दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्लॅमरस आई गेली Sad
रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सर रॉजर मूर यांना श्रद्धांजली. त्यांनी हसरा आणि मिस्किल बाँड साकारला. त्यांचे बाँडपट पाहताना तणाव दूर होत असे. बाँडमधेय जी फँटसी हवी होती तीच नेमकी त्यांनी आणली.

के पी एस गिल Sad
इफेक्टिव्ह, डिसायझिव

थोर मुस्लिम समाजसेविका श्रीमती मेहेरुन्निसा दलवाई यांचं काल रात्री पुण्यात दु:खद निधन झालं.

हमीदभाई आणि त्यांनी सुरू केलेल्या कामांना, त्यांना अभिप्रेत असलेल्या समाजसुधारणांसाठी केल्या जाणार्‍या धडपडींना यश लाभो ही इच्छा!

लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल ह्यांचे काल निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! Sad Sad Sad
त्यांची " तरुण तुर्क म्हातारे अर्क " मधली भूमिका अजून आठवतेय. ते खूप छान अभिनय करायचे.

ज्येष्ठ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल, अतिशय सहजसुंदर अभिनय असायचा. घायाळ (१९९३) या चित्रपटात एका कठोर बापाची भूमिका त्यांनी केलेली भूमिका अजून आठवते. अशोक सराफ जॉनी लिव्हर यांच्या भूमिकांमुळे अतिशय हसवणारा हा चित्रपट खरेतर विनोदी ढंगाचा आहे. पण तोरडमल यांनी जो गंभीर आणि कठोर स्वभावाचा जो बाप त्यात साकारलाय त्यावरच सर्व चित्रपट तोलला गेला आहे. सहज पण खूप प्रभावी वावर असणारा अभिनेता होता. भावपूर्ण श्रद्धांजली.

मेहरुंनीसा दलवाईंना श्रद्दांजली.

प्रा. तोरडमलांनाही श्रद्दांजली. नाटककार म्हणून ते परिचित तर होतेच पण त्यांनी त्या व्यतिरिक्त केलेले लिखाण मी उशिरा वाचले. एका दिवाळी अंकात शेवटच्या रशियन झार वरचा लेख अजूनही लक्षात आहे.

त्यांची मुलगी शाळेत माझ्या वर्गात होती.

श्रद्धांजली.

चंद्रलेखाच्या नाटकांतला त्यांचा अभिनय लक्षात आहेच, पण फार पूर्वी दूरदर्शनवर कमलाकर सारंगांनी घेतलेली त्यांची मुलाखत खूप आवडली होती हे आठवतं. मी आजवर पाहिलेल्या रंगकर्मींच्या मुलाखतींतली बहुधा सर्वात चांगली मुलाखत असेल ती. अभिनयाचं तंत्र, वेषभूषेचं महत्त्व इ. अनेक (तेव्हा न कळणार्‍या) विषयांबद्दल सारंगांनी खूप छान बोलतं केलं होतं त्यांना. माणूस बहुश्रुत आणि विचारी होता.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना श्रद्धा़जली. उत्तम सामाजिक भाष्यकार म्हणून सर्वांना परिचित असलेले व सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेले व्यक्तिमत्व

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं. आज दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली.

अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यान्नी केलेल्या हल्ल्यात ७ निरपराध यात्रेकरू ठार झाले. Sad

मायबोलीकर जागू हिच्या वडिलांना आज देवाज्ञा झाली. Sad
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली

Dear Jagu,Our hearts are saddened by your loss and our thoughts and prayers are with you.

Pages