चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग गोविंदाला का जमू नये? >>>
याच करता गोविंदाची बरोबरी मी विनोद कांबळीशी केली. दोघांनीही अंगीभूत क्षमता असून , एकेकाळी आपापल्या क्षेत्रात अव्वल स्थानी राहून मग स्वतःहून आपापले करियर संपवले ! कांबळीला आता शक्य नसलं तरी, गोविंदाकडून मात्र अजूनही अपेक्षा आहेत..
रच्याकने, या निमित्ताने गोविंदा बाबतीत इतके सारे समविचारी पाहून गहिवरुन आलं Happy

>>तसेच नंतर उर्मिला मातोंडकर चे झाले नंतर ती सगळ्याच चित्रपटात वेडी वाटू लागली.
मला तर hritik पण वाटतो तसा कोई मिल गया छाप
काबिल मध्ये त्याला आंधळा करापेक्ष वेडसर करायला हवे होते
नवीन Submitted by आशुचँप>> Lol
तनू वेड्स मनू आणि कंगनाबद्दल सहमत. शाहरुखपण असाच सायको वाटतो प्रत्येक पिक्चरमध्ये.

पूनम, सही पोस्ट.

काही कलाकार थोडी आपटी खातात, मग बहुधा त्यांना वेळ मिळतो विचार करायला :). अमिताभ चे लेट-९०ज मधे तसेच झाले. ऋषी ने ही ९०ज मधे बरेच पानचट पिक्चर्स केले. पण तो बर्‍यापैकी अंडर-रडार होता तेव्हा. मात्र पुन्हा जो आला तो एकदम जबरी. गोविंदाही आत्ता त्या ९०ज अमिताभसारखाच ना धड तरूण दिसतो, ना म्हातारा (सूर्यवंशम मधला तरूण अमिताभ म्हातार्‍या अमिताभपेक्षा म्हातारा दिसतो Happy ). अजून थोडे ग्रेसफुल एजिंग होण्याची गरज आहे Happy

गोविंदाचा अभिनय किल-दिल या चित्रपटात चांगला होता. चित्रपट दणकुन आपटल्याने त्या भुमिकेचा फायदा गोविंदाला मिळाला नाही. (आपटण्यात गोविंदा कारण नव्हते. लोक रणवीर आणि परिनितीला बघायला गेले होते )

"सेच नंतर उर्मिला मातोंडकर चे झाले नंतर ती सगळ्याच चित्रपटात वेडी वाटू लागली.
मला तर hritik पण वाटतो तसा कोई मिल गया छाप" - उर्मिला म्हणजे चालतं बोलतं स्कूल ऑफ ओव्हरअ‍ॅक्टींग होती. भूत मधे वगैरे तिने सॉलिड नॅचरल (ओव्हर) अ‍ॅक्टींग केली होती. ह्रितीक हा एक 'कम बॅक स्टार' आहे. दिसायला, नाचायला छान आहे. पडेल सिनेमे करतो आणी मग वडील एक कम-बॅक सिनेमा काढून परत नय्या पार करवतात. बरोबरीच्या मित्रांची लग्न होऊन, मुलं वगैरे होऊन संसार मार्गाला लागला तरी पार्ल्यातल्या रस्त्यांवर 'सीजन' कसा आहे हे बघत उभ्या रहाणार्या 'नाथा कामत' ची आठवण होते मला त्याच्याकडे बघून. अर्थात ह्या एका कॅटेगरीत - कुणाचा मुलगा जास्त पडेल आहे- राकेश रोशन, अमिताभ ला भारी पडलाय. Happy

या लोकांकडे बघून कधी वाटते की यांना दिग्दर्शक व्यवस्थित मिळाला नाही. अभिषेक बच्चन ला मनी रत्नम यांनी फार व्यवस्थित हाताळले होते. युवा, गुरु सारख्या चित्रपटात "हाच तो अभिषेक का?" असे प्रेक्षक म्हणतो. इतका छान अभिनय त्याने केला आहे. युवा मधे अजय देवगण, विवेक असुन सुद्धा अभिषेक मात्र भाव खाउन गेलेला. (अर्थात "रावण" मधे त्याने पुन्हा माती खाल्ली"

रितिक सुद्धा धुम २ , जिंदगी ना मिलेगी दुबारा, सारख्या चित्रपटातून चांगलाच अभिनय केलेला. त्यांना दिग्दर्शक चांग्ले मिळाले की अभिनय करतात नाही तर " मै प्रेम कि दिवानी हु" सारखा अभिनय करतात

गेल्या विकांताला २ चित्रपट पाहिले ..

१. रंगून : विशाल भारद्वाज चा बहुतेक मी पूर्ण पाहिलेला पहिलाच चित्रपट . कंगना , शाहिद , सैफ तिघेही आवडले . वरवर सरळ चालताना दिसणारा चित्रपट हळू हळू वळणं घेउ लागतो आणि हळू हळू "चढायला" लागतो .
पण ...
१ - शेवटला फिल्मी बनवलाय एक्दम . हसायला येतं .
२. स्पेशल ईफेक्ट ने मार खाल्लाय . आगीच्या ज्वाळाही धड दाखवता येउ नये ? एका ठिकाणी खोटा सरडा ही दिसतो .
३.कंगना वगैरे मंडळी कधी कधी ईतके तोंडातल्या तोंडात बोलतात की काही कळत नाही , काय चाललयं .

बद्रीनाथ की दुल्ह्नीया .
मला तर वरूण जाम आवडतो . फक्त त्याच्यासाठी बघितला .
त्याची आणि आलियाची केमिस्ट्री जाम मस्त आहे .
वरूण धवन ला कॉमेडीची चांगली जाण आहे , त्याचं टायमिन्ग ही चांगलं आहे . अभिनयात सो-सो च म्हणावा .
बद्रीचं बेअरिन्ग चांगलं पकडलयं त्याने .
पहिला भाग जरा तरी सुसह्य आहे , दूसरा तर अगदीच अ आणि अ आहे . काही काही ठिकाणी विनोद चांगले आहेत , खुदकन हसू येतं .
गाणी चांगली आहेत. बद्रीच्या बाबांची निवड चुकली . तो अभिनेता अजिबात करारी ठाकुर वाटत नाही.

धुम २ मधला सगळ्यात जबरदस्त असायला हवा होता आणी तितकाच पानचट झाला असा सीन म्हणजे ह्रितीक-अभिषेक भेटीचा. दोन अनोळखी माणसं एअरपोर्ट वरच्या लाऊंज मधे जसं आणी जितकं कॅज्युअल बोलतील, तितकच सपक संभाषण आहे दोघांचं. कडक संवाद नाहीत, अभिनय म्हणजे अगदीच मलूल झालेल्या पडवळासारखा. छे! असं कुठे असतं का? अरे अमिताभ-शशी कपूर / शत्रुघ्न सिन्हा, राजकुमार - दिलीपकुमार, नसिरुद्दीन शाह-अनुपम खेर वगैरे जोड्या पडद्यावर कशी जुगलबंदी सादर करून गेल्या (दीवार, सौदागर, अ वेनस्डे). तसंही धूम सिरीज ही अभिषेक-उदय चोप्रा ची जवाहर रोजगार योजना आहे.

मी बद्रनाथ कि दुल्हनिया पाहिला...
अगदी अ आणि अ आहे.. वरुण आलिया ला पाहिल्यावर वाटत कि हेच का ते बदलापूर, हायवे फेम..का असे पिच्चर करतात?
तो आणि ती छानच वाटलीए पिच्च्रमधे पण काही करण्यासारखं नव्हत त्यात..
त्याला मोलेस्ट करतात त्यावेळि मात्र मी खुप हसली होती...खुप बिच्चारा चेहरा केलाय त्याने त्यात.. Lol

आज 'Beauty and the Beast' पाहिला...
छान होता..वन टाईम वॉच...मला १९९१ चा अ‍ॅनिमेटेड मुव्ही जास्त आवडला...यातील म्युझिकल पिसेस खुप लाऊड वाटले मलातरी...कदाचित सिनेपोलिस आयमॅक्सचा इफेक्ट असावा..असो..बघण्यासारखा आहे नक्किच.. एमा/इमा छान दिसते.. ९०च्या लेकरांचा क्रश..

गोविंदाने हत्या या चित्रपटामधे गंभीर भूमिका खूप छान केली होती. पण बिचारा त्याच त्याच विनोदी रोल मधे अडकून राहिला.

>>गोविंदाने हत्या या चित्रपटामधे गंभीर भूमिका खूप छान केली होती. पण बिचारा त्याच त्याच विनोदी रोल मधे अडकून राहिला.--
त्याचीच चॉइस होती, डेविड धवनच्या नादी लागायची. करिष्माचा पण पार कचरा झाला त्याच्यामुळे. कादर खान, शक्ती कपुर, अरुणा ईराणी, गोविंदा या लोकांनी वात आणलेला तेव्हा.

पण रंगून आपटलेला पाहून फारच वाईट वाटलं Sad >> अरेरे, मला पाहायचा होता पण रिव्ह्यूज सुद्धा फार चांगले नव्हते आले त्याचे त्यामुळे नाही बघितला ! आता जरा पश्चातापच होतोय...

एमा वॉटसनचा कलोनीया म्हणून एक चित्रपट पाहिला. अगदीच अंगावर येणारा आहे. सत्य स्थितीवर आधारीत आहे. एका ख्रिस्चन धर्मगुरुने चालवलेल्या एका मठात होणारे अत्याचार आणि त्यातून सुटून जाण्याची धडपड. काही काही प्रसंग तर अगदीच डेडली घेतलेत.

अप्रतिम चित्रपट

गेल्या काही आठवड्यात पाहिलेले चित्रपट
१] हॅकसॉ रिज - दुसर्‍या महायुद्धात हातात शस्त्र धरायला नकार देऊनही ७५ सैनिकांचा प्राण वाचवणार्‍या 'डेस्मंड डॉस' ची कथा. यातले फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट विचारात पाडणारे आहे. युद्धाची भयानकता स्पष्ट जाणवून देणारे प्रकाशचित्रण आहे पण तरीही याच बॅटल ऑफ ओकिनावावरील 'लेटर्स फ्रॉम आयवो जिमा' मध्ये युद्धाची निरर्थकता जशी अंगावर येते तसे इथे होत नाही.

२] डॅन इन रिअल लाईफ आणि द फॅमिली मॅन- दोन्ही मस्त रॉम-कॉम, फॅमिली मॅन तर फक्त टी लिओनीसाठी बघा.
डॅन इन रिअल लाईफ चा हिंदी रिमेक नक्कीच बनू शकतो, त्या कथेच्या जवळ जाणारा 'सॉरी भाई' आला होता, कोणी पाहिलाय का?

सूर्यवंशम मधला तरूण अमिताभ म्हातार्‍या अमिताभपेक्षा म्हातारा दिसतो>>> केवळ महान!!!!
बाकी गोविंदाबद्दल सगळ्यांनी लिहीलेले मान्यच, त्याचा आणी डेव्हीडचा पडता काळ एकदम आला.

गोविंदाचा लक्ष्मीकांत बेर्डे झालेला होता. जशी लक्ष्याला शेवट पर्यंत स्वतःची इमेज तोडता आली नाही तसा काहीसा प्रकार गोविंदाचा होऊ नये.

गोविन्दाच्या कॉमेडी अन इमेजविषयी थोडं... (त्याच्याच अनेक इंटर्व्ह्यूजच्या संदर्भाने)

८० च्या शेवटी अन ९० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यानी भरमसाठ (त्याच्याच शब्दानुसार ५२) सिनेमे साईन केले होते, अन चार चार शिफ्ट्समधे काम करत होता. पैसा कमवून कुटुंबाला गत वैभव प्राप्त करून देणं हा एकमेव उद्देश यापाठी होता. इतक्या ओव्हरवर्कचा परिणाम कुठेतरी शरिरावरही दिसायला लागला. आणि याच काळात देव आनंदनी त्याला सल्ला दिला, बाबा तुला इतकं काम करायचंच आहे तर असं कर की स्वास्थ्य धोक्यात येणार नाही. हलके फुलके रोल्स कर, फार जास्त अ‍ॅक्शन किंवा विचार करायला लावणारे रोल्स करायचे असले तर कमी सिनेमांमधे काम कर. मोठ्या अभिनेत्याचा सल्ला सर आँखोंपर म्हणून त्यानी कॉमेडीला सुरुवात केली, अन नशिबानी तगडा साथ दिली. नंबर वन सिरीज सुपरहिट झाली. चलती है तो चलाते है करत तो तीच गाडी चालवत राहिला अन वेगळं काही करायचं राहूनच गेलं. जे थोडंफार ट्राय केलं (शिकारी मधला निगेटिव्ह रोल, वगैरे) ते आपटलं. म्हणून अ‍ॅव्हॉईड केलं.
२००० च्या दशकात सिनेमा बदलायला लागला पण त्यावेळी याला राजकारणाचे वारे लागले. संसदेत आणखी एक अपयशी खेळी खेळून तो परत सिनेमात आला तेंव्हा आता ट्रेंड प्रमाणे जायचं, मोठ्या प्रॉडक्शन्स सोबत काम करायचं वगैरे ठरवून आला होता. पण त्याच्या नशिबानी त्याचे वेगळे रोल्स असलेले सिनेमे आपटले (सलाम ए इश्क, दिल्ली सफारी, चल चला चल, रावण), काही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे असूनही डब्यातच राहिले (रन भोला रन - अष्टविनायक, बंदा ये बिन्धास्त है - बी आर चोपडा), तर काही फालतूच निघाले (मनी है तो हनी है, नॉटी @ ४०). पण यानी करिअर पुन्हा सुरू करायला फारशी मदत झाली नाही.
मधे त्यानी थोडे वेगळे विषय अन दिग्दर्शक ट्राय केले (अंधळ्या चहावाल्याच्या साक्षीवर बेतलेला मर्डर मिस्ट्री 'चाय गरम '- तिग्मांशू धुलिया, ब्योमकेश बक्शीचा एक अवतार 'बेंगॉली डिटेक्टिव्ह' - मीरा नायर, कॉलेजच्या फुटबॉल टीमच्या कोच ची गोष्ट 'अवतार' - पहलाज निहलानी) पण हे सिनेमे पूर्णच झाले नाहीत.
आ गया हीरो (अभिनयचक्र) २०१३ मधे बनून तयार होता. त्याच वेळी दबंग, सिंघम, रावडी राठोड वगैरे पोलीसपट जोरदार धंदा करत होते. त्याच लाटेत हा आला असता तर चालूनही गेला असता. २०१४ आयफा मधे याचं ट्रेलर लाँच ही झालं होतं. पण त्याच वर्षी नंतर येणारे किल दिल अन हॅपी एंडिंग जर चालले, तर याला डिस्ट्रिब्यूटर्स कडून बरे पैसे मिळतील या आशेवर गोविंदा राहिला, अन रिलीझ पुढे ढकलला. वेगळ्या धटणीचे रोल्स असलेले ते दोन्ही सिनेमे पडल्यावर, जे आपल्याला बेस्ट जमायचं तेच करूया अशा शेल मधे गोविंदा गेला. तयार असलेल्या सिनेमात त्यानी स्वतःच्या मतानुसार फेरफार केले. गाणी लिहिली, सीन्स लिहिले, ते शूट करून घुसडले अन फायनली कलेक्शनच्या ८% पैसे देण्याच्या बोलीवर पॅची सिनेमा डिस्ट्रिब्यूटर्स ना विकला अन घाट्यात गेला.
मी वेगळं काही केलं तर ते अ‍ॅक्सेप्ट होत नाही, या मोड मधे जाऊन तो नवीन काही करताना तेच करायला बघतोय जे तो वर्षानुवर्ष करत आलाय. त्याची इमेज त्यालाच इतकी प्रिय झालिये की बाहेर येण्याच्या दृष्टीनी तो काहीच पावलं उचलत नाहिये.

रणबीर - कतरीनाच्या अनुराग बासु दिग्दर्शित जग्गा जासूसमधे त्याचा रोल आहे. ट्रेड बझ बघता हा टिनटिनचा देशी अवतार वाटतोय. ट्रेलरमधे गोविंदाला एक सेकंदही दाखवलं नाहिये. कदाचित सरप्राईज एलेमेंट ठेवायचं असेल किंवा त्याच्या पडत्या इमेजचा सिनेमाला धक्का पोचायला नको म्हणून मुद्दाम केलं असेल.
काही का असेना... हा बहुतेक शेवटचा मौका आहे...

एकच साचा अभ्नेत्याने ठेवला तर लोकांच्या पोटात का दुखते कळत नाही.

तुम्हाला गोविंदा किंवा लक्ष्या कधी बोल्लला का ? सारखे ब्यान्केतच नोकरी करताय. एकच साचा कशाला ? आता प्लंबर किंवा टांगेवालाही व्हा .

तुम्हाला गोविंदा किंवा लक्ष्या कधी बोल्लला का ? सारखे ब्यान्केतच नोकरी करताय. एकच साचा कशाला ? आता प्लंबर किंवा टांगेवालाही व्हा . >>> Biggrin
हो पण बाकीचे काम हे एकच आहे त्यासाठी प्रेक्षक तुम्हाला पैसे नाही देत. जिथे प्रेक्षक पैसे देतात तिथे त्यांना वेगळे हवेच असते. आता तुम्ही एकच गोळ्या सगळ्या रोगांवर द्यायला लागले तर काय होणार>? पेशंट एक तर जिवंत राहणार नाही अथवा तो पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. वेगवेगळ्या रोगांवर वेगवेगळे औषध देतात ना. तसेच आहे. अभिनेता हा एकाच इमेज मधे अडकून बसला की लोक कंटाळतात.
उदा. आता अक्षय चे बघा. आता त्याचा मनोजकुमार होऊ लागला आहे. प्रत्येक चित्रपटात "देशभक्ती" वरचे आहे. अर्थात तो काम उत्तम करतोय तिथपर्यंत ठिक आहे. पण त्याच्या जाहीरातींमधे सुध्दा देशभक्ती वगैरे येऊ लागली आहे. उदा. कजारिया टाईल्स इ. चित्रपट रुस्तम मधे तर मुद्दामुन घुसवल्यासारखी आहे त्यामुळे तेच तेच बघून प्रेक्षक कंटाळतो. मनोजकुमार काही चित्रपटांनंतर फ्लॉप याच कारणाने गेला.

गोविंदाने तरी कुठे लिहुन दिले आहे ? मॅ तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भूमिका दाखवीन ?

निर्माता निर्मिती करतो. लेखक लिहितो .अअभिएता बिच्चारा त्याला जे दिले स्क्रिप्ट ते तो करतो.

अअभिएता बिच्चारा त्याला जे दिले स्क्रिप्ट ते तो करतो. >> त्याला स्क्रिप्ट दिले जाते पण त्याला ते स्वीकारावे असे बंधन नसते.

एकच साचा अभ्नेत्याने ठेवला तर लोकांच्या पोटात का दुखते कळत नाही.
>>> कुठे कुणाच्या पोटात दुखतंय... रादर हे केल्यानि अभिनेत्यालाच घाटा होतोय

तुम्हाला गोविंदा किंवा लक्ष्या कधी बोल्लला का ? सारखे ब्यान्केतच नोकरी करताय. एकच साचा कशाला ? आता प्लंबर किंवा टांगेवालाही व्हा
>>> गोविंदा किंवा लक्ष्यालाही कुणी प्लंबर किंवा टांगेवाला व्हायला सांगत नाहिये. बँकेतला माणूस जसा काळाप्रमाणे अन अनुभवाप्रमाणे वेग वेगळ्या जवाबदार्‍या हाताळतो तेच करावं अशी अपेक्षा आहे.
पहिलीच्या परीक्षेत पहिला नंबर आला होता म्हणून दहावीच्या वयात कुणी पहिलीचीच परीक्षा देत नाही.

निर्माता निर्मिती करतो. लेखक लिहितो .अअभिएता बिच्चारा त्याला जे दिले स्क्रिप्ट ते तो करतो.
>>> निर्माता अन लेखक तो स्वतःच आहे ना.

डॅन इन रिअल लाईफ चा हिंदी रिमेक नक्कीच बनू शकतो, त्या कथेच्या जवळ जाणारा 'सॉरी भाई' आला होता, कोणी पाहिलाय का? >> दोन्ही पाहिलेत आगाऊ. चित्रंगदा असल्यामूळे सॉरी भाई पाहणे मस्ट होते Happy मला सॉरी भाई अधिक आवडला - शबाना, बोम्मन ची नोकझोक नि शरमान जोशीचा hesitation मस्त उतरलय.

गोविंदा... गोविंदा... भारी आहे हा बाबा... काय ते जबरदस्त विनोदाचे टायमिंग आणि काय तो अफलातुन डान्स. पायाच्या कमीतकमी हालचाली व केवळ हात्/खांदे/चेहरा वापरुन डान्स त्याच्यासारखा कोणालाच जमत नाही. गोविंदा, परत येरे बाबा. धवन साहेबांनी त्याच्यातला विनोदी अभिनेता एकदम काबुत ठेवला होता म्हणुन मजा यायची. धवन नसताना गोविंदाचे विनोदी रोल हाताबहेर गेलेले जाणवायचे. त्यामुळे या जोडीने पुन्हा एकत्र यावे.

काल बॅक टू बॅक दोन चित्रपट पाहिले...ट्रॅप्ड आणि कॉन्ग-स्कल आयलंड..

ट्रॅप्ड - राजकुमार राव होता म्हणुन बघायला गेली पण मला नाही आवडला.. एकदा बघुन बाजुला करावा असा..

काँग - म्हटलं यातले निदान इफेक्ट बरे राहिलं...जोडीला सॅम्युअल जॅकसन, टॉम हिडल्स्टोन आहे पण यानेसुद्धा निराशा केली.. काही काही प्रसंग तर बॉलीवूड सोबत कॉम्पिटिशन करतात कि काय असे.. आणि राहुन राहुन ते सॅम्युअल जॅकसन आणि काँगचे डोळे काय दाखवायचे..एकदम बोरींग वाटलं मला... त्यातल्या स्कल क्रॉवलर तर सरळ सरळ 'ब्लीच' या अ‍ॅनिमी/कार्टुन सिरीज मधले हॉलोज वरुन तोंडावळा उचलला आहे अस दिसतयं..

आणि आज अनारकली आराहवाली बघीतला.. संजय मिश्रा आणि स्वरा भास्कर साठी गेली होती.. हापन बोर झाला मला..

हा आठवडा ओळीने बोर पिच्चर बघुन आली थोडक्यात..

Pages