चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I swa force 2. John ab is looking really old and tired. Very weird story. Copied scenes. Villain is good youngish looking guy. You end up thinking poor boy for him. Stunts are good. One time watch.

लोगन सॉलिड आवडला. स्टोरी मध्ये काही नाविन्यं नाही मागच्या 'अंडरवर्ल्ड' च्या स्टोरी सारखीच आहे साधारणतः , पण जॅकमन ला बघून पूर्ण सिनेमा फार मस्तं वाटत रहाते. अ‍ॅक्शन पेक्षा ईमोशन्स एनकॅश करणारा पहिलाच एक्स मेन सिरिज चा सिनेमा म्हणावा लागेल. आताश्या एका हाताचे तीन पैकी एक ब्लेड बाहेर येत नाही आणि तो ते ओढून काढतो ते पाहून खरंच फार भरून आले.
पण खूप मुलं न दाखवता एकाच मुली भोवती सिनेमा ठेवला असता तर अजून चांगला वाटला असता.

ह्यु जॅकमन ऑल टाईम फेवरेट माझा...
फ्रँचायझी मधला शेवटचा पिच्चर मोठ्या पडद्यावर मिस करुच शकत नव्हती...बघुन आली...
वाटल कि त्याचा शेवट बघवेल कि नाही पण हॉलीवूडवाले कम्माल करतात...इमोशन्स टाकतात पण गरजेपुरतेच..मुळ कथेच्या गाभ्याला धक्का लागु देत नाही...तरी अजुनही तो आला वुल्वरिन म्हणुन दिसणार नाही याची खंत वाटते.. पूर्ण एक्स मॅन सिरीज या एका कॅरेक्टरसाठी पाहणारी मी आता बाकीचे चित्रपट अगदी आवर्जून वगैरे पाहिल अस वाटत नाही...

ललि तुझी पोस्ट आवडली होती मागच्या पानावरची. खास करून मसान बद्दलची.
सुदैवाने लगेच या वीकेन्ड ला स्टार गोल्ड सिलेक्ट एच डी वर मसान लागला होता तो पाहून घेतला. त्या चॅनल वर सगळे हटके सिनेमे लागतात. डिअर डॅड पण पहायचा आहे, कुणी पाहिला असला तर प्लिज रिव्ह्यु लिहा.

मसान सिनेमा फार आवडला, बनारसचे घाट, ते शालु गुप्ताला शोधणं, तिचा आवाज टेप करणं, शायरी... सगळं सगळं खूप आवडलं. गंगेत डुबकी मारून अधिकाधिक नाणी गोळा करणारा चिमुरडा पण मस्त.
एकही पात्र अस्थानी नाही या सिनेमात.

एकदा जरूर पहावाच.

मला सर्वात जास्त विकी कौशलचं काम आवडलं.. रमन राघव मधे कित्ती वेगळं पात्र साकारलय त्यानं..मी आधी रमन राघव पाहिला अन मग मसान त्यामुळे दोन टोकाच्या भुमिका त्याच ताकदीने उभा करणार्‍या ते पन अगदी पहिल्या दुसर्‍या चित्रपटात याच कमाल वाटली.. मस्तच..
संजय मिश्रा इज अ जेम.. देव करो त्याला असेच छान छान चित्रपट मिळत राहो..

आपल्या महान सेन्सॉर बोर्डने ला ला लँड ला देखिल ए सर्टिफिकेट दिले आहे आणि त्याच सुमारास आलेल्या बेफिक्रे ला U/A! आहे की नाही कमाल!

दक्षे Happy
शनिवारी डिअर डॅडचा टेलिव्हिजन प्रिमिअर होता बहुतेक. पण मला पाहता नाही आला.

अदिती, स्टार गोल्ड सिलेक्ट एच्डीवर आता अधूनमधून मसान दाखवतीलच. त्या चॅनलवर लक्ष ठेव.

बेफिक्रे ला U/A! >> तो मेंदूची वाढ न झालेल्या लोकांसाठीच आहे! मोजून १५ मिनिटे पाहू शकलो. हा सिनेमा आदित्य चोप्राचा 'मै प्रेम की दिवानी हूं' आहे!

आगावा Biggrin
पण चोप्रांच्या 'अच्छे दोस्त' गिरणीचा खरंच उबग आलाय आता Angry

बेफिक्रे अजून बघितलाच नाहीये. काय क्रावे?
मी स्वामी आणि अपने पराये असे दोन सुद्द तुपातले फॅमिली सिनेमे बघितले. अतिश्य संथ पेस व सरधोपट कथा, व सादरीकर ण. पीळ बधीर सिनेमे आहेत दोन्ही. आये ना बालम्का करु सजनी गाणे मस्त आहे. स्वामी मधले. बाकी दोन्हीकडे तेच मोठे बंगाली घर. ते चालवणे काही स्वैपाक घरातले काही रूम मधले सीन् म्हणजे भलते सलते काही नाही हिरोइन अपमान झाला की धावत येउन बेडवर पडते. तेच मोठे लोड तक्के उश्या व बंगाली बेड. दोनी सिनेमाचे नेप थ्य अगदी सारखे आहे.

स्वामी मध्ये शबाना आझमी विक्रम कि काय त्याच्या दोन मिनिटात प्रेमात पड्ते. ज्या ओल्या झाडा वरून एक ट्यालाही जाणे खरेच अवघड आहे तिथून तो तिला उचलून घेउन चालत जातो व दोघे पावसात भिजतात. खाली भयानक स्पीडचा ओढा वाहत आहे. तरी ते त्यात पडत नाहीत. ही प्रेमाचीच कृपा. लगेच तिचे लग्न गिरिश कर्नाड बरोबर होते. ती काही सासरी त्याचा मान राखत नाही. त्यासा ठी काहीही करत नाही. घरचे ड्रामे बघत राहते व पुस्तके वाचते. कार ण मना विरुद्ध लग्न!!! आधी तर फार स्त्रीवादी बड्बड करत असते. मग विक्रम तिथे येतो व ती त्याचा लिटरली हात धरून पळते. पण ट्रेनची वाट बघे परेन्त तिला उपरती होते. गि. क. पण तिला घ्यायला येतो. व सासूची माफी मागणे हे तुझे कर्त व्य आहे असे बजावतो. विक्रम सपाट चेहर्‍याने हे बघतो. पूर्ण चित्रपट भर शबाना सडू चेहर्‍याने वावरते. हम बोअर होचुके सनम चीच स्टोरी आहे.

अपने पराये मध्ये मध्यमवर्गीय गरिबी. अमोल पालेकर शबानाचा नवरा व दोन पोरे. आशालता मोठी जाउ. पण घर शबानाच्या तालाव र चालते. इथे गिरिश कर्नाड मधला दीर व भारती आचरेकर भोचक मधली जाउ आहे. हे कारस्थाने करून अमोल शबानाला हाक लून लावतात. गावी पण त्यांची हलाखीची परिस्थिती होते. शेवटी शबानाने देवा ला प्रार्थना केल्याव्र मोठा दीर उत्पल दत्त, मनाने चांगला येतो व प्रॉप्र्टी हिच्या नाववर करून देतो. ते आशालताचे घर चालवायला परत येतात. अगदी प्रचंड आर्थिक त्रासात देखील अमोल पालेकरचे पात्र काही झटून उद्योग व्यापार काम शारिरिक काम काहीच करत नाही. मृदंग वाजवून गाणे म्हणतो व ही लोर्‍या म्हणते. शेवट गोड गोड !! इथे पण सेम कॉट्न साड्या, बंगाली माहौल आणि घरातल्या कटकटी किचन पॉलिटिक्स. भाज्या आणणे, बनवणे. मुले झोपवणे. कपाटा तून पैसे काढून आणणे इत्यादि.

अमा, Lol
अतिचशय तंतोतंत. दोन्ही शिणुमे पाहिलेत. तुम्ही धमाल परीक्षण लिहिलत.

अमा Biggrin

बेफिक्रे वीकांताला मॅक्स एचडीला लागला होता तेंव्हा अधुन मधुन पाहिला.
- शेवट प्रियदर्शन नी गेस्ट डिरेक्टर बनून केल्यासारखा वाटला.
- रणावीर कितीही आवडता असला तरी तो अभिनयाला सीरियसली घेणारा माणूस आहे (ऋतिक सारखा) त्यामुळे त्याला लाईट रोल झेपला नाही. त्यासाठी हॅपी गो लकी टाईप माणूस पाहिजे. सैफ नी तो रोल झोपेतही यापेक्षा सहज अन बरा केला असता.
- वाणी कपूर शुद्ध देसी रोमान्समधे आवडली होती. इथे फार जास्त पुरुषी वाटली. तिचं वॉर्डरोब, तिची हाडाडलेली जॉ लाईन, सगळंच ऑड होतं.
- लबोंका कारोबार, उडे दिल बेफिक्रे अन नशे सी चढ गई गाणी ऐकायला कितीही छान वाटत असली तरी सिनेमात अस्थायी वाटली.
- आदी चोप्रनी कथेकडे जरा लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं.

अमा Lol
जबरी. शबाना आणि विक्रम म्हणजे अभिनयाची लेव्हल बॅलन्स करायल घेतली असावी पेअर Happy

हाहा अमा हे दोन बघितलेत की नाही आठवत नाही पण शबाना चे अश्या टाईप सिनीमे बघितले आहेत.

अंजली कॉमकास्ट घेतल्यामुळे नेट्फ्लिक्स बंद केला आहे. मसान einthusan वर बघितला.

नाही प्रोव्हाडर्स मधे कॉन्फ्लिक्ट नाही. गेले कित्येक वर्ष्य नेट्फ्लिक्स वापरले, हिन्दी मुव्हीज चा काही खास चॉईस नसतो(१ वर्ष्यापुर्वी तरी) नेट्फ्लिक्स वर. नेट, फोन टीव्ही च पॅकेज घ्यायच होत म्हणुन कॉमकास्ट घेतले. तेव्हा नेट्फ्लिक्स आणि हुलु बंद केल. $१२०+ कॉमकास्ट ला दिल्यावर $१५/२० नेफि/हुलुला देण जिवावर आले. Happy

ओह :). काँमकास्टचे स्वतःचे ही ऑन-डीमाण्ड पूर्वी सुरू झाले होते. आम्ही नंतर बदलल्याने माहीत नाही आता किती "रिच कन्टेण्ट" आहे. त्यांचा प्लॅन होता नेफि वगैरे शी स्पर्धा करण्याचा.

नेफिवर आता बरेच आले आहेत हिन्दी.

अमा Lol . शबानाला हल्लीच नीरजा पहायला सुरुवात केलीये त्यात पाहिली. थोडाच वेळ पाहिला. चार्म गेलाय असे वाटले. Sad

आगाऊ, बेफिक्रे १५ मिनिटे पाहिलास म्हणजे तरी भरपुर वेळ पाहिलास की.

नीरजा बघितला ! एखादी हीरॉइन आवडत नाही म्हणजे नाही अस काहिस माझ सोनमच्या बाबतित आहे, एकतर अ‍ॅक्टिन्गची गन्धवार्ताही बापाकडुन वारश्याने अजिबात मिळाली नाही... तस ते मान्य करण्याइतकी ( ट्विन्कल खन्ना इतकी) कुवतही नाही.. ती उत्तम ड्रेस-डिझायनर होवु शकते. तो सेन्स तिच्यात बराय जरा! असो! ...तर निरजा, मुव्ही चान्गलाय, खुप लाबण अजिबात लावलेली नाही, सोनम ने बरच बर काम केलय, शबाना आझमी मात्र अजिबात आवडली नाही , अजिबात सहजता नाहीये तिच्या भुमिकेमधे, तीच्यात आणि सोनम मधल बॉन्डिन्ग नॅचरल अजिबात वाटत नाही.(मुळ निरजा भानोत फार वेगळी आणी सुन्दर दिसते, )

शबाना मला कुठ्ल्याच चित्रपटांत आवडत नाही. फायरर्च्या वेळी तिने म्हणे अट घातली होती मेन कॅरॅक्टर्स्ची नावे राधा आणि सीताच ठेवायची. मला ती अगदी विचित्र पर्सनॅलिटी वाटते.

अमा Lol

तो स्वामी, शाळेत असताना कधीतरी टीव्हीवर बघितला होता, तेव्हा दूरदर्शन वर सगळेच बघायचो, जे लागतील ते, मला विक्रम आवडायचा. स्वामीचे दोनंच सीन आठवतायेत. एक गि क पाय धुताना आणि शेवटचा रेल्वे platform वरचा.

अन्जु सेम हिअर Lol
मला पण दोनच सीन... एक ती पुस्तक वाचत बसलेली असते तो, त्यात तिने अशी काही पांढरी सुती साडी आणि लाल ब्लाउ़ज घातले आहे बहुधा... आणि शेवटी प्लॅटफॉर्म वर फणकार्यात बसलेली शेजारी ट्रंक

अमा Lol
स्वामी मधली गाणी फार आवडतात मला. का करू सजनी, पल भर मे ये क्या हो गयाआ, यादोमे वो सपनो मे है - धडकन का बंधन तो धडकन से है . गि. क. मात्र मुळीच आवडत नाही. शिल्पा शेट्टी चा धडकन याचाच रिमेक आहे बहुतेक.

अनेक पुरस्कार मिळालेला 'रंगा पतंगा' रविवारी स्टार प्रवाह वर पाहिला. फारच निराशा झाली.
मकरंद अनासपुरेचा सिरियस रोल (तोच तोच पणा असला तरी त्याचे विनोदी सिनेमे प्रचंड आवडतात), नंदिता धुरी (एलिझाबेथ एकादशी फेम), उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार विजेता संदीप पाठक यांच्या मुळे फार अपेक्षा होत्या .
अतिसंथ सिनेमा ... पाहताना कुठेच सिनेमाशी कनेक्ट होऊ शकलो नाही. शेवट तर अक्षरशः .. चला एकदाची मिळूदे ती बैलजोडी असं करत ओढून ताणून दाखवलेला योगायोग वाटला !
साधारण अशाच प्रकारची कथा असलेला 'टिंग्या' जास्त भावला होता. तो पाहताना, त्या लहान मुलाचं बैला वर असलेलं प्रेम सादरीकरणातून छान उतरलं होतं..

सैराट खूपच गाजल्याने अति उत्साहाने कन्नड वर्जनचा ट्रेलर पाहिला आणि का? का? का? असे झाले.
तसाही सैराट ठिकच होता(माझ्या मते) पण कन्नड वर्जन पाहून पच्चाताप( आर्ची म्हणते तसेच) होइल.
आर्चीला ( अका: रिंकू राजगुरुला) फक्त आणि फक्त तेलुगु आणि कन्नद मूवीमश्येच काम मिळु शकेल असे तिचे रूप झाले आहे. भयानक जाडी वाढलीय आणि कन्नड सिनेमांधली ठोकळेबाज अभिनय. अरारा वाटेल इतका विचित्र रीमेक आहे. ...
फक्त लंगड्या आणि हिलाच घेतलेय , बाकी सर्व कन्नड ठोकळे आहेत...

Pages