खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)

पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे उदासिनीकरणाची अभिक्रिया झाली की क्षार आणि पाणी तयार होते असं होतं की!
अर्थात टायात्रेषन मध्ये शेवटचा थेंब मोजून अचूक मापन करणे अभिप्रेत असते आणि उदासिनीकरण ही जनरल अभिक्रिया आहे.
अश्विनी के, तुला कसले कसले शब्द आठवतायत!!! भारीच! तुम्ही सगळ्यांनी लिहिलं की अरे हे आपण पण शिकलोय फिलिंग येतंय मला Happy

सगळे विज्ञानाचेच शब्द झाले म्हणून आता काहीतरी वेगळं.
हे असल्याशिवाय स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री शक्यच नसते. **** ** (४-२) . शेवटचा दोन अक्षरी शब्द मोठा करून पाच अक्षरीही लिहितात कुठे कुठे.

दोन शब्द
४ अक्षरी आणि २ अक्षरी

हे जास्त खाऊ नये असं आहारतज्ज्ञ सांगतात

अरे मी टाईप करत असताना अमितवचा क्लू आला

Ownership deed/title deed?

मालकी पत्र /गहाण पत्र?

चिकू यातलं कुठलच नाही.
हे मिळाल्याशिवाय हस्तांतर होउच शकत नाही. स्थानिक महा/नगरपालिका देते हे.

Barobar

दोन शब्द
४ अक्षरी आणि २ अक्षरी
हे जास्त खाऊ नये असं आहारतज्ज्ञ सांगतात

Submitted by पायस on 5 September, 2017 - 23:49

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१७ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

Pages