खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)

पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त नाव लक्षात आहे.
काटकोन त्रिकोणाच्या एकरूपतेचा/ समरूपतेचा सिद्धांत असावा

५ अक्षरी.
' धोपट मार्गा सोडू नको' हा उपदेश जे ऐकत नाहीत त्यांचं हे होतं

माझ्या डोक्यात परावर्तन नव्हतं, वक्रीभवन होतं. ं
वक्रीभवन म्हणजेच अपवर्तन ना? मग अपवर्तन बरोबर.

दोन शब्द. प्रत्येकी ३ अक्षरं. एकाच प्रकारचं एका फळीवर लावून अश्या वेगवेगळ्या फळ्यांची रचना.

सोप्पं आहे.

correct

अगं पण कुठलं ?

मी आपलं एकमस्थान सहस्रस्थान वगैरे आठवत होते. पण कशातच ज बसत नाही.

Physics म्हटले की फार सोपे होईल म्हणून शास्त्र म्हटले. आता बघ विचार करून . सोपे आहे तसे.

Pages