चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी whats your rahis? बघताना हाच विचार करत होते की interval तरी कधी झाला? पुर्ण पिच्चर बोर आहे. झोपेचा त्रास असलेल्याने चार तासात मस्त झोप लागेल असे औषध आहे हा मूवी. गाणी तर एक से एक पकाव. एकही राशीचा गूण मॅच होत नाही असे मला तरी वाटले.
बरेचसे सीन्स अ. आ. प्रकारात मस्त मोडतात.

गोवारीकर साहेबाना मोठे मोठे फिल्ल्म बनवण्याची हौस दिसतेय.
ह्या व्हॉट्स युअर राशी वर उतारा म्हणुन एकहि गाण नसलेला आणि मोजुन दीड तासात संपणारा पिक्चर बनवण्याचा हुकुम दिला असता मी जर सम्राट असतो तर. Happy

अगदीच गंडलाय व्हॉटस योर राशी ... १२ राशीच्या मुली अन जवळजवळ प्रत्येकीसोबत त्या बथ्थड हिरोच एक गाणं, श्श्या वैताग नुसता , पैसे,वेळ वायाच ! मला मोहन गोखलेंची एक सिरियल आठवत होती थोडी थोडी , म्हणजे लग्नासाठी मुली पाहणे बगैरे वरुन तसलीच काही थीम असेल असे वाटले होते म्हणून पहिल्याच दिवशी पाहायचा गुन्हा झाला, इथे रिव्ह्यु वाचेपर्यंत तर वाट पाहायला हवी होती असं आता वाटतय Proud

दीपुर्झा,
मी 'व्हॉट्स युअर राशि ' पाहिला नाही पण मला सुध्दा ट्रेलर पाहून 'मि.योगी' वरून घेतला असणार असं वाटलंच होतं !
त्यात पण मोहन गोखले ची इनिशियल्स वाय्.आय. पटेल होती, यातही हिरो योगेन पटेल च आहे ना ?

'व्हॉट्स योर राशी' पाहण्यापेक्षा लिंडा गुडमनचे 'सन साईन्स' वाचणे परवडेल Happy
हरमन बावेजाला बथ्थड म्हणणे हे आत्तापर्यंतच्या सर्व बथ्थड कलाकारांचा अपमान आहे.प्रदिपकुमार-भारतभूषणपासून विवेक मुश्रन- तुश्शार कपूरपर्यंत सर्वानी बथ्थडपणातही एक ग्रेस,एक स्टाईल दाखवली होती,त्यांना बघून निदान राग,वैताग,असहाय्यता अशा काहीतरी भावना मनात यायच्या,किमान 'उठून याच्या एक कानाखाली वाजवावी' एवढीतरी प्रतिक्रिया आपल्या मनात येईल इतका ताकदीचा मख्खपणा त्यांनी दाखवला.बावेजात तेवढेही नाही.मोबाईल-सिमकार्डचे दुकान चालवणार्‍या सिंध्याची पर्सनालीटी असलेला हा इसम आहे आहे Happy

मोबाईल-सिमकार्डचे दुकान चालवणार्‍या सिंध्याची पर्सनालीटी असलेला हा इसम आहे आहे >>>>>>>>.
तो गरीबांचा ह्रितिक असल्यासारखे लूक्स देतो आणि अभिनय करण्याचा प्रयत्न करतो.

इथे लोकांनी चांगले लिहिलेले पाहून मी 'निशाणी डावा अंगठा' पाहिला. अगदीच सामान्य सिनेमा वाटला. विषय गंभीर आहे पण विनोदी अंगाने दाखवलाय, असेही वाटले नाही. सिनेमा विनोदी आहे असेही वाटले नाही. काही अगदी थोडेथोडके प्रसंग सोडले तर विशेष हसूही आले नाही. बहुतेक करून अश्लील विनोद. ते तरी नवीन आहेत का? तर नाही. तेच तेच घिसेपीटे अश्लील विनोद. प्रेक्षकांपेक्षा ते विनोद करणारेच जोरजोराने हसतात. समलिंगी संबंधांबद्दल विनोद करायचे तेवढे राहिले बघा. नाहीतर सिनेमा सर्वगुणसंपन्न सिनेमा झाला असता.

मकरंद अनासपुरे फार बोर करतो. त्या भरत जाधवला विशेष काम दिले नाही ते बरे केले. नाहीतर तोही डोक्यात गेला असता. शेवटचा हिंदू-मुसलमानचा जो सीन आहे, त्याच्याइतके वेडगळ सीन फक्त भारतीय सिनेमेच करू जाणे. सिनेमाचा वेग चांगला आहे ही एक जमेची बाजू. त्यामुळे अगदीच बोर होत नाही. ते सोडले, तर सिनेमा मला अतिशय साधारण वाटला.

विषयांतरः त्या टिंग्यामधल्या मुलाला बक्षीस मिळाल्याचे वाचून आनंद झाला. त्याने मस्तच काम केले होते त्या चित्रपटात. चित्रपटही चांगला होता.

आगावू,
>>>मोबाईल-सिमकार्डचे दुकान चालवणार्‍या सिंध्याची पर्सनालीटी असलेला हा इसम आहे आहे<<<
तुम्ही हे रेसीस्ट पणे लिहिले आहे ह्याची जाणीव तुम्हाला अजुन कोणी दिली नाही का? तुम्ही लोकांच्या भावना दुखवतात अश्या प्रतिक्रीया नाही आल्या अजुन? Proud

'व्हॉट्स योर राशी?' बघितला आज. महा गंडलेला सिनेमा आहे. पैसे वाया गेले पार. >>>
तपशीलवार अ नि अ चिरफाड करायलाच हवी याची.>>

श्र! होवुन जाउन दे कि मग...

'व्हॉट्स योर राशी?' बघितला आज

>>>
आरं तिच्या? हा पोपट बीबी पार थेटरात पोचला की काय? Uhoh

मोबाईल-सिमकार्डचे दुकान चालवणार्‍या सिंध्याची पर्सनालीटी असलेला हा इसम आहे आहे >> Lol एक नंबर! Lol
मला सुचतच नव्हते, या महापकाऊभाऊचे वर्णन कसे करावे ते. धन्यवाद आगाऊ. Proud

जोधा अकबरपासून वेडा झाला आहे तो गोवारीकर. Uhoh रामूच्याच रस्त्याला लागणार बहूधा हा पण. Sad

मोबाईल-सिमकार्डचे दुकान चालवणार्‍या सिंध्याची पर्सनालीटी असलेला हा इसम आहे आहे >> या अत्यंत जातीयवादी वाक्याबद्द्ल नव्हे तर त्यांची तुलना हरमन बावेजाशी केल्याबद्द्ल समस्त सिंधी बांधवांची मी जाहीर माफी मागत आहे.

आगाउ Rofl

गेल्या २ वीकेन्डला दिल बोले हडिप्पा, व्हाट इज युर राशी, लव स्टोरी २०५०, लव इन नेपाल आणि वाँटेड बघितले (हो तेवढी डेरिन्ग हाय आप्ल्यात Happy ). या सगळ्यात वाँटेड एकदम बेस्ट मुव्ही आहे Happy

व्हाट इज युर राशी बघताना तर आपण कधी सहा महिन्यापूर्वी थेटरात गेलो होतो आणि बाहेर आल्यावर बघतो तर काय... शेजार्यांची रांगणारी बबडी चालायला लागलीय अस काही तरी वाटत Happy

हडिप्पा चे वर्णन तर काय करावे . Only 5 ppl in the history of cricket have managed to hit six sixes in an over- Sir Gary Sobers, Ravi Shastri, Herschelle Gibbs, Yuvaraj Singh and Rani Mukherji Happy

हरमन बावेजाला बथ्थड म्हणणे हे आत्तापर्यंतच्या सर्व बथ्थड कलाकारांचा अपमान आहे.प्रदिपकुमार-भारतभूषणपासून विवेक मुश्रन- तुश्शार कपूरपर्यंत सर्वानी बथ्थडपणातही एक ग्रेस,एक स्टाईल दाखवली होती,त्यांना बघून निदान राग,वैताग,असहाय्यता अशा काहीतरी भावना मनात यायच्या,किमान 'उठून याच्या एक कानाखाली वाजवावी' एवढीतरी प्रतिक्रिया आपल्या मनात येईल इतका ताकदीचा मख्खपणा त्यांनी दाखवला.
----------------------------------------------------------------------------
आगाउ,

जबरदस्त!!!!! Happy Happy Happy Happy

निशाणी डावा अंगठा सीडी विकत घेऊन बघीतला मुर्खासारखा..: राग:

जेवढा गवगवा झाला होता त्याच्या तुलनेत काहीच्या काहीच आहे हा सिनेमा..मकरंद अनासपुरे कंटाळवाणा झालाय. सिनेमावाल्यांनी त्याच्या बोलीभाषेच भांडवल केलंय किती दिवस पुरणार आहे ते Uhoh आणि इथे वैदर्भिय बोलीसाठी अनासपुरे??? थोडक्यात काय जमल नाहीये.

मी परवा गोष्ट छोटी डो.न्गराएवढी पाहीला ..सगळ्याची कामे छान झाली आहेत...कुठेहि अवाजवी खोटेपणा किन्वा अतिशयोक्ती नाहि वाटली.उलटे अन्तर्मुख करायला लावणारा सिनेमा वाटला..अगदी प्रत्येक स.न्वाद मनाला भिडतो..
मक्याचे काम अप्रतिम! नागेश भोसले superb!

मी परवा गोष्ट छोटी डो.न्गराएवढी पाहीला ..सगळ्याची कामे छान झाली आहेत...कुठेहि अवाजवी खोटेपणा किन्वा अतिशयोक्ती नाहि वाटली.उलटे अन्तर्मुख करायला लावणारा सिनेमा वाटला..अगदी प्रत्येक स.न्वाद मनाला भिडतो..
मक्याचे काम अप्रतिम! नागेश भोसले superb!

>>>जेवढा गवगवा झाला होता त्याच्या तुलनेत काहीच्या काहीच आहे हा सिनेमा..

अगदी अगदी...मी पुर्ण सिनेमा बघू शकलेच नाही.

मी पण निशाणी डावा अंगठा पाहिला. बोर एकदम. तसाही मकरंद अनासपुरे डोक्यात जातोच. पण म्हटले एवढे काय आहे म्हणून पाहिला.

गेल्या २ वीकेन्डला दिल बोले हडिप्पा, व्हाट इज युर राशी, लव स्टोरी २०५०, लव इन नेपाल आणि वाँटेड बघितले (हो तेवढी डेरिन्ग हाय आप्ल्यात>>
लगे रहो परविनभाय!!! आपल्यासारख्या तरुणांची आज देशाला फार आवश्यकता आहे!! यातला एक एक सिनेमा म्हणजे एक एक रत्न आहे,विशेषतः लव इन नेपाल आणि त्यातला सोनू निगम सहन करणे याला फार उच्च कोटीची साधना लागते.

काल वेक अप सिड बघितला.... बरा आहे सिनेमा.... स्टोरीबिरीत फार काही दम नाही!
पण टेकिंग फ्रेश आहे... रणवीर मस्त दिसतो आणि कोकणा परत एकदा तिच्या हातखंडा भुमिकेत बाजी मारुन जाते!
एकदा नक्कीच बघणेबल Happy

लव इन नेपाल कधी आला होता??? आणि तो आता का पाहिला/???? डेरिंग आहे म्हणून काय काहीही करायचे का???

लव इन नेपाल मधल्या हिरवेनीचे नाव गूगल न अक्रता सांगा बघू पटकन. Proud

लव इन नेपाल कधी आला होता???
>>२००४

आणि तो आता का पाहिला????
>>नाही पाहिला...

डेरिंग आहे म्हणून काय काहीही करायचे का???
>>ह्यॅट्ट... भलती रिस्क घेऊ नये...

लव इन नेपाल मधल्या हिरवेनीचे नाव गूगल न अक्रता सांगा बघू पटकन
>>फ्लोरा सैनी

Pages