Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
' सैराट ' च्या वास्तववादी
' सैराट ' च्या वास्तववादी प्रभावा मुळे मागील काही सिनेमे पाहिले
..
..
त्यात अशोक सराफ अभिनीत ' भस्म ' पाहिला ...... जातपंचाय् ती चे भयाण वा स्त व सै रा ट प्र माणे याही सिनेमात सं द र्भा सा ठी आले आहे
मी यू ट्यूबवर नागेश कुकनूर
मी यू ट्यूबवर नागेश कुकनूर चा, मोड नावाचा चित्रपट बघितला. तो यथातथाच आहे पण त्यात एक हिल स्टेशन दाखवलेय, त्याचे नाव ( चित्रपटातले ) गंगा. अश्या नावाचे स्टेशन आहे का खरेच ? फारच सुंदर गाव होते ते.
दिनेश, ते बहुधा कोडाईकॅनाल
दिनेश, ते बहुधा कोडाईकॅनाल आहे. त्या मूव्हीमध्ये नंबरप्लेट्स वगैरे तमिळनाडूच्या दिसतात, ह्या डिसक्रीपन्सीवरून मी तो शोध घेतला होता.
दिनेश , मोड चे शूतिंग उटी,
दिनेश , मोड चे शूतिंग उटी, कुनूर, आणि कोटगिरी येथे झालेले आहे.
ओह, मग कोडाई पण नाही तर.
ओह, मग कोडाई पण नाही तर.
कोडाई पण असू शकेल . हे सगळे
कोडाई पण असू शकेल . हे सगळे जवळ जवळच आहेत आ णि निसर्ग सारखाच आहे
फार सुंदर गाव वाटले ते.
फार सुंदर गाव वाटले ते. निवांत रस्ते आणि गर्दी पण नव्हती. घरे, रेल्वे स्टेशन तर नक्कीच खरे असणार.
Yesterday watched Devil's
Yesterday watched Devil's Advocate on MN+ after long time. Al Pacino wow.... a must watch
<< Yesterday watched Devil's
<< Yesterday watched Devil's Advocate on MN+ after long time.>. हें वाचून " The Devil's Disciple " ह्या मला आवडलेल्या जुन्या सिनेमाची [१९५०-६० ] आठवण झाली. जरी "क्लासिक" या वर्गात मोडणारा हा सिनेमा नसला तरीही बर्ट लँकेस्टर, कर्क डग्लस व सर लॉरेनन्स ऑलिव्हीए यांच्या कसलेल्या अभिनयाने त्या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे .
The Conjuring 2 कसा आहे? The
The Conjuring 2 कसा आहे?
The Conjuring १ नाही पाहिला.
eddie the eagle एक चांगला
eddie the eagle
एक चांगला चित्रपट. लहानपणी सुरुवातीला पायाने अधू असणार्या खेळाडूने स्वतःच्याजिद्दीवर विंटर ऑलंपिक्स मधे आपल्या देशाकडून ski jumper म्हणून लौकिक कसा मिळवला याची कथा म्हणजे हा चित्रपट.
चित्र्पट सत्य घटनेवर आधारीत आहे.
द कंज्युरिंग २ बघीतला
द कंज्युरिंग २ बघीतला मी..
छाने.. पहिल्या च्या कंपेरिझन मधे जरा कमी टरकवणेबल आहे..
पण सार्यांची कामे मस्तच..
कुठ कुठ गाफील राहिल्यास लय वाईट्ट दचकतं माणुस
थेटरात बघायला मज्जा येईल.. फुल्ल अंधेरेमे झामझुम...
एडी द इगल..
ट्रेलर बघीतला होता मी.. ह्यु जॅकमन इन ब्लॅक... हाय मै मरजावा.. हि इज अ कम्प्लिट पॅकेज..
भारतात नै आला वाटत.. कि आला होता ?
आता लॅपीवर बघेल मी
काल उडता पंजाब बघीतला..

मला आवडला.. सर्वांनी मस्तच काम केलयं.. आलीया सरप्राईज होती माझ्याकरीता..
शी हॅज गटस पण चांगले रोल मिळाले पाहिजे..
शाहिद ला कुठेतरी कोणीतरी जॉनी डेप सोबत कंपेअर केलयं पण नै त्या दोघांची जातकुळी खुप वेगळी आहे.. निव्वळ विअर्ड मेकअप म्हणजे जॉनी नव्हे.. तो बहोत सॉल्लीड्ड आहे.. शाहिद ने छान अॅक्टींग केलीये.. दिलजित आणि करीना पन मस्तच..
आत्ता 'फक्त मराठी' चॅनल वर
आत्ता 'फक्त मराठी' चॅनल वर पद्मा चव्हाण, अजिंक्य देव आणि अजून बरेच फेमस कलाकारांचा 'घायाळ' लागला आहे. करीना कपूर आणि अक्षय खन्ना यांचा 'हलचल' डिट्टो या 'घायाळ' वर बेतला आहे असं लक्षात आलं.
सुनिधी | 25 June, 2016 -
सुनिधी | 25 June, 2016 - 05:17
The Conjuring 2 कसा आहे?
The Conjuring १ नाही पाहिला.
>>
मी मध्यंतरी टीव्हीवर 'कॉन्ज्युरिंग - १' पाहिला. चांगला आहे. पण जितकं ऐकून होतो तेव्हढा काही भारी वाटला नाही. नेहमीचाच भयपट मसाला आहे त्यात.
थँक्स टीना आणि रसप.
थँक्स टीना आणि रसप.
मी मध्यंतरी टीव्हीवर
मी मध्यंतरी टीव्हीवर 'कॉन्ज्युरिंग - १' पाहिला. चांगला आहे. पण जितकं ऐकून होतो तेव्हढा काही भारी वाटला नाही. नेहमीचाच भयपट मसाला आहे त्यात
>>>
टीव्हीवर पाहिल्यामुळे ओव्हरॉल इफेक्ट आला नसणार.
पावसात भिजत असताना टपरीवरचा चहा खारी खाणं अन घरात भर दुपारी चहा पिणं यात जितका फरक आहे तितकाच फरक कॉन्ज्युरिंग मोठ्या पडद्यावर अन टीव्हीवर बघण्यात आहे.
पावसात भिजत असताना टपरीवरचा
पावसात भिजत असताना टपरीवरचा चहा खारी खाणं अन घरात भर दुपारी चहा पिणं यात जितका फरक आहे तितकाच फरक कॉन्ज्युरिंग मोठ्या पडद्यावर अन टीव्हीवर बघण्यात आहे.>>> +१०
मला'कॉन्ज्युरिंग - १' ने घाबरवल होत.थिएटरमधेच पाहयाचा चित्रपट होता हा.
मी पण पाहिला. आणि लक्षात आले
मी पण पाहिला. आणि लक्षात आले की आधी पाहिला होता. अजिबात लक्षात नव्हते.
रसपला अनुमोदन.... इतका आवडला नाही याचे कारण कदाचित भरपुर भयपट पाहिलेत त्यामुळे नविन असे काहीच मिळाले नाही या सिनेमातुन आणि म्हणुनच सिनेमा पाहिलाय हे पुर्ण विसरुन गेले होते.
२ पण पहायची शक्यता कमी झाली आता.
'फाईंडिंग डोरी'
'फाईंडिंग डोरी' पाहीला.
'फाईंडिंग निमो'शी तुलना झालीच सिक्वल असल्याने..
'फाईंडिंग निमो'च्या तुलनेत फार लहान वाटला.
खूप प्रेडिक्टेबल आणि कमी अॅडवेंचरस.
मदारीचं ट्रेलर पाहिलं ओझरतं,
मदारीचं ट्रेलर पाहिलं ओझरतं, डोंबिवली फास्ट सारखा वाटतोय !
हा पण निशिकान्त कामतचा आहे ना ?
या वेळी फ्लाईटमध्ये " द
या वेळी फ्लाईटमध्ये " द ईन्टर्न" पाहिला .
एकदम " फील गूड मूव्ही" . आणि बराचसा प्रेडिक्टेबल पण.
म्हातारा बेन एकदम लव्हेबल आणि ज्युल्स एक्दम स्टायलिश .
अॅना हॅथवे हॅन्गओव्हरमध्ये लगे हाथ लगेच डेविल वेअर प्राडा पण बघून घेतला.
मदारीचं ट्रेलर पाहिलं ओझरतं,
मदारीचं ट्रेलर पाहिलं ओझरतं, डोंबिवली फास्ट सारखा वाटतोय !
हा पण निशिकान्त कामतचा आहे ना ? >>> हो.
काल तारे जमिन पर पुन्हा एकदा
काल
तारे जमिन पर पुन्हा एकदा बर्याच कालावधीनंतर पाहिला. छोट्या इशानचे वागणे फार ओव्हर वाटले या वयात मुल इतकी पण बेफिकिरपणा करत नाही. उदा. परिक्षेचे पेपर फेकून देणे , घरी न सांगणे, भावाकडून खोटी चिठ्ठी लिहून घेणे, इतकेच काय मॅडम ना भर वर्गात ब्लाब्ला करत मोठ्याने उत्तर देणे हे अजिबातच होत नाही.
असे बरेच प्रसंग खटकले जे सुरुवातीला लक्षात आले नाही.
नविन घोस्टबस्टर्स भारी वाटला.
नविन घोस्टबस्टर्स भारी वाटला. जुन्याशी तुलना न करता फक्त नविन कॉमेडी म्हणून बघितला तर नक्की आवडेल. ३ डी इफेक्ट्स पण मस्त आहेत. काही जागा घाबरवणार्या ही आहेत. ४ ही मुख्य घोस्टबस्टर्स मस्त विनोदी भुमीका करतात. क्रीस हेम्सवर्थ ( थॉर) ची आय कँडी भुमीका पण चांगली झालीये. जशी आपल्याकडे करमचंदची असिस्टंट थोडी माठ दाखवलेली असते तशीच भुमीका त्यानी केलीये.
सायफाय कॉमेडी आवडत असेल तर नक्की पहा.
निलकंठ मास्टर नावाचा मराठी
निलकंठ मास्टर नावाचा मराठी चित्रपट यू ट्यूबवर बघितला.
यातले चित्रीकरण मला फार आवडले. चित्रपट स्वातंत्रपूर्व काळातील कथेवर आहे. त्या काळातले वाडे, वास्तू फार छान टिपल्यात आणि उघड्यावरची दॄष्ये पण छान टिपलीत. कथा काही खास नाही.
खटकणारी एक बाब म्हणजे, विक्रम गोखले, किशोर कदम आणि आदीनाथ कोठारे यांची नावे ठळकपणे दाखवत असले तरी तिघाच्याही भुमिका, पाहुण्या कलाकाराच्या असाव्यात तितक्या तोकड्या आहेत. इतर कलाकारांचा अभिनय वाईट आहे असे नाही.
काल कबाली बघितलाच - हिन्दी
काल कबाली बघितलाच - हिन्दी मध्ये .
शिवाजी द बॉस जास्त एन्टरटेनिन्ग होता. रजनीकांतचा चित्रपट अ आणि अ असतो हे मानलं तरीही नको तितका मेलोड्रामा , योगायोग ,हाणामारी यामुळे पूर्वार्ध तर कधी संपतोय असं झालेलं. खरतर काय चाललं आहे तेच कळत नव्हतं . त्यात हिन्दी भाषंतर ईतक भयानक होतं की कबाली बघतोय की सेट मॅक्स्वर ईन्द्रा द टायगर !
राधिका आपटे नेहमीप्रमाणे लवेबल .एक दोन प्रसंगात तिने रजनी सरांसमोर जी अभिनयाची ताकद दाखवली - वाह !
रजनीकांत या माणसाची या वयात एनर्जी बघून टोटल रिस्पेक्ट . पण या चित्रपटात फॅन्सनी थिएटरमध्ये धूमाकूळ घालावा अस काही नाही . सामान्य वाटला. रजनी स्ट्याईल वगैरे क्वचितच दिसते.
रजनीकांतचा चित्रपट आहे म्हणून मुलांना एन्जोय करायला घेउन जाणार असालं तर टोटल नो नो .
मला तरी अतिरक्तरंजित वाटला. हाणामार्या , गोळीबारी , जखमी क्लोजअप अंन्गावर येतात.
समजत असेल तर तमिळमध्ये आवडेल कदाचित , पण हिन्दी वर्जन एक्दम बेक्कार .
खरोखर जरा हटके विषय असणारा
खरोखर जरा हटके विषय असणारा 'अँड जरा हटके' हा मराठी चित्रपट पाहिला.
पुनर्विवाह ही गोष्ट आता आपल्या समाजासाठी नवीन राहिलेली नाही. तरी एखाद्याच्या पहिल्या लग्नाबद्दल आपसांत बोलताना जो सूर असेल, तितकाच निखळ सूर दुसर्या लग्नाबद्दल बोलताना लागणार नाही हेही पाहायला मिळते. त्यातून पुनर्विवाह करताना मुलंही प्रेम करण्याच्या वयातली असली आणि त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच आकर्षण निर्माण झालं तर ? सांस्कृतिक धक्के बाजूला ठेवून जरा तटस्थपणे विचार केला तर ही कल्पना टॅबू वाटायला नको. ती मुलं काही लहानपणापासून एकमेकांबरोबर वाढलेली नाहीत, शिवाय आत्ये-मामे भावंडांतल्या लग्नाला आपल्या संस्कृतीत मान्यता असताना ह्यांच्यात तर रक्ताचं नातंही नाही. वयाच्या एका टप्प्यावर एखाद्या व्यक्तीकडे आई किंवा वडील म्हणून बघण्यापेक्षा आपल्या बायलॉजिकल पेरेंटची लाईफ कंपॅनियन म्हणून बघणे सोपे आहे, कदाचित त्यात त्या व्यक्तीशी जास्त समजूतदार, मैत्रीपूर्ण नातं निर्माण होईल अशीही शक्यता आहे. असे मानले तर ओढून ताणून त्या व्यक्तीच्या मुलाशी बहीण-भावाचे नाते जोडण्याची गरज आहे का ? अर्थात हे सगळे तर्काला धरुन असले तरी रोजच्या आयुष्यात व्यवहार्य आहे का हाही एक कळीचा मुद्दा आहे. मग तडजोड कुणी करायची ?
'अँड जरा हटके' असे अनेक प्रश्न पाडतो. एकीकडे मीरा आणि आकाश ( मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनील सेनगुप्ता ) ह्यांचं संयत, प्रगल्भ प्रेम ! त्या प्रेमाला मराठी-बंगाली पार्श्वभूमी दिल्यामुळे आणि हँडसम आकाश- इंद्रनील सेनगुप्तामुळे ते जरा जास्तच तरल वाटतं
दुसरीकडे आस्था-निशांत ( शिवानी रंगोले आणि सिद्धार्थ मेनन ) ह्या त्यांच्या मुलांमध्ये नकळत उमलणारं आकर्षण आणि मैत्री. आस्था-निशांतमधील भावनांना प्रेम म्हणावंसं वाटत नाही, पडद्यावर बघताना ते तारुण्यसुलभ आकर्षणच वाटत राहतं. त्या आकर्षणाचं पुढे प्रेमात रुपांतर होईलही किंवा नाहीही. त्या भविष्यातील शक्यतेसाठी आकाश-मीराने सुंदर वर्तमानावर पाणी सोडावं की नाही ह्याचं संदिग्ध उत्तर मात्र नक्कीच मिळतं.
चित्रपटाची गती जरा संथ आहे पण मूळ विषयापासून भरकटत नाही. पार्श्वसंगीत आणि गाणी चित्रपटाच्या एकंदर मूडशी अगदी परफेक्ट मॅच आहेत. कॅमेरावर्क सुंदर. चारही मुख्य कलाकारांचे अभिनय उत्तम झाले आहेत. मृणाल कुलकर्णीचा अभिनय मध्यंतरी थोडा आवडेनासा झाला होता पण आता गेल्या काही चित्रपटांपासून परत आवडायला लागलाय. ती दिसायला सुंदर आहेच पण ह्या चित्रपटात खूप दृष्यांत तिचं सुंदर दिसणं ठळक जाणवतं. सिद्धार्थ मेननने खूप सहज काम केलंय, काही प्रसंगांत तर अगदी उल्लेखनीय ! मृणालच्या बहिणीच्या भूमिकेत सोनाली खरे आणि निशांतच्या मैत्रिणीच्या भूमिकेत मधुरा देशपांडेचे काम छान. एखाददुसर्या फ्रेम्समध्ये बर्याच मोठ्या कलाकारांनी हजेरी लावलीय - सुहास जोशी, स्पृहा जोशी, संदेश कुलकर्णी, ज्योती सुभाष, सीमा देशमुख वगैरे. ( एका दृष्यांत चक्क आपली मायबोलीकर संघमित्रा आहे.
) एक मात्र खरं, आस्था-निशांतपेक्षा मीरा-आकाशमधली केमिस्ट्री जास्त सच्ची वाटते.
एकंदरीत चित्रपटाचा विषय हटके असला तरी त्याची हाताळणीही अजून जरा हटके, वेगळ्या पद्धतीने करता आली असती असं वाटलं. ह्या विषयाच्या व्याप्तीला हा चित्रपट फारसा भिडत नाही, त्यातली गुंतागुंत सोडवायला जात नाही, वरवरच रेंगाळत राहतो. मात्र एक नेत्रसुखद आणि प्रामाणिक कलाकृती म्हणून किमान एकदा पाहायला हरकत नाही.
बघायला पहिजे. आवडेल अस वाटतेय
बघायला पहिजे. आवडेल अस वाटतेय
मलाही हा चित्रपट पाहायचा आहे.
मलाही हा चित्रपट पाहायचा आहे.
या वेळी फ्लाईटमध्ये " द
या वेळी फ्लाईटमध्ये " द ईन्टर्न" पाहिला .
एकदम " फील गूड मूव्ही" . आणि बराचसा प्रेडिक्टेबल पण.
म्हातारा बेन एकदम लव्हेबल आणि ज्युल्स एक्दम स्टायलिश .
अॅना हॅथवे हॅन्गओव्हरमध्ये लगे हाथ लगेच डेविल वेअर प्राडा पण बघून घेतला.
>>
लुफ्तांसा का?
मी पण पाहिला. मस्त वाटला.
मी नंतर त्याच हँगओव्हरमधे वन डे, अॅलिस इन बंडरलँड, डेविल वेअर्स प्रादा पाहिले.
फाईंडिंग नेव्हरलँड (जॉनी डेप, केट विन्स्लेट) पण छान होता.
Pages