खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
पण हा पृथक्करण चाच एक प्रकार
पण हा पृथक्करण चाच एक प्रकार असल्याने कृष्णा तुमचं उत्तर बरोबर
माझ्या मनात ऊर्ध्वपातन होतं
माझ्या कोड्याचे उत्तर -
माझ्या कोड्याचे उत्तर - अनुनाद Resonance
तीन प्रकार कुठले? उर्ध्वपतन,
तीन प्रकार कुठले? उर्ध्वपतन, chromatography आणि तिसरं?
त्याला इंग्रजी शब्द
त्याला इंग्रजी शब्द 'एक्स्ट्रॅक्शन' असा आहे..
पण ही म्हणजे चक्क पिळवणूक असते!
विलगीकरण फार तर होऊ शकते जर मिश्रणातील घटक बाजुला करायचे म्हटले तर!
ते उर्ध्वपतन म्हणजे प्रभाजी
ते उर्ध्वपतन म्हणजे प्रभाजी उर्ध्वपतन असे म्हणतात त्याला!
इन्ग्रजी शब्द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन
नाही नाही पृथकरणाचे बरेच
नाही नाही पृथकरणाचे बरेच प्रकार आहेत
उर्ध्वपतन
वाष्पीकरण
क्रोमॅटोग्राफी
चुंबकीय पृथक्करण
आणि अजून बरेच आहेत काय काय
पैकी एक ऊर्ध्वपातन
आणि ऊर्ध्वपातन मध्ये ३ प्रकार आहेत
१ प्रभाजि/प्रभाजी (fractional distillation)
२ निर्वात (vacuum distillation)
३ भंजक (destructive distillation)
सगळ्याला स्वतः स्वतःचे अर्थ
सगळ्याला स्वतः स्वतःचे अर्थ आहेत. त्यातून भाषेचा / भाषांतराचा फरक
पृथक्करण -- याचेच किती तरी अर्थ आहेत. कोडे देणार्याने बरोबर म्हटले की पुढे जाऊया. द्या कृष्णा पुढचे.
(No subject)
हा गती देतो प्रक्रियेला..
हा गती देतो प्रक्रियेला..
४ अक्षरी
उत्प्रेरक // Catalyst
उत्प्रेरक // Catalyst
catalyst?? मराठीत बहुतेक
catalyst?? मराठीत बहुतेक उत्प्रेरक ???
बरोबर!
बरोबर!
मला त्यांनी एका डब्यात घालून
मला त्यांनी एका डब्यात घालून ठेवला,
घट्ट झाकणाचा नव्हता म्हणून सापडेल तो घेतला
मला कोणी चोरलं नाही, खाल्लं नाही, सांडलं नाही
पण प्रत्येक वेळी आधीपेक्षा कमीच दिसतो
कारण मी X X X X X X आहे
मला कापूर वाटलं सुरुवातीला ..
मला कापूर वाटलं सुरुवातीला .. पण ६ अक्षरी हवं ना?
संप्लवनशील??
संप्लवनशील??
Volatile ना?
Volatile ना?
येस्स संप्लवनशील
येस्स संप्लवनशील
स्थायु चे हवेत रूपांतरण
स्थायु चे हवेत रूपांतरण
बरोबर असेल तर अंजली तू दे
बरोबर असेल तर अंजली तू दे पुढचं कोडं
संप्लवनशील बरोबर
संप्लवनशील बरोबर
मी २० मिनिटांनी जाणारे एक
मी २० मिनिटांनी जाणारे एक सोप्प कोड देते
अन्नाशी related अतिशय जटिल अशी रासायनिक प्रक्रिया (५)
उत्तर चयापचय
उत्तर चयापचय
संप्लवन = sublimation
संप्लवन = sublimation
पुढचं कोड?
पुढचं कोड?
३ शब्द. ३-४-४ असे अक्षरी शब्द
३ शब्द. ३-४-४ असे अक्षरी शब्द आहेत. ह्यामुळे हिवाळ्यात थंड प्रदेशातील जलवाहिन्या फुटतात.
पाण्याचे असंगत आचरण.
पाण्याचे असंगत आचरण.
भाचा, बिंगो!!!
भाचा, बिंगो!!!
भाचा, पुढचं कोडं?
भाचा, पुढचं कोडं?
ह्या शास्त्राचा तोल जात नाही,
ह्या शास्त्राचा तोल जात नाही, सगळ्यांना सामावून घेतं.
-----
अजून क्लू हवाय का?
अजून क्लू हवाय का?
ह्यामध्ये छेदून फायदा नाही, फक्त स्पर्शाची भाषा चालते.
Pages