Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पार्च्ड् बघितला. सगळ्यांची
पार्च्ड् बघितला. सगळ्यांची कामं सुरेख. त्या सुरवीन चावला ला बघून ऐश्वर्या आठवत होती.
m s dhoni cha koni review
m s dhoni cha koni review lihila nahi ?
M S Dhoni is good movie. One
M S Dhoni is good movie. One time watch. Thoda motha aahe. First half mast aahe. Second half thoda boar hoto. But overall OK. Sushant Singh acted well and the actress who played Sakshi is also very good. But watch in theatre only. I watched on Dasara and it was houseful. In NCR this movie is Superhit
मला ही राजस्थान च वाटल पण
मला ही राजस्थान च वाटल पण नेटावरच्या माहितीत गुजरात म्हट्लय,_____ भाषेचा लहेजा राजस्थानीच आहे
पार्च्ड् बघितला. सगळ्यांची
पार्च्ड् बघितला. सगळ्यांची कामं सुरेख. >>>> मला पाहायचा आहे.सगळ्यांचेच डोळे खुप बोलके वाटतात मला ट्रेलर मधले.
एम.एस धोनी चा रिव्ह्यु कुणी
एम.एस धोनी चा रिव्ह्यु कुणी ही लिहिला नाही? कालच पाहिला खूप आवड्ला. एकदा बघ्ण्या सारखा आहे आवर्जून बघा आणि आपल्या मुलांना ही दाखवा. तो टी.सी होता हे माहित नव्हते.. किती सराव आणि मेहनत करून तो आज ह्या पदावर पोचला आहे.

proud of him!
सुशांतसिंग राजपूत..बेस्ट !
काल मिर्झ्या थोडा पाहिला.
काल मिर्झ्या थोडा पाहिला. हीरोचा चेहरा दिसतच नाही नीट. चेहर्याचा पाऊण भाग केसांनीच व्यापलेला आहे. अनिल कपूरचा मुलगा किती हँडसम असेल म्हणून पहायचा प्रयत्न केला तर एक नंबर कळकट माणूस निघाला. असो ती हिरोईन बरी आहे पण अॅक्टींगच्या नावाने शंख वाटली. अतिशय संथ चित्रपट आहे. दोन डाय्लॉग्स किंवा सीन्स च्य मध्ये २-३ सेकंदाचे टींग टॉंग असे पार्श्वसंगित... पेशन्स संपला.
इथले लेख वाचू वाचू काल अर्थ
इथले लेख वाचू वाचू काल अर्थ परत पाहिला. यूट्यूब वर दोन तीन अगदी महत्वाचे सीन सेन्सर केले आहेत. श बाना त्या दोघांना पार्टीत शिव्या घालते तो. आणि स्मिताचे दोन महत्वाचे सीन. पण बघताना जाणवले की अगदी सर धोपट मांडणी आहे. एक रिलेशन शिप संपली की दुसरा माणूस जागा घ्यायला तयार आणि वेल ऑफ कंडिशन मध्ये अगदी रेडी आहे. त्याचे काहीच नखरे, इत्यादि नाहीत. हा सिनेमा चा एक वीक पॉइंट आहे. असे रिअल लाइफ मध्ये होत नाही. तिला रिबाउंड मध्ये जायला सुद्धा वेळ दिलेला नाही. शबाना आईच्या आग्रहास्तव स्मिताला भेट्ते तो सीन खूप टची आहे.पहिले नवरा शबानाला सांगतो प्लीज लीव्ह अस अलोन. व शेवटी स्मिता त्याला म्हणते लीव्ह मी अलोन. असा हा प्रवास आहे.
रोहिणी हट्टंगडींचा पोलिस स्टेशनमधला दोन मिनिटांचा सीन एकदम ट डोपा. आहे. मुलीला वार्यावर सोडून द्यायचे ती चिंता. तिला आपण झाडू पोछा पण शिकवले नाही. ह्यातले फ्रस्ट्रेशन. किती ताकदीची अभिनेत्री. एकून अगदी अलवर हाताळणी वाटली. आता रिअल लाइफ व एकूण चित्रिकरण खूप ग्रासरूट्स लेवहलचे व व्हायोलंट असते. शेवटच्या सीन मध्ये शबानाची साडी खूप सुरेख. सर्व चित्रपट भर एकच साधी पर्स. व एंडिंगला सिलुएट मध्ये ती , मुलगी कडेवर आणि खांद्याला पर्स. पिक्चर कंप्लीट. लै भारी. स्मिताचे कपडे त्यामानाने जरा अत्रंगी एटीज स्टाइल अग्ली आहेत. शबानाचे कॉटन चुडीदार सूट्स, ओढणी घ्यायची सिस्टीम अगदी आम्ही तसेच ऑफिसात जायचो. व फॅन्सी म्हणजे चायना सिल्कची साडी.
गाणी एकदम मिळमिळीत आहेत. एखादे रुना लैला स्टाइल "तुम्हे होनहो मुझको तो इतना यकीं है" गाणे हवे होते शबानावर.
मुंबई शहरात येणार्यांचे व राहणार्यांचे प्रश्न आजही सेमच आहेत. नोकरी, राहण्याची जागा. रिजेक्षन झाल्यावर दोघांचे अंडा ब्रेड खाणे. सो क्यूट.
माझा राहिला अर्थ
माझा राहिला अर्थ पाहायचा..
शोधावा लागेल .
शेवटी जर आपल्याला समजले नसेल
शेवटी जर आपल्याला समजले नसेल तर राज किरणचे पात्र समजावून सांगते तुम्हारे जीवनका अर्थ क्या है. तुम्हे अपने पीछे कोई राज /मल्हो त्रा की गरज नही है तुम अपना पाथ खुद चुन सकती हो जी सकती हो इत्यादि. ओह लीव्ह ऑलरेडी.
अमा छान पोस्ट अर्थ जितक्या
अमा छान पोस्ट
अर्थ जितक्या वेळेला पाहू तितक्या वेळेला नव्याने उलगडतो
परवा रजनीकांतचा "कोच्चडियान"
परवा रजनीकांतचा "कोच्चडियान" अॅनिमेटेड मुव्ही हिंदीत लागला होता टीव्हीवर. टीपी आहे एकदम.
त्यात जॅकी श्रॉफ, दिपीका पदुकोण पण आहे.
व्हेंटिलेटर पाहिला का
व्हेंटिलेटर पाहिला का कोणी..??
मटा मधे ४ स्टार दिले आहेत..
'व्हेंटीलेटर'. चांगला
'व्हेंटीलेटर'.
चांगला आहे.
वॉर्निंग - जितेंद्र जोशी जर क्षणभरही सहन होत नसेल (काहींना नाही होत) तर पाहू नका. लीड रोल आहे. मला सहन होतो, मी पाहिला. मस्त काम केलंय.
जोशीसह गोवारीकर लीड रोल. एन्सेम्बल का काय म्हणतात, तशी स्टार कास्ट आहे आणि सगळ्यांचीच कामं भारी आहेत.
डिसेंट मूव्ही, पण जरा लांबलेला. सव्वा दोन ताससुद्धा जास्त वाटतात आजकाल.. साहजिकच आहे, कारण आजकाल मूव्हीचा रनिंग टाईम 'नेट' असतो. पूर्वी ७-८ गाणी असायची. आता एकही नसतं किंवा अगदीच एखादं वगैरे. त्यामुळे सव्वा दोन तास खूपच होतात. विदाउट गाणी फार तर शंभर मिनिटं किंवा लेट्स से, दोन तास पुरेसे असायला हवे.
असो. एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. फ्रेश लूक आणि सगळ्याच फ्रेम्स खूप अर्थपूर्णही वाटल्या. कहाणी छोटीशी आहे, ती बुकमायशोवर सिनॉप्सिसमध्ये समजेल. वाचू शकता.
लाल रंग नावाचा पिक्चर पाहिला.
लाल रंग नावाचा पिक्चर पाहिला. रणदीप हुडा अतिशय आवडतो फक्त त्याच्यासाठी. बाकी काहीही माहित नव्हते. अमेझिंग मुव्ही आहे. रणदीप ने मस्त च काम केलेय. हुडा फॅन्स ने जरूर बघा. त्याची देहबोली, हरयाणवी भाषा मस्तच! सबटायटल्स वाचावे लागले बर्ञाचदा. पण चालतंय. कातील दिसतोय हुडा एकदम.
बाकी हिरो हिरवीन माहित नाही. पण जो अजून एक हिरो दाखवलाय त्याचे पण काम मस्त झालेय. नावावरून सांगायचे तर रक्तदान आणि त्याच्याशी संबंधीत गैरव्यवहार यावर हा चित्रपट आहे. एकदा बघणेबल आहे नक्कीच.
इंथुसान. कॉम वर पाहिला.
कुणी डिअर जिंदगी पाहिला आहे
कुणी डिअर जिंदगी पाहिला आहे का? पाहिला असेल तर कसा आहे ते लिहा.. बघण्याचा विचार आहे.जर सो सो च असेल तर थिएटर ला नाही बघणार..टीवी वर येईल तेव्हा बघू
डीअर जिंदगी रीलीज झाला का ???
डीअर जिंदगी रीलीज झाला का ???
हो.कालच रिलीज झाला आहे. आलिया
हो.कालच रिलीज झाला आहे. आलिया भट्ट मूळे बघायचा विचार आहे
गौरी शिन्देचा आहे त्यामुळे आज
गौरी शिन्देचा आहे त्यामुळे आज पाहणार आहे. एक मिनिमम दर्जा असणारच आहे. सर्वत्र ३ स्टार दिसत आहेत. मायबोलीवर कुजकट परीक्षण येइपर्यन्त थांबा::फिदी:
आताच दंगल पाहिला. अप्रतिम
आताच दंगल पाहिला. अप्रतिम सिनेमा आहे. आमीरने मि परफेक्शनिस्टचा किताब राखला आहे. शब्दच नाहीयेत...
कुस्तीची एव्हढी माहिती याआधी कधीच मिळाली नाही. पॉइण्ट्स कसे मिळतात. डिफेन्सिव्ह म्हणजे काय, अॅटॅकिंग खेळणे म्हणजे काय, किती राउंड्स असतात. दिलेल्या वेळेचा फायदा कसा उचलतात हे अगदी बारकाईने, तपशीलवार दाखवतानाच मनोरंजनाचे मूल्यही कमी पडू दिलेले नाही. संगीत सिनेमाला साजेसे आहे. ते कुठेही सिनेमावर भारी पडलेलं नाही. खूप दिवसांनी सिनेमा चाललाय एका दिशेला आणि गाणी एका दिशेला असं झालेलं नाही. सुलतान प्रमाणे ठिगळांचा सिनेमा नाही दंगल. प्रसंगांची लांबी कमी ठेवायची हा अलिकडच्या सिनेमातला अट्टाहास नसल्याने ते चांगले खुलवता आले आहेत.
पटकथा सशक्त आहे. दिग्दर्शकाने कॅप्टनशिप अतिशय उत्तम केलेली आहे.
आमीरचे घर दाखवलेय त्याच्या भिंतींचे रंग उडालेले, जुने दरवाजे असे तपशील वेळोवेळी जाणवतात.
कल तू उन सब छोरीयों के लिए लड्डेगी | तू उन सबसे लडेगी जो सोचते है की छोरीयां होत्ती है चुल्हा पालने के लिये | कल तू अपने लिये नही देश के लिये लडेगी |
सॅल्युट यार !!!
गिरीश कुलकर्णीच्या चाहत्यांसाठी प्रेक्षकांसाठी इंटरव्हलच्या आधी एक सुखद धक्का आहे.
दंगल????????????????? झाला
दंगल????????????????? झाला का रिलिज?
जानेवारीत सिक्रेट सुपरस्टार
जानेवारीत सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमा येणार आहे, तो ही आमीर खान प्रोडक्शन्सचा आहे. खरं तर किरण रावचा सिनेमा अस्णार आहे हा. पण त्यात आमीर नसणार.. ट्रेलर वरून खूप वेगळा वाटतोय...
यू ट्युब वरून बुरखा घेतलेली नाव न सांगणारी एक गिटारिस्ट मुलगी जिला घरून कुठलेही प्रोत्साहन नाही, असलीच तर १९६० बंधने आहेत ज्यामुळे ती ओळख देऊ शकत नाही. घरी कळलं तर या भीतीने..
दंगल अप्रतिम सिनेमा आहे.
दंगल अप्रतिम सिनेमा आहे. आत्ताच पाहीला.
दंगल खरोखरच दंगल आहे. कुस्ती
दंगल खरोखरच दंगल आहे. कुस्ती लढती अगदी खर् या वाटतात. कुठेही मोठी उपदेश पर भाषण नाहीत. चारी मु ली छानच.
समाज काय म्हणेल याची पर्वा न करत मु लींना कुस्तीवीर बनवणर्या आणि वडीलांंची साथ देत ध्येय साधणार्या फोगट कुटुंबा बद्दल total respect.
दंगल चे रिव्ह्यू सगळीकडेच
दंगल चे रिव्ह्यू सगळीकडेच चांगले आलेत. खुप दिवसांनी कथेबद्दल चांगले वाचायला मिळाले.
थोरल्या गीता फोगटचं काम
थोरल्या गीता फोगटचं काम करणारी म्हणजे चाची-४२० मधली लहान मुलगी, भारती, आहे असं आज पेप्रात वाचलं.
दंगल पहिला नाहीये पण ती यंग
दंगल पहिला नाहीये पण ती यंग भारती खूपच कॅटरिना सारखी दिसते नाही का ?
फोटो बघितलेत
जानेवारीत सिक्रेट सुपरस्टार
जानेवारीत सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमा येणार आहे, तो ही आमीर खान प्रोडक्शन्सचा आहे. खरं तर किरण रावचा सिनेमा अस्णार आहे हा. पण त्यात आमीर नसणार.. ट्रेलर वरून खूप वेगळा वाटतोय..>>> आहे तो त्या सिनेमात. टिझरमध्ये दाखवलाय त्याला.
दंगल पहिला नाहीये पण ती यंग
दंगल पहिला नाहीये पण ती यंग भारती खूपच कॅटरिना सारखी दिसते नाही का ? >> प्रियंका गांधी सारखी दिसत होती ती. काम चांगलं केलंय तिनेही आणि ज्यु. गीतानेही.
उद्याचीच तिकीट बुक केलीत .
उद्याचीच तिकीट बुक केलीत . खूप दिवसांनी आवर्जून थेठरात जाण्यासारखा सिनेमा वाटतोय. सगळीकडे चांगलेच रिव्ह्यू आलेत .
Pages