आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन बरेच नायिका प्रधान चित्रपट आलेले! त्यातिलच हा एक!

आता लिहतो गाणेच एक भेंडी सर्वांवर! Happy

आता लिहतो गाणेच एक भेंडी सर्वांवर!>>. हे छान आहे तुमचं...लगेच भेन्दी...
मला तर ते चानी,सासू वरचध जावई हेच माहिति आहे ब्वॉ!

पन्दितजी....कुथे आहात???

चित्रपट : सुशिला
नायिका: रंजना
गाणे चित्रीत : अशोक सराफ
गायक : सुरेश वाडकर

अरे विचार खोटा आचार खोटा
अरे खोटी दुनियादारी
खोटे तराने खोटे बहाने
खोटी दोस्ती यारी
अरे इस दुनियामें जीना है तो
मस्त मजे में जीना रे
जीवन इसका नाम है प्यारे
तुझे है आगे चलना रे

अरे बापरे!!!
तुम्हीच द्या...कोणालाच आलेलं नाही ना..

ओके मी देते Happy ... सोप्प आहे..

कोडे क्र.:६६४
(हिन्दी)(२०१० नन्तर)
म ह त ह ब न स
च ह म क क ल स

भेंडी काय घेतलीत....वेळ मागायचा ना थोडा>>>

अहो त्या वेळ मागायचा सोडून सिनेमाचे नांव, हिरो, हिरॉईन, इ इ मागत बसल्या! आता गाण्याचे शब्दच विचारतील म्हणून मी गाणे लिहले! Wink

कोडे क्र.:६६४ उत्तर
मिले हो तुम हमको
बडे नसीबों से
चुराया है मैने
किस्मत कि लकीरो से

काय हे कावेरि....भेंडी काय घेतलीत....वेळ मागायचा ना थोडा
मला नेमका आज उशीर झाला>>> म्हणजे तुम्हाला येत होतं हे गाणं....अहो आम्हाला कोणालाच येइना..म्हणून..
आणि त्यात क्रुश्नाजींचे क्लु माझ्या डोक्यावरुन जातात...
ते म्हणे..
नायिका गाजलेली आहे Lol
काय बोलणा र यावर...

पन्दितजी तुस्सी सच्ची मे ग्रेट हो.. Happy
द्या आता.. .सोप्प द्या हं.. अवघड असेल तर पटकन माझ्या कानात मुव्हिच नाव सान्गा.. Proud

अहो त्या वेळ मागायचा सोडून सिनेमाचे नांव, हिरो, हिरॉईन, इ इ मागत बसल्या! आता गाण्याचे शब्दच विचारतील म्हणून मी गाणे लिहले!>>> क्रुश्नाजी Lol सर्वांना असेच वाटतं..

अहो,पहा स्निग्धा ताईंना पण माहिती नव्हतं हे गाणं...
मला माहित असण्याचा प्रश्नच येत नाही ना मग..

कृष्णाजी, हे तुमच गाणं माहिती नाही मला, कधी ऐकल्याच पण आठवत नाहिये Sad>>

सुशिला चित्रपटातल्या 'सत्यम शिवम सुंदरा' आणि 'कुण्या गावाचं आलं पाखरू' ह्या दोन गाण्या इतके नाही पण बर्‍यापैकी हे गाणे गाजलेले त्यावेळी!

जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे! ह्या ओळीनेच ओळखू येते चटकन...

पन्दितजी तुस्सी सच्ची मे ग्रेट हो..>>>थेन्कु
द्या आता.. .सोप्प द्या हं.. अवघड असेल तर पटकन माझ्या कानात मुव्हिच नाव सान्गा.. >>>द्या तुमचा कान

अल्बम ????
पास...
हे अस अल्बम दिसलं ना..मला लैच वाईट वाटतं... Sad

कॄष्णा, कावेरि, स्निग्धा....
मलाही तोंडपाठ माहीत नव्हते...पण शोधले असते step by step
बाकी काही नाही.
महेश कोठारे... opt out कारण बेर्डे / सराफ इतका फेमस नाही
अशोक सराफ म्हणजे रंजना पहिला पर्याय नायिकेचा
ल. बेर्डे म्हणजे वर्षा उ / प्रिया अरुण इ. इ.
नायिका प्रधान सिनेमा मधे वर्षा उ / प्रिया अरुण क्वचितच
मग रंजना रडारवर.... असे...

मी इथे जेवताना / चहा घेता घेता किंवा रात्री येते. काल नाही आले.
कधी थोडा वेळ असते, कधी थांबते जास्त. सलग नसते. त्यामुळे मिस झाले हे कोडे

Pages