चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ललिता-प्रीति आणि अंजू.

आत्ता सहज पहिली काही पानं चाळली ह्या धाग्याची. कालची पोस्ट लिहिताना आणि एकंदरीतच हल्ली मला वाटतं की मराठी सिनेमाची आपण जरा जास्तच पीसं काढतो की काय. उदा. बहुतांशी वास्तववादी वाटणार्‍या हिंदी चित्रपटांतही अवास्तव अशा गोष्टी असतातच पण त्याकडे दुर्लक्ष करुन मला चित्रपट बघता येतो ( काही हिंदी चित्रपट अ आणि अ कॅटेगरीच असतात पण ते नेमके त्याच कारणासाठी बघितले जातात. डोकं बाजूला ठेवून चार घटका एंजॉय करण्यासाठी Wink )
मराठी चित्रपटाबाबत मात्र त्या लगेच डोळ्यांत खुपतात आणि हळहळ वाटते. एक निरीक्षण म्हणून नोंदवावेसे वाटले Happy

अगो, खुप छान लिहिलंय.. असा विषय मराठीत येईल असे वाटले नव्हते कधी.. पण प्रत्यक्षात असे घडले तर तोड कशी निघत असेल, ते पण कळत नाही. बहुतेक दोघांपैकी एक जोडी नक्कीच त्याग करत असेल.

अगो चांगलं लिहिलंय पण पुढची पोस्ट पण एकदम पटली . हिंदी सिनेमातल्या किती तरी अवास्तव गोष्टी आपण चालवून घेतोच कि .दुर्लक्ष करतो . चालायचंच अशा प्रतिक्रिया देतो . मग मराठी सिनेमाचं का एवढं मनावर घ्यायचं ? त्याला का वेगळी फुटपट्टी लावायची ?

बहुतेक दोघांपैकी एक जोडी नक्कीच त्याग करत असेल.

नाही नं... तेच तर लिहिलेय वर. मी चित्रपट पाहिला नाहीय पण असे वाटतेय की जेष्ठ जोडी सिरियस आहे पण कनिष्ठ जोडी बहुतेक आकर्षणाच्या पातळीवर आहे. अगोने लिहिलेय ते चित्रपटातही चर्चिले गेले असेल तर पुढे जाऊनही त्यात त्याग नसावा, तर असेही नाते होऊ शकते, त्यात गैर किंवा अनैतिक काहीही नाही असे मला तरी वाटले.

त्या भविष्यातील शक्यतेसाठी आकाश-मीराने सुंदर वर्तमानावर पाणी सोडावं की नाही ह्याचं संदिग्ध उत्तर मात्र नक्कीच मिळतं.

संदिग्ध की नि:संदिग्ध उत्तर ??? संदिग्ध म्हटले तर त्याचा अर्थ निटसे उत्तर मिळाले नाही असा होतो ना?

याच तमिळ सिनेमा आठवला याच थीमवरचा, हेमा मालिनी आणि कमल हसन होते त्यात, फक्त त्यांनी परंपरेला अनुसरुन अतिरंजित शेवट केला होता.

याच तमिळ सिनेमा आठवला याच थीमवरचा, हेमा मालिनी आणि कमल हसन होते त्यात, फक्त त्यांनी परंपरेला अनुसरुन अतिरंजित शेवट केला होता.>>>एक नई पहेली कि हे राम?

धन्यवाद.

साधना, कुणी त्याग करतं की नाही ह्याबद्दल मी काहीच लिहिलं नाहीये. त्यासाठी चित्रपट पाहायला हवा.

नि:संदिग्धपणे मला संदिग्ध उत्तर मिळते असंच लिहायचं आहे Wink

हेमामालिनी, राजकुमार, कमल हसन आणि पद्मिनी कोल्हापुरेचा एका चित्रपट होता न ? नाव नाही आठवत त्याचे पोस्टर आठवतेय फक्त.

हेमामालिनी, राजकुमार, कमल हसन आणि पद्मिनी कोल्हापुरेचा एका चित्रपट होता न ? >> एक नयी पहेली नाव त्याचे. k. balachandar ह्यांनी स्वतःच्या मूळच्या तमिळ सिनेमा (Apoorva Raagangal ) वरून काढलेला . तमिळ सिनेमाला National awards वगैरे मिळालेली. तोही कुठल्या तरी अमेरिकन सिनेमावरून inspired होता.

एका फिल्मचे नाव पाहिजे त्याबद्दल कुठे लिहु ते काही कळत नाही त्यामुळे इथेच विचारते Happy

मी लहान असताना टिव्हीवर एक इंग्रजी चित्रपट पाहिला होता. आता नीट आठवत नाही पण साधारण कथा अशी होती की त्यात एका माणसाला ट्युमर असते. त्याचा तो ट्युमर काढण्यासाठी ४-५ जणांच्या टिमला आपल्या रक्तातल्या पेशींपेक्षापण लहान करुन एका इंजेक्शनने त्या पेशंटच्या शरिरात सोडले जाते. मग सुरु होतो त्या टिमचा पेशंटच्या शरिरातील प्रवास. तो प्रवास बघायला तेव्हा मला खुपच मज्जा आली होती. आम्ही चारही भावंडांनी टिव्हीच्या अगदी जवळ बसुन, अजिबात न हालता तो चित्रपट एंजॉय केला होता.
खुप दिवस झाले मला तो चित्रपट पुन्हा बघण्याची हुक्की आली आहे पण त्याचे नावच माहित नाही. ताई आणि भावांना पण नाव आठवत नाही. इथे जर कोणाला या चित्रपटाबद्दल माहित असेल तर कृपया मला त्याचे नाव सांगा.
आगाऊ धन्यवाद.

हीच कल्पना अजून एका हॉलिवूड चित्रपटात वापरलेली ज्यात एका स्त्रीच्या शरीरात मिनिएचर माणूस जातो. फॅटस्टिक व्हॉ एज आठवत नाही पण हा दुसरा आठवतोय.

अजुन कुठे बघता येईल?>>
दुर्दैवाने 'ती' साईटही बंद झाली आहे. Sad

आत्ता सहज पहिली काही पानं चाळली ह्या धाग्याची. कालची पोस्ट लिहिताना आणि एकंदरीतच हल्ली मला वाटतं की मराठी सिनेमाची आपण जरा जास्तच पीसं काढतो की काय. >>> अगो +१ मलाही असं बर्‍याचदा जाणवलं आहे, कुठेतरी लिहिलं पण होत बहुतेक.

ल्ली मला वाटतं की मराठी सिनेमाची आपण जरा जास्तच पीसं काढतो की काय.

>>

कारण हिंदीवाले सरळ हा धंदा आहे अशा अ‍ॅप्रोचने आम्ही तुमचे दोन घटका मनोरंजन करतो तुम्ही पैसे टाका , या भूमिकेने कोणतीही ढोंगबाजी न करता सिनेमे काढतात आणि दाखवतात.
मराठीवाले आम्ही काहीतरी मराठी संस्कृती वाचवण्यासाठी, मराठी भाषा वाचवण्यासाठी, हटके, ध्येयवादी, काही संदेश देऊन सकल जनांना शहाणे करून सोडण्यासाठी कथित कलात्मक , सामाजिक बांधीलकी जपण्याच्या कृतक उद्देशाने, आम्हाला जगवणे हे प्रेक्षकांचे कर्तव्यच आहे मुळी ह्या अ‍ॅटीट्यूडने तद्दन सपक आणि बालिश चित्रपट काढतात. एखादी हटके दोन ओळींची कथावस्तू घेऊन बॉलीवूडचाच दुय्यम मालमसाला भरून हे घ्या आम्ही नवीन प्रयोग केला आहे असे भासवतात. थोडक्यात ताकाला जाऊन गाडगे लपवायची त्याना सवय आहे. त्यामुळे तशा अपेक्षा पूर्ण न झाल्याने लोक सोलतात त्याना. हिंदीत खुल्लम खुला व्यावसायिक मामला असल्याने आणि लोक त्याच अपेक्षेने जात असल्याने लोक समजून घेतात Happy

सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत असलेला पाछेड सिनेमा नेटफ्लिक्स वर बघितला गुजरात मधल्या ( अस नेटवर म्हटल अस्ली तरी सगळ्या देहबोलि,प्र्था,कपडे आणी चित्रपटात दाखवलेल्या गावावरुन राजस्थान असावे) एका खेड्यात राहणार्‍या ४ महिलाची कथा, समाजाच्या बन्धन आणी पुरुषी अत्याचार या सगळ्याला रोज तोन्ड देत त्याचि ज्गण्याची धडपड.मनातल्या सुप्त इच्छा पुर्ण करण्याचा प्र्यत्न यावर बेस्ड स्टोरी आहे, चित्र्पटात येणारी बोल्ड दुर्ष्य वेगळी काढुन नेटवर टाकणार्‍याने काय विचार केला त्यालाच माहिती कारण ही सगळी दुष्य चित्र्पटात अगदी सहजतेने येतात, पुर्णपणे स्टोरीशी सुसन्गत, चारही मुख्य कलाकारानी अतिशय उत्तम भुमिका केल्यात, राधिका आपटे किति चान्गल काम करते हे नव्याने सान्गायचि गरज नाही पण सुरविन चावला वॉज सरप्राइझ फॉर मी, तिच्या वाट्याला आलेली भुमिका तिने फार सहजेतेने केलीये.

ओह तो पाछेड आहे का? मी "पार्चड" असा स्पेलिंग वरून उच्चार समजायचो. गुजराती शब्द आहे का?

पारछेड पाहिला कालच, आवडला.
राधिका आपटे आणि इतर स्त्रियांचा पण सुरेख अभिनय.
प्राजक्ता,
गुजराथ मधला आहे का ? मला राजस्थानी वाटला.

हैप्पी भाग जायेगी पहिला , आवडला, अभय देओल नेहमी प्रमाणे मस्तच Happy पूर्ण मूवी मध्ये काही खूपच छान सीन्स आहेत. पाकिस्तानी नटी पण मस्त वाटली.

Pages