चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदीनी, लव इन नेपाल टी वी वर फुकट येत होता.. शेवटी मी पडलो फ्रीडम फायटर... जे जे फ्री ते ते पौष्टिक, म्हणून बघितला Happy हिरवीण कोण?? मला वाटत होतं की सोनू निगमच हिरवीण हाय म्हनून...अन्क्य न १ ने सांगितलं तेव्हा कळलं फ्लोरा सैनी हिरवीण हाय म्हनून Happy

डू नॉट डिस्टार्ब...

म्हणे फ्रेंच सिनेमाची कॉपी आहे...
पण देशी प्रेक्षकांकरता ही जुन्याच डेव्हिड-गोविंदा सिनेमांची मिसळ आहे...
पण या मिसळीत सतत काहितरी कमतरता जाणवते...
ही कामचलाऊ आहे, परफेक्ट/दर्जेदार नाही...
अभिनय, दिग्दर्शन, नृत्य, संगीत, विनोद... वगैरे सगळ्याच बाबतीत सिनेमा 'साधारण' दर्जाचा आहे... विशेष उल्लेखनीय वगैरे काहीच नाही...
कथा तर फारच घिसी-पिटी...
एखादी गोष्ट एकदा, दोनदा फारतर तीनदा विनोदी वाटू शकेल...
सतत तेच तेच केलं की त्यात काही मजा रहात नाही...
त्यामुळे माझ्यासारखे कट्टर पंखे नसाल तर याच्या ऐवजी डेव्हिड-गोविंदाचा कुठलाही जुना सिनेमा बघा... त्यात नक्कीच जास्ती एन्टरटेनमेन्ट असेल...
इसमे अब 'वो वाली बात' नही...

माझ्याकडून ५ पैकी २ तारे...

वेक अप सिद : ठिक ठिक आहे. स्टोरी काही नविन नाही. मला वाटते होते की आता कहितरी नवीन होइल. पण तेच रटाळ शेवटी हिरोने प्रेमात पडणे आपल्या बेस्ट फ्रेंडच्या वगैरे वगैरे.. फक्त रणबीर कपूर असल्याने व कोकणा मुळे बघायला सुखद नाहीतर तसा प्रेडिकटेबल होत जातो खुपच क्लिअरली नंतर नंतर. Happy

बरं झालं, मी काल तो डु नॉट डिस्टर्ब पाहिला नाही.

त्याऐवजी घरी 'निशाणी डावा अंगठा' हा अप्रतिम सिनेमा पुन्हा पाहिला. Happy

बी,

www.ibollytv.com
इथे जा...

तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील...
वत्सा तुजप्रत कल्याण असो...

मला पण दाखवा ना प्लीज.. कुठे पाहिला तुम्ही? लिंक असेल तर द्या ना गड्या...

>>> बी अशक्य हसतेय हे वाचून Proud

Lol

Rofl

खुशखबर!!!!

व्हॉट इज युअर राशी ची लांबी ११ मिनिटाने कमी केली आहे..

मग्..बघणार ना ३ तास २० मिनिटे बसुन? Happy

आधी पाहिलेल्यांनी परत बघा...
नक्की कोणते सीन्स उडवलेत ते समजून घ्यायला...

अंक्य १
>>आधी पाहिलेल्यांनी परत बघा...
नक्की कोणते सीन्स उडवलेत ते समजून घ्यायला...>>

माझ्या अंगात डेरिंग हाय, पण यवढी पन नाय की राशी परत बघीन Happy

प्रत्येक राशीला एक गाणे आहे ना? ६ किंवा ८ राशीची गाणी उडवली असती तरी ४० मिनिटे कापला गेला असता (समजा ५ मिनिटाचे एक गाणे असेल तर) Happy
मला अजुनही तो (फुकट ऑनलाईनही) बघायची इच्छा होत नाही आहे. एकदा पहायला ठीक आहे का?

मला अजुनही तो (फुकट ऑनलाईनही) बघायची इच्छा होत नाही आहे
>>
मलापण....

त्या हर्मनचे आधीचे दोन्ही सिनेमे पाहिलेत...
हा बघायला लै भिती वाटते आता...

बरे ती गाणी इतकी पकाव आहेत ना की लक्षात पण रहात नाही. दर पोरी बरोबर एक गाणे नी तो मक्ख बावेजा व प्रियांका.. अति बोर आहे. आणि कायच्या काय थाप आहे प्रत्यक राशीच्या गुणाची. ती मीन रास म्हणजे पागल असतात असे दाखवलेय्.(नाही, माझी नाहीये ती रास ..) Happy
वृषभ राशीच्या मुलीबद्दल काय दाखवलेय.. काहीही. थेटरात बघून वेळ घालवला फुकट.

कोणी "ब्लु ऑरेंजेस" नावाचा चित्रपट पाहिला आहे का? सस्पेन्स आहे. आणि चांगला आहे असे लिहिलेय.
ऑनलाईन दिसला नाही कुठे. (आताच रीलीज झालाय)

लोकहो एमिर कुस्टुरिकाचा अंडरग्राउंड बघा कुठे मिळाला तर. ऑनलाइन/ टोरेन्ट/ दुकानात/ टिव्हीवर कुठेही.. मस्ट वॉच. अप्रतिम आहे.
याच दिग्दर्शकाचा 'ब्लॅक कॅट व्हाइट कॅट' बर्‍याचदा लागतो वर्ल्ड मूव्हीजवर.

आस्मानी,
त्या लिंक वर हल्ली एक अ‍ॅड स्क्रीन येतो दर वेळेस त्याला वरती उजव्या कोपर्‍यात स्किप धिस अ‍ॅड वर क्लिक करावं लागतं...
तसंच कुठलाही सिनेमा हा नव्या विंडो मधे सुरू होतो...
त्यामुळे पॉप-अप्स ब्लॉक्ड असतील तर या साईट पुरते सुरू करावे लागतील...

नाही रे प्रवीण मी अ‍ॅसिड फॅक्टरीच पाहीला , त्यात सगळ्या हिरोना ( ???) गॅसच्या इफ्फेक्ट्मुळे काहीच आठ्वत नाही , एकदम बकवास वाटला म्हणुन पुर्ण पाहिलाच नाही.
वेक अप सिद चांगला ,हलका फुलका वाटला , मेंदुला जास्त कल्हई नाही . Proud

एक स्फोटक विधान

मला 'वेक अप सिड' पेक्षा 'वॉट्स योर राशी' बरा वाटला...

सुरवातीचा फुटकळ भाग आणि गरज नसलेले डिटेक्टिव्ह/भाई सबप्लॉट्स सोडले तर १२ राशीच्या १२ मुलींना बघण्याचे १२ सीन्स (गाणी वगळता) छान जमले आहेत...
(पुनर्जन्म वाल्या सीन मधली मागच्या जन्माची कहाणी जरी 'कुछ ना कहो' मधून जशीच्या तशी उचलली असली तरी...)
हा सिनेमा खूप छान करता आला असता...
अनावश्यक गाणी आणि सबप्लॉट्स ना कात्री लाऊन मुख्य कन्सेप्टवर फोकस ठेवला असता तर सिनेमाची लांबी ही कमी झाली असती आणि तो अधिक रंजक झाला असता...

माझ्यामते केवळ ग्लॅमरस चॉकलेट हीरो आणि हाईप्ड हिरोईन या भांडवलावर सिड लोकप्रिय होतोय...

तसं पहायला गेलं तर दोन्ही सिनेमे उन्नीस बीसच आहेत...
पूरे सौ मुळीच नाहीत...
पण माझ्या मते सिड उन्नीस आणि राशी बीस आहे...

माझी मतं ही बहुसंख लोकांच्या मतांच्या विरुद्ध आहेत...
असेनातका...

'वॉट्स योर राशी' मला पण बरा वाटला... मंगळ आणि सगळ्या ग्रहांची शांती अशी पण होऊ शकते Proud

जय श्री कृष्ण

'ऑल द बेस्ट' सिनेमा आणि मराठी नाटक 'पती सगळे उचापती' ची कथा सारखीच आहे...
(मूळ इंग्रजी नाटक राईट बेड राँग हजबंड ची कॉपी)

कुलदीप पवार च्या रोल मधे संजय दत्त आणि चेतन दळवी च्या रोल मधे अजय देवगण...

आजच 'बयो' चित्रपट बघितला. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला व विक्रम गोखले, म्रुणाल कुलकर्णी, श्रेयस तळपदे, म्रुण्मयी लागू यांची भूमिका असलेला हा चित्रपट आवडला.
चित्रपटाची कथा म्हणजे कोकणातील एका खेड्यातील बयो व तिचे तिच्या विश्वनाथाची वाट पाहत त्याला न चुकता न कंटाळता पत्र लिहिणे. विश्वनाथ शिक्षणासाठी म्हणून लंडनला गेला असतो. या पत्रांची तिला कधीच उत्तरे मिळत नाहीत पण एका वेड्या आशेवर ती पत्र लिहीणे चालूच ठेवते.
लंडन येथे जो पत्ता विश्वनाथचा असतो तेथे आत्ता राहणार्‍या म्रूणाल कुलकर्णी , ज्या लेखिकाही आहेत, यांना ही पत्रे मिळतात व या पत्रांतून बयोचा पूर्ण भूतकाळ त्यांना उलभेटतात. त्या भारतात येवून बयोला भेटतात व तिच्याकडून पूर्ण कहानी ऐकून 'बयो' या नावाने पुस्तक लिहितात.
पुढे बयोचे काय होते, बयोला विश्वनाथ मिळतो का आदि उत्तरांसाठी चित्रपट पाहावे.

बाकी भास्कर चंदावरकर यांचे सुंदर संगीत व कोकणाचे सुंदर चित्रीकरण या विशेष आवडलेल्या गोष्टी. सर्वांचा अभिनयही चांगला झालाय.

सध्या प्रदर्शीत झालेले तिनही चित्रपटांचे परीक्षण ऐकूण हे चित्रपट पहावेत की नको या विचारात आहे.

वेक अप सिद आणि वोट्स युवर राशी, बंडल पिक्चर्स एकदम .. त्यापेक्षा सलमान चा wanted परवडला.. Proud ,
All The Best जे कुणी पहाणार असतील त्याना माझ्याकडून All The Best Happy

Pages