आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा, सिनेमा आणि गाणे जुळत असेल तर, गायिकेच्या क्ल्यूमधे बदल होइल का?
मला त्यांची कौटुंबिक माहिती नाही फारशी. सोन्याची कोकिळा आहे नं?

मुव्ही: मुकद्दर का सिकंदर(१९७८)
कास्ट : अमिताभ्,विनोद खन्ना,रेखा,राखी

वफा जो ना की ,तो जफा ना किजिये...

गायिका: हेमलता

थान्कु कारवी ताई Happy

क्रुश्नाजी,जरा असे क्लु द्या की... निशेध..
किती छळा मेरेकु.. Sad

कोडे क्र.: ६६७ (हिन्दी)(२०१० नन्तर)
अ र ज म प क ल
द स र ब क ल
स न प त श क ल अ ल ल क ल
ब ब ब...

घ्या मेन्दूला व्यायाम... Happy

हे गाणं क्रुश्नाजींनीचं ओळखायचं आहे...
क्रुपया त्यान्ना मदत करा..

तुम्ही साल सांगितले तर व्यायाम करायचा की नाही ठरविता येईल ना! >>. ये तो नाइंसाफी है ना...
मी जुनं वालं पण शोधण्याचा प्रयत्न करते ना???
हेच पटतं नाही मला तुमचं Angry

पन्दितजी लगेच ओळखतील..
पण त्यान्ना १ रिक्वेस्ट आहे..प्लिज क्लु सान्गा..पण गाण लगेच सान्गू नका...हे गाण क्रुशनाजींनीचं ओलखायचयं( लिरिक्स वाचून क्रुश्नाजीं चा चेहरा पाहण्यासारखा होईलं).. मला काही माहीत नाही बाकिचं.. Happy

थोडीशी गम्मत म्हणून हे गाणं देलेले आहे...याची नोन्द घ्यावी...
नाहितर लगेच ओरडायला सुरुवात कराल...

हे गाण क्रुशनाजींनीचं ओलखायचयं >> हे ठीक आहे
पण साल हवे ना.... शब्द कसे अंदाजायचे नाही तर....
ओळखा कृष्णा.... मग आपण पार्टी घेऊ तिच्याकडून

बरं.. काम सोप्प करते..
नेहमीप्रमाणे.. २०१० नन्तर..(२०१७ नाही)

४ वर्षे कमी केलेली आहे..

हे घ्या...मी तुम्च्याच बाजूने आहे हो...
१)गायक फेमस आहे...
२) गायिका विचारात घेउ नका(गायकानेच गायल आहे)..
३)मुलाच्या प्रेमाखातर वडील गरिब बनून राहतो..

पन्जाबी शब्द आहेत..
अजून एक मी कुठलीही तळागाळातली गानि देत नाही कधी...फेमसवालीचं असतात...
याचीही नोन्द घ्या..

मी नविन सिनेमे पाहिलेले नाही>>> अहो,मी काय लिहिलय फेमसवाली गानी ना...
मग यियर बाय यियर गाणी शोधा ना... टॉप ५० मधेच असतात माझी गाणी...
बाय...
Good Luck! Happy

कृष्णा, ६६७ बद्दल कावेरिंचे क्ल्यू एकत्र करून --
१. २०११-२०१६, फेमस
२. पुरूष गायक -- तिच्या लिहिण्यात अरिजित सिंग आणि कोणीतरी मिका पाजी नेहमी असतात. तेच असतील तर ज्याची हिंदी-पंजाबी गाणी जास्त तो बघावा लागेल.
३. हल्लीच्या नवीन गाण्यात शब्द रिपीट होतात. सगळ्या ओळी क ल ने संपत आहेत. ते सगळे कलकलाट सारखे असणार....
कसम लो/ले/ली, कर लो/ले/ली, कह लो/ले/ली, काट लो/ले/ली, .... असे काहीतरी. शेवटचा ब ब ब पण एकच शब्द असावा बहुतेक.
४. ( लिरिक्स वाचून क्रुश्नाजीं चा चेहरा पाहण्यासारखा होईलं).. मला काही माहीत नाही बाकिचं.. Happy
थोडीशी गम्मत म्हणून हे गाणं देलेले आहे...याची नोन्द घ्यावी...>>>> गाणं वाह्यात / आयटेम सॉन्ग असावे.
५. ३)मुलाच्या प्रेमाखातर वडील गरिब बनून राहतो..>>>>> सिनेमा माहीत असला तर याचा उपयोग..

बघूया काय गीत-रत्न निघते...
शुभेच्छा.

कारवी ताई ग्रेट जॉब! Happy
मानलं तुम्हाला... (तुम्ही दिलेल्या नावापैकी एक माझा फेवरेट)
मी अजून सोप्प केलं होतं ....पण तिकडे कोणी लक्षचं दिलेले नाही...
पन्दितजी कुठे गायब झालेतं...त्यान्ना ही येत नाही का???

गाणं वाह्यात / आयटेम सॉन्ग असावे.>>> अस म्हनू नका... छान आहे... फक्त लिरिक्स भयानक आहे(तुमच्या साठी)...

आणि हो क्रुश्नाजी लिरिक्स देवनारिमधेही उपलब्ध आहे..त्यामुळे तेच लिहा... रोमन मधील इथे चकटवू नका...

आज रात जाना मैनु प्यार कर ले
दुनियासे सारे रुल ब्रेक कर ले
ओ सड्डे नाल पुरे तेरे शौक कर ले..

बुम बुम बुम

क्रुश्नाजी करेक्ट! Happy
कसे ओळखले???

प्लिज प्लिज सर्वांनी क्रुश्नाजींनीसाठी जोरदार टाळ्या वाजवा.... Happy

हेच गाण मी काय ऐकताय? या धाग्यावर काल लिहुन गेले होते... पण तुम्ही पाहिलचं नाही..

आज रतं जाना मैनु प्यार कर ले
दुनिया दे सारे रुल्स ब्रेक कर ले
ओ सड्डे नाल पुरे तेरे शौक कर ले.. आजा लिप लॉक करले...
बुम बुम बुम

हे असं आहे..

क्लु:
१)गायक - मिका सिंग
२)मुव्ही- अजब गजब लव्ह...

कसे ओळखले???>>>

ब ब ब असे काही गाणे शोधावे लागले
तुमच्या अत्यंत आवडत्या गायकांचे!
कधीही न ऐकलेले गाणे..

आणि तसेही ह्या वाद्यवृदांच्या गदारोळात शब्द महत्वाचे नसतात.. आणि तसेच हे गाणे पण बुम बुम बुम वरून ओळखले जात असावे असावे! अंदाज..

तुमच्या अत्यंत आवडत्या गायकांचे!>>. तुम्हाला काय माहीत ते कोण आहेत ??

मी लिहिले होते ना तिकडे ...पहायचं ना...

हभिनंदन कृष्णाजी, चला म्हणजे कावेरीची कोडी सोडवणार्‍यामधे आता तुमचाही नं. लागला Wink ७-१७ पास म्हणणारी मी एकटीच राहीले कि काय Uhoh

छे छे! मी पण ७-१७ पास वालाच!
हे न ऐकलेले गाणे मीच लिहायचे बाकीच्यांनी केवळ मदत करायची ह्या नियमावलीत असल्याने सोडवावे लागले! Wink

तुमच्या अत्यंत आवडत्या गायकांचे!>>. तुम्हाला काय माहीत ते कोण आहेत ??>>>

तुम्हीच लिहलयं ना वर <<<<< मानलं तुम्हाला... (तुम्ही दिलेल्या नावापैकी एक माझा फेवरेट)>>>>

Pages