Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून एक, शास्त्र शाखा असलेलं
अजून एक, शास्त्र शाखा असलेलं कॉलेज सुरू करणं तसं खर्चिक असतं. लॅब वगैरे गोष्टी दाखवायला लागतात त्यामुळे सगळीकडे शास्त्र शाखा नसते. कला आणि वाणिज्य शाखांचे कॉलेज काढणे सोपे असते.
परश्या मनापासून काम करतो की नाही ह्याला खरंतर काही महत्व नाही. केवळ आधी त्याने गॅरेज मध्ये हात काळे केलेले असतात म्हणून तो नंतर गाड्यांच्या दुकानात नोकरी घेतो आवड म्हणून नाही. आवड म्हणाल तर त्याला कविता करायला आवडतात, क्रिकेट आवडतं!
दिनेशदा, तुम्हाला इतके प्रश्न पडताहेत हेच सिनेमाबद्दल त्याच्या प्रभावाबद्दल बरंच काही सांगणारं आहे असं मला वाटतं!
>>>>>ज्याला पुढे आर्थिक कमाई
>>>>>ज्याला पुढे आर्थिक कमाई करुन घरच्या खर्चाला हातभार लावायचा आहे तो सहसा कलाशाखेकडे जाणार नाही. ( हे माझे वैयक्तीक मत. बारावीला कलाशाखा असेल तर पुढेही तीच शाखा घ्यावी लागेल,
हे कळण्याइतपत माझे शिक्षण झाले आहे.)<<<<<
आजही गावातली वाढलेली बरीच मुलं बीकॉम आणि बीए "च" ज्यास्त करतात. त्यात आर्थिक वगैरे कारण हेच असते की खर्च कमी आणि अक्कल कमी असली तरी चालते. सर्व साधारणपणे विज्ञान शाखे बद्दल असेच विचार असतात, अबब, खर्च करून कोणाला डागदर व्हायाचय. त्यात कसंबसं शिक्षण करून शेतीची कामं आवरायची किंवा घरी शेती सांभाळायची किंवा शिक्षक किंवा गवर्मेंट मध्ये कारकून ज्यास्तीत ज्यास्त असा विचार असतो. गावच्या कोणाही मुलांशी बोलोइन पहा.
बाकी बरबर् काही नंतर,
दिनेश +११११
दिनेश +११११
खरंच सैराट फक्त एकदा पाहण्याच्या पात्रतेचा सिनेमा आहे.
अहो तो नुसता फोन करत नाही तर
अहो तो नुसता फोन करत नाही तर सल्या आणि लंगड्या त्यांना भेटायला पण आलेले असतात. त्यांचे फोटोही दाखवलेत शेवटच्या सिन मध्ये. प्रिन्स फोटो अल्बम बघत असतो तेव्हा. घरी फोन करत नसावा कारण त्यामुळे घरच्यांना फार नामुष्की पत्करावी लागली असणार आणि ता भीतीने कदाचित.
सायन्स ला जायला पैसे कोण देणार? त्या पेक्षा कला शाखेला काम करून शिकणे शक्य आहे
ढोलकी पाहिला , ह्या सिनेमाचा
ढोलकी पाहिला , ह्या सिनेमाचा कसलाच गाजावाज नाही म्हणुन बघायचा टाळत होतो पण शेवटी पाहिला , मस्त टाईमपास आहे, सिद्धार्थ जाधव त्याच्या नेहमीच्या मुडमध्ये आहे, सयाजी शिंदेची कॉमेडी आवडली , कश्मिरा नावाची हिरोईन आहे मध्येच ग्रामीण बोलते मध्येच शहरी स्टेशन लागत पण ठीक आहे. मानसी नाईक एकदम मस्त , दिसते भारी , नाचते भारी आणि हावभाव पण भारी , पण लावणीवर नाचताना मध्येच आयटम करते की काय वाटत. पण ओव्हरऑल सिनेमा मस्त आहे . एकदा नक्कीच बघण्यासारखा.
तुम्ही सैराटला कितीबी नावं ठेवा पण सैराट म्हंजी सैराटच
दिनेश. :: तुमच निरीक्षण
दिनेश. :: तुमच निरीक्षण चांगल आहे.. पण
"बारावीला ७२ टक्के मात्र असून तो कलाशाखेत का ?" हा प्रश्न आणि त्याच विश्लेषन योग्य नाही वाटल..
"ज्याला पुढे आर्थिक कमाई करुन घरच्या खर्चाला हातभार लावायचा आहे तो सहसा कलाशाखेकडे जाणार नाही. "
---
"बारावीला ७२ टक्के मात्र असून तो कलाशाखेत का ?" >>>>>
या ठिकाणी "कला" (Arts) शाखा हि दुय्यम व "सायन्स" वा "कॉमर्स" उत्तम असण्याच तुम्ही सुचीत करता आहत..
एकुणच कोणतेही शिक्षण हे एका पेक्षा दुसर दुय्यम अस केव्हाच नसत अस मला तरी वाटत.. पहा पटत असेल तर विचार कराव हि विनंती
"ज्याला पुढे आर्थिक कमाई करुन घरच्या खर्चाला हातभार लावायचा आहे तो सहसा कलाशाखेकडे जाणार नाही. "
>>>>>
हे नाही पटल... तसाही कोणत्याही शाखेचा विद्यार्थी पुर्ण शिक्षण झाल्याशिवाय आर्थिक कमाई करण्यास जाणार नाही (पार्टटाइम जॉब खेरीज).... आणि जर लवकरच आर्थिक कमाई सुरु करायची असेल तर आय टी आय हा उत्तम पर्याय अस मला वाटत...
तुम्ही सैराटला कितीबी नावं
तुम्ही सैराटला कितीबी नावं ठेवा पण सैराट म्हंजी सैराटच >>>>
श्री पुर्ण सहमत तुझ्या या वाक्याशी.... तुझ्या या वाक्याला एक हाजार एक्शे आकरा लाइक्स
ओके जानु पाहिला का कुणी? कसा
ओके जानु पाहिला का कुणी? कसा आहे?
सैराटचा पहिला भाग मी
सैराटचा पहिला भाग मी कित्येकदा पाहिलाय आणि अजून कित्येकदा आरामात पाहू शकते. एक वेगळीच निरागसता आहे पहिल्या अर्ध्या भागात. त्यामानाने दुसरा भाग थोडा कंटाळवाणा वाटतो. शेवट आला की वाईट वाटायला लागते.
मी पूर्ण सैराट एकदा आणि पहिला
मी पूर्ण सैराट एकदा आणि पहिला अर्धा भाग नंतर पन्नासएक वेळा पाहिला आहे.
मी पूर्ण सैराट एकदा आणि पहिला
मी पूर्ण सैराट एकदा आणि पहिला अर्धा भाग नंतर पन्नासएक वेळा पाहिला आहे. >>> दे टाळी फा
मी पण नेटफ्लिक्स वर परत
मी पण नेटफ्लिक्स वर परत पहिलाच भाग पाहु शकले, दुसरा भाग नाहि पण ५० वेळा वैगरे नाही बघु शकणार , सैराट बर्याच दिवसानी रिपिट बघताना पहिल्या इतकी मजा नाही आली, त्यामुळे सुपरहिट असला तरी कालातीत वैगरे नाही , बनवाबनवी मी आजही परत (कितव्यादा तरी )पाहु शकते , रिसेन्ट मधे वळु , देउळ ,निडाअ सुधा रिपिट बघायला मजा येते.
गाणि मात्र आजही रिपिट मोड मधे कितिहीवेळा एकु शकते.
अरे बस करा कि सैराट !! एक
अरे बस करा कि सैराट !! एक धागा ऑलरेडी आहे ना त्यासाठी ?
(मला सैराट आवडला आहे )
एक नुम्बेर पिच्चर आह्जे ...
एक नुम्बेर पिच्चर आह्जे ... होउ दे चर्चा ... अजुन एक धागा उघदा ... तीन धगे पन कमि पद्तिल...
मिशन इम्पॉसिबल ४ संपुर्ण
मिशन इम्पॉसिबल ४ संपुर्ण चित्रपटात अनिल कपूर जेव्हढा वेळ दिसला तेवढ्या वेळेपेक्षा जास्त तर दिपिकाचा सर्वात छोटा सीन " ट्रिपल एक्स" चित्रपटात आहे.
हॉलिवूडच्या एका चित्रपटात सर्वात जास्त वेळ दिसणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणून दिपीकाची ओळख पुढे होईल.
दिनेशदा, भविष्यात सरकारी
दिनेशदा, भविष्यात सरकारी नोकरी हवी असेल तर बरेचजण कलाशाखेचा पर्याय निवडतात. माझी मैत्रिण व तिचा भाऊ दोघेही नेहमी पहिला दुसरा नंबर आणणारे, आम्ही ८-९ वीला असल्यापासुनच त्यांचा फोकस सरकारी नोकरीवरच होता. १० वीला दोघांनाही ७५ + टक्के मिळाले आणि त्यांनी कलाशाखा निवडली. आता दोघेही सरकारी नोकर आहेत असे समजलयं. तसेच माझे जे नातेवाईक रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये काम करतात तेपण कलाशाखेतुनच पदवी झाले आहेत.
त्यामुळे कदाचित कलाशाखा = सरकारी नोकरी असा समज असु शकेल, म्हणुन आपला परश्या गेला कलाशाखेत.
मुंबईत कॉलेजात कला शाखेला
मुंबईत कॉलेजात कला शाखेला मुलगे अत्यल्प संख्येने असतात. तेच मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व खुल्या शिक्षण विभागाच्या (डिस्टन्स & ओपन लर्निंग) कला विभागाच्या पदवी परीक्षांना मुलगे भरपूर असतात. इतिहास आणि राज्यशास्त्र घेतलेले जास्तच. बहुतेक जण पेपर मराठीतूनच लिहितात. हे कुठेतरी काम करत शिकत असतात. पुढे सरकारी नोकरी हेच लक्ष्य असतं.
'ती सध्या काय करते' YouTube
'ती सध्या काय करते' YouTube वर आहे. मला आवडला.
मिशन इम्पॉसिबल ४ संपुर्ण
मिशन इम्पॉसिबल ४ संपुर्ण चित्रपटात अनिल कपूर जेव्हढा वेळ दिसला तेवढ्या वेळेपेक्षा जास्त तर दिपिकाचा सर्वात छोटा सीन " ट्रिपल एक्स" चित्रपटात आहे.>> +१ दिपस्त...
मला स्वतःला अनिल कपुर एखाद्या रईस व्यक्तिच्या भुमिकेत अज्ज्याब्बात आवडत नाही..त्यात समोर टॉम क्रुझ.. एखादा दुसरा हिरो नै का सापडला त्यांना घायला... असो...
दिपिकाचा बराच मोठा पार्ट आहे ना ट्रिपल एक्स मधे...
आणि बेवॉच मधे आपली पिसीपन मोठ्या रोल मधे आहे ठिकठाक.. ग्रे शेड आहे वातत तिच्या रोल ला.. प्रोमोमधे वाटल.. असो...
"बारावीला ७२ टक्के मात्र असून तो कलाशाखेत का ?" >> या प्रश्नावर लिहिते लिहिते म्हटल पण राहुनच गेलं..
कसय ना दा.. सहसा खेडेगावात पोरं आर्ट्स ला पहिली पसंती देतात.. त्यानंतर कॉमर्स अन त्यानंतर विज्ञान. त्यामुळे सारी टॉपर पोर कला शाखेत, अन उरले सुरले बाकी शाखेत असा हिशोब असतो.. हे मी माझ्या खेडेगावातील बर्याच भावंडाना बघुन विचारपुस केल्यानंतर बोलतेय.. हि हारारकी मलापन पहिले विचित्र वाटली होती पण जिल्हा परिषद अथवा आश्रमशाळेसारख्या ठिकाणी बेसिक शिक्षणाची क्वालिटी खुपच खालावलेली असते. अशावेळी त्या पोरांना ७० ७५% मार्क पडुनही त्यांना वाणीज्य अन् विज्ञान शाखेत शिक्षण घेण खुप अवघड जातं..
म्हणुन खेड्यातली हुशार पोरं तुम्हाला कला शाखेत जास्त दिसतील...
But the soul of sairat is
But the soul of sairat is true love. That unbearable attachment to ones lover. The desire to do anything and conquer all difficulties or die trying . To be with ones lover despite al earthly obstacles. Xan ek pure premAcha. Varshaw pado maranancha. Slightly more intense than ...;)
ती सध्या काय करते ' बघितला.
ती सध्या काय करते ' बघितला. मुं पु मुं आणि प्रेमाची गोष्ट नन्तर सतीश राजवाडे कडून खूप अपेक्षा होत्या.
अंकुश चा मर्यादित वकूब आणि एकसुरी अभिनय जाणवत राहतो . कुठेच त्याची तगमग , घालमेल आपल्याला भिडत नाही. तेजस्वी ने कृत्रिम अभिनयाचा कळस केला आहे.शेवटच्या गच्ची च्या प्रसंगात तर तिने कृत्रिम हसण्याचा कहर केलाय. आर्या आंबेकर ने गाणीच म्हणावीत. अभिनय बेर्डे च्या फक्त नावातच अभिनय आहे.
' ती सध्या काय करते '
' ती सध्या काय करते ' प्रचंssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssड आवडला !
ति सध्या पहिल... खूप मस्त आहे
ति सध्या पहिल... खूप मस्त आहे... अर्या चि अच्तिन्ग खरच मस्त आहे.केतल्क्कि मतेगव्कर पेक्शा खूप चन्ग्लि...
अजुन अच्तिन्ग केलि पहिजे तिने ... लहन जोदि तुफान आहे... अन्कुश ने मस्त अभिनय केला आहे... जुनिओर लक्श्ये पन उत्तम...
च्लिमक्ष जमला आहे...
च्रप्स, तुमच्या नावाप्रमाणेच
च्रप्स, तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही लिहिलेलं वाचणसुद्धा अवघड जातय.. अनुस्वार नाही देता येत, ज्ञ नाही लिहिता येत येथवर ठिक पण आपण नॉरमल मॅसेजेस टायपतो तसे जरी पूर्ण स्पेलिंगसहित लिहिले तरी थोड आणखी लेखन सुधारेल..
ती सद्ध्या काय करते ठिक वाटला मलातरी.. अंकुश, आर्या आणि अभिनय बरे आहे.. बाकी इतक्या लहान वयात लाईन मारण्याची अक्कल कशी येऊ शकते हे मात्र मला कळलं नाही...
आता जॉली एलएलबी २, जॉन विक २ आणि हरामखोर या तीन सिनेमाची वाट आहे..
रच्याकने कुणी बाहुबली द कन्क्ल्युजनच पोस्टर पाहिल का? छाने...
हरामखोर मागच्याच आठवड्यात
हरामखोर मागच्याच आठवड्यात रिलीज झाला.
माहितीए... मला बघायला मुहुर्त
माहितीए... मला बघायला मुहुर्त अजुन नाही सापडला म्हणुन लिस्टित आहे तो..
तीना ... लहन वयात लयिइन नाहि.
तीना ... लहन वयात लयिइन नाहि... एक अत्त्रेक्शन नक्किच असते ... आनि प्रत्येकच शलेत एक तरि मुल्गि असतेच जि त्यला अवदत असते ...
ज्ञ लिह्ता येतोय . ब्रोसेर ला द (दफलि मध्ला ) आनि त (तमातर मद्ला) कलत नहिय...बरेच शब्द नीत लिहिले जतत ... कहि शब्द गन्दतो ... मन्य आहे सध्या अवघद जतय वचयला ... असु दे होइइल सवय हलु हलु तुम्हला अनि सर्वना वचयचि..
बहुबलोइचा पोस्तर पहिला मि.,..
बहुबलोइचा पोस्तर पहिला मि.,.. खूप मस्त आहे...
असो...
असो...
अनुष्का शेट्टी अरुंधती मधे खुप आवडली होती.. यात पन छानच असेल नो शंका..
हो... चान असेल... बिचरि
हो... चान असेल... बिचरि पहिल्य बहुबलि मधे नुसति काथ्या गोला करत होति :प :प
Pages