चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगून पाहिला. एकदम मस्त सिनेमा. कंगनाने अफाट काम केलं आहे. खरंतर मला कंगना या आधी फारशी आवडली नव्हती. तनु वेड्ज मनु पहिला बंडल होता. त्याच्या दुसरा भाग पहिल्यापेक्षा बकवास होता, पण त्यातलं कंगनाचं हरियाणवी कॅरॅक्टर मस्त जमून आलं होतं. क्वीनमध्येही तिला खास करण्यासारखं काही होतं असं वाटलं नव्हतं, पण तो संपूर्ण सिनेमा म्हणून छान होता. पण 'रंगून' हा कंगनाचा सिनेमा आहे. अफलातून काम केलं आहे तिनं. सुरूवातीला स्वतःच्या स्टारडममध्ये रमलेली, स्टन्ट्स करणारी, रुसीच्या प्रेमात पडलेली आणि नंतरची हळूहळू बदलत जाणारी, हळवी होणारी, स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणारी, नवाबच्या प्रेमात स्वतःला झोकून देणारी कंगनाची ज्युलिआ अतिशय प्रेक्षणीय आहे. She grows on you! फार अवघड आहे असं काम करणं आणि कंगनानं ते लीलया पेललंय.

शाहीदला कंगनाच्या बरोबरीनं काम आहे. तो झकास दिसतो, कामही भारी करतो, पण त्यामानानं त्याच्या रोलमध्ये शेड्ज नाहीत ज्या कंगनाच्या रोलला आहेत. सैफचा 'एक्स्टेन्डेड गेस्ट अपियरन्स' होऊ नये यासाठी त्याला शेवटी भाव दिला आहे, पण त्याच्या रोलसाठी जे व्हीएफएक्स वापरलं आहे ते ऑसम आहे! म्हणजे ते व्हीएफएक्स आहे असं वाटतंच नाही इतकं बेमालूम काम केलंय.

विशाल भारद्वाजके क्या कहने! अरुणाचलचा माहौल पर्फेक्ट वापरला आहे. हैदरमध्ये त्यानं कथा पुढे नेण्यासाठी गाण्याच्या माध्यमाचा एकदाच वापर केला आहे. इथे ज्युलियाचं गाणं आणि स्टन्ट्स आणि त्यातून पुढे सरकणारी कथा याचा फार भारी वापर केलाय. म्युझिकलसारखी कथा पुढे सरकत जाते. संवाद एक नंबर आहेत, गाणी, पार्श्वसंगीतही चपखल. 'ब्लडी हेल' मस्तच आहे Happy सिनेमाटोग्रफी अत्युच्च आहे. त्या कॅमेरावर्कचा बेस ठेवून केलेलं व्हीएफएक्सही एकदम साजेसं.

आणि टीका करायचीच तर, सिनेमाचा उत्तरार्ध जरा लांबला आहे. पण विशालचे सिनेमे हळूहळू अंगावर येतात. त्या वातावरणनिर्मितीसाठी त्यांची लांबी जास्त असते. ते मान्य करण्याजोगं आहे. पण मुळातल्या संघर्षासाठी जे कारणीभूत आहे, ते कारणच काही लोकांना फुसकं किंवा बालीश वाटू शकेल.

पण ओव्हरऑल कंगना, शाहीद, इन्टेन्सिटी, संवाद आणि वातावरणनिर्मितीसाठी सिनेमा पहायला हवा. विशाल भारद्वाज फॅन्स निराश होणार नाहीत. कंगनाचे फॅन्स तर मुळीच होणार नाहीत. न्युट्रल लोकांनाही आवडू शकेल. आम्ही तरी 'रंगून' गेलो Happy

छानच पूनम..
मला नाही वाटत मी थेटरात पाहायला जाईल..
कंगना आवडते पण शाहीद अन त्याउप्पर नवाबसाहेब मला बहोत इर्रिटेट करतात...झालच तर शायद लॅपटॉपवर्/तूनळीवर पाहिलं..

काल मी कॅलेंडर गर्ल्स बघीतला..
भंगार पिच्चर..

विशाल भारद्वाजचं कौतुक वाचून मटरू की बिजली का मनडौला या अगम्य नावाचा सिनेमा पाहिला होता. ब्लॅक कॉमेडी केव्हां प्रभावी ठरते आणि केव्हां नाही याचं भान तर सुटलंच होतं पण हाताळणीने एक चांगला विषय रद्दड आणि बालीश करून टाकला. त्यामुळे आता त्याचा सिनेमा पुन्हा हॉल मधे जाऊन पाहीन असं वाटत नाही.

कुणि कॉफी विथ करणचा कन्गणा-सैफ एपिसोड पाहिला का? कन्गणा ने करणचीच साल काढलेली , ती तशीही 'मन की बात ' करण्यासाठि फेमसच आहे म्हणा पण करणला त्याच्या शोमधे सगळे अ‍ॅक्तर लोक फार मस्का मारत असतात त्यामुळे कन्गणाने अगदी आतापर्यत त्याच्यकडुन केलेल्या क्रिटिसिझमचा चान्गलाच समाचार घेतला.

व्हेटिलेटर बघितला आणि आवडला, ट्रेलर किवा पोस्टर मधे आशुतोश गोवारिकर ला केद्रस्थान दिलय पण मुव्हित तो अजिबात ओव्हरपॉवर करत नाही हे बघुन बरच वाटल, हायवे मधे असलेली अनेक कलाकाराची गर्दी इथेही आहे पण हायवे मधे ते सगळ जरा जास्तच वाटल होत, इथे ते तस वाटत नाही.शेवट मराठिच्या मानाने मेलोड्रामाटिक आहे पण चालतय.

नुकतेच टीव्हीवर काही सिनेमे पाहण्यात आले.

१. इन्कार : चित्रांगदा सिंग, अर्जुन रामपाल. याबद्दल काहीही माहिती नव्हतं. चांगली कॉर्पोरेट कथा वाटली. चित्रांगदा सिंगचा मी पाहिलेला हा पहिलाच सिनेमा. तिचं काम आवडलं. स्क्रीन प्रेझेन्स खूप प्रभावी आहे तिचा. स्क्रिप्ट छान आहे. फ्लॅशबॅक आणि वर्तमानकाळातल्या उड्या व्यवस्थित मारल्या आहेत. शेवट जरा वेगळा असल्याने आवडला.

२. रॉय : स्टोरीलाईन चांगली आणि वेगळीच आहे खरं याची... पण जॅकलीन फर्नांडिस Uhoh आयेशा आणि टिया दोन्ही कॅरेक्टर्समध्ये कितीतरी छटा आहेत. कुणीतरी चांगली अभिनेत्री तिथे हवी होती. जॅकलीनला बळंच घेतलंय असं वाटतं. शिवाय ते मलेशियातल्या वेगळ्याच वातावरणात अचानक येणारं `चिट्टिया कलाइया वे' (किंवा जी काही लिरिक्स असतील ती) गाणंही किती उगीच आहे! Uhoh

३. मसान : हा सिनेमा मात्र एकदम भारी निघाला. मुळीच चुकवू नये असा! बनारस, तिथले घाट कसलं दाखवलंय सगळं... कथानकाचा एक पार्ट बनूनच येतात सगळी लोकेशन्स! रिचा चढ्ढा काम छान करतेच. मला तो दुसरा अ‍ॅक्टर पण आवडला. साधा, सरळ, पण किती बोलका चेहरा आहे त्याचा. दोघांची कथानकं एकमेकांना जिथे छेदतात तो क्षण फार भारी आहे. संजय मिश्रा पण एक नंबर! वेगळं काहीतरी, इन्टेन्स आणि अस्सल पाहायचं असल्यास नक्की बघा.

रॉय हा चित्रपट पुर्ण बघीतल्याबद्द्ल आपले अभिनंदन. मी रिलीजच्या दिवशी बघितला होता. वट्ट १३ लोक होते थेटरात. संपल्यावर लोकांनी टाळ्या वाजवुन सुटलो एकदाचे म्हणून आनंद व्यक्त केला होता. Happy

तो विकी कौशल आहे >>> हां, बरोबर. मला नाव आठवत नव्हतं. किती सहज वावर आहे त्याचा. आणि मोकळं, स्वच्छ हसू.

`तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थडथडाता हूं' - हे त्यातल्या एका गाण्याचे बोल.
संपूर्ण सिनेमाच असा साधा, नेमका पण भिडणारा आहे.

अगदी. अत्यंत नैसर्गिक अभिनय सगळ्यांचाच आणि उत्कृष्ट दिग्दर्शन. लोकेशन्स तर अगदी नेमकी. उगाचच लोकेशन खुलवली नाहीत. रिचा चढ्ढा सुरूवातीलाच public toilet मध्ये कपडे बदलून येते तेव्हाचा परिसर वगैरे अगदी वास्तववादी.

मसान : हा सिनेमा मात्र एकदम भारी निघाला
>> लै भारी आहे मसान...

तो विकी कौशल आहे लले. ती दुसरी हिरॉईन श्वेता त्रिपाठी.
>>> विकी कौशल म्हणजे रमन राघव २.० मधला राघव अन श्वेता त्रिपाठी म्हणजे हरामखोर मधली संध्या...

मला हे दोन्ही सिनेमेही आवडले... नवाज हा कॉमन फॅक्टर

काल (एकदाचा) 'आ गया हीरो' पाहिला (मीही नाही पाहिला तर कोण बघणार?)
१९९० मधे आला असता तर सुपरहिट झाला असता. हाताळणी त्याच लेव्हलची आहे. एडिटिंग मेजर गंडलंय. त्यामुळे खूप पॅची वाटतो.

एक कर्तव्यदक्ष इन्सपेक्टर एका डेंजरस आतंकवाद्याला फक्त त्याच्या हसण्याच्या क्लू वरून शोधून काढण्यासाठी अभिनयचक्र नावाचं बहुरूपी मिशन चालवतो अन यशस्वी होतो असा प्लॉट आहे.

पण कथा, पटकथा, संवाद, गाणी अशा अनेक जबाबदार्‍या कुली नं. १ नी स्वतःच उचलल्या आहेत अन तो भार काही पेलवला नाहीये. पैसे वाचवण्याच्या नादात प्रॉपर टेक्निशिअन्स न घेता टाकलेल्या पाट्यांमुळे पार विचका झालाय.
५३व्या वर्षी, स्वतःच्या बॅनरखाली काहितरी जबरदस्त वेगळं करून लोकांना चकित करण्यापेक्षा गोविंदानी हीरो नं.१ होऊन सातशिळ्या कढीला आणता येईल तितका ऊत आणलाय, पण मुळात आजच्या पास्ता जनरेशनला कढीतच रस नाही हा मुद्दाच लक्षात घेतला गेला नाहिये.
गोविंदा बर्‍यापैकी देव आनंदच्या वाटेवर निघालाय. एक तर तो स्क्रीनवर असतो, किंवा नसलाच तर गोष्टीचं बॅकग्राऊंड नरेशन करतो, अन अगदीच इलाज नाही म्हणून २-३ सीन्स पुरता गायब होतो. त्याचं डान्सिन्ग आजही जबरदस्त आहे, चेहेर्‍यावर वय दिसत असलं तरी तो अ‍ॅक्टिंग करू शकतो, कॉमेडी अन डायलॉग डिलीव्हरी अजूनही जबरदस्त आहे, पण हे सर्व एफर्ट्स टोटल वेस्ट जातात.
निदान पैसे वाया गेल्यावर तरी त्याला शहाणपण येवो, अन त्यानी स्वतः मधल्या अभिनेत्याला डिझर्विंग न्याय द्यावा. (अन पुढचा राजू माईंडब्लोईंग जो त्याला स्वतः ला बनवायचा आहे, तो बनवू नये.)

सिनेमा पडल्याचं दु:ख नाही, पण एक खूप महत्वाची गोष्ट हातून गेलिये... चान्स... परत मिळेल कि नाही ते माहिती नाही... मिळालाच तर जपून वापरा...
डिस्ट्रिब्यूटर्स नी नाकारलेला, लिमिटेड बजेट मधे बनलेला, खराब निर्मितीमूल्य असलेला आणखी एखादा सिनेमा करून रिटायरमेंट घेण्यापेक्षा, एखादा तगडा रोल करून ऋषी कपूर सारखी तगडी सेकंड इनिंग गोविंदाच्याही नशीबी असूदे असं वाटतं...

एखादा तगडा रोल करून ऋषी कपूर सारखी तगडी सेकंड इनिंग गोविंदाच्याही नशीबी असूदे असं वाटतं...>>> अगदी! त्या मुव्हीच प्रमोशन बघताना जाणवलेल एक म्हणजे हे ना हिरो ना फादररोल करण्याच वय फार कमी जणाना हॅन्डल करता येत, त्यामुळे या स्टेजला उगाच कड्वट होवुन अ‍ॅक्टर लोक फिरत असतात, आणी नाही ते धाडस करतात, गोविन्दा कितिही फिट असला तरी हिरो च्या पक्तित बसत नाही, वयाप्रमाणे स्वतःला बदलायला हरकत नाही.

डिस्ट्रिब्यूटर्स नी नाकारलेला, लिमिटेड बजेट मधे बनलेला, खराब निर्मितीमूल्य असलेला आणखी एखादा सिनेमा करून रिटायरमेंट घेण्यापेक्षा, एखादा तगडा रोल करून ऋषी कपूर सारखी तगडी सेकंड इनिंग गोविंदाच्याही नशीबी असूदे असं वाटतं...+१
उत्तम कलाकार, जबरा कॉमेडियन, अफलातून डान्सर (आजही!) असं सगळं असून सुद्धा स्वतःच्या चूकांमुळे गोविंदाचं करियर अकाली संपलं म्हणायला हरकत नाही. हल्ली हल्ली आलेला 'पार्टनर' बर्‍यापैकी जमला होता, 'भागमभाग' काहीही होता.. आणि 'आ गया हिरो' चे प्रोमोज पाहूनच काहीच्या काही असणार असं वाटतच होतं. कधी काळी एकापाठोपाठ एक हिट्स देणारा, चार्टबस्टर्सवर गाणी नं.१ स्थानी ठेवू शकणार्‍या गोविंदाचा असा विनोद कांबळी झालेला पाहून वाईट वाटतं.

किल दिल अन हॅपी एंडिंग सिनेमे म्हणून पडले असले तरी गोविंदाचा परफॉरमन्स खणखणीत होता...

त्याच्यातल्या अभिनेत्याची एक चुणुक दाखवणारा किल दिल मधला हा एक सीन बघा, अन मग पहा...
स्वतःच स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवून काय वेळ ओढवून घेतलिये...

तनु वेड्ज मनु पहिला बंडल होता. त्याच्या दुसरा भाग पहिल्यापेक्षा बकवास होता, >> निषेध Happy
माईलस्टोन सिनेमे आहेत दोन्ही. पहिला बिना मसाल्याचा सिनेमा कसा असावा ह्याचा परिपाठ आहे तर दुसरा मसाला सिनेमा कसा असावा ह्याचा.

सहमत! पहिला मला गाण्यासाठी आवड्ला, दुसरा त्याच परफेक्ट कन्टीन्युएशन साठी आवडला , कग्नणा च रिअल पोन्टेशनल या दोन्हीत पहिल्यादा दिसल... तिच स्टाइलिन्ग पण भारि आहे दोन्हीत.

तनु वेड्ज मनु पहिला बंडल होता. त्याच्या दुसरा भाग पहिल्यापेक्षा बकवास होता, >> निषेध Happy>> Happy (माझ्या मते) असं लिहायचं राहिलं! Wink
असो. पण रंगून आपटलेला पाहून फारच वाईट वाटलं Sad

कंगणा काही चित्रपट सोडल्यास कायम सायको वाटते. क्वीन व तनु वेड्स मनु-२ मधले तिचे दुसरे रुप फार छान होते. चेहरा शांत सालस वाटला. बाकी सगळ्याच चित्रपटात तिचा चेहरा बघताना एक वेडी सायको किलर ला बघतोय असे वाटत राहते.
चेहर्‍यावर मग्रुरी, बेफिकरी बर्‍याच चित्रपटात सारखी आहे.

मस्त रे, अँकी! गोविंदाबद्दलच्या सर्व मतांशी सहमत.

दीपस्त, कंगणा बद्दल +१
कंगणा स्व्तःच एक आपटीबार आहे. त्यामुळे चित्रपट आपटल्यास नवल काय ते .

तसेच नंतर उर्मिला मातोंडकर चे झाले नंतर ती सगळ्याच चित्रपटात वेडी वाटू लागली.
मला तर hritik पण वाटतो तसा कोई मिल गया छाप
काबिल मध्ये त्याला आंधळा करापेक्ष वेडसर करायला हवे होते

अरे अरे अरे... असे शिक्के मारू नका. रंगून पहा आणि मग ठरवा वेडी आहे की नाही ते. हृथिक बॅंग बँग आणि जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये कोई मिल गया छाप दिसतो का? Happy उलट आय कँडी दिसतो एकदम...

असो. अँकी, गोविंदाबद्दल एकदम पर्फेक्ट लिहिलं आहेस. गोविंदाचे एक्स्प्रेशन्स म्हणजे एक नंबर. त्याला आजही तोड नाही. पण ही चित्रपटसृष्टी क्रूर आहे एकदम. एखादा बाजूला पडला की संपतोच जवळपास. अमिताभ आणि ऋषी कपूरला जमलं, पण अयशस्वी ठरलेले अनेक!

ऋषी कपूरवरून आठवलं- परवा "औरंगजेब" पाहिला. अर्जुन कपूरचा मला वाटतं दुसरा चित्रपट हा. जबरदस्त सिनेमा आहे. ऋषी कपूरने काय काम केलं आहे त्यात! मुळात स्टोरीच मस्त आहे. सतत वळणं आहेत. मजा येते बघायला. इन्स्पेक्टर आर्यची भूमिका करणारा अभिनेताही भारी आहे त्यातला.

त्यावरून आठवलं, की जॅकी श्रॉफही पुष्कळच टिकून आहे की. छोट्या रोलमध्ये का असेना, पण दिसत राहतो सतत. सरकार ३ मध्येही आहे. मग गोविंदाला का जमू नये? त्याची आधीची टपोरी इमेज पुसता येत नाहीये का त्याला? हे जे आपण पब्लिकच शिक्के मारतो ना की हा असाच, ती तशीच वगैरे, त्यामुळे होत असावं का हे? मग अभिनेतेही नवीन काही करून पहायला कचरतात का?

Pages