मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेच तर नेमकं विरोधाभासाचं कारण आहे. आपल्या मुलावरील ममतेसाठी, दुसऱ्याशी क्रूरता....
समजा उद्या एखाद्या मुलाने child cannibalism चा हट्ट केला, तर ममतेपोटी ती आई हा पण हट्ट पूर्ण करेल.
आत्ता ही अतिशयोक्ती वाटत असेल. पण हे स्लो पॉयझनिंग आहे. एके दिवशी उग्र रूप दाखवेल. त्यादिवशी सर्व माबोकर child cannibalism ला सुद्धा जस्टीफाय करतील.
असो. सर्वांनीच मान्य केलं तर, कलियुगाचा अपमान होईल.......>> हे वाचून साक्षात लोटांगण घालावेसे वाटले. हे सगळे seriously लिहिले आहे का?

पद्म, हा लेख आणि हे सर्व प्रतिसाद वाचून एकच म्हण आठवते....
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता"
फक्त इथे जरा जास्त सोफिस्टिकेटेड गाढवं दिसताहेत....(परदेशातल्या गाढवांचा अहंकार तर सातव्या आसमंतात)

तुम्ही अशा टाइम पास ठिकाणी तुमचा लेख प्रदर्शित करून लेखाचाच अपमान केला आहे....
तुम्ही कवितेबद्दलही असेच केले, तिलाही अशीच रस्त्यावर टाकली.
असो, इच्छा तुमची.

जी माणसं मांसाहार करत नाही म्हणत म्हणत इतरांची डोकी खातात अशांचे काय करावे.>>>>>>

हर्पेन, अश्याच प्रकारचा प्रश्न माझ्या एका मित्राने मला विचारलेला मी त्याचे डोके पिडत असताना!

तेंव्हा त्याला म्हटले "बाबा रे शाकाहारी आहे म्हणूनच तुझे डोके खातोय कारण त्यात फक्त कांदे बटाटे आहेत!" Wink

असो! मला वादविवाद जमत नाही त्यामुळे असे धागे माझ्या कुवतीच्या बाहेर! Happy

गौरप्रेम म्हणजेच पद्म आहेत ना? मग स्वतःशीच का बोलत आहेत ?
सुंदर लेख. पण एक कळले नाही:
हो! त्याशिवाय थोडीच ही कन्सेप्ट लिहिली...
भरपूर देशांमध्ये महिला आपला गर्भ child cannibalism साठी भाड्याने देतात
>>>>>गर्भ भाड्याने द्यायचा आणि मग नरभक्षक लोक तो खाणार. भाड्याने दिलेली वस्तू तर काम झाल्यावर परत करावी लागते ना ? जसे भाड्याचे घर, कार वगैरे. मग खाल्लेला गर्भ परत कसा मिळतो ?

गौरप्रेम म्हणजेच पद्म आहेत ना? मग स्वतःशीच का बोलत आहेत ?>>>>> महोदय, माझे नांव पद्म आणि त्यांचा id पद्म. योगायोग समजा. त्यांचे नाव परेश आहे.

 child cannibalism
>>>>>
अरे हे काय असते कोणीतरी मराठीत समजवा..
जल्ला सगळा धागा त्यावरच चाल्लाय..

फे फे मांस आणि मास हा महान होता. 'पार कोथळाच काढलात' असे लिहिणार होतो पण विरोधाभासाचे लेबल लागायचे Wink

ओह ओके. मला लेटेस्ट वरच्या दोनेक पोस्टवरून तसे वाटले पण कन्फर्म करूया म्हटले.

पण असे खाणारे खरोखर असतात का?
तसेच ईतर प्राण्यांतही हे चालते का?
म्हणजे सिंहाने सिंहाला खाल्ले, वाघाने वाघाला गिळले, नागाने नागाला चावले, कावळ्याने आपल्याच अंड्याला चोच मारली, वगैरे वगैरे. कधी ऐकले नाही.

तसेच ईतर प्राण्यांतही हे चालते का? >> इतर प्राण्यांच्या तरुण माद्या चिकन/मटण खरेदी करतात का ते बघ कि आधी Wink

माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

>>>>

हे म्हणजे.. असच ना..

-- "झाडे लावा झाडे जगवा" म्हणने आणि फर्निचर शॉप मध्ये लाकडी चा फर्निचर आग्रह धरणे...
-- "मुक्या कळ्या तोडु नये बाळा" म्हणने आणि फ्लॉवर / ब्रोकोली फ्रय चा आग्रह धरणे

असामी Lol

ऋन्मेष, त्या 'इतर' प्राण्यांच्या माद्या आहेत रे. भलतेसलते विचार मनात आणू नकोस. Lol

"पार कोथळाच काढलात' असे लिहिणार होतो पण विरोधाभासाचे लेबल लागायचे" - Happy Happy

असामी, आज फॉर्म मधे आहे. (खरं तर फॉर्म चं उगाचच स्तोम माजवलं जातं. क्लास च पर्मनंट असतो.. ऊप्स, गल्ली चुकलं का हो हे पी.यल.? Happy )

असामी, ऋन्मेष, ते ईतर प्राण्यांच्या माद्यांचं डिस्कशन जबरी आहे Happy

भा तुम्ही माझ्या भा भडकवू नका. उगाच माझ्यातला मादीभक्षक जागवू नका..>> Rofl

अरे पुण्याच्या बाफावर सल्ला मागत होतास तो भा. ने इथे दिलाय एव्हढेच फक्त हाहा >> Lol

ऋ, तू तर अंडी खातोस मॅगीमध्ये घालून. म्हणजे लेखातली child विषयीची भीती तू अगदीच सार्थ करतोयस की! Lol

लेखातली child विषयीची भीती तू अगदीच सार्थ करतोयस की! >> भा लेखातला मुद्दा "अश्या मुली पाहून," आला होता. तुम्ही ऋ बद्दल वेगळाच विरोधाभास निर्माण करताय Lol

इतर प्राण्यांच्या तरुण माद्या चिकन/मटण खरेदी करतात का ते बघ कि आधी >>> Lol
ओ असामी मला गर्लफ्रेंड आहे. मला नाही बघायच्यात कोणाच्या तरुण माद्या. मरवाल फुकट. >>> तुझ्या लैंगिक असमाधानाचं तुणतुणं का वाजवत असतोस मग ? Proud

प्रत्येक धाग्याचं पाणी ऋच्या"च" वळचणीला काय म्हणून जात असेल अस एक भा प्रश्नं. Happy

राग मानू नको रे बाबा, ऋन्मेश

भा, भालतेसलते आरोप नकोत. मी फक्त चिकन म्यागीत अंडे घालून खातो. मायलेकरांची भेट घडवतो.

दाद, राग कसला. लोकांच्या प्रेमाचा राग यावा ईतका मी नतद्रष्टद्युम्न नाहीये.

आजच्या तारखेला मी लैंगिक असमाधानाचे उसासे सोडत आहे, एक दिवस येथील लोकांच्या मार्गदर्शनामुळेच लैंगिक समाधानाचे सुस्कारे सोडत असेल.

अहो तुम्हाला काय खायचे आहे ते खा. आमच्या ताटात का डोकावताय!>>>>>:हहगलो:

जी माणसं मांसाहार करत नाही म्हणत म्हणत इतरांची डोकी खातात अशांचे काय करावे.>>>>>:हहगलो:

Pages