खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)

पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy अंदाजपंचे....

मी आजारी नाहीये, पण खंगत चाललोय. पण डॉ म्हणतात काळजीचे कारण नाही. वजनावर लक्ष ठेवायला सांगितलेय. एक ठराविक आकडाही दिलाय. तिथवर खाली आले, की आपोआप बरा होशील. नंतर वजन वाढले नाही, तरी उगाचच खालीही नाही जाणार म्हणाले.
मी कोण? (५+४)

भारी clue Lol

कोणते शास्त्र ??

geostationary satellite ?
भूस्तरणीय (??) उपग्रह

उपग्रह नाही, सोनू ;
शास्त्रे --- जीव, भौतिक, रसायन सगळीच.

आणि एक तक्रार, मला आधीच त्रास होतोय तर डॉ "मदतीला येत जा माझ्या" म्हणतायत. बरा झाल्यावर नाही आलास तरी चालेल म्हणे. माणुसकी नाही अजिबात. डॉ बदलू का????? कोतबो.

पुढचा clue देऊ का ?

प्रकाशाच्या तरंगलांबीनुसार क्रमवार मांडणी

मी एक देऊ?
एकदम गमतीशीर संस्थेचे तसेच गमतीशीर दोरे.
४ अक्षरी.

गुणसुत्रे ना ती?
पण हे दोरे गमतीदार आहेत. ज्या संस्थेत बांधलेत ती ही गमतीदार.

सोडवण्यापेक्षा कोडी देणे सोपे Happy
अजून एक
- फार पूर्वी कामाची होतं हे शेपूट. आता राहिली तर सूत नाहीतर भूत. त्रास दिला तर सरळ कापून काढा ते शेपूट.

मेंदूचा मित्र,
वर्गातला हुषार विद्यार्थी, मी; पहिल्या ओळीत, दुसर्‍या रांगेत असंच बसायला आवडतं.
हुशार असलो, तरी देऊन टाकण्याच्या बाबतीत दिलखुलास
थोडा तापट मात्र, सहज कुणी शेकहँड नाही करू शकणार
मोकळ्या हवेत खेळता येत नाही; सुगंधी (?) निळ्या द्रवातून जगाकडे बघत बसतो टुकुटुकु

मूलद्रव्य आहे का ?हेलियम ऑक्सिजन वगैरे
वर्गातला हुषार विद्यार्थी, मी; पहिल्या ओळीत, दुसर्‍या रांगेत असंच बसायला आवडतं.>> म्हणून मला वाटलं आवर्त सारणी प्रमाणे कि काय Lol

Pages