मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या तारखेला मी लैंगिक असमाधानाचे उसासे सोडत आहे, एक दिवस येथील लोकांच्या मार्गदर्शनामुळेच लैंगिक समाधानाचे सुस्कारे सोडत असेल.>>>>>Crying with laughter आईगं! आवरा याला आता कुणीतरी!

काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते..>>>>>>>
फक्त तरुण मुलीच चिकन्/मटण खरेदी करतात का आम्हाला तर तरुण मुलेसुद्धा अशी खरेदी करताना दिसतात जे भविष्यात बाप्/पिता होणारेत मग त्यांच्याबद्दल शंका येत नाही? का पुरुष हार्टलेस असतात असे म्हणायचेय

आवरायला गेलो आणि धरलं तर..

बाकी काही नाही पण सूड म्हणून मॅगीत अंडं आणि आमटी घालून खायला लावेल याचीच भिती वाटते!
Wink

असामी, भा,:D Lol

बाकी बाळ ॠन्मेष आला म्हणजे धागा सुसाट धावणार आणि उचकवणार्‍या धाग्याचे विनोदी धाग्यात रुपांतर होणार.

अरेरे ! काय चाल्लयं हे ! फूल टू धमाल चाललीये..सगळेच्जण टाईमपास्चं स्तोम कावून माजवून राह्य्लेत... प्रॅक्टाकली... काम धंदा नाय काय... नोटबंदी.. भष्ट्राचाराला कंटाळली वाटतं पब्लिक Happy
बाकी काही नाही पण सूड म्हणून मॅगीत अंडं आणि आमटी घालून खायला लावेल याचीच भिती वाटते!>>>> आणि त्या पाकृचा इथं धागा काढेल....

आजच्या तारखेला मी लैंगिक असमाधानाचे उसासे सोडत आहे, एक दिवस येथील लोकांच्या मार्गदर्शनामुळेच लैंगिक समाधानाचे सुस्कारे सोडत असेल.>>> तु सनी लिओनीचे जुने अॉस्करपात्र सिनेमे बघत जा रे तुला उस्कारे आणि सुस्कारेतला फरक कळेल Wink

सातीमाय तूच गो तूच.
तू आलीस आणि आपोआप आवरलाच की गो बाळ तुझा Happy
काल नव्हतीस तर बघ काय झालं होतं त्याला आणि आज बघ अजून आरवला नाहीये Wink

आजच्या तारखेला मी लैंगिक असमाधानाचे उसासे सोडत आहे, एक दिवस येथील लोकांच्या मार्गदर्शनामुळेच लैंगिक समाधानाचे सुस्कारे सोडत असेल. >> लैंगिक समाधानाच्या बाबतीत 'लई गीक' झालाय पोरगा. Lol

श्री, Lol

तु सनी लिओनीचे जुने अॉस्करपात्र सिनेमे बघत जा रे तुला उस्कारे आणि सुस्कारेतला फरक कळेल >>>>> Rofl

पोरगं पार कामातून जायचं अश्यानं. Proud

पण त्याने ते सिनेमे बघितले नसतीलच कशावरून?>>>>> वेल सेड भाचा. त्यामुळेच तो स्वतःला लैगिंकदृष्ट्या असमाधानी समजत असेल. Lol

काल नव्हतीस तर बघ काय झालं होतं त्याला आणि आज बघ अजून आरवला नाहीये 
>>>>
आज माझी अर्धसंकष्टी होती म्हणून नव्हतो. आताच चिकनथाळी विथ एक्स्ट्रा जवळा वर तोंड साफ करून ती सोडली. आम्हा लोकांना ज्यांना "ते" समाधान मिळत नाही ना ते मग असे खाण्यात समाधान शोधतात.

अरारारा.....हितं पण फुल्ल टु राडा का? >>>

पुण्याला मोठं करणार्‍या स्वयंघोषित भगवानांनी सांगून ठेवलंय जे जे म्हणून नको असेल ते ते इतके करा की त्याचा वीट आला पाहिजे.

म्हणून हो केवळ म्हणून

कोणीसं म्हटलंच आहे ना जगाच्या कल्याणा पुण्याच्या विभुती म्हणून

चिकनथाळी विथ एक्स्ट्रा जवळा वर तोंड साफ करून ती सोडली
>>>
काय नाही समजले सस्मित.

चिकन थाळी - चिकन डिश असलेली राईस प्लेट, सोबत चपाती, कांदा, लोणचे .. पापड सोलकढी ईत्यादी

एक्स्ट्रा जवळा - सुका जवळा प्लेट एक्स्ट्रा मागवला. मच्छीचा फ्लेवर म्हणून.

तोंड साफ केले - खाल्ले. (जसे एखाद्याला मारणे म्हणजे हात साफ करणे तसे एखाद्याला कचाकचा खाणे म्हणजे तोंड साफ करणे)

ती सोडली - अर्धसंकष्टी जी सकाळपासून पाळलेली ती सोडली

चिकन थाळी - चिकन डिश असलेली राईस प्लेट, सोबत चपाती, कांदा, लोणचे .. पापड सोलकढी ईत्यादी

एक्स्ट्रा जवळा - सुका जवळा प्लेट एक्स्ट्रा मागवला. मच्छीचा फ्लेवर म्हणून.>>>>>>> इथवर कळलेलं.

मग तोंड साफ केले आणि सोडली काही टोटल लागत नव्हती.

मला वाटलं जवळ्याची तोंडं साफ केली आणि तो जवळा चिकनच्या रस्स्यात सोडला. पण अग पुन्हा ती सोडली वर गाडी अडलीच होती.

मी चिकन, मटण, जवळा, मासे, मच्छी खात नाही.
म्हणजे एकत्र असे, कॉम्बिनेशन मधे नाही खात, एकावेळी एकच आयटम खाते. चिकन तर चिकन. मटण तर मटण. मासे तर मासे. Happy

मला दोन अन्ननलिका आहेत एकातून मासे सोडतो तर एकातून चिकन. अन्नाची पिशवी मात्र एकच आहे. पण कोंबडी फडफड करत लौकर पोचते तर मासे आरामात पोहत जातात. त्यामुळे टेक्निकली मी एकाच वेळी दोन्ही खात नाही.
अर्थात जबडे मलाही सर्वांसारखेच दोन आहेत. त्यामुळे खाताना या जबड्याचे त्या जबड्याला कळत नाही.

Pages