नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक!
पूर्वी बरहा वापरुन डॉक मधे लिहिलेल टेक्स्ट कॉपीकरुन इकडे पेस्ट केल तरी दिसत असे
आता तस होत नाही! मला काही मजकुर डॉक फाईलमधे बरहा वापरुन तयार केलेला, इथे टाकता येत नाही, असे का होते? असे करणे कसे शक्य होईल?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंक्स डावीकडे पाहिजेत हे माझेही मत.
फाँट, रंगसंगती ओके. मीही इतर साईटस वर फारसा जात नाही. क्व्चित जेव्हा गेलो, तेव्हा मायबोलीचंच रूप त्यांच्यापेक्षा अधिक चांगले वाटले.
स्पीडही वाढला आहे.
बरहा फ्रेंडली मात्र हवे.

--
जरा विसावू, या वळणावर.. Happy

(माफ करा मधे मधे बरेच इंग्रजी शब्द आलेत.)
मायबोलीचे नवीन रूप छान आहे.
मला font colour थोडाgray shade मध्ये असल्यासारखा वाट्तोय.
तो थोडा अजुन dark (गडद काळा) करता येइल का?
नुसतीच पांढरी screen दिसते. (हा कदचित माझ्या wide screen चा problem असु शकतो)
मी तशीही computer चा वापर खुपदा करते. more than 5 hr. a day
पण ह्या पांढर् या रंगामुळे डोळे थोडे जड होतात , अस मला वाटतेय.

शिवाय 'आपली मायबोली' (जिथे log in वगैरे अस्ते) या column ला दिलेली width आणखी थोडी कमी करता येइल
कारण तसही त्यावरचा मजकुर फक्त पहिल्या पानापर्यंतच दिसतो.
त्यामुळे तो column पुर्ण screenच्या १०-१५% ठेवला तरी चालेल असे माझे मत आहे.

हे दोन column हवे तसे resize करण्याची सोय देता येईल का ?

Unable to select database
We were able to connect to the MySQL database server (which means your username and password are okay) but not able to select the database.

The MySQL error was: Too many connections.

Currently, the database is drp1. ब्ला ब्ला

बहुतेक ओपन कनेकश्न लिमीट डिबी मध्ये जाउन वाढवावी लागेल.

हो, केदार म्हणतो तो प्रॉब्लेम मलाही आला..

नव्या मायबोलीवर रण्ग असतील तर बर होईल्. हे पांढर फार भकास वाटतय. निळा रंग चांगला होता आधी.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

मायबोलीमध्ये एक प्रोबलेम आहे तो म्हणजे लोग इन आणी लोग ओउट हे जर करता उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यामध्ये आसते तर पठकन समजल आसत.... कारण बहुत करून सर्व वेब साईड चे लोग इन आणी लोग ओउट हे उजव्या बाजूच्याच वरच्या कोपर्‍यामध्ये आसतात... आणी आजून एक म्हणजे तुम्ही ज्या नवीन मायबोली: असे सुधारता येईल ह्यच्या ज्या नव्या पोस्ट आसतील त्या पहील्या पानावर आल्या पहिजे मग जश्य जुन्या होतील तश्या त्या शेवट शेवट होत जातील....
(आनंद राजगोळे)

ज्या बाफवर वेगवेगळ्या वेळ-प्रदेशातील/देशातील लोक गप्पा मारतात तिथे पोस्ट वाहुन जाण्याने बरेचदा सलगता तुटते. तेव्हा बाफ सफाइसाठी सध्या असलेली क्ष पेक्षा अधिक संख्या झाली की जुन्या य इतक्या पोस्ट नष्ट होतील ही व्यवस्था गैरसोयीची ठरते. उदा: भारतात संध्याकाळी शेवटची पोस्ट टाकून गेलेला मनुष्याने सकाळी परत बाफ उघडला की नवीनच ३०-३२ पोस्ट दिसतात कारण त्याच्या पोस्ट नंतर बर्‍याच वेळेला क्ष संख्यामर्यादा ओलांडल्याने पोस्ट वाहून गेलेल्या असतात.

बाफ वाहुन जाण्याला पोस्टांच्या संख्येपेक्षा तासांचे परिमाण अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते..
म्हणजे पहिल्या पोस्ट पासून पुढच्या ३२ तासातल्या पोस्ट पानावर ठेवाव्यात.. मग एका ठरावीक वेळेला पहिल्या २४ तासाच्या पोस्ट उडवाव्यात म्हणजे केवळ शेवटच्या आठ तासाच्याच पोस्ट शिल्लक राहतील.. हा पोस्ट उडवायचा प्रोग्रॅम बॅच मोडमधे स्केड्युल करावा..
ज्यावेळी एका दिवसात एका बाफवर क्ष पेक्षा कमी पोस्ट असतील, त्या बाफवर क्ष इतक्या पोस्ट जमा होइ पर्यंत त्या तश्याच ठेवाव्यात..

@tanyabedekar
सध्या असलेली वाहून जाणारी पाने (आणि त्यांचा प्रोग्रॅम) शक्य तो न बदलता जुन्या मायबोलीवरून आणली आहे. त्यामुळे जर त्रूटी असली तर ती बर्‍याच वर्षापासून आहे, नवीन नाही. (If greater than X post, reduce to Y posts)
हा प्रोग्रॅम करताना तुम्ही सुचवलेला विचार नक्कीच केला होता. गेल्या काही वर्षांचा अनुभव असा आहे, वाहत्या पानावर लिहिलेलं लेखन हे बहुतांशी काही तासापुरते रुचकर वाटते. नंतर जरी ते वाचायला मिळाले आणि मधे काही तास निघून गेले असेल तर त्यातली गम्मत संपली असते. किंवा जर त्या पानावर इतकी वर्दळ वाढली असेल तर विषयांतर झाल्यामुळे जुन्या विषयावर कुणाला बोलायचे नसते. मी हे सर्वसाधारणपणे म्हणतो आहे त्याला अपवाद नक्की असतील. याचं मुख्य कारण असही आहे की वाहत्या पानावर बहुतांशी लेखकांना हे कधीही उडणार आहे हे माहिती असल्यामुळे ते उडले गेले तरी हरकत नाही अशा प्रकारचेच लेखन इथे होत राहते. सध्या मायबोलीवर जतन करून ठेवावे असे इतके लेखन वाचण्यासाठी असताना (आणि तेच वाचून होत नाही असे काही जण म्हणत असतात), जे उडले जाणार आहे अशा उद्देशाने लिहिलेले नंतर वाचायची इच्छा असणारे किती असतील?

रंगीत अक्षरे लिहायची सोय अजुन उपलब्ध झाली नाहिये का?

>रंगीत अक्षरे लिहायची सोय अजुन उपलब्ध झाली नाहिये का?
नाही.

नविन गृप कसा तयार करायचा.

मला भाषा विभागात म्हणी नावाचा विभाग सुरु करायचा आहे, पण तसे काही option कुठे नाहीय.

गुलमोहरात गेल्यावर खालच्यासारखं दिसतं:

कथा (6)
कविता (36)
काहीच्या काही कविता (6)
चित्रकला (5)
प्रकाशचित्र (10)
बालकविता (1)
मराठी गझल (4)
ललित (12)
विनोदी लेखन (1)
हस्तकला (3)

पण ह्यातल्या कुठल्याही लिंकवर क्लिक केलं की दुसरं काही उघडायला एकतर पुन्हा मागे यावं लागतं, किंवा नव्या टॅब मधे लिंक उघडावी लागते. तेव्हा 'कथा' वर क्लिक केलं तरी उघडल्या गेलेल्या नव्या पानावर इतर ९ लिंक्स दिसंत राहतील असं काही होऊ शकेल का?

प्रशासक,

मी आत्ता सफारीमधुन एक पोस्ट टाकत होतो तर एक गडबड झाली, काहितरी चुकीचे लिहिले गेले म्हणुन मी 'डीलीट' केले, पण परत लिहायला लागलो तर आधीचा डीलीट केलेला मजकुर सुद्धा मधी मधी यायला लागला, नवीन ओळीवर गेल्यावर व्यवस्थित चालतं, पण डीलीट करेपर्यंतच Sad

काहीतरी बफर होतय अस वाटतय सफारीत... IE मधे झकास चालते सगळे...

ऍडमिन, हल्ली गुलमोहर/रंगीबेरंगीमध्ये फार चांगली प्रकाशचित्रं येताहेत.
मुखपृष्ठावर तळाशी यातल्या निवडक चित्रांची पुढे सरकणारी आडवी पट्टी ठेवली तर बरे होईल.

||पन्चम्पुराण|| अशा काहिशा नावाचा "आगाऊ" यान्चा लेख हे
त्यान्नी तो लिहायला १० जाने. सुरुवात केली
प्रकाशित केला २४ जाने ला
मात्र लेखाची तारीख १० जाने. च दिसते
असे व्हायला नको! ज्या दिवशी तो प्रकाशीत होईल, (सर्वान्साठी) ती तारीख त्या लेखाची असायला हवी
असे वाटते
चु.भु.दे.घे.
...;
आपला, लिम्बुटिम्बु

जीसुमीत,
सफारीमध्ये असे होते. एकदा जर डीलीट बटन वापरले तर नंतर टाइप करायला घेतलेली सगळी अक्षरे एकमेकात मिसळ्तात किंवा डीलीट केलेलेपण दिसते. त्यासाठी मी शोधुन काढलेला उपाय म्हणजे दरवेळी सगळे डीलीट केल्यानंतर एकदा स्पेस बटन दाबायचेच. थोडक्यात १ अक्षर डीलीट करुन तिथे दुसरे लिहायचे असेल तर डीलीट - स्पेस -डीलीट (मागे येण्यासाठी) अशी बटने वापरावी लागतात. मला तरी हाच उपाय सापडला, दुसरा काही उपाय असेल तर मला महित नाही.

धन्यवाद रुनी, मी बहुतेक IE च वापरतो, पण वाटल निदर्शनास आणुन द्यावं Happy

हा अनुभव फक्त सफारी पुरता मर्यादित नाही, मला फायरफॉक्स मध्ये असे नेहमी दिसले आहे.
मला तर मध्येच देवनागरी लिहायला पण जमत नाही, अचानक फक्त इंग्लिश अक्षरे च उमटतात.

मी MS IE वापरतो, यातिल अनुभव म्हणजे लिहिलेल्या मजकुरात अधेमधे काही भर घालताना नविन अक्षर टाईप केल्याकेल्या वाक्याच्या शेवटील शब्द तिथे येऊन मूळच्या शब्दाला खातो व गिचमिड होते! रुनीने सान्गितल्याप्रमाणेच, टाईप करायच्या आधी जर स्पेस बार दाबला तर हा प्रॉब्लेम येत नाही
मला वाटत की हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम असावा कारण देवनागरीची अशी सुविधा असणार्‍या अन्य साईटवर देखिल हाच अनुभव आला आहे
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मला तर मध्येच देवनागरी लिहायला पण जमत नाही, अचानक फक्त इंग्लिश अक्षरे च उमटतात. >> हे बरेचदा होते जेंव्हा लिहिता लिहिता तुम्ही दुसर्‍या पेजवर जाता जिथे वेगळी user encoding असेल. बहुधा मायबोलीवर लिहिता लिहिता तुमचे लक्ष विचलित होउ नये म्हणून केलेली सोय असेल Happy

<<हे बरेचदा होते जेंव्हा लिहिता लिहिता तुम्ही दुसर्‍या पेगवर जात<<>> Lol
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

Rofl मग असे होणारच.

milindaa, limbutimbu, asami
तुम्ही वर कळवलेली अडचण सहसा देवनागरी लेखनाला मदत करणारी Javascript अर्धिच तुमच्या browser मधे उतरली असेल तर येतो. तुम्ही एकदा browser मधल्या जुन्या गोष्टींची साफसफाई करून पहा.

सध्या एकाहुन जास्त पाने असलेल्या धाग्यावर एखादा प्रतिसाद नोंदवला की त्या धाग्यातील पहिले पान उघडते. तसे न होता शेवटचे पान उघडले तर बरे पडेल असे मला वाटते.

www.marathigazal.com वर ग़ज़ल ईमेलने पाठवण्याची सोय आहे. तशी सोय इथे देता येईल का? तसेच 'अ' या अक्षरावर अर्धचंद्र कसा देता येईल? हे कुणी कृपया सांगेल का? शरद

नुसते shift + e वापरले की 'ऍ' लिहिता येते. अ वर अर्धचंद्र नाही दिसत.

Pages