जात नाहि, तरीही निरीक्षण असे की, मायबोलीचे रन्गरुप हे मला जास्त भावते, सोज्वळ (म्हणजेच सोबर ना?), शान्त वाटते
...;
आपला, लिम्बुटिम्बु
हो साईट
हो साईट अता वेगवान झाली आहे
डावीकडचा समास थोडा जास्त वाटतो, कदाचीत main paragraph align center असेल म्हणून. ...
हॅपी न्यु Year
Pages