मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चिकन, मटण, जवळा, मासे, मच्छी खात नाही.
म्हणजे एकत्र असे, कॉम्बिनेशन मधे नाही खात, एकावेळी एकच आयटम खाते. चिकन तर चिकन. मटण तर मटण. मासे तर मासे.

सस्मित,

ऋन्मेष सरांचे "आम्हा लोकांना ज्यांना "ते" समाधान मिळत नाही ना ते मग असे खाण्यात समाधान शोधतात." हे वाक्य नजरअंदाज करू नका. Happy

त्याच्या आम्हा मधे मी नाही ओ. बहुतेक तोच एकटा आम्ही आहे. हो हो. म्हणून तर एकावेळी एकच आयटम खाता तुम्ही नॉर्मल माणसांसारखा . Happy

भा Lol

मित्रों................. पेक्षा मेरे प्यारे माबोवासियों लई ड्यांजर. Wink

भा Proud

हर्पेन असे लांच्छन लावू नका.
मागे मी एकदा पुण्यात मिसळ खाल्लेली. त्यात कांदापोहे आणि बटाट्याची भाजी होती. ते चालते तर हे का नाही. मांसाहारी लोकांच्या नशिबी नेहमीच हेटाळणी का असते? आम्हालाच आमचे पावित्र्य नेहमी का सिद्ध करावे लागते?

मांसाहारी लोकांच्या नशिबी नेहमीच हेटाळणी का असते? >>> नविन धाग्याचे पोटेन्शियल असणारा मुद्दा आहे असे मी येथे नम्रपणे नमुद करु इच्छीतो.

ते आपण कधी डावी कडून खातो कधी उजवी कडून खातो त्या पोकळीला काय बोलतात मग?
मी या मेडीकल फिल्डमध्ये एकदम मुन्नाभाय आहे. प्रकाश टाका.

हर्पेन असे लांच्छन लावू नका.
मागे मी एकदा पुण्यात मिसळ खाल्लेली. त्यात कांदापोहे आणि बटाट्याची भाजी होती. ते चालते तर हे का नाही. मांसाहारी लोकांच्या नशिबी नेहमीच हेटाळणी का असते? आम्हालाच आमचे पावित्र्य नेहमी का सिद्ध करावे लागते?

ऋन्मेष सर माझी काय हिंमत तुम्हाला लांछन लावायची. पण पुणेरी मिसळवाल्याने चुना लावला तुम्हाला Wink

ते आपण कधी डावी कडून खातो कधी उजवी कडून खातो त्या पोकळीला काय बोलतात मग? >> त्याला 'गाल' असे म्हणत नाहीत का?

भा पण गाल बाहेरच्या पृष्ठभागाला म्हणतात ना.. उदा. ये तुझ्या गालाला गाल लावतो.. ते आतून कसे लावणार ..

आतमधल्या भागालाही मी गालच म्हणतो. फारतर 'गल्लपोकळी' म्हणू, म्हणजे जरा संस्कृतोद्भव नाव वाटेल. Lol

ते आपण कधी डावी कडून खातो कधी उजवी कडून खातो त्या पोकळीला काय बोलतात मग

ती पोकळी सगळी मिळून एकच त्यामुळे जबडापण एकच ! त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू. दोन जबडे नाही.

आणि काय ऐकतोय काय मी हे !
ये तुझ्या गालाला गाल लावतो.. ते आतून कसे लावणार ..

तुला अजून आतून गालाला गाल नाही लावता येत. तरीच तरीच तुला ते का ते कसलेसे समाधान मिळत नाही.

शिकून घे हो वेळेवारी

९८ प्रकार तर तुला भा पण शिकवेल Wink

त्यापुढचे शिकायचे असतील तर पुण्यात यावे लागेल Happy

आतून गालाला गाल लावता येतात... पुणेकर फ्रेंच लोकांच्याही पुढे गेलेत म्हणजे.. कधी येऊ गुरुदेव _/\_ मला सगळं शिकायचे आहे. आजवर माझ्या गालांना आतल्या बाजूने चिकन लॉलीपॉपच्या पलीकडे काही लागले नाहीये.. (बघा धागा शिताफीने कसा पुन्हा मांसाहारावर आणला)

भा पण गाल बाहेरच्या पृष्ठभागाला म्हणतात ना.. उदा. ये तुझ्या गालाला गाल लावतो >> भा ह्यात एक छुपा इशारा लपलेला आहे असे मला ऋ च्या 'त्या' पोस्ट वरून सारखे वाटतेय. सांभाळ, उगाच भलतेच स्तोम माजायचे Lol

>>>>मला दोन अन्ननलिका आहेत एकातून मासे सोडतो तर एकातून चिकन. अन्नाची पिशवी मात्र एकच आहे. पण कोंबडी फडफड करत लौकर पोचते तर मासे आरामात पोहत जातात. त्यामुळे टेक्निकली मी एकाच वेळी दोन्ही खात नाही.
अर्थात जबडे मलाही सर्वांसारखेच दोन आहेत. त्यामुळे खाताना या जबड्याचे त्या जबड्याला कळत नाही.<<<<

म्हणजे नॉर्मलच आहे की सगळं! आम्हाला उगाच शंका वाटायची.

अरे रे हा धागा कुणाचा... पद्मचा की ऋ. चा?

मी तर धाग्याचा विषय पण विसरलेलो....

एक लक्षात आले आहे की बाळ ऋ ची मजा घ्यायची असेल तर त्याला विरोध करायला जाऊ नये....

पु.ल. म्हणतात तसे, केटलू मज्जानू तर केटला मज्जानू

(वाचा)

मी तर नावानेच बदनाम आहे. मी काही धाग्याचा रोख वळवण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना माझ्या पोस्ट पाहिल्या तर मी लैंगिक मांसाहारावरच चर्चेचा फोकस कसा राहील हे बघितले आहे.

ऋन्मेष सरांचे "आम्हा लोकांना ज्यांना "ते" समाधान मिळत नाही ना ते मग असे खाण्यात समाधान शोधतात." हे वाक्य नजरअंदाज करू नका. >>> तु चुकुनही अख्खी कोंबडी आणु नकोस रे . Wink

सगलेच सुटलेत Lol

किती छळता रे पोरगं एकटं सापडलं म्हणून!

गाडी पुन्हा मांसाहारावर आणूया.

ऋबाळा, आज रात्री काय जेवायला संकष्टीचं?

Pages