आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६६८.

मराठी

अ क र क म त
ल त फ प

य ब ह अ
म ल घ ज द
अ स द व द व न
ज द स ज द

कृष्णाजी, तुमची परवानगी असेल तर मी कोडे देऊ का?>> अहो परवानगी काय?

द्या तुम्ही पण! मी आता पाहिला मेसेज! Sad

तुमचे पण द्या कोडे! Happy

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडीगोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हाती
याचा बोभाट होईल उद्या
मला लवकर घराकडं जाऊ द्या

६६९.
भय भंजना वंदना सुन हमारी
दरस तेरे माँगे ये तेरा पुजारी

येस Happy आता चालु द्या तुमचं मी थोडावेळ बिझी बिझी

६७०

मराठी

र क घ क य ह क व म
ब क ब क ग म अ क व म

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥

६७१ मराठी (२०१०-२०१७)
अ झ ह ज अ भ
ढ क अ व अ ग

पास!
आज बहूतेक मी फकस्त प्रेक्षक असणार आहे..

चावी???
सिनेमा,नायक्,नायिका, याबद्दल काहि कलेल का???
क्लु इतरान्च्या कामी येईल.. मेबी माझ्या पण.. Uhoh

पन्दितजी.. किथ्थे हो... Uhoh

चावी???
सिनेमा,नायक्,नायिका, याबद्दल काहि कलेल का???
क्लु इतरान्च्या कामी येईल.. मेबी माझ्या पण.. >>> मिळणार सगळ मिळनार
१) ह्यात खूप गोड दिसनारी नायिका भूत आहे जिने खूप टाईमपास पण केलय
२) केतकी माटेगावकर मोठी झाली की ही नयिका बनते
एवढे पुरेसे आहे बहुतेक.

भरूनसे
गळूनसे>>>> Lol

सगळे ओळखतात ...मी सोडून..

६७२.

पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
आले मनात नवखे उमलून भाव सारे

आजकाल फक्त वाचनापुरतं याव लागतंय ह्या धाग्यावर! सगळेच तरबेज झालीयेत कोडी सोडवण्यात! छान, मस्त !!! Happy
माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. गूड लक.

Pages