दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओम पुरी Sad इन्डियन एक्स्प्रेसमधील बातमीनुसार ओम पुरींचे आज सकाळी निधन झाले. माझे अत्यंत आवडते अभिनेते. अर्धसत्यमधील त्यांची भुमिका केवळ सर्वोत्तम

Om Puri... your shows, dialogs, acting etc are part of our childhood memories Sad RIP

Sad ओम पूरीना श्रद्धांजली! आर्ट फिल्म्स मधला एक उत्तम अभिनेता हरपला. जरी ते कमर्शियल फिल्म्स मध्ये प्रसिद्ध होते तरी त्यांच्या आधीच्या भूमिका:- अर्धसत्य, आक्रोश वगैरे कायम लक्षात रहातील. दूरदर्शनवरील तमस या मालिकेने त्यांना वादात ओढले होते.

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. आज दि. ०६ जानेवारी २०१७ ला त्यांनी आखेरचा श्वास घेतला...

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
Sad Sad

ओम पुरी यांना मी प्रथम पाहिले ते धारावी चित्रपटात जबरदस्त काम मग नंतर त्यांचे जवळपास सर्व चित्रपट पाहिले. . चेहरा चांगला असला तरच मायानगरीत यशस्वी होता येत हा समज ह्या माणसाने खोटा ठरवला. अश्या ह्या अष्टपैलू कलाकारास शेवटचा सलाम
RIP

ओम पुरी.....
छ्या... ६६ म्हणजे फार वय नव्हतो हो त्यांच.
अभिनयातील "दादा"माणुसास पारखे झालो.
इश्वर त्यांचे आत्म्यास सद्गती देवो...

ओम पुरी, यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

प्रथम त्यांना पाहिलं ते 'तमस' मालिकेत. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपट.

६६ म्हणजे फार वय नव्हतो हो त्यांच.>>>>>>>>हो ना! पण आयुष्य संपल्यावर काय? तिथे वयाचा हिशेब नसतोच ना? Sad

ओम पुरी! Sad

सर्वोच्च व उच्च न्यायालयात वकिली करणारे ज्येष्ठ्य वकील टी. अन्ध्यारुजीना यांना विनम्र श्रद्धांजली. पारसी समाजातील वकील रत्नांपैकी हे एक वेगळे रत्न. घटनेच्या मूलतत्त्वांना प्रमाण (झुकते माप) देणार्‍या ज्यांना कॉन्स्टिट्युशनल कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात त्या धारेतील अन्ध्यारुजीना होते. केसवानंद भारती वि. भारत सरकार या स्वतंत्र भारतातील सर्वात महत्त्वाच्या घटनासंबंधी दाव्यावर त्यांनी लिहिलेले पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.

गानसरस्वती किशोरी आमोणकर ह्यांचे ८४व्या वर्षी निधन. Sad लोकसत्तेत आताच बातमी आली आहे.

http://www.loksatta.com/mumbai-news/kishori-amonkar-passed-away-1445492/

"ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना पद्मविभूषण, पद्मभूषण या नागरी सन्मानांनी गौरवण्यात आले होते. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानीत केले होते. सविस्तर वृत्त लवकरच…"

त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली.

Pages