खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)

पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॉजिक/तर्कशास्त्र?

नाही.

जरा जास्तच कठीण होता का? :घाबरलेला बाहुला:

पुढचा मीच देऊ का? हा त्वरित ओळखता येईल बहुधा.

बल नेहमी ह्या राशीशी प्रमाणात असते.
---

वर कारवींनी कोड्यात सांगितलेले डब्यात घालून ठेवलेले कमी होत गेले...

हा नियम सांगतो की विश्वात हे कधीच कमी होत नाही!

४ & ४ अक्षरे

हा नियम सांगतो की गदगदा हलवल्या शिवाय झोपेतुन उठणार नाही की थांब थांब म्हणल्या शिवाय थांबणारही नाही! Happy

- - -

बरोबर! Happy

Inertia is tendency of a body which maintains its state of rest or uniform motion unless and until acted upon by any external unbalanced force. बहुदा हा तो जडत्वाचा नियम!

Pages