खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)

पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला इंग्रजी शब्द 'एक्स्ट्रॅक्शन' असा आहे..
पण ही म्हणजे चक्क पिळवणूक असते! Happy

विलगीकरण फार तर होऊ शकते जर मिश्रणातील घटक बाजुला करायचे म्हटले तर!

नाही नाही पृथकरणाचे बरेच प्रकार आहेत
उर्ध्वपतन
वाष्पीकरण
क्रोमॅटोग्राफी
चुंबकीय पृथक्करण
आणि अजून बरेच आहेत काय काय

पैकी एक ऊर्ध्वपातन
आणि ऊर्ध्वपातन मध्ये ३ प्रकार आहेत
१ प्रभाजि/प्रभाजी (fractional distillation)
२ निर्वात (vacuum distillation)
३ भंजक (destructive distillation)

सगळ्याला स्वतः स्वतःचे अर्थ आहेत. त्यातून भाषेचा / भाषांतराचा फरक
पृथक्करण -- याचेच किती तरी अर्थ आहेत. कोडे देणार्‍याने बरोबर म्हटले की पुढे जाऊया. द्या कृष्णा पुढचे.

मला त्यांनी एका डब्यात घालून ठेवला,
घट्ट झाकणाचा नव्हता म्हणून सापडेल तो घेतला
मला कोणी चोरलं नाही, खाल्लं नाही, सांडलं नाही
पण प्रत्येक वेळी आधीपेक्षा कमीच दिसतो
कारण मी X X X X X X आहे

अजून क्लू हवाय का?

ह्यामध्ये छेदून फायदा नाही, फक्त स्पर्शाची भाषा चालते.

Pages